AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election Results 2025 : एनडीएच्या बिहार विजयाचं हरियाणा कनेक्शन, महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याची खळबळजनक पोस्ट

बिहारमध्ये एनडीएचा दणदणित विजय झाला आहे, तर महाआघाडीला पुन्हा एकदा पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. भाजप सर्वाधिक जागांवर विजयी झालं आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर जेडीयू आहे. यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यानं केलेली पोस्ट चांगलीच चर्चेमध्ये आली आहे.

Bihar Election Results 2025 : एनडीएच्या बिहार विजयाचं हरियाणा कनेक्शन, महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याची खळबळजनक पोस्ट
Bihar Election Results Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2025 | 3:29 PM
Share

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल कसा लागणार? कोणाला बहुमत मिळणार, एनडीएची पुन्हा एकदा सत्ता येणार की? महाआघाडी बाजी मारणार याबाबत मोठी उत्सुकता होती, अखेर ही उत्सुकता आता संपली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा दणदणित विजय झाला आहे, तर महाआघाडी विशेष: काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सध्या समोर येत असलेल्या निकालानुसार भाजप सर्वाधिक म्हणजे 95  जागांवर आघाडीवर आहे, भाजप बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर नितीशकुमार यांच्या जेडीयूचा नंबर आहे. जेडीयू सध्या 82 जांगावर आघाडीवर आहे. तर या निवडणुकीमध्ये एलजेपीला देखील मोठं यश मिळालं आहे, या निवडणुकीत एलजेपी 20 जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान दुसरीकडे महाआघाडीला मात्र मोठा दणका बसला आहे. महाआघाडीचे उमेदवार केवळ 30 जागांवर आघाडीवर आहेत. तर सात ठिकाणी अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसची अवस्था तर खूपच बिकट बनली आहे, काँग्रेसचे उमेदवार अवघ्या तीन जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी एक पोस्ट केली आहे, ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 

‘हरियाणा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल होता. हे चित्र पोस्टल मतदानात देखील स्पष्ट झाले होते. EVM व्होटिंगदरम्यान पहिला एक तास हा कल पोस्टलप्रमाणेच राहिला. परंतु पुढच्या एक दीड तासात सर्व चित्र पालटले. भाजपा आश्चर्यकारक रित्या पुढे गेली आणि धक्कादायक निकाल समोर आला. आज सेम-टू-सेम याच पद्धतीचे चित्र बिहार निवडणुकी दरम्यान निकाल येताना दिसत आहे. येणाऱ्या निकालाने मतदान मोजणीत घोळ होतो यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सरकारचं बुजगावणं झालेल्या यंत्रणा, निवडणूक आयोग यामुळे एकंदरीतच लोकशाही आणि पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आलंय हे नक्की! महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा गुवाहाटी व्हाया सुरत जसा प्रवास झाला तसाच निवडणूक निकाल लावण्याचा आयोगाचा प्रवास हरियाणा टू बिहार व्हाया महाराष्ट्र असा दिसून येतो. असो, हि निवडणूक थेट बिहारची जनता विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यात आहे.

तेजस्वी यादव यांना मिळालेला प्रतिसाद त्यांच्या सभांमध्ये उसळलेला जनसागर आणि त्यांनी युवांचे, शेतकऱ्यांचे मांडलेले प्रश्न बघता आजचा निकाल काहीही लागला, तरी जनतेची खरी पसंद आणि जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मात्र तेजस्वी यादव आहेत यात तिळमात्र शंका नाही,’ अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.

बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे, काँग्रेस अवघ्या तीन जागांवर आघाडीवर आहे, तर संपूर्ण महाआघाडी केवळ 30 जांगावर आघाडीवर आहे. भाजप या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...