AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस गळतीने अनेक गावं हैराण, जागतिक आरोग्य संघटनेला बुलढाण्यात पाचरण करा, उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराची मागणी

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात गेल्या 20 दिवसांपासून पसरलेल्या केसगळतीच्या प्रादुर्भावाने 197 पेक्षा जास्त लोक बाधित झाले आहेत. स्थानिक आणि राष्ट्रीय आरोग्य संस्था केस गळतीचे कारण शोधण्यासाठी प्रयत्न करत असल्या तरी त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जागतिक आरोग्य संघटनेला पाचारण करण्याची मागणी केली आहे. आयसीएमआर आणि आयुष मंत्रालय यांची पथके नमुने गोळा करून संशोधन करत आहेत.

केस गळतीने अनेक गावं हैराण, जागतिक आरोग्य संघटनेला बुलढाण्यात पाचरण करा, उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराची मागणी
केस गळतीने अनेक गावं हैराण
Follow us
| Updated on: Jan 17, 2025 | 4:56 PM

बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यात गेल्या 20 दिवसांपासून केस गळतीच्या दहशतीन अनेकांना चिंताग्रस्त करून सोडले आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेपासून राष्ट्रीय पातळीवरच्या आरोग्य संस्था केस गळतीचे कारण शोधण्यासाठी बाधित गावात येऊन गेल्या आहेत. मात्र अजूनही केस गळतीचे नेमके कारण शोधण्यात या आरोग्य संस्थांना यश आलेले नाही. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांना देखील केस गळतीचे नेमके कारण सापडत नसेल तर आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था जागतिक आरोग्य संघटनेला या प्रकरणात पाचारण करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी याबाबत मागणी केली आहे.

केस गळती रुग्णांची संख्या आता 197 वर

बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगांव तालुक्यातील केस गळतीच्या रुग्णाची संख्या आता 197 वर पोहचली आहे. मात्र अद्याप 20 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरीही ग्रामस्थांची केस गळती कशामुळे होतेय? याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. केस गळती कशामुळे होतेय, याचा शोध घेण्यासाठी स्थानिक आरोग्य विभाग, आयुष मंत्रालयची टीम, आयसीएमआरचे पथक आतोनात प्रयत्न करत आहेत. शेगांव तालुक्यातील गावात आयुष मंत्रालयाचं पथक आणि आयसीएमआरचं पथक ठाण मांडून आहेत. दोन्ही पथकाकडून विविध प्रकारचे नमुने गोळा करण्याचे काम सुरु आहे. या नमुन्यांच्या अहवाल आल्यावरच या केस गळतीचे निदान होणार आहे. पण दुसरीकडे केस गळतीचे रुग्ण वाढतच आहेत.

शास्त्रज्ञांची वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांसोबत प्राथमिक चर्चा

शेगांव तालुक्यातील केस गळती बाधित गावांत आयसीएमआरचे पथक दोन दिवसांपूर्वी दाखल झाले. या शास्त्रज्ञांच्या टीममधील तज्ज्ञांनी जिल्ह्यातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांसोबत प्राथमिक चर्चा केली. त्यानंतर या पथकामधील शास्त्रज्ञांनी केस गळती भागातील बाधित रुग्णांशी संवाद साधला. शास्त्रांनी केस गळतीचे मूळ कारण शोधून प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने कामाला सुरुवातही केलीय. मात्र केस गळतीला तब्बल 22 दिवसांचा कालावधी उलटला तरीही आरोग्य विभागला केस गळती कशामुळे होत आहे, याचा शोध लागला नाही. परिणामी आजपर्यंत रुग्णाची संख्या वाढून ही 197 झालीय. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे आयसीएमआरच्या 8 तज्ज्ञांचे पथकाकडून विविध प्रकारचे नमुने घेतले जात आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. त्यावर संशोधन झाल्यावरच केस गळतीचे कारण समोर येणार आहे.

हे सुद्धा वाचा

‘कितीही दिवस लागले तरी आजाराचा शोध लावूनच जाऊ’

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 13 च्या जवळपास गावांमध्ये केस गळती आणि नागरिकांमध्ये टक्कल पडण्याच्या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणा हादरलेली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुंबई, चेन्नई, दिल्ली येथील तज्ज्ञांद्वारे या गावांच्या रुग्णांची तपासणी केली जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार सर्व पथके या गावांमध्ये पोहोचली. दरम्यान ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी, चेन्नई येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी सुद्धा तालुक्यातील बोंडगाव येथे पोहोचून रुग्णांच्या तपासणी सुरुवात केलेली. त्यांच्याकडून विविध सॅम्पल्स गोळा करण्याचे काम करण्यात आले. या सॅम्पल्सच्या तपासणीनंतर निष्कर्ष काढला जाईल, असे या डॉक्टरांनी सांगितले. कितीही दिवस लागले तरी आजाराचा शोध लावूनच या ठिकाणावरून जाऊ, असे डॉक्टरने सांगितले.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.