AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद लोकसभा : पाचव्या टर्मसाठी खैरेंवर मतविभाजनाची टांगती तलवार

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत. टीव्ही 9 मराठी राज्यभरातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर तसा शिवसेनाचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला गेली 20 वर्षांपासून खासदार चंद्रकांत खैरे यांनी राखून ठेवला. 2014 च्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे पराभूत होतील अशी शक्यता असताना काँग्रेसकडून प्रबळ उमेदवार दिला गेला नाही. नितीन पाटील यांना काँग्रेसने […]

औरंगाबाद लोकसभा : पाचव्या टर्मसाठी खैरेंवर मतविभाजनाची टांगती तलवार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM
Share

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत. टीव्ही 9 मराठी राज्यभरातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर तसा शिवसेनाचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला गेली 20 वर्षांपासून खासदार चंद्रकांत खैरे यांनी राखून ठेवला. 2014 च्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे पराभूत होतील अशी शक्यता असताना काँग्रेसकडून प्रबळ उमेदवार दिला गेला नाही. नितीन पाटील यांना काँग्रेसने बलाढ्य खैरेंच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवलं. तुल्यबळ असलेले नितीन पाटील आणि मोदी लाट यामुळे चंद्रकांत खैरे चौथ्यांदा जिल्ह्याचे खासदार झाले. काँग्रेसच्या नितीन पाटलांचा 1 लाख 62 हजार मतांनी पराभव झाला.

2014 मध्ये पडलेली मतं

शिवसेना, चंद्रकांत खैरे – 5 लाख 20 हजार 902

काँग्रेस, नितीन पाटील – 3 लाख 58 हजार 902

आप, सुभाष लोमटे – 11 हजार 974

खैरेंचा 162000 मतांनी विजय झाला.

2019 ची लोकसभा निवडणूक खैरे यांना चांगलीच अवघड जाणार आहे. शिवसेना आणि भाजपची युती न झाल्यास भाजपकडून अनेक इच्छुक आहेत. त्यात भागवत कराड यांचा तिकिटासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली असून दोन्ही पक्षांच्या आघाडीत औरंगाबादच्या जागेवर दोघांनी दावा केलाय. काँग्रेसकडून आमदार सुभाष झांबड गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. तर राष्ट्रवादीला जागा सुटल्यास आमदार सतीश चव्हाण दंड थोपटून तयार आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव स्वतःच्या शिवस्वराज्य बहुजन पक्ष या पार्टीकडून लोकसभा लढण्याच्या तयारीत आहेत. त्यातच संभाजी ब्रिगेडही लोकसभेत मराठा मतांना एकत्र करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतांच्या आकडेवारीत खैरेंचा विजयासाठी कस लागणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात लोकसभा मतदारसंघात सहा, तर जालना लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील चित्र

औरंगाबाद पूर्व – अतुल सावे – भाजप

औरंगाबाद मध्य – इम्तियाज जलील – एमआयएम

औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाठ – शिवसेना

वैजापूर – भाऊसाहेब चिकटगावकर – राष्ट्रवादी

गंगापूर – प्रशांत बंब – भाजप

कन्नड – हर्षवर्धन जाधव – शिवसेना

जालना लोकसभा मतदार संघात

सिल्लोड – अब्दुल सत्तार – काँग्रेस

फुलंब्री – हरिभाऊ बागडे – भाजप

पैठण – संदीपान भुमरे – शिवसेना असे आमदार आहेत.

यावेळी पुन्हा हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर निवडणूक?

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत तसा शहराचा विकास हा मुद्दा असायला हवा. मात्र गेली अनेक वर्षे तसं होत नाही. हिंदू आणि मुस्लीम याच मुद्द्यावर म्हणजेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक होत आली आणि या वेळी तोच प्रत्यय येईल अशी शक्यता आहे. 2019 च्या निवडणुकीत मराठा आरक्षण, धनगर आणि मुस्लीम  आरक्षणाचा मुद्दा नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे.

मराठा समाज काही अंशी शिवसेना आणि भाजपच्या पाठीशी असला तरी मात्र युती झाली तर धनगर आणि मुस्लीम आरक्षणाचा निर्णय होत नसल्याने युती न झाल्यास शिवसेना-भाजपला याचा फटका बसणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेली 20 वर्षे शिवसेना खासदार चंद्रकात खैरे निवडून येतात. 20 वर्षे हिंदुत्व याच मुद्द्यावर ते वावरत असतात. सर्वांना नेहमी उपलब्ध असणारे खासदार म्हणून खैरेंची ओळख आहे. त्यात ग्रामीण भागात धार्मिक बाबीत खैरेंची सर्वांना मदत असते त्यामुळे लोकप्रिय असलेले खासदार आहेत. मात्र विकासाच्या बाबतीत मागे पडतात.

औरंगाबाद विकासकामांपासून कोसो दूर

शहरात आणलेल्या कोणत्याच योजना पूर्ण नाहीत. मग ती पाणी पुरवठा असो, की भूमीगत गटार योजना असो, इतकंच काय, तर नवीन कुठलाच कारखाना आणण्यास ते अयशस्वी ठरलेत हे देखील तितकंच खरं आहे. याच मुद्द्यांवर 2019 च्या निवडणुकीत सर्व विरोधक आक्रमकपणे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसकडून आमदार सुभाष झांबड लोकसभेसाठी इच्छुक आहेत. गेली दोन वर्ष त्यांनी ग्रामीण भागात आपला संपर्क वाढवला आहे. कधी लग्नात तर कधी अंत्यविधीला झांबड आवर्जून उपस्थित राहत आहेत.

युती न झाल्यास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे भाजपकडून औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. मराठा उमेदवार आणि त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा फायदा होईल अशी भाजपला आशा असली तरी भाजपचे माजी महापौर भागवत कराड हे देखील इच्छुक आहेत. दुसरीकडे शिवसेना आमदार आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत खैरेविरोधात दंड थोपटले आहेत.

आगामी लोकसभेत निवडणूक लढवण्याची तयारी जाधवांनी सुरु केली आहे. मराठा क्रांती मोर्चात मराठा आरक्षणासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. कन्नड तालुक्यात त्यांचे वडील रायभान जाधव यांना मानणारा एक वर्ग आहे. तिच हर्षवर्धन यांची ताकद असून कन्नड तालुक्यात खैरेंना चांगलं मतदान होतं त्यावर परिणाम होईल अशी शक्यता आहे. त्यात मराठा समाजाची मतं मिळतील अशी अपेक्षा हर्षवर्धन जाधव यांना आहे. त्यात वंचित बहुजन आघाडी निवडणूक रिंगणात उतरल्यास मतांचं विभाजन कसं होईल त्यावर खैरेंचं भवितव्य अवलंबून आहे.

संबंधित बातम्या :

कल्याण लोकसभा : शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंसमोर यावेळी मनसेचं आव्हान

अहमदनगर लोकसभा : भाजपातूनच विरोध, यावेळी खा. दिलीप गांधींचं काय होणार?

शिरुर लोकसभा : यावेळीही शिवाजी आढळराव पाटलांना तोडीस तोड प्रतिस्पर्धी नाही?

वाशिम-यवतमाळ लोकसभा : पाचव्यांदा निवडून येण्यासाठी भावना गवळींचा मार्ग खडतर

हातकणंगले लोकसभा : 2014 ला एनडीए, 2019 ला राजू शेट्टींच्या खांद्यावर यूपीएचा झेंडा?

पालघर लोकसभा : पुन्हा एकदा वनगांच्या मुलाविरोधात भाजपचा उमेदवार? 

परभणी लोकसभा : अंतर्गत नाराजीने शिवसेनेला बालेकिल्ल्यातच भगदाड

कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!

रायगड लोकसभा : तटकरेंच्या घराणेशाहीला कंटाळलेले नेतेच राष्ट्रवादीला दगा देणार?

हिंगोली लोकसभा : मोदी लाटेतही निवडून येणाऱ्या राजीव सातवांचा मार्ग खडतर

नागपूर लोकसभा: संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी, गडकरींसमोरील आव्हानं काय?

उस्मानाबाद लोकसभा : राष्ट्रवादी जिव्हारी लागलेल्या पराभवाचा बदला घेणार?

माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.