Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा घसरला, दिवसभरात 10 हजार 219 नवे रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा घसरला, दिवसभरात 10 हजार 219 नवे रुग्ण
corona

| Edited By: चेतन पाटील

Jun 07, 2021 | 11:49 PM

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर आता ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करुन त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 07 Jun 2021 08:16 PM (IST)

  राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा घसरला, दिवसभरात 10 हजार 219 नवे रुग्ण

  राज्यात दिवसभरात 10 हजार 219 नवे कोरोनाबाधित रुग्ण, दिवसभरात 154 रुग्णांचा मृत्यू, तर 21 हजार 81 रुग्णांची कोरोनावर मात

 • 07 Jun 2021 08:14 PM (IST)

  मुंबईत दिवसभरात 728 नवे कोरोनाबाधित

  मुंबईत आज 728 नवे रुग्ण मुंबईत आज 980 रुग्ण कोरोनामुक्त मुंबईत आज 28 रुग्णांचा मृत्यू

 • 07 Jun 2021 07:57 PM (IST)

  नागपुरात दिवसभरात 134 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 8 जणांचा मृत्यू

  नागपूर :

  नागपुरात आज 134 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  430 जणांनी केली कोरोना वर मात

  तर 8 जणांचा कोरोना मुळे मृत्यू

  एकूण रुग्ण संख्या - 475926

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 463723

  एकूण मृत्यू संख्या - 8967

 • 07 Jun 2021 07:55 PM (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 263 नवे कोरोनाबाधित

  नाशिक :

  आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 686

  आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ - 263

  नाशिक मनपा- 130 नाशिक ग्रामीण- 123 मालेगाव मनपा- 01 जिल्हा बाह्य- 09

  नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 4974

  आज कळविण्यात आलेले एकूण मृत्यू -34 नाशिक मनपा- 12 मालेगाव मनपा- 00 नाशिक ग्रामीण- 22 जिल्हा बाह्य- 00

 • 07 Jun 2021 05:15 PM (IST)

  कोरोनामुक्त गाव योजनेसाठी मुख्यमंत्र्यांची नाशिक आणि कोकण विभागातील सरपंचांशी चर्चा

  कोरोनामुक्त गावासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक विभाग आणि कोकण विभागातील सरपंचांशी संवाद साधला व सरपंच हे आपल्या गावांमध्ये कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना करीत आहेत हे जाणून घेतले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार सहभागी झाले होते. मुख्यमंत्री पुणे विभागातील सरपंचांशीही थोड्याच वेळात बोलणार आहेत

 • 07 Jun 2021 05:00 PM (IST)

  जळगावात आतापर्यंत 1,24,270 लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण

  जळगाव :

  जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 124270 लाभार्थ्यांना लसीकरण देण्यात आलेले आहे, त्यापैकी पहिली लस घेणारे 421051 लाभार्थी तर दुसरी लस घेणारे लाभार्थी 124270 इतके आहेत, रोज सरसरी 1500 लोकांना लस देणार येत आहे तसेच जिल्हात पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असून जिल्हात ऑक्सिजन बेडस 90 टक्के उपलब्ध आहेत त्यामुळेच जिल्हा हा 1 स्तरावर समाविष्ट करण्यात आला आहे.

 • 07 Jun 2021 03:11 PM (IST)

  गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 2,76,667 नागरिकांचे लसीकरण पूर्ण

  गोंदिया:-

  गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 276667 लाभार्थ्यांना लसीकरण झाले आहे, त्यापैकी पहिली लस घेणारे लाभार्थी 211806 तर दुसरी लस घेणारे लाभार्थी 64861 इतके आहेत, रोज सरसरी 6077 लोकांना लस देणार येत आहे। तसेच जिल्हात पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असून जिल्हात ऑक्सिजन बेडस 90 टक्के उपलब्ध आहेत त्यामुळेच जिल्हा हा 1 स्तरावर समाविष्ट करण्यात आला आहे।

 • 07 Jun 2021 03:04 PM (IST)

  यवतमाळमध्ये आतापर्यंत 4 लाख 23 हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण

  यवतमाळ :

  रोज सरासरी 6000 लोकांचे लसीकरण आतापर्यंत 4 लाख 23 हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा झपाट्याने कमी झाला टेस्टिंग वाढविल्या होत्या, त्याने पॉझिटिव्ह दर वाढला होता लोकांवर उपचार मोठ्या प्रमाणात झाले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात झाले, त्यामुळे रुग्ण लवकर सापडले, त्यांच्यावर उपचार झाला, त्यामुळे अनलॉक झाला

 • 07 Jun 2021 12:28 PM (IST)

  बारामती होणार उद्यापासून अनलॉक

  बारामती :

  - बारामती होणार उद्यापासून अनलॉक...

  - सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत सर्व दुकाने राहणार सुरु..

  - अत्यावश्यक सेवेतील दुकानांना दुपारी ४ वाजेपर्यंतची वेळ...

  - गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली बाजारपेठ होणार सुरु...

  - बारामतीतील कोरोना बाधितांचा आकडाही आटोक्यात..

  - प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय..

 • 07 Jun 2021 09:56 AM (IST)

  बुलडाणा जिल्ह्यातील आजपासून सर्वच दुकाने सुरु, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता

  बुलडाणा -

  जिल्ह्यातील आजपासून सर्वच दुकाने सुरु

  खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता

  मात्र, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिलीये

  कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करण्याचेही आवाहन

  जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेय

 • 07 Jun 2021 09:52 AM (IST)

  आजपासून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व व्यवहार पूर्ववत होण्यास सुरुवात

  अहमदनगर -

  आजपासून जिल्ह्यातील सर्व व्यवहार पूर्ववत होण्यास सुरुवात

  सकाळी 9 पासून सर्व बाजारपेठ खुली, भाजीपाला, किराणा खरेदीसाठी नागरीकांची गर्दी

  नागरिकांना कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन बंधनकारक

  जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आदेश

  जिल्ह्याचा कोविड-19 चा साप्‍ताहिक पॉझिटीव्‍हीटी रेट 4.30 टक्के

  तर ऑक्सिजन बेडवरील रुग्‍णांचे एकूण उपलब्‍ध ऑक्सिजन बेडशी असलेले प्रमाण 24.48 टक्के

 • 07 Jun 2021 09:21 AM (IST)

  सोलापुरात शहरातील रस्त्यावर वर्दळ वाढू लागली

  सोलापूर - शहरातील रस्त्यावर वर्दळ वाढू लागली

  गेल्या अडीच महिन्यांपासून कमी होती रस्त्यावर वर्दळ

  लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडण्यास होते मोठे निर्बंध

  शहरात होती नाकाबंदी, आज नाकाबंदी तरी शिथिलता

 • 07 Jun 2021 09:20 AM (IST)

  लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे कामावर जाणारे चाकरमानी मोठ्या संख्यने बाहेर पडले आहेत

  लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे कामावर जाणारे चाकरमानी मोठ्या संख्यने बाहेर पडले आहेत

  अनलॉकमुळे आता आंतरजिल्हा बंदी असली तरी मात्र लेव्हल 5 मध्ये जाण्यासाठी इ-पास लागणार आहे

  तर सध्या मुंबईला जाण्यासाठी मुलुंड आनंदनगर टोल नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्या रस्त्यावर पाहायला मिळत आहे

 • 07 Jun 2021 08:48 AM (IST)

  3 महिने बंद असणारी जिम हे 50 % क्षमतेने सुरु करण्यात आलेली आहे

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॉझिटीव्ही रेट आणि शिल्लक बेड बघता राज्य शासनाने त्या त्या महापालिका हद्दीत नियम शिथिल करत अनलॉक धोरण सुरु केले आहे

  त्यामुळे गेले 3 महिने बंद असणारी जिम हे 50 % क्षमतेने सुरु करण्यात आलेली आहे

  जिममधील साहित्य सॅनिटायझर आणि स्वच्छता राखत जिम मालक कामाला लागले आहे

  तर दुसरीकडे पहिला दिवस असल्याने व्यायाम करण्यासाठी तरुण मंडळीमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे

  गेले 3 महिने जिम बंद असल्याने मोठा फटका व्यायाम शाळेच्या मालकाना बसला आहे

  आता व्यायाम शाळा सुरु झाल्याने पूर्णतः साफसफाई करत, सोशल डिस्टन्स ठेवत, मास्कचा वापर करत नियम पाळताना दिसत आहे त्याच बरोबर नोंदणी करूनच व्यायाम करता येणार आहे

 • 07 Jun 2021 08:15 AM (IST)

  हिंगोली जिल्ह्या लेवल 3 मध्ये, जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन नियमावली जाहीर

  हिंगोली जिल्ह्या लेवल 3 मध्ये येत असल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली जिल्ह्यात नवीन नियम लागू केले आहेत,

  किराणा, भाजीपाला, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई विक्रेते, पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी पूर्व पूर्व साहित्याची दुकाने आज पासून 15 जूनपर्यंत सकाळी 9 ते 4 पर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आलीये

  तर अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थापने एक दिवस आड उघडण्यास परवानगी देण्यात आलीये

  सकाळी 9 ते 4 पर्यंत परवानगी असणार आहे

  रेस्टॉरंट हॉटेल 50% क्षमतेने उघडण्यास परवानगी देण्यात आलीये तर लग्न समारंभात फक्त घरच्या घरी 10 व्यक्तींना परवानागी असणार  आहे

 • 07 Jun 2021 08:11 AM (IST)

  पाच टप्प्यात लॉकडाऊन हटवण्यात येणार आहे, मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात

  राज्यात आजपासून कडक लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे

  एकूण पाच टप्प्यात लॉकडाऊन हटवण्यात येणार आहे

  मुंबईच्या समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे

  मॉर्निंग वॉकसाठी नागरिकांना पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत मोभा देण्यात आलेली आहे

  मरीन ड्राईव्हवर नागरिक मोठे संख्येनी मॉर्निग वॉकसाठी बाहेर निघाले आहेत

 • 07 Jun 2021 08:07 AM (IST)

  16 दिवसांनंतर सातारा जिल्ह्यांतील जनतेला दिलासा, आज पासून अंशतः शिथिल

  सातारा -

  सोळा दिवसांनंतर सातारा जिल्ह्यांतील जनतेला दिलासा, सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन आज पासून अंशतः शिथिल

  सातारा जिल्हा कोरोना रेडझोन, चौथ्या टप्यात जिल्ह्याचा समावेश

  सकाळी 7 ते 9 या वेळेत मैदानी खेळ तर 9 ते 2 अत्यावश्यक सेवा सुरु रहाणार

  हॉटेल रेस्टॉरंटमध्ये बसून खायला परवानगी नाही होम डिलिव्हरी किंवा पार्सल सेवा देता येणार

  अपॉइंटमेंट घेऊन सलून आणि ब्युटीपार्लर सुरु ठेवता येणार, मात्र 50 टक्के उपस्थितीची मर्यादा

  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 50 टक्के बैठकीमध्ये सुरू होणार

  खाजगी आस्थापना 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करता येणार

  अंत्यसंस्कार 20 तर लग्न 25 लोकांच्या उपस्थितीत करता येणार

  जिल्ह्यात प्रवेशासाठी ई-पास बंधनकारक नाही

  मॉल, सिनेमागृह बंदच राहणार

 • 07 Jun 2021 08:04 AM (IST)

  सोलापुरात वैद्यकीय परीक्षेसाठी हॉल तिकीटासोबत आता कोरोना निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती

  सोलापूर - वैद्यकीय परीक्षेसाठी हॉल तिकीटासोबत आता कोरोना निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती

  10 जून पासून सुरुवात होत आहे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षांना

  डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 450 विद्यार्थी एमबीबीएसच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षाचे परीक्षार्थी

  आरटीपीसीआर  रिपोर्ट नसल्यास विद्यार्थ्याला अँटीजन रिपोर्ट अहवाल सादर करावा लागणार

  मात्र दुसऱ्या विषयाचा पेपरला येताना  rt-pcr चा अहवाल बंधनकारक

 • 07 Jun 2021 08:03 AM (IST)

  पुणे महापालिकेच्या 56 केंद्रांवर आज कोव्हिशिल्ड तर 16 केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार

  पुणे -

  - पुणे महापालिकेच्या 56 केंद्रांवर आज कोव्हिशिल्ड तर 16 केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार

  - या सर्व ठिकाणी लसीचे प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आले आहेत,

  - लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे़,

  - याव्दारे कोव्हिशिल्डकरिता केवळ ४५ वर्षांपुढील नागरिकांना नोंदणी करता येणार असून, कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी १० मे पूर्वी घेतला आहे, त्यांनाही नोंदणी करता येणार आहे.

 • 07 Jun 2021 08:03 AM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन आज पासून अंशतः शिथिल

  कोल्हापूर :

  कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन आज पासून अंशतः शिथिल

  चौथ्या टप्यात जिल्ह्याचा समावेश

  सकाळी सात ते नऊ या वेळेत मैदानी खेळ आणि सायकलिंग ला परवानगी

  परवानगी मिळताच शहरातील मैदानं फुलली

  फुटबॉल,क्रिकेट,बॅडमिंटन खेळण्यासाठी खेळाडू मैदानात

  मॉर्निंग वोक आणि जॉगिंग साठी दीड महिन्या नंतर लोक घराबाहेर

  मैदानी खेळाला परवानगी मिळाल्यान खेळाडूंमधून समाधान

 • 07 Jun 2021 08:02 AM (IST)

  आजपासून पुणे अनलॉक, शहरातील पीएमपी बससेवा आजपासून 50 टक्के क्षमतेने सुरु

  पुणे -

  आजपासून पुणे अनलॉक

  शहरातील पीएमपी बससेवा आजपासून 50 टक्के क्षमतेने सुरु

  सार्वजनिक बस वाहतूक सुरु झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा

  शहरातील 179 मार्गावर 496 बस धावणार

 • 07 Jun 2021 08:01 AM (IST)

  नवी मुंबईत आजपासून मॉलचे प्रवेश द्वार उघडणार

  नवी मुंबई -

  नवी मुंबईत आजपासून मॉलचे प्रवेश द्वार उघडणार

  नियम शिथिल केल्यामुळे नाट्यगृह, सलून , स्पा, जिम ,खाजगी कार्यालय देखील सुरू होणार; मात्र 50 % क्षमतेने

  तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आस्थापना सुरू होणार

  दुसऱ्या स्तरातील नियमावली लागू झाल्यामुळे शहरातील बहुतांश घटकांना दिलासा

  सार्वजनिक वाहतूक पूर्णक्षमतेने ने आन करता येणार

 • 07 Jun 2021 08:00 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यात 2 लेव्हल मध्येहोणार अनलॉक

  औरंगाबाद -

  औरंगाबाद जिल्ह्यात 2 लेव्हल मध्येहोणार अनलॉक

  औरंगाबाद शहरात लेव्हल फस्टच्या नियमानुसार अनलोक

  तर औरंगाबादचा ग्रामीण भाग तिसऱ्या लेव्हल नुसार अनलॉक

  ग्रामीण भागात 5 वाजेनंतर संचारास बंदी

  आजपासून औरंगाबाद शहर पूर्णपणे अनलॉक

  ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने ग्रामीण भाग 3 ऱ्या लेवलचा अनलॉक

  शहरात रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने शहर पूर्णपणे अनलॉक

 • 07 Jun 2021 08:00 AM (IST)

  सालापुरात सकाळपासूनच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली

  सोलापूर शहरात आज पासून सर्व व्यवहारात शिथिलता देण्यात आल्यामुळे सकाळपासूनच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे, तर ग्रामीण भागात कोरणा बाधित रुग्णांची संख्या अद्यापही कमी होत नसल्याने अंशतः शिथिलता देण्यात आली आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील व्यवहार दुपारी चार पर्यंत सुरू राहणार आहेत

 • 07 Jun 2021 07:17 AM (IST)

  सोलापूर बस स्थानकात राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेला सुरुवात

  सोलापूर बस स्थानकात राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेला सुरुवात

  सकाळपासून सुरुवात झाली आहे

  मात्र प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये

  त्यामुळे अनेक बसेस  स्थानकातच थांबून आहेत

 • 07 Jun 2021 07:02 AM (IST)

  नागपुरात आजपासून अनलॉकिंगला सुरुवात

  - नागपुरात आजपासून अनलॉकिंगला सुरुवात

  - नागपूर लेव्हल वनमध्ये, सर्व व्यवहार सुरु

  - आज सकाळपासून मॅार्निंग वॅाक करणाऱ्यांची गर्दी

  - सकाळी पाच ते नऊ आणि सायंकाळी पाच ते नऊ मॅार्निंग वॅाकला परवानगी

  - सायकलिंगसाठीही सकाळी पाच ते नऊ व सायंकाळी पाच ते नऊ परवानगी

 • 07 Jun 2021 06:44 AM (IST)

  पाच टप्प्यात होणाऱ्या अनलॉकमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा चौथ्या टप्यात समावेश

  कोल्हापूर

  आजपासून पाच टप्प्यात होणाऱ्या अनलॉकमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा चौथ्या टप्यात समावेश

  पॉझिटिव्हीटी रेट 17 टक्क्यांपेक्षा जास्त आणि ऑक्सिजन बेड 77.81 टक्के व्यापले असल्याचं जिल्हा प्रशासना कडून स्पष्ठ

  नव्या नियमानुसार अत्यावश्यक दुकान सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत उघडी राहणार तर इतर दुकान बंदच राहणार

  मैदानी खेळ सकाळी सहा ते नऊ या वेळेत खेळता येणार

  हॉटेल रेस्टॉरंट मध्ये बसून खायला परवानगी नाही होम डिलिव्हरी किंवा पार्सल सेवा देता येणार

  अपॉइंटमेंट घेऊन सलून आणि ब्युटीपार्लर सुरू ठेवता येणार,मात्र 50 टक्के उपस्थितीची मर्यादा

  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 50 टक्के बैठकी मध्ये सुरू होणार

  खाजगी आस्थापना 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करता येणार

  अंत्यसंस्कार 20 तर लग्न 25 लोकांच्या उपस्थितीत करता येणार

  जिल्ह्यात प्रवेशासाठी ई पास बंधनकारक नाही..

  मॉल, सिनेमागृह बंदच राहणार

 • 07 Jun 2021 06:39 AM (IST)

  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर

  गडचिरोली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज आरमोरी आणि गडचिरोली या तीन ठिकाणच्या दौरा करणार आहेत

  क्वॉरंटाईन सेंटरला भेट काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या कोरोन टाईन रुग्णांना मदतीचा आढावा

  पेट्रोल दरवाढी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन जिल्हा मुख्यालयी करणार आहेत

Published On - Jun 07,2021 8:17 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें