Jamner Assembly Elections 2024: शरद पवार, एकनाथ खडसेंची खेळी, एकतर्फी विजय मिळवणाऱ्या गिरीश महाजनांसमोर तगडे आव्हान, मनोज जरांगेंची मिळणार साथ
Jamner Assembly Elections Details: विकासाची कामे जामनेर विधासभा मतदार संघात झालीच आहे. परंतु मतदार संघातील कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्याच्या समस्येबाबत गिरीश महाजन धावून गेले आहेत. त्यासाठी त्यांची खास टीम नेहमी कार्यरत राहिली आहे. जळगावपासून मुंबईपर्यंत रुग्णांना त्यांनी मदत केली आहे. परंतु यंदा मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

Jamner Assembly Elections Details: भाजपचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळख असलेले, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा उजवा हात समजले जाणारे, कधीकाळी पक्षात असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याशी पंगा घेणारे गिरीश महाजन यांना पुन्हा भाजपने जामनेर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसच्या गड असलेल्या या मतदार संघात गिरीश महाजन यांनी 1995 मध्ये पहिल्यांदा कमळ फुलवला. त्यानंतर मतदार संघात त्यांच्या गुर्जर समाजाची संख्या कमी असताना केवळ लोकांशी असलेल्या थेट जनसंपर्कामुळे गिरीश महाजन सलग सहा वेळा आमदार झाले. परंतु सातव्यांदा आमदार होणे त्यांच्यासाठी सोपे नाही. मतदार संघातील गणिते बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गिरीश महाजन यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहेत. त्यासाठीच त्यांनी भाजपमध्ये गिरीश महाजन यांच्यासोबत काम करणारे मराठा समाजाचे दिलीप खोडपे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे. आता महाविकास आघाडीचे ते उमेदवार असण्याची शक्यता आहे. यामुळे ही निवडणूक आता एकतर्फी नाही तर रंगतदार होणार आहे. ...
