PHOTO: महापालिकेतच पावसाचा धिंगाणा, पार्किंगमध्ये झाड पडलं, स्मार्ट सिटी औरंगाबादची पुरती दाणादाण

सोमवारी रात्रीपासून झालेल्या पावसाने औरंगाबाद शहराची पुरती दाणादाण उडवली. शहरातील विविध भागातील घरांमध्ये पाणी शिरले, वीजेचे खांब कोसळून पडले. मात्र सर्वात चर्चेत राहिलेली घटना म्हणजे महापालिकेच्या पार्किंगमध्ये कोसळलेले झाड.

1/8
महापालिकेच्या परिसरातील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 1 आटो रिक्षा आणि  मारुती 800 ,महिंद्रा एसयूव्ही,टाटा नॅनो, स्पार्क व तवेरा या गाड्यांचे नुकसान झाले आहे. मनपा मुख्यालय टप्पा क्र 3 येथील व मनपा पार्किंग येथील कँटीन बाजूला असलेले झाड सकाळी कोसळले.

2/8

3/8
मनपा अग्निशमन विभाग,उद्यान विभाग ,वार्ड कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर काम सुरू करून रस्त्यावर पडलेले झाडे बाजूला करून रहदारीस झालेला अडथळा दूर करून वाहतूक पूर्ववत केली.

4/8
महापालिका परिसरात वाहनावर कोसळलेल्या झाडाला मोठ्या मेहनतीने बाजूला करण्यात आले. वाहनावर कोसळलेले भले मोठे झाड अक्षरशः करवतीने कापून काढले गेले. त्यानंतरच त्याखालील वाहनाचे काय हाल झाले, हे कळू शकले.

5/8
 महापालिकेतील टाऊन हॉल कला दालनाचे छतावरील कौलारू कोसळले आहे. याठिकाणी असलेले लिंबाचे झाड कोसळले असून कला दालन भिंतींना नुकसान झाले.  बाहेरील उभ्या असलेल्या मारुती अल्टो गाडीवर झाडाची फांदी पडून नुकसान झाले आहे. या ठिकाणी विद्युत पुरवठा खांब पडून विद्युत पुरवठा खंडित झाला.

6/8
 सोमवारच्या पावसामुळे शहरातील विविध भागातील वीजेच्या खांबांना फटका बसला. वादळी वाऱ्यासह पावसामुळे काही ठिकाणचे वीजीचे खांब कोसळले. तर अनेक ठिकाणी वीजेच्या तारा रस्त्यावर येऊन लोंबकळू लागल्या.

7/8
शहरातील अनेक भागांमध्ये वीजेच्या तारा खांबांपासून तुटून रस्त्यावर आल्या. त्यामुळे रात्रभरातल्या पावसाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सकाळपासून चांगलेच कामाला लावले. शहरातील विविध रस्त्यांवर कोसळलेल्या अशा धोकादायक तारांचा बंदोबस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर करावे लागले.

8/8
यावर्षी माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत खामनदी पुनर्जीवन मोहिमेअंतर्गत खाम नदीचे पात्र खोल करणे ,त्याची साफसफाई करणे,नदीचा प्रवाह सुरळीत करणे तसेच अतिक्रमण काढणे आदी मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे नदी जवळील  सखल भागात पाणी शिरण्याचे प्रमाण जवळपास शून्य झाले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI