AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही चुका करणार, तर तुम्हाला फळं भोगावी लागणार; मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. तेव्हा मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर...

तुम्ही चुका करणार, तर तुम्हाला फळं भोगावी लागणार; मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा
देवेंद्र फडणवीस, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
| Updated on: Oct 29, 2024 | 2:53 PM
Share

राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. चूक केलेली मान्यच करायची नाही ही त्यांची वृती आहे. त्यांना मला बोलायची गरज काय आहे आम्ही त्यांना कधी विरोधक शत्रू मानलं. खोट्या केसेस करणं, SIT नेमणं, सग्या सोयऱ्याची अमलबजावणी न करू देणे, आम्ही चूक नाही करत तुम्ही चूक केली. आंदोलन बेदखल करायचं, गुरमीत भाषा तुमची, आम्हाला खुन्नस द्यायची त्याचा आता हिशोब तर लोक चुकता करणारच आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

फळं भोगावी लागणार- जरांगे

लाडकी बहीण योजना यांनी बंद केली, पीक विम्याचे काय झालं? शेतीमालाच्या भावाचं काय झालं, कर्जमाफीचा काय झालं अनुदान कुठे आहे. लाडकी बहीण म्हणून तुम्ही गडी माणसाला पैसे दिले, तुम्ही इतके बधीर झाले. पैसे जनतेचे आहेत सरकार चालवायचे म्हणून कुणालाही वाटत आहेत. तुम्ही चुका करणार तुम्हाला फळ भोगावे लागणार आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत.

मनोज जरांगे फॅक्टर विधानसभेला किंगमेकर ठरतील का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आमचेच सगळे उमेदवार येणार आहे. पूर्ण आमचेच येणार आहे दलित मुस्लिम मराठी एकत्र आले की, सगळं आमचं असणार आहे. कधी चेहरा न बघितलेले शेतकऱ्याचे मुसलमानाचे मायक्रो ओबीसीचे पोरं तुम्हाला आमदार मंत्री झालेले दिसतील. पण हे सुंदर स्वप्न बघण्यासाठी समीकरण जुळलं पाहिजे. दलित मुस्लिम मराठयांनी शहाणं होणं गरजेचं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मी कुठे खानदानी राजकारणी म्हणून म्हणून माझी इज्जत जाणार आहे. मला लय वारसा होता. मपली- आपली आजी मुख्यमंत्री होती. मी पडलो तर किंमत जाईल. गरिबाच्या मतदानावर हे आमदार झाले. यांच्या ढेऱ्याच गरिबामुळे वाढत वर वेगळा दिसतो खाली वेगळा दिसतो, सगळं चव ना चोथा.. त्यामुळे सगळीकडे आमचेच लोक तुम्हाला दिसतील, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.