कोरोना काळात हृदय निरोगी ठेवण्यासाठी करा ‘हे’ व्यायाम, अनेक आजार पळतील दूर

कोरोना काळात आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे झाले आहे. या काळात आरोग्याबद्दलचा थोडासा निष्काळजीपणाही धोकादायक ठरू शकतो.

कोरोना काळात हृदय निरोगी ठेवण्यासाठी करा 'हे' व्यायाम, अनेक आजार पळतील दूर
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 7:09 AM

मुंबई : कोरोना काळात आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे झाले आहे. या काळात आरोग्याबद्दलचा थोडासा निष्काळजीपणाही धोकादायक ठरू शकतो. विशेषतः हृदयरोग्यांनी स्वत: ची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण हृदयाच्या पेशंटला कोरोना इन्फेक्शन होण्याचा धोका 30 ते 40 टक्के जास्त आहे. हृदय हा आपल्या शरीराचा मुख्य भाग आहे, जो शरीराच्या इतर भागात रक्त पोहोचविण्याचे कार्य करतो. हृदयाची गती सुधारण्यासाठी नियमितपणे कार्डिओ व्यायाम करा आणि खाण्याकडे विशेष लक्ष द्या. (Special tips to keep the heart healthy during the corona period)

वॉकिंग चालणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. सोपा आणि उत्तम व्यायाम म्हणजे चालणे होय. जे लोक दररोज फिरायला जातात. त्यांना जीवघेण्या आजारांचा होण्याचा धोका कमी असतो. हा व्यायाम केल्याने तुमची रक्तातील साखर नियंत्रित होते. तर दररोज 35 ते 40 मिनिटे चाला.

दोरीवरच्या उड्या बहुतेक लोकांना असे वाटते की दोरीवरच्या उड्या मारणे फक्त मुलांसाठी असते. पण प्रत्येक वयोगटातील लोकांनी दोरी वरच्या उड्या मारल्या पाहिजेत. दोरीवरच्या उड्या मारणे हा एक सोपा व्यायाम आहे जो हृदयाचे ठोके सुधारतो. यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.

सायकलिंग जर आपण सायकल चालवत असाल तर हे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. सायकलिंगमुळे हृदयाची गती वाढते आणि रक्त परिसंचरण सुधारते. असे केल्याने तुमची मांसाची स्नायू मजबूत होते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.

पोहणे जर आपल्याला पाणी आवडत असेल तर आपण तंदुरुस्तीची पातळी राखण्यासाठी पोहू करू शकता. या व्यायामामुळे रक्तदाब कमी होतो आणि साखरेची पातळी वाढते. हे हृदयाची गती वाढवते आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते.

गुडघाचा व्यायाम हा एक कार्डिओ व्यायाम आहे. जो आपण सहजपणे घरी करू शकता. यासाठी, आपण सरळ उभे रहावे आणि डाव्या हाताच्या कोपऱ्याला स्पर्श केला पाहिजे तर उजवा पाय वरपर्यंत आणला पाहिजे. पुन्हा सुरूवातीच्या स्थितीवर या आणि आता ही प्रक्रिया डावीकडून पुन्हा करा. आपण 30 सेकंदांच्या ब्रेकवर हा व्यायाम दररोज 2 ते 3 सेटमध्ये करू शकता.

संबंधित बातम्या : 

एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Special tips to keep the heart healthy during the corona period)

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.