AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : हरयाणात जो फॅक्टर चालला त्याचा इथं काय संबंध? आता तुम्ही सगळे पडणार, मनोज जरांगे यांचे दसरा मेळाव्यापूर्वीच मोठे भाष्य

मनोज जरांगे पाटील यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीत जो फॅक्टर चालला, तो राज्यात कसा चालेल असा असा उलट सवाल केला आहे. नारायणगडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे, त्यापूर्वीच त्यांनी राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारं वक्तव्य केलं आहे.

Manoj Jarange : हरयाणात जो फॅक्टर चालला त्याचा इथं काय संबंध? आता तुम्ही सगळे पडणार, मनोज जरांगे यांचे दसरा मेळाव्यापूर्वीच मोठे भाष्य
मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
| Updated on: Oct 09, 2024 | 2:49 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला सुनावलं आहे. राज्यात ठिकठिकाणी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जागर सुरू असताना त्यात आता नारायणगडावरील दसरा मेळाव्याची भर पडणार आहे. या मेळाव्याच्या तयारीपूर्वीच जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीत जो फॅक्टर चालला, तो राज्यात कसा चालेल असा असा उलट सवाल केला. आता तुम्ही सगळे पडणार, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला.

हरयाणा फॅक्टरचा राज्यात काय संबंध?

फडणवीस यांचे असेच आहे, हरियाणा मध्ये जो फ्याक्टर चालला त्याचा राज्यात काय संबंध, असा सवाल त्यांनी केला. तिकडे त्यांना मराठा, जाट, शेतकरी आणि तिकडच्या अठरा पगड जातींनी मतदान केले आणि दिले का ढकलून. हे उपकार विसरणारे आहेत, एकदा जेवण झाले आणि मागून हात पुसले की हे मोकळे झाले, असा आरोप त्यांनी भाजपवर केला. यांना किती माया लावा हे असेच आहे. 106 आमदार निवडून दिले पण हे उपकार विसरले, झाले सुरू आमच्यात फूट पाडणे, इथे मराठ्यांचे वाटोळे झाले आहे, इथे आमच्या लेकरांचा प्रश्न आहे. राज्यात आमचा वेगळा प्रश्न आहे, इथे सोपे नाही, इथे एकटा मराठा पन्नास पंचावन्न टक्के आहे. ते गणित आम्हाला सांगायचे नाही आणि ते गणित जुळतही नाही. तुम्ही निवडून या आम्हाला काही गरज नाही, पण आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, असे ते म्हणाले.

सहा प्रमाणपत्रावर आरक्षण

आमचे डोळे उघडले आहेत, ज्यांचे डोळे उघडायचे नव्हते त्यांचे डोळे उघडले आहेत. जे राजकारणात आंधळे झाले होते त्यांचेही डोळे उघडले आहेत. जे आमचा पक्ष म्हणत होते, त्या पक्षातील मराठ्यांचेही डोळे उघडले आहेत. आमच्या डोळ्यात धूळ फेकून, करोडो मराठ्यांच्या अनादर आणि अपमान करून, आमच्या डोळ्यादेखत त्यांनी निर्णय घेतला आणि सहा प्रमाणपत्रावर आरक्षण मिळू शकते, तर आमच्या 57 लाख नोंदी सापडल्या आहेत. मग सरकार भेदभाव आणि जातीभेद का करत आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी मराठ्यांना खुन्नस दिली आहे, आणि आता मराठे जागे झाले आहेतय एकाचे करतो आणि एकाचे करत नाही. धनगर समाजाचा निर्णय घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो, पण मग मराठ्यांवर अन्याय का? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला.

तुमचे सगळे पाडणार

कुणबी मराठा एक कसा नाही, आणि कोणाला नाटक शिकवता? भाजपामधील गोरगरीब मराठ्यांना कळते आपण इतकी हाडाचे काडं केली, रक्ताचे पाणी केले आणि यांना निवडून आले, ते एका जातीचा निर्णय घेतात, मग मराठ्यांचे कसे होत नाही, आम्ही तुम्हाला निवडून आले आहे. आमच्या लेकरांची वाटोळे करायला निवडून आले का? याच्या साठी सत्ता हातात दिली का? असा प्रश्न भाजपामधील मराठा विचारत आहे.

आता मराठा उसळला आहे, आणि काल परवा धनगर समाज बाबतीत निर्णय झाला, तेव्हापासून मराठा खडबडून जागा झाला आहे. आता मराठा समाज एकत्र येणार आहे, आणि ही शक्ती तुम्हाला दिसणार आहे, आता जातवाण मराठा घरी थांबत नाही. जातवाण मराठा आता कोणाच्या मेळाव्याला जात नाही, आता मराठ्यांनी दंड थोपटले आहेत, आणि आता सगळे पडणार, तुम्ही किती शहाणे आहेत बघू आता, असा इशारा त्यांनी दिला.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.