PHOTO: औरंगाबादेत पुन्हा दाणादाण, मोठ-मोठी झाडं पडली, विजेचे खांब वाकले, कोर्ट परिसरात मोठे नुकसान

विशेष म्हणजे औरंगाबादमधील बुधवारचा हा पाऊस वीजांचा कडकडाट घेऊन आला. या वेळी वादळी वारेही प्रचंड वेगाने वाहत होते. या वाऱ्यामुळे बाबा पेट्रोल पंप ते एस.एस क्लब या रस्त्यावर मोठी झाडे उन्मळून पडल्याचे चित्र दिसले.

1/9
शहरात आज दुपारी अचानक पणे वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने जालना रोडवरील कुटुंब न्यायालय परिसरातील काही झाडे अचानकपणे पडली. या खाली काही कार तर काही दुचाकी अशी 25 ते 30 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  सदरील माहिती शहरातील अग्निशामक विभागाला देण्यात आली असून काही वेळात अग्निशामक विभागाचे जवान येथे पोहोचतील. सदरील घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

2/9
मागील आठवड्यातील पावसामुळे महापालिकेच्या परिसरात मोठे झाड पडले होते. तीच मालिका अजूनही सुरु असून आता शहरातील कोर्ट परिसरातील पार्किंमध्ये मोठे झाड कोसळले. आपत्कालीन पथकाद्वारे हे झाड हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

3/9
औरंगाबादेतील जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगमध्येच झाडे कोसळल्याने विविध वाहनांचे नुकसान झाले. अचानक झालेल्या या हाहाकारामुळे कोर्टातील सर्व कर्मचारीही घाबरले. आपापली वाहने सुरक्षित आहेत का हे पाहण्यासाठी कोर्टातील कर्मचारी बाहेर धावत आले.

4/9
मनपा कर्मचारी व आपत्कालीन विभागातर्फे कोर्ट परिसरातील पार्किंगमध्ये पडलेल्या झाडांना हटवण्याचे काम सुरु आहे. ही झाडे पडल्यामुळे किती वाहनांचे नुकसान झाले, याची माहिती लवकरच कळवली जाईल.

5/9
कोर्टाच्या पार्किंग परिसरात अचानक झाडे उन्मळून पडल्याने कोर्टातील कर्मचारी घाबरून बाहेर आले.

6/9
औरंगाबादमधील गोळीवाडा फाट्याजवळ भले मोठे झाड रस्त्यावर कोसळून पडले.

7/9
मुसळधार पावसामुळे औरंगाबाद शहर आणि परिसरात काही ठिकाणी वीजेचे खांबही वाकले.

8/9
पावसामुळे औरंगाबादमधील शहरांची तर पुरती वाट लावली आहे. कुठे नुकताच केलेला रस्ता उखडला आहे तर कुठे रस्त्याची दुरुस्ती सुरु असल्यामुळे वाहने चालवणे मुश्कील झाले आहे. ग्रामीम भागातील रस्त्यांवरून मोठी वाहने चालवणेही कठीण झाले आहे. शहरातील रस्त्यांवरून चालणारी वाहनेही अशा प्रकारे कलंडत आहेत.

9/9
बुधवारी म्हणजेच 06 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास औरंगाबाद शहरात अचानक झाकोळून आलं आणि काही मिनिटात धो-धो पावसाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे हा पाऊस वीजांचा कडकडाट घेऊन आला. या वेळी वादळी वारेही प्रचंड वेगाने वाहत होते. या वाऱ्यामुळे बाबा पेट्रोल पंप ते एस.एस क्लब या रस्त्यावर मोठी झाडे उन्मळून पडल्याचे चित्र दिसले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI