AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मी फक्त एकाच गोष्टीला घाबरते, ती म्हणजे….”, पंकजा मुंडेंनी केला खुलासा

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही बीड जिल्ह्यातील भगवान गडावर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

मी फक्त एकाच गोष्टीला घाबरते, ती म्हणजे...., पंकजा मुंडेंनी केला खुलासा
| Updated on: Oct 12, 2024 | 3:25 PM
Share

Pankaja Munde Dasara Melava 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. आज दसऱ्यानिमित्त राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याप्रमाणेच अनेक राजकीय नेत्यांकडून दसरा मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. नुकतंच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही बीड जिल्ह्यातील भगवान गडावर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे, सुजय विखे पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडेंनी ऊसतोड कामागारांचे प्रश्न मांडले.

पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात मी गरीबांसाठी काम करणारी आहे. राजकारणाला चिटकून बसणारी नाही. पाच लेकरांनी जीव दिला. त्या आमदारकीचं काय गोड वाटणार आहे, असे विधान केले. त्यासोबतच त्यांनी मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते, असे म्हणत एक मोठा खुलासा देखील केला.

असा दिवस कधीच येऊ देऊ नको

कितीही वर्ष लागो तुमचं जीवन सुसह्य केल्याशिवाय मी श्वास घेणार नाही. तुमच्या मुलांच्या अंगावरचा मळका शर्ट पाहून मला वेदना होते. पंकजा मुंडे कुणाला घाबरत नाही. अंधारात भेटत नाही. पंकजा मुंडे फक्त एकाच गोष्टीला घाबरते. या मैदानात माझं भाषण ऐकायला लोकं येणार नाही त्या दिवसाला घाबरते. भगवान बाबांना प्रार्थना करते असा दिवस कधीच येऊ देऊ नको. मी मंत्री असताना विकास केला. रस्ते दिले. या बीड जिल्ह्याला ऐतिहासिक विमा दिला. एकही गाव सोडलं नाही, असे पंकजा मुंडेंनी सांगितले.

जातीवर स्वार होणाऱ्यांच्या मागे उभं राहायचं

यावेळी गडबड झाली. आपल्याला ही गडबड दुरुस्त करायची आहे. छत्रपती घराण्याने गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम केलं. मी उदयनराजेंच्या प्रचाराला गेले,. त्यांनी मला त्यांच्या देवघरात नेलं. माझ्या हाताने आरती केली. त्यानंतर एका घरात नेलं तिथल्या खांबावर त्यांच्या वडिलांचा आणि गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे. आम्ही जात बघून काम करत नाही. आम्ही काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहायचं आहे. जातीवर स्वार होणाऱ्यांच्या मागे उभं राहायचं आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...