Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता, निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच झाली मोठी घोषणा
ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. सरकारची ही योजना राज्यातील महिलावर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना महायुतीमधील काही नेत्यांनी लाडकी बहीन योजनेच्या सन्मन निधीमध्ये वाढ करून आम्ही या योजनेतील पैसे 2100 करू अशी घोषणा केली होती. मात्र राज्यात महायुतीचं सरकार येऊन एक वर्ष झालं आहे, अजूनही या योजनेचा सन्मानी निधी वाढवण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. आता या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
ज्या महिला या योजनेसाठी पात्र नव्हत्या, त्या देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आल्यानंतर सरकारने मोठं पाऊल उचललं होतं, ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांची नाव या योजनेतून वगळण्यात आली, तसेच ज्या महिला पात्र नसून देखील या योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना आळा बसावा म्हणून सरकारने या योजनेसाठी ई केवायसी सुरू केली होती. ज्या महिलांनी ई -केवायसी केली आहे, त्यांनाच आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान या योजनेतून गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात लाभार्थी महिला वगळण्यात आल्यामुळे विरोधकांकडून ही योजना बंद पडणार असल्याचा आरोप केला जात आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींचं देखील टेन्शन वाढलं आहे.
विरोधकांच्या या आरोपाला आता एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे, ते अमरावतीमध्ये बोलत होते. लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत चमत्कार दाखवला आहे. मी गरिबी पहिली आहे. काटकसर पहिली आहे. काही लोक योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले, खोडा घालणाऱ्या लोकांना लाडक्या बहिणीनी जोडा हाणला आहे. कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद पाडू शकत नाही, अशी घोषणाच आता एकनाथ शिंदे यांनी प्रचारसभेत केली आहे.
