मराठा आरक्षण विधेयक मंजूर होताच मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; पुन्हा आंदोलन होणार?

Manoj Jarange Patil on Maratha Reservation Bill Pass in Maharashtra Assembly Session 2024 : मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर होताच मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला काय आवाहन केल? वाचा सविस्तर...

मराठा आरक्षण विधेयक मंजूर होताच मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; पुन्हा आंदोलन होणार?
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 2:39 PM

संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, अंतरवली सराटी, जालना | 20 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षण विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं आहे. यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दिलेल्या आरक्षणाचं स्वागत आहे. पण हे आरक्षण आम्हाला मान्य नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. उद्या जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबतची बैठक बोलावली आहे. सगळ्या मराठा बांधवांनी अंतरवली सराटीमध्ये या आंदोलनाची पुढची दिशा ठरवूयात, असं आवाहन मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

मनोज जरांगे काय म्हणाले?

मराठा आरक्षणाबाबतचं विधेयक मंजूर झालं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी हे विधेयक मंजूर करणं आमच्या हिताचं नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. या विधेयकाला विरोध करतानाच मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मराठा समाजासाठी त्यांचा मुलगा म्हणून मी काम करतो आहे. त्यांच्यासाठीच लढत राहणार, असं मनोज जरांगे म्हणाले. यावेळी हाताला असलेली सलाईन त्यांनी काढून टाकली. मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोवर उपचार घेणार नसल्याचं जरांगे म्हणाले.

निर्णयाचं स्वागत पण…

आम्ही इथून आधीही स्वागत केलं होतं. आताही स्वागत करतो. आमचं म्हणणं आहे. आमच्या हक्काचं आरक्षण द्या. सगे सोयरेची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे. जे पाहिजे ते आम्ही मिळवणारच आहोत. आधीही सांगितलं होतं की हे नाकारण्याचा काही कारणच नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. आज जे विधेयक मंजूर झालं, त्याचं आम्ही त्यासाठी आताही स्वागतच करतो. यात पोरांचं काही कल्याण होणार नाही. आमच्या हक्काच्या ओबीसीमधील आरक्षणाची मागणी आहे. त्याची अंमलबजावणी पाहिजे यावर आम्ही ठाम आहोत, असं जरांगेंनी म्हणालेत.

उद्या अंतरवलीत बैठक

उद्या दुपारी 12 वाजता अंतरवलीत बैठक होणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं. शक्यतो सर्वांनीच यावं. उद्या आंदोलनाची दिशा ठरवू. घाई गडबड नाहीच आहे ना. हरकती साठी यंत्रणा आहे. आणखी मनुष्यबळ वाढवा. आमची आणि त्यांची वैयक्तिक काही दुश्मनी नाहीये. आमचं येवढाच म्हणणं आहे की, त्यांनी आज त्या मागणीवर निर्णय घ्यायला पाहिजे होता. ज्यासाठी आक्रोश करतोय त्या माता माऊलींची चेष्टा करत आहात? सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Non Stop LIVE Update
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?.
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले....
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.