Maharashtra Coronavirus LIVE Update : महाराष्ट्रात 8 हजार 470 कोरोना रुग्णांची नोंद, 188 जणांचा मृत्यू
राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. तसेच, काहीच आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यासाठीची तयारीही सुरु करण्यात आली आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. तसेच, काहीच आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यासाठीची तयारीही सुरु करण्यात आली आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE
LIVE NEWS & UPDATES
-
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सर्व केंद्र बुधवारी बंद
-पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सर्व केंद्र बुधवारी बंद
-लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे उद्या बंद रहाणार असल्याचे महापालिकेने पत्रकाद्वारे कळविले आहे
-रविवारी जास्त नागरिकांना सुट्टी असते त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण मिळावे या उद्देशाने रविवार ऐवजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बुधवारी साप्ताहिक सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
-
महाराष्ट्रात 8 हजार 470 कोरोना रुग्णांची नोंद, 188 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8 हजार 470 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 9 हजार 43 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात 188 जणांचा मृत्यू झाला आहे.
-
-
नागपुरात आज 30 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 2 जणांचा मृत्यू
नागपूर कोरोना अपडेट –
नागपुरात आज 30 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
120 जणांनी केली कोरोना वर मात
तर 2 जणांचा कोरोना मुळे मृत्यू
एकूण रुग्ण संख्या – 476824
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 467093
एकूण मृत्यू संख्या – 9021
-
अकोल्यात दिवसभरात 13 रुग्ण पॉझिटिव्ह,दोघांचा मृत्यू
अकोल्यात आज दिवसभरात 13 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला आहे….
आतापर्यंत 1122 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 55750 जणांनी कोरोनावर मात केली आहे…
तर सध्या 580 रुग्ण उपचार घेत आहेत…
तर दिवसभरात 165 जण कोरोना मुक्त झाले आहेत….
-
पुण्यात दिवसभरात 220 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ, 15 जणांचा मृत्यू
पुण्यात दिवसभरात 220 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ३३१ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत १५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १०. – ३४२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७६२१०. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २३५४. – एकूण मृत्यू -८५४२. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६५३१४. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४८७८.
-
-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या काळात संचारबंदी
आषाढी वारी दरम्यान पंढरपुरात संचार बंदीची शक्यता
१७ जुलै पासून २५ जुलै पर्यंत संचारबंदी लावण्याबाबत पोलीस प्रशासन चा जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर केला आहे.
जिल्हाधिकारी या बाबत अंतिम निर्णय घेणार
-
नागपुरात आजही 18 वर्षावरील वयोगटाचं लसीकरण नाही
– नागपुरात आजही 18 वर्षावरील वयोगटाचं लसीकरण नाही
– लसीचा साठा नसल्याने महानगरपालिकेने लसीकरण सुरु केलं नाही
– नागपुरात ३० ते ४४ वयोगटाचं लसीकरण सुरु
– ३० ते ४४ वयोगटात काल ११२३१ नागरीकांनी घेतली लस
– ३० ते ४४ वयोगटातील लसीकरणाला आजंही चांगला प्रतिसाद
– तीन दिवसात ३० ते ४० वयोगटातील २५०९१ लाभार्थीचे लसीकरण
– शहरातील १०५ केंद्रावर लसीकरण सुरू
-
देशात 24 तासांत कोरोनाचे 42,640 नवे रुग्ण
दिल्ली –
देशात 24 तासात नवे रूग्ण – 42,640
देशात 24 तासात मृत्यू -1,167
देशात 24 तासात डीस्चार्ज – 81,839
एकूण रूग्ण -2,99,77,861
एकूण मृत्यू – 3,89,302
एकूण डीस्चार्ज – 2,89,26,038
एकूण एक्टीव्ह रूग्ण – 6,62,521
आत्तापर्यंत लसीकरण झालेली संख्या -28,87,66,201
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
-
पुण्यात गेल्या 24 तासांत 136 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
पुणे –
– दिवसभरात 136 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 223 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात करोनाबाधीत 17 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 11
– 359 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 475990
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 2470
– एकूण मृत्यू – 8537
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 464983
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 3872
-
नाशकात कोरोना काळात 69 अल्पवयीन मुली बेपत्ता
नाशिक – कोरोना काळात 69 अल्पवयीन मुली बेपत्ता
सोशल मीडियाचा दुष्परिणाम असल्याचा तज्ञानचा दावा
पोलिसांनी घेतला यातील 7 मुलींचा शोध
पोलीस तपासात धक्कादायक बाब उघड
मुलांशी संवाद वाढवण्याचा मानसोपचार तज्ञांच आवाहन
-
संभाव्य तिसऱ्या लाटेची धास्ती, नाशकात ऑक्सिजन साठा तिप्पट करण्याची महापालिकेची खाजगी रुग्णालयांना सूचना
नाशिक – संभाव्य तिसऱ्या लाटेची धास्ती, ऑक्सिजन साठा तिप्पट करण्याची महापालिकेची खाजगी रुग्णालयांना सूचना
खाजगी रुग्णालयांच्या प्रतिनिधी बैठकीत निर्णय
पुढील आठ दिवसात नियोजन करण्याच्या आयुक्तांच्या सूचना
-
महाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण
महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरियंटचे 21 रुग्ण आढळल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांन दिली
डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्राची चिंता वाढली
कोरोनाच्या डेल्टा प्लसचे रुग्ण रत्नागिरी, जळगाव, मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहेत
रत्नागिरीमध्ये 9, जळगावमध्ये 7, मुंबईमध्ये 2, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये एक रुग्ण समोर आला आहे
Published On - Jun 22,2021 6:39 AM
