AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही मला मतदान करा ते माझ्यावरचं कर्ज समजेन अन्…; पंकजा मुंडे यांचं बीडकरांना आवाहन

Pankaja Gopinath Munde on Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक ही माझ्यासाठी महायुद्ध...; पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या... बीडकरांना पंकजा मुंडे यांनी काय आवाहन केलं? माझा विजय निश्चित आहे, असं पंकजा मुंडे नेमकं का म्हणाल्या? वाचा सविस्तर......

तुम्ही मला मतदान करा ते माझ्यावरचं कर्ज समजेन अन्...; पंकजा मुंडे यांचं बीडकरांना आवाहन
| Updated on: Apr 18, 2024 | 5:08 PM
Share

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. तसंच मतदारांना आश्वस्त करत आहेत. बीडमध्येही महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. प्रचारादरम्यान बोलताना पंकजा मुंडे यांनी बीडवासीयांना आवाहन केलं. यूट्यूब उघडलं की पंकजा मुंडे पडणार असं येत आहे… मला ही निवडणूक अवघड नाही. मला कुठलेही कपट कारस्थान न करता मतदान करा. मी जात कधीही काढणार नाही. ठिगळं लाऊन संसार करण्याची ताकत स्त्रीमध्ये असते. मी फेडणाऱ्या पैकी नाही, मी स्त्री आहे. मला शिवणं माहीत आहे. तुमचे मतदान मी कर्ज समजेन. व्याजासकट परत करेन, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी बीडकरांना केलं आहे.

विजयाचा विश्वास व्यक्त

आताची लोकसभा निवडणूक ही उज्वल भविष्याची आहे. शांत मनाने विचार करून मत द्या. विधानसभा निवडणूक पुढे आहे. ही निवडणूक संसदेची आहे. त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा. आपल्या बीडमध्ये मी सर्वात मोठं कॅन्सर रुग्णालय उभं करणार आहे. मी आपल्या जिल्ह्यासाठी उद्योग आणणार आहे. लोकांचे प्रेम आणि विश्वास माझ्यावर आहे. सुरेश धस हे माझ्यासोबत सदैव आहेत. माझी एकट्याची लीड नव्हे तर सर्व मतदारांची लीड राहील. कलयुगात अस्त्र शस्त्र घेऊन पुढे चालावं लागेल. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे. माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

बीडच्या राजकारणावर म्हणाल्या…

मी या भागात येणं नवीन नाही. 2009 ला मुंडे साहेब निवडणुकीला उभे होते. तेव्हा मी एक न एक गाव फिरले आहे. 2014 ला सुरेश धस आमच्याविरोधात राष्ट्रवादीकडून उभे होते. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमाणेच प्रीतम ताई यांची हट्रिक व्हावी अशी माझी ईछा होती. सध्याचे राजकारण डायनॅमिक झाले आहे. दोन दिवसात काहीही बदल होत आहेत. मी मागितले नाही तरीही मला उमेदवारी. मला मिळाली, हे ईश्वराचे दायित्व आहे. मी पालकमंत्री झाल्यावर जिल्हा परिषदेमध्ये सात सदस्य सुरेश धस यांनी दिले. जिल्हा परिषद ताब्यात घेतली. मुंडे साहेब गेल्यामुळे प्रीतम ताई राजकारणात आल्या. आताचा उमेदवार मी आहे. मी उमेदवार म्हणून पसंत आहे का? मग बदलून घ्यायचा का? पंकजा मुंडेंनी भर सभेत लोकांनी विचारले.

मला विजयी करा- पंकजा मुंडे

लहान बहिणीला जेवढे लीड दिलं. त्यापेक्षा छटाक भर मते मला जास्त द्या.. मी 22 वर्ष राजकारणात आहे. मग आता आभाळ का कोसळले आहे? ही निवडणूक संसदेची आहे. मोदी जी मला विचारतील पंकजा कुठे आहे म्हणून… तुम्हाला देखील अभिमान वाटेल बीडचे नाव दिल्लीत घुमेल. संसदेत मी उत्तर देईल. बीड जिल्हा हा माझं घर आहे, मी तुमची लेक आहे. आता मला निवडून द्या.. पुढे कोणालाही निवडून.आणू परळीचे लोक सध्या परेशान आहेत. पाच वर्ष झाले हैराण आहेत, असं पंकजा मुंडे बीडमधील सभेत म्हणाल्या.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.