Maharashtra Coronavirus LIVE Update : लोकांची चाचणी आणि लसीकरणावर जोर असणार : नितीन राऊत 

| Updated on: Jun 07, 2021 | 12:14 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : लोकांची चाचणी आणि लसीकरणावर जोर असणार : नितीन राऊत 
CORONA

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर आता ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करुन त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Jun 2021 08:43 PM (IST)

    लोकांची चाचणी आणि लसीकरणावर जोर असणार : नितीन राऊत 

    नागपूर : जिल्हा लेव्हल 1 ला असला तरी मागचा अनुभव विसरता कामा नये- नितीन राऊत

    काही कठोर नियम राहणार

    लोकांची चाचणी आणि लसीकरण यावर जोर असणार

    गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न

    शहरातील सर्व दुकाने, नियमितपणे सुरू होणार , वेळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल

    मॉल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू होणार

    नुसता बार असल्यास 5 वाजेपर्यंत सुरू आणि बार आणि रेस्टॉरंट असेल तर 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

    खासगी कार्यालयेसुद्धा 100 टक्के क्षमतेने सुरू

    खासगी 50 टक्के  आणि शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरू होणार

    खेळाची मैदाने सकाळी 6 ते 9 तसेच रात्री 6 ते 9 सुरु राहतील

    पालकमंत्री नितीन राऊत यांची माहिती

    जिम स्पा सलून 5 वाजे पर्यंत

    इंटर डिस्ट्रिक्ट ट्रॅव्हल सुरू राहतील

    शाळा ,महाविद्यालय ,ट्युशन क्लास बंद मात्र शाळा कार्यालय सुरू

    धार्मिक स्थळ बंद राहणार

    स्विमिंग पूल बंद राहतील

    विवाहासाठी 100 लोकांना परवानगी

    अंत्यसंस्कार  50 लोकांना परवानगी

    नियमांचं उलनघन झाल्यास कारवाई

    शनिवार रविवार सुरू राहील नियम घालून

    जमावबंदी लागू राहील
  • 06 Jun 2021 08:39 PM (IST)

    साताऱ्यात 1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित, 36 बाधितांचा मृत्यू

    सातारा कोरोना अपडेट

    साताऱ्यात 1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

    साताऱ्यात 36 बाधितांचा मृत्यू

    दिवसभरात 1110 नागरिकांना दिला डिस्चार्ज

    आज अखेर सातारा जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी

    एकूण नमुने -854809

    एकूण बाधित – 174590

    घरी सोडण्यात आलेले -155258

    एकूण मृत्यू -3864

    उपचारार्थ रुग्ण-15467

    सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांनी दिली माहिती

  • 06 Jun 2021 08:36 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली, सोमवारपासून अनलाॅकची प्रक्रिया सुरु 

    सातारा जिल्हयात पाॅझिटिव्हीटी दर कमी झाल्यामुळे सोमवारपासून अनलाॅकची प्रक्रिया सुरु

    सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास प्रशासनाकडून परवानगी

    अत्यावश्यक सेवांमध्ये किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, डेअरी, बेकरी, मटन, चिकन,अंडी इतर खाद्य पदार्थांचा समावेश

    आरोग्यसेवेशी निगडित मेडिकल सेवा पूर्ण वेळ सुरु ठेवण्यास परवानगी

    हाॅटेल,रेस्टाॅरंटमधील घरपोच पार्सल सेवेला परवानगी

    सार्वजनिक मैदानावर सोमवार ते शुक्रवार सकाळी 5 ते 9 यावेळेत फिरण्यास परवानगी

    सार्वजनिक तसेच गर्दीच्या कार्यक्रमांना मात्र प्रशासनाची कडक नियमावली

    शनिवार, रविवारी जिल्हयात कडक संचारबंदी लागू

  • 06 Jun 2021 08:02 PM (IST)

    नाशिकमध्ये दिवसभरात 880 जण कोरोनामुक्त, 324 नव्या रुग्णांची वाढ

    नाशिक कोरोना अपडेट

    आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 880

    आज रोजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ - 324

    नाशिक मनपा- 106 नवे रुग्ण

    नाशिक ग्रामीण- 201 नवे रुग्ण

    मालेगाव मनपा- 04 नवे रुग्ण

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 4940

    आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यू -23

    नाशिक मनपा- 11 जणांचा मृत्यू

    नाशिक ग्रामीण- 12 जणांचा मृत्यू

  • 06 Jun 2021 07:12 PM (IST)

    10 जूनपासून एमबीबीएसच्या परीक्षा, पॉझिटिव्ह येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी द्यावी : नाना पटोले

    गोंदिया : येत्या 10 जूनपासून एमबीबीएसच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यात सर्व विद्यार्थ्यांना RTPCR चाचणी बंधनकारक असून त्यामध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी देण्यात यावी अशी मागणी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले केली आहे.

  • 06 Jun 2021 06:08 PM (IST)

    नागपुरात आज 196 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 941 जणांनी केली कोरोनावर मात

    नागपुरात आज 196 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    941 जणांनी केली कोरोनावर मात

    तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्णसंख्या - 475792

    एकूण बरे होणाऱ्यांची संख्या - 463293

    एकूण मृत्यूसंख्या - 8959

  • 06 Jun 2021 06:07 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 297 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, 549 रुग्णांना डिस्चार्ज 

    पुणे कोरोना अपडेट

    दिवसभरात 297 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

    - दिवसभरात 549 रुग्णांना डिस्चार्ज

    - पुण्यात करोनाबाधित 25 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 9 रुग्ण

    - 662 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू

    - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 472254

    - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 4295

    - एकूण मृत्यू -8395

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 459564

    - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5868

  • 06 Jun 2021 05:30 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात आज आढळले 88 नवे कोरोना रुग्ण, 207 जणांना डिस्चार्ज 

    वाशिम कोरोना अपडेट

    जिल्ह्यात आज आढळले 88 नवे रुग्ण

    तर आज 207 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    तसेच 01 रुग्णाचा झाला मृत्यू

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 40616

    सध्या सक्रिय  रुग्ण – 984

    आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 39040

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 591

  • 06 Jun 2021 04:30 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमधील नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरमधून संगणक चोरीला

    पिंपरी चिंचवड -पिंपरी चिंचवडमधील नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरमधून संगणक चोरीला

    -  या कोविड सेंटरमधील कोरोना रुग्ण तसेच मृतांच्या दागिन्यांची चोरी होण्याचे अनेक प्रकार समोर येत असतानाच चोरट्यांनी चक्क संगणक चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

    -अज्ञात चोरट्याने या कोविड सेंटरमधील 33 हजार 101 रुपये किमतीचा सीपीयू, सात हजार 457 रुपयांचा एक मॉनिटर, एक हजार 186 रुपये किमतीचा किबोर्ड, असा एकूण 41 हजार 745 रुपये किमतीचा माल चोरून नेला आहे.

    -महापालिकेच्या पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमवरील जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. या सेंटरमधील 25 मे 2021 रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 06 Jun 2021 03:54 PM (IST)

    कोरोना ड्यूटीतून मुक्त करा, खासगी शिक्षक महासंघाची नाशिक महापालिका आयुक्तांकडे मागणी

    नाशिक - कोविडच्या ड्यूटीतून शिक्षकांना मुक्त करा

    - खासगी शिक्षक महासंघाची नाशिक महापालिका आयुक्तांकडे मागणी

    - सध्या सतराशे शिक्षक करतायत कोरोना ड्यूटी

    - आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्व शिक्षकवर्गाचं लक्ष

  • 06 Jun 2021 03:22 PM (IST)

    बुलडाणा जिल्ह्यात सोमवारपासून नवे नियम, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

    बुलडाणा : जिल्ह्यात बरेच निर्बंध शिथील

    अजूनही काही निर्बंध कायम

    किराणा, भाजीपाला, फळे, सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहणार

    सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्व नोंदणी पद्धतीने 50 टक्के क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी

    बिगर जीवनाश्यक वस्तूची दुकानेसुद्धा सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत चालू राहतील

    तर ही दुकाने शनिवार, राविवार बंद राहतील

    जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी काढले आदेश

    उद्यापासून आदेश होणार लागू

  • 06 Jun 2021 02:51 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया टप्याटप्याने सुरु, प्रशासनाकडून स्टेज 3 नुसार अनलॉकबाबत नवीन आदेश जारी

    गडचिरोली : शासन निर्देशाप्रमाणे कोविड - 19 साथरोग संदर्भाने "ब्रेक द चैन अंतर्गत निर्धारित प्रतिबंधात्मक पातळी" अंतर्गत गडचिरोली जिल्हा हा पातळी-3 मध्ये मोडत असून शासन आदेशानुसार वेळोवेळी सुरु केलेले व प्रतिबंधित बाबींना जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदीसंदर्भात नवीन नियमावली आणि उपाययोजना कालावधी, सोमवार दि. 07 जुन 2021 चे सकाळी 07.00 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात येणार आहेत.

    ▪️अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकाने ही सोमवार ते रविवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल.

    ▪️अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने ही सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल.

    ▪️रेस्टॉरेन्ट, उपहारगृह- सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत 50% डायनिंग क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. इतर वेळेस पार्सल/होम डिलीव्हरी सुरु ठेवता येईल.

    ▪️सार्वजनिक स्थळे, खुले मैदान इ.- सार्वजनिक स्थळे, खुले प्रेक्षागृह, मॉर्निंग वॉक, सायकलिंग हे सर्व दिवस सकाळी 5.00 ते 9.00 वाजेपर्यंत सुरु असेल.

    ▪️खाजगी कार्यालये हे सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल.

    ▪️खाजगी/शासकीय कार्यालयातील उपस्थिती- 50% उपस्थितीसह सुरु ठेवता येईल.

    ▪️सामाजिक/सांस्कृतिक/मनोरंजन इ. ठिकाणची गर्दीबाबत- सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून 50 लोकांच्या मर्यादेत सुरू ठेवण्याची मुभा असेल.

    ▪️विवाह कार्यक्रम- कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून एकूण 50 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल. तथापि याचे उल्लंघन केल्यास रु. 50000/- दंड व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

    ▪️अंत्यविधी- कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून एकूण 20 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल.

    ▪️स्था.स्व.संस्था व सहकारी संस्था यांचे बैठका व निवडणुकाबाबत- कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून 50 लोकांच्या मर्यादेत सुरू ठेवण्याची मुभा असेल.

    ▪️बांधकाम-सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत प्रत्यक्ष बांधकामस्थळावर कामास मुभा असेल परंतु कामगारांना दुपारी 4 वाजेनंतर काम करण्याची परवानगी नसेल.

    ▪️कृषी विषयक सेवा, दुकाने- सोमवार ते रविवार चे सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सुरू ठेवण्याची मुभा असेल.

    ▪️व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स इ.- सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर ठिकाणांमध्ये एसी चा वापर करता येणार नाही.

  • 06 Jun 2021 10:30 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यातील रामाजीगुडम आणि रामांजापूर गाव कोरोना मुक्त

    गडचिरोली जिल्ह्यातील रामाजीगुडम आणि रामांजापूर गाव कोरोना मुक्त

    कोरोणा मुक्त गावांसाठी प्रतिस्पर्धा

    सिरोंचा तालुक्यातील रामांजापूर व रामाजीगुडम हे गाव ७० टक्के कोरोणा बाधित होते लसीकरण वेळोवेळी पाठपुरावा तरुण शासनाने कोरोना मुक्त हे गाव केलेले आहे

    आता हे गाव कोरोना मुक्त झाल्याने ग्रामपंचायत स्थळावरुन शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यास या गावांची तयारी दिसत आहे

  • 06 Jun 2021 10:10 AM (IST)

    मुक्ताईनगर तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या घटली, 6 दिवसात 300 रुग्ण बरे

    मुक्ताईनगर

    मुक्ताईनगर तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या घटली, 6 दिवसात 300 रुग्ण बरे

    तालुक्यात रोज आढळणारी रुग्ण संख्या घटली मुक्ताईनगर तालुका कोरोना मुक्ती कडे वाटचाल

    स्थानिक प्रशासनाच्या वतीने येणाऱ्या प्रत्येक रविवारी 15 जून पर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे तालुक्यात स्थानिक प्रशासन राबवत असलेल्या अनेक उपाययोजना त्यामुळे रुग्ण संख्या घटली....

  • 06 Jun 2021 09:22 AM (IST)

    बुलडाण्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेनंतरंगत जिल्ह्यातील 1126 कोरोनाबधित रुग्णांना मिळाली नवसंजीवनी

    बुलडाणा -

    महात्मा फुले जनआरोग्य योजनेनंतरंगत जिल्ह्यातील 1126 कोरोनाबधित रुग्णांना मिळाली नवसंजीवनी

    जिल्ह्यातील 12 रुग्णालयात सुरुय योजना

    योजनेच्या तक्रारीसाठी प्रशासनाने केली हेल्पलाईन सुरु

    या योजनेनंतरंगत नॉन कोव्हिड रुग्णांवरही केले जातात उपचार

    तर 416 रुग्णावर बाहेर जिल्ह्यात सुरु उपचार

  • 06 Jun 2021 09:21 AM (IST)

    मलकापुरात आतापर्यंत 405 बालकांना कोरोनाची लागण

    बुलडाणा -

    मलकापुरात आतापर्यंत 405 बालकांना कोरोनाची लागण

    गेल्या 14 महिन्यातील मलकापूर तालुक्यातील स्थिती

    पालकांच्या चिंतेत वाढ झाली असून सतर्कतेची गरज

    पहिल्या लाटेत बालकांची संख्या 114 होती तर दुसऱ्या लाटेत वाढ होत 291 झाली

    पालकांची आपल्या पाल्यांची काळजी घेण्याची आरोग्य विभागणे केले आवाहन

  • 06 Jun 2021 08:41 AM (IST)

    9 ते 6 पर्यंत सरसकट दुकानं उघडायला परवानगी द्या, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

    कोल्हापूर  -

    जिल्ह्यात सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत सरसकट दुकानं उघडायला परवानगी द्या

    कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

    परवानगी न मिळाल्यास व्यापारी कोणत्या क्षणी रस्त्यावर उतरतील असाही दिला इशारा

    ब्रेक द चेन अंतर्गत उद्यापासून होणाऱ्या अनलॉक मध्ये कोल्हापूर जिल्हा आहे तिसऱ्या टप्प्यात

    नव्या नियमात दुकानांना सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत असेल परवानगी

    मात्र नवी वेळ व्यापाऱ्यांना अमान्य

    नियमावली व्यापारी आणि जिल्हा प्रशासन यामध्ये संघर्षाची शक्यता

  • 06 Jun 2021 08:39 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात आता अ‍ॅम्फोटेरेसिन-बीसाठी रुग्णालयांना द्यावे लागणार हमीपत्र

    कोल्हापूर

    कोल्हापूर जिल्ह्यात आता अ‍ॅम्फोटेरेसिन-बीसाठी रुग्णालयांना द्यावे लागणार हमीपत्र

    म्युकरमायकोसोसि रुग्णांसाठी आवश्यक आहे अ‍ॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शन

    जिल्ह्यात अ‍ॅम्फोटेरेसिन बी चा जाणवतोय तुटवडा

    इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनाचा निर्णय

    अ‍ॅम्फोटेरेसिन बी साठी बनवली स्वतंत्र नियमावली

    जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिस च्या 84 रुग्णांवर सुरू आहेत उपचार

  • 06 Jun 2021 07:59 AM (IST)

    सोमवारपासून पुणे शहर होणार अनलॉक, शहरातील दैनंदिन स्वरुपाच्या जवळपास सर्व व्यवहारांना मुभा

    पुणे :

    सोमवारपासुन पुणे शहर होणार अनलॉक

    शहरातील दैनंदिन स्वरूपाच्या जवळपास सर्व व्यवहारांना मुभा

    दुपारी चारपर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवता येणार असले, तरी संध्याकाळी पाचनंतर मात्र जमावबंदी आणि संचारबंदीचा आदेश

    पुणेकरांना आता जिल्हाबंदी नसून ते आवश्यक ठिकाणी ई-पासशिवाय प्रवास करू शकणार

    पीएमपीएलएम बससेवा 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार

    बँका, सर्व प्रकारच्या वित्तीय संस्था आठवडाभर काम सुरु राहणार

    पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासाठीदेखील हे आदेश लागू असणार

  • 06 Jun 2021 07:53 AM (IST)

    नाशिकचा अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश

    - नाशिकचा अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश

    - उद्यापासून लॉकडाउनमध्ये मिळणार शिथिलता

    - परिस्थिती बघुन हळूहळू निर्बंध शिथिल करणार

    - उद्या जिल्हाधिकारी नवीन आदेश काढणार

  • 06 Jun 2021 07:44 AM (IST)

    पुणे महापालिकेकडील कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड लसीचे डोस संपले

    पुणे -

    महापालिकेकडील कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड लसीचे डोस संपले

    शहरातील सर्व लसीकरण केंद्र आज बंद राहणार

  • 06 Jun 2021 07:42 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणखी सात रुग्णवाहिका

    नागपूर -

    नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणखी सात रुग्णवाहिका

    पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांच्याहस्ते लोकार्पण

    जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 49 रुग्णवाहिका कार्यरत आहेत.

    त्यात आणखी सात रुग्णवाहिकेची भर पडली आहे.

    आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी हातभार लागेल असा विस्वास व्यक्त केला जात आहे

  • 06 Jun 2021 07:40 AM (IST)

    नागपूर महापालिका 75 ऑक्सिजन उद्यान विकसित करणार

    नागपूर -

    नागपूर महापालिका 75 ऑक्सिजन उद्यान विकसित करणार

    जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेतर्फे प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची लागवड करून शहरात ७५ ऑक्सिजन झोनची निर्मिती केली जाणार आहे,

    महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली घोषणा

    गांधीबाग उद्यानात १२०० प्राणवायू वृक्षांची लागवड करण्याची सुरूवात करण्यात आली.

    मनपातर्फे सध्या अस्तित्वात असलेल्या उद्यानात, खुल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येईल.

    येथे वनौषधी सुद्धा लावण्यात येतील. याचा लाभ आयुर्वेदचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल.

    पोहरा नदीच्या काठालगत सुध्दा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. महापौर व अन्य उपस्थित नागरिकांनी वृक्षारोपण करून मोहिमेचा शुभारंभ केला.

  • 06 Jun 2021 06:50 AM (IST)

    उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार म्युकरमायकोसिस टास्क फोर्सच्या कामकाजाला नागपुरात सुरुवात

    नागपूर -

    उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार म्युकरमायकोसिस टास्क फोर्सच्या कामकाजाला नागपुरात सुरुवात

    टास्क फोर्स समितीची कार्यकक्षा वाढली

    बावीस सदस्यीय समिती ; सर्वेक्षणाचा निर्णय

    कार्यकक्षेत अन्य बुरशीजन्य आजार समाविष्ट

    तज्ञ डॉक्टरांकडून आजारावर विचारमंथन

    उपचारासाठी प्रमाणित कार्यपद्धत

  • 06 Jun 2021 06:31 AM (IST)

    नागपुरात आजपासून लहान मुलांवरील कोरोना लसीची चाचणी 

    - नागपुरात आजपासून लहान मुलांवरील कोरोना लसीची चाचणी
    - लहान मुलांना सकाळी १० वाजता देणार लसीचा पहिला डोस
    - नागपूरातील मेडीट्रीना हॅास्पीटलमध्ये होणार चाचणी
    - लहान मुलांना वयानुसार तीन गटात विभागून देणार कोरोना लस
  • 06 Jun 2021 06:28 AM (IST)

    राज्यात तीन महिन्यांत पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद, महाराष्ट्राची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

    राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे.

    गेल्या २४ तासांत कोरोनाचे २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले

    आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ जण कोरोना मुक्त झाले आहेत

    प्रथमच सर्वात कमी १३ हजार ६५९ कोरोना रुग्णांचे निदान झाले

    राज्यात गेल्या २४ तासांत ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे.

Published On - Jun 06,2021 8:43 PM

Follow us
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.