AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : विधानसभा निकालानंतर मराठी माणसावरचे हल्ले वाढले – संजय राऊतांचा आरोप

कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले. कल्याणमध्येच नव्हे तर मुंबईतही अशा घटना घडल्या आहेत. मराठी माणसं घाणेरडी आहेत, त्यांना जगण्याचा अधिकार नाही. मुंबईतही मराठी बोलायचं नाही, मराठी माणसाला जागा नाकारण्यात येतात. ही हिंमत?

Sanjay Raut : विधानसभा निकालानंतर मराठी माणसावरचे हल्ले वाढले - संजय राऊतांचा आरोप
शिवसेना खासदार संजय राऊत
| Updated on: Dec 20, 2024 | 10:33 AM
Share

कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले. कल्याणमध्येच नव्हे तर मुंबईतही अशा घटना घडल्या आहेत. मराठी माणसं घाणेरडी आहेत, त्यांना जगण्याचा अधिकार नाही. मुंबईतही मराठी बोलायचं नाही, मराठी माणसाला जागा नाकारण्यात येतात. ही हिंमत? ज्या महाराष्ट्रामध्ये हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना निर्माण केली. भारतीय जनता पक्षाने, नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला. असा थेट आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळावी, त्याची लढण्याची ताकद नष्ट व्हावी यासाठीच हे केलं. अदानी, लोढा , गुंडेचा आणि सगळे इतर अमराठी बिल्डर यांच्या घशात मुंबईचा परिसर घालता यावा यासाठी मोदी, शाह , फडणवीस आणि त्यांच्या गोतवाळ्याने मराठी माणसाला कमजोर केलंय, असं राऊत म्हणाले. विधानसभा निकालानंतर मराठी माणसावर होणारे हल्ले वाढायला लागले आहेत , असा आरोपही राऊत यांनी केला.

कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर अमराठी लोकांनी निर्घृण हल्ला केला, त्याचे पडसाद मुंबईसह राज्यभरात उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते.

स्वत:ला जे शिवसेना समजणारे नामर्द लोक सरकारमध्ये बसलेत

स्वत:ला जे शिवसेना समजतात, मोदी-शहांनी ज्यांच्या हातात शिवसेना आणि चिन्हं दिले, ते नामर्द लोक सरकारमध्ये बसले आहेत, त्यांना कल्याणमधल्या घटनेची वेदना टोचत्ये का? असा थेट सवाल विचारत त्यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला. ते लोक नामर्द आहेत, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची मराठी माणसाची संघटना फोडायला मदत केली. ते सत्तेसाठी लाचार आहेत. त्यांनी मराठी माणसाचं नुकसान केलंय, असे टीकास्त्र राऊत यांनी सोडलं.

मराठी माणसाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं कारस्थान 

मुंबईचं गुजरातीकरण करायचं, उत्तर भारतीयकरण करायचं आणि मराठी माणसाला इथून कायमचं तडीपार, हद्दपार करायचं हे फार मोठं कारस्थान आहे. काल कल्याणमध्ये मराठी माणसावर जो हल्ला झाला, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली.

महाराष्ट्रातून मराठी माणसाला नष्ट करण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका आहेकाय अवस्था आहे मराठी माणसाची ?  . या सगळ्यांना स्वत:ला मराठी म्हणवून घेण्याची लाज वाटली पाहिजे, असं राऊत म्हणाले.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.