Maharashtra Coronavirus LIVE Update : सांगलीत कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 901 नवे कोरोनाबाधित

| Updated on: Jun 16, 2021 | 11:25 PM

आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : सांगलीत कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 901 नवे कोरोनाबाधित
corona

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 16 Jun 2021 10:58 PM (IST)

  सांगलीत कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 901 नवे कोरोनाबाधित

  सांगली कोरोना / म्युकर अपडेट –

  जिल्ह्यात आज दिवसभरात 901 कोरोना रुग्ण

  म्युकर मायकोसीस – एकूण रुग्ण 253 , आज आढळलेले रुग्ण 2

  जिल्ह्यात आज कोरोनामुळे 19 रुग्णाचा मृत्यू

  जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3796 वर

  ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 9051 वर

  तर उपचार घेणारे 863 जण आज कोरोना मुक्त

  आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 120229 वर

  जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 133076 वर

 • 16 Jun 2021 09:51 PM (IST)

  राज्यात दिवसभरात 10 हजार 107 नवे कोरोनाबाधित, 237 जणांचा मृत्यू

  राज्यात दिवसभरात 10 हजार 107 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 10 हजार 576 रुग्णांची कोरोनावर मात, महाराष्ट्रात दिवसभरात 237 जणांचा मृत्यू

 • 16 Jun 2021 08:19 PM (IST)

  अकोल्यात दिवसभरात 16 नवे कोरोनाबाधित रुग्ण

  अकोल्यात कोरोना अपडेट :

  अकोल्यात आज दिवसभरात 16 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही

  आतापर्यंत 1116 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 55046 जणांनी कोरोनावर मात केली आहे

  तर सध्या 1098 रुग्ण उपचार घेत आहेत

  तर दिवसभरात 172 जण कोरोनामुक्त झाले आहेत

 • 16 Jun 2021 07:34 PM (IST)

  लसीकरणात नागपुरकरांची भरारी, राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

  नागपूर :

  लसीकरणात नागपुरकरांची भरारी, राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

  नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासनाने कोव्हिड लसीकरणाचा मोहिमेत चांगली भरारी घेतली.

  नागपूरात आतापर्यंत १० लक्ष ७१ हजार ६३१ नागरिकांनी लस घेतली आहे.

  महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरणामध्ये पुणे आणि मुंबई चा खालोखाल नागपूर जिल्हा तिस-या क्रमांकावर आहे.

  कोव्हिन ॲपवरील नोंदणीनुसार नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १०,७१,६३१ इतक्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

  त्याकरीता १३,६५,४४८ डोज देण्यात आलेले आहेत.

  ही टक्केवारी २९.३४ इतकी आहे.

 • 16 Jun 2021 07:05 PM (IST)

  नागपुरात दिवसभरात 86 नवे कोरोनाबाधित, 279 जणांची कोरोनावर मात

  नागपूर कोरोना अपडेट :

  नागपुरात आज 86 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  279 जणांनी केली कोरोनावर मात

  तर 3 जणांचा कोरोना मुळे मृत्यू

  एकूण रुग्ण संख्या - 476577

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 466228

  एकूण मृत्यू सांख्य 9013

 • 16 Jun 2021 07:02 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 295 नवे कोरोनाबाधित, 321 जणांना डिस्चार्ज

  पुणे : - दिवसभरात २९५ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ३२१ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत २० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ११. - ४५१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७४८४०. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २७३८. - एकूण मृत्यू -८५०१. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६३६०१. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५९५८.

 • 16 Jun 2021 06:20 PM (IST)

  नागपुरात मुलांच्या स्क्रिनिंगमध्ये 12 मुलांमध्ये आढळले कोरोनाचे ॲंटिबॅाडी

  मोठी आणि दिलासादायक बातमी :

  - लहान मुलांवरील कोरोना लसीची चाचणी, पालकांसाठी आनंदाची बातमी

  - नागपुरात मुलांच्या स्क्रिनिंगमध्ये आज १२ मुलांमध्ये आढळले कोरोनाचे ॲंटिबॅाडी

  - सहा ते १२ वयोगटातील ३५ पैकी १२ मुलांच्या ॲंटीबॅाडी पॅाझीटीव्ह

  - घरात कोरोनाची पार्श्वभुमी नसलेल्या १२ मुलांचे ॲंटीबॅाडी पॅाझीटीव्ह

  - न कळत मुलांना होऊन गेला कोरोना

  - पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटात १० मुलांमध्ये आढळले होते ॲंटीबॅाडीज

  - नागपूर शहरात न कळत अनेक मुलांना होऊन गेला कोरोना

 • 16 Jun 2021 06:16 PM (IST)

  भिवंडी शहरात 4 तर ग्रामीण भागात 50 नवे कोरोनाबाधित

  भिवंडी कोरोना अपडेट : पालिका क्षेत्रात रुग्ण संख्या अवघी 4 तर ग्रामीण भागात रुग्ण संख्या 87 मागील तीन दिवसां पासून ग्रामीण मध्ये 50 च्या पुढे रुग्ण संख्या

 • 16 Jun 2021 05:55 PM (IST)

  नागपुरात 6 ते 12 वयोगटातील मुलांना कोवॅक्सिन लस देण्यास सुरुवात

  नागपूर :

  भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन (covaccine ) लसीच्या लहान मुलांच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये 6 ते 12 या वयोगटातील मुलांना लस देण्यास आज पासून सुरुवात झाली आहे

  नागपुरातील मेडीट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयात कोवॅक्सिनचे लहान मुलांसाठीचे क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत

  6 जून रोजी 12 ते 18 वयोगटातील 40 मुलांना लस देण्यात आली होती. या वयोगटातील मुलांच्या लसीकरणानंतर कोणालाही दुष्परिणाम नव्हते.

  त्यामुळे आता 6 ते 12 वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

  आज 20 मुलांना लस देण्यात येत आहे.

  काही दिवसांनी 2 ते 6 या वयोगतासाठी लसीकरण सुरू केले जाईल.

 • 16 Jun 2021 03:15 PM (IST)

  खासदार राहुल शेवाळे यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा, कोरोना लसीकरण मोहिमेसाठी मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द

  मुंबई : महाराष्ट्रातील मोफत कोरोना लसीकरण मोहिमेसाठी, खासदार राहुल शेवाळे यांनी आपले एक महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'त जमा केले आहे. खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांची निवासस्थानी भेट घेऊन एक लाख रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला.

  देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांचे मोफत कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी जाहीर केला. या निर्णयानुसार केंद्राकडून महाराष्ट्राला कोरोना लसींचा साठा उपलब्ध होत आहे. मात्र, काही प्रमाणात राज्य सरकारला कोरोना लशींची खरेदी करणे अनिवार्य आहे. "केंद्र सरकारकडून कोरोना लसींचा साठा मोफत उपलब्ध होत असला तरीही राज्यातली जनतेचे मोफत लसीकरण वेगाने करण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. यासाठी यंत्रणेवर मोठा खर्च करावा लागेल.तसेच राज्य सरकारला काही प्रमाणात लशींची खरेदी करणे अनिवार्य आहे. आधीच गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडलेला आहे. या पार्श्वभूमीवर, लोकप्रतिनिधी या नात्याने खारीचा वाटा उचलावा, या भावनेने माझे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'त जमा करण्याचा निर्णय घेतला" अशी प्रतिक्रिया खासदार शेवाळे यांनी दिली आहे.

 • 16 Jun 2021 09:25 AM (IST)

  गेल्या 24 तासात भारतात 62 हजार 224 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

  गेल्या 24 तासात भारतात 62 हजार 224 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

  तर 2 हजार 542 रुग्णांना प्राण गमवावे लागले

  कालच्या दिवसात देशात 1 लाख 7 हजार 628 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

 • 16 Jun 2021 07:33 AM (IST)

  हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट

  हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे

  या प्लांटचा लोकार्पण सोहळा आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आलाय

  कोरोनाची दुसरी लाट सध्या आटोक्यात आली असलेली तरी तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे

  त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य येंत्रणा सज्ज होत आहे

  नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आल्याने आता हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात देखील हवेतून ऑक्सिजन निर्मिती होणारा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे

  या प्लांट मुळे जवळपास 40 रुग्णांना ऑक्सिजन मिळणार असल्याने रुगणांची मोठी सोय होणार आहे

 • 16 Jun 2021 07:27 AM (IST)

  कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट अद्याप चिंताजनक नाही

  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की कोरोनाव्हायरसचा डेल्टा प्लस व्हेरिएंट अद्याप चिंताजनक नाही आणि देशात तो कुठे आढळला आहे त्याचा शोध घ्यावा लागेल. नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी पत्रकारांना सांगितले की डेल्टा प्लस नावाचा विषाणूचा एक नवीन प्रकार समोर आला आहे आणि तो मार्चपासून युरोपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच याबद्दलची माहिती सार्वजनिक झाली.

 • 16 Jun 2021 06:42 AM (IST)

  नागपुरात भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री

  - नागपुरात भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री
  - ब्रॅण्डेडच्या नावावर भेसळयुक्त खाद्यतेल
  - नागपूर पोलिसांची कारवाई

Published On - Jun 16,2021 6:27 AM

Follow us
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.