AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरएसएसच्या कार्यक्रमातून माघार ?, सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई यांनी काय म्हटले ?

मी आंबेडकरी चळवळीला वाहून घेतले आहे, पण मला एका कार्यक्रमामुळे कलंकित करण्याचा प्रयत्न होत आहे. आपण या कार्यक्रमाला जरी गेलो असतो तरी तेथे आंबेडकरी विचारच मांडले असते असेही कमलताई गवई यांनी म्हटले आहे.

आरएसएसच्या कार्यक्रमातून माघार ?, सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई यांनी काय म्हटले ?
kamaltai gavai and cji bhushan gavai
| Updated on: Oct 01, 2025 | 7:56 PM
Share

अमरावतीत येत्या ५ ऑक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला आपण प्रकृतीच्या कारणास्तव जाणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी अखेर स्पष्ट केले आहे. आपले वय आता ८४ झाले असल्याने प्रकृती बरी नाही, त्यामुळे आरएसएसच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही असे कमलताई गवई यांनी पत्राद्वारे जाहीर केले आहे. या संघाच्या कार्यक्रमाला कमलताई गवई जाणार असल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये अस्वस्थता होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त अमरावतीत आरएसएसचा येत्या ५ ऑक्टोबरला एक सोहळा आहे. हा सोहळ्याला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई या जाणार असल्याची एक निमंत्रण पत्रिका समाजमाध्यमातून व्हायरल होत होती. त्यानंतर आंबेडकरी अनुयायांच्या यावरुन नाराजी व्यक्त केली जात होती. त्यानंतर या कार्यक्रमाला आपण जाणार नाही असेही कमलताई गवई यांच्या हस्तलिखित पत्र व्हायरल होऊ लागले होते. त्यानंतर हे पत्र खोटे असून त्या या कार्यक्रमाला जाणारच आहेत असे सांगितले गेले होते. आता पुन्हा कमलताई गवई यांनी प्रकृतीच्या कारणामुळे आपण या कार्यक्रमला उपस्थित राहू शकणार नसल्याचे पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

अमरावतीत ५ ऑक्टोबरला RSS चा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून कमलताई गवई यांचे नाव समाविष्ठ असल्याची निमंत्रण पत्रिका समाजमाध्यमात व्हायरल केली जात होती. त्यानंतर आंबेडकरी समाजाकडून या संदर्भात टीका केली जात होती. अखेर आता कमलताई गवई यांनी पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

…तरी आंबडेकरी विचारच मांडले असते

RSSच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत कमलताई गवई यांचं नाव असल्याने वाद निर्माण झाला होता. त्यावर कमलताई यांनी पत्राद्वारे आपले मत मांडले आहे. माझं वय 84 असल्याने माझी प्रकृती बरी नाही, त्यामुळे आरएसएसच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही. मी आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेले आहे, पण मला एका कार्यक्रमामुळे कलंकित करण्याचा प्रयत्न होत आहे. आपण या कार्यक्रमाला जरी गेलो असतो तरी तेथे आंबेडकरी विचारच मांडले असते असेही कमलताई गवई यांनी म्हटले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...