AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदी सांभाळणार ‘मिशन महाराष्ट्र’ची कमान, मुंबईत होणार भव्य रोड शो; कसा असेल कार्यक्रम ?

मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा असून पाचव्या टप्प्यात या जागांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपाने जय्यत तयारी केली आहे. पंतप्रधान मोदी लवकरच मुंबईत येणार असून त्यांचा रोड शो देखील होणार आहे.

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदी सांभाळणार 'मिशन महाराष्ट्र'ची कमान, मुंबईत होणार भव्य रोड शो; कसा असेल कार्यक्रम ?
| Updated on: May 09, 2024 | 10:41 AM
Share

मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा असून तेथे विजय मिळवण्यासाठी भाजपने ‘मेगा प्लान’ तयार केला आहे. मुंबईतील आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसून तयार केली आहे. मुंबईतील सहा जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मैदानात उतरले आहेत. त्यासाठी ते लवकरच मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांचा रोड शो देखील होणार आहे. 15 मे रोजी मोदींचा ईशान्य मुंबई रोड शो होणार आहे. ससेच 17 तारखेला त्यांची मुंबईत पहिली जाहीर सभा होणरा आहे.

काल बांद्रा येथील MCA क्लब येथे महायुतीची बैठक झाली. या बैठकीसाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, किरण पावसकर, नितीन सरदेसाई, मनीषा कायंदे उपस्थित यांसह महायुतीमधील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी तसेच रोड शोसाठी चर्चा झाली.

मुंबईत लोकसभेच्या किती जागा ?

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांपैकी 6 जागा या मुंबईत आहेत. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य यांचा मुंबईच्या सहा मतदारसंघांमध्ये समावेश आहे. भाजप मुंबई उत्तर, मुंबई ईशान्य आणि मुंबई उत्तर मध्य मधून निवडणूक लढवत असून शिवसेना शिंदे गट हा मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य येथून निवडणूक लढवत आहेत.

कसा असेल पंतप्रधानांचा मुंबई दौरा ?

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पंतप्रधान मोदींच्या सभा वाढल्या आहेत. पीएम मोदींनी महाराष्ट्रात 16 ठिकाणी सभा घेतल्या. आतापर्यंत दोन टप्प्यात मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरू आहे. काल झालेल्या महायुतीच्या बैठकीत मोदींच्या मुंबई दौऱ्याबाबत चर्चा झाली.

महायुतीच्या मुंबईतील सहा जागांसाठी उमेदवार कोण ?

मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा मुंबई उत्तर पश्चिम – रविंद्र वायकर मुंबई उत्तर मध्य – उज्ज्वल निकम मुंबई दक्षिण – यामिनी जाधव मुंबई दक्षिण-मध्य  – राहुल शेवाळे मुंबई उत्तर – पीयूष गोयल

मुंबईत मोदींचा भव्य रोड शो होणार

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशातल अनेक मोठमोठे, नामवंत लोक राहतात. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचा दबदबा, वर्चस्वव गटाचे नेहमीच दिसून आले. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर आता ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे या जागेवर कोण विजयाचा झेंडा फडकवणार हे 4 जूनलाच कळेल. मात्र विजयासाठी भाजपने कंबर कसली असून त्याच पार्श्वभूमीवर मोदींचा मुंबई दौरा असून त्यांची जाहीर सभा तसेच रोड शो देखील होणार आहे.

अशी असेल तयारी

15 मे रोजी नरेंद्र मोदी यांचा ईशान्य मुंबईत रोड शो असेल. मोदींच्या यांच्या रोड शो चा रूट हा 15 किलोमीटरचा असेल. तसेच 17 तारखेला शिवाजी पार्क येथे पंतप्रधानांची सभा होणार असल्याचे वृत्त आहे. ही दीड लाख लोकांची सभा असेल असं रेकॉर्ड करायचं आहे, त्यासाठी नियोजन करा असे आदेश काल महायुतीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. सभेच्या आणि रोड शो च्या नियोजनासाठी एक कमिटी तयार करण्यात येईल. येणाऱ्या लोकांच्या येण्या-जाण्याची सोय करण्यासाठी देखील नियोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोसाठी 50 हजार कार्यकर्ते ईशान्य मुंबईत उपस्थित राहतील याच नियोजन महायुतीकडून करण्यात येईल. तर 17 मेच्या सभेत शिवाजी पार्क येथे तर मैदानाच्या बाहेर एलईडी स्क्रीन लावण्यात येतील.

50 हजारहुन अधिक कार्यकर्ते जमवण्याचे आदेश आशिष शेलार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईत प्रत्येक भागात नेत्याकडून कार्यकर्त्यांना येण्यासाठी बसेस दिल्या जातील या बसेस सुरळीत याव्यात आणि रून यावेत यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे , असे आदेशही देण्यात आले आहेत. सभा दोन ते अडीच तास चालणार आहे, यासाठी खाण्याची व्यवस्था ही बसमध्ये केली जाईल. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव मैदानात पाण्याच्या बॉटल ठेवल्या जाणार नाहीत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.