LIVE | माजी आमदार विवेक पाटील यांची वाहने जप्त, कर्नाळा बँक अपहार प्रकरणी सीआयडीची कारवाई

| Updated on: Apr 13, 2021 | 10:08 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | माजी आमदार विवेक पाटील यांची वाहने जप्त, कर्नाळा बँक अपहार प्रकरणी सीआयडीची कारवाई
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Apr 2021 06:11 PM (IST)

    माजी आमदार विवेक पाटील यांची वाहने जप्त

    माजी आमदार विवेक पाटील यांची वाहने जप्त

    कर्नाळा बँक अपहार प्रकरणी सीआयडीची कारवाई

    राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाची या प्रकरणात कारवाई करण्यास सुरूवात

    रिझर्व्ह बँकेने सहकार आयुक्तांना या बँकेचे विशेष लेखा परीक्षण करण्याचे आदेश

  • 13 Apr 2021 05:56 PM (IST)

    सोलापूर शहरातही मुसळधार पाऊस, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली

    सोलापुर : सोलापूर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस, विजेच्या कडकटासह मुसळधार पाऊस, द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढ

  • 13 Apr 2021 05:51 PM (IST)

    चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

    चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू, नागभीड तालुक्यातील धामणगाव गावालगतच्या जंगलातील घटना, विक्राबाई खोब्रागडे (65) ही महिला धामणगाव येथील रहिवासी असून आज सकाळी मोहफुल वेचण्यासाठी जंगलात गेली होती, मात्र दुपारपर्यंत घरी न आल्याने जंगलात शोध घेतल्यावर मिळाला मृतदेह, वनपथक घटनास्थळी दाखल

  • 13 Apr 2021 05:49 PM (IST)

    कोल्हापुरात अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात

    कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणचा वीज पुरवठा झाला खंडीत, भुदरगड तालुक्यातील तांबाळे इथं वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले, हायस्कूलच्या इमारतीचेही झालं मोठं नुकसान

  • 13 Apr 2021 05:36 PM (IST)

    मी कच्च्या गुरुचा चेला नाही, धनंजय मुंडेंचा भाजपला इशारा

    पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराप्रत्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आज पंढरपुरात दाखल झाले. त्यांनी आज प्रचारसभेत लोकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.

    धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

    आजचा दिवस माझ्या आयुष्यात का यावा? पंढरपूरच्या पांडुरंगाला मी प्रश्न विचारतो. माझ्या जीवनातील सर्वात मोठी सभा नानांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळीच मी संगितलं होतं, नाना हॅट्रिक करणार ते. नानांचं आणि माझं नातं हे वडील-मुलाचं होतं. मी आशीर्वाद द्यायला नाही. तर भगीरथसाठी आशीर्वाद मागायला अलोय. भाजपने इथलं राजकारण खालच्या पातळीवर नेले आहे. पोटनिवडणूक लागल्यावर विरोधात उमेदवार देण्याचं पाप यांनी केलं. लाखोंच्या संख्येने कोरोनाचे पेशंट समोर येतायत. अशा परिस्थितीत ही निवडणूक लागायला नको होती. वारकरी संप्रदायात या गावाचं वेगळं स्थान आहे. त्यामुळे 17 तारखेला वळवळ करणाऱ्याला चांगलं रिंगण दाखवायचं आहे.

    मी कच्च्या गुरुचा चेला नाही. कोणाचीही पावसात सभा झाली की यांची धसकी भरते. मी कासेगावच्या सभेत सांगितले होते, मायच्यान कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करु नका. पण नाद केल्याशिवाय त्यांना रहावत नाही. टिका करायचे विरोधकांचे काम आहे. लोकशाहीचा आदर करणारे आम्ही कार्यकर्ते, आम्हाला लोकशाही शिकवता. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं पवार साहेबांनी करुन दाखवलं.

  • 13 Apr 2021 04:31 PM (IST)

    हिंगोली जिल्हायत काही ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात

    हिंगोली : जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात, विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात, हळद उत्पादक शेतकरी चिंतेत

  • 13 Apr 2021 03:41 PM (IST)

    अहमदनगर शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पाऊस

    अहमदनगर शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पाऊस.... विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस... उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा.... कांदा काढणीला पावसामुळे ब्रेक .... अवकाळी पावसाने होणार कांद्याचं नुकसान.... जिल्हयातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण....

  • 13 Apr 2021 03:24 PM (IST)

    राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या तीन तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

    राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या तीन तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता, हवामाना विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांची ट्विटरवर माहिती. महाराष्ट्रात नाशिक, पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, शोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढच्या तीन ते चार तासात, वादळी वारे, वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.

  • 13 Apr 2021 03:08 PM (IST)

    म्हाडाच्या ताडदेवमध्ये महिलांसाठी हॉस्टेल उभारणार: जितेंद्र आव्हाड

    महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामासाठी आणि शिक्षणासाठी येणाऱ्या महिलांसाठी ताडदेवमध्ये हॉस्टेल उभारणार आहोत, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. येत्या दोन वर्षांमध्ये ते हॉस्टेल सेवेत दाखल होईल, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. ताडदेवमध्ये 500 खोल्यांचं हॉस्टेल उभारणार आहोत. एक हजार महिलांची सोय त्या इमारतीमध्ये होईल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मागणीकेली आहे.

  • 13 Apr 2021 03:07 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांची मोठी घोषणा, एक हजार महिलांसाठी होस्टेल उभारणार

    गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. म्हाडा मुंबईतील ताडदेव येथे एक हजार महिलांसाठी पाचशे खोलीचंं हॉस्टेल उभारणार असल्याची घोषणा केली. या हॉस्टेलमध्ये महिलांसाठी सर्व सुविधा असतील, असंही आव्हाड यांनी सांगितलं.

  • 13 Apr 2021 03:00 PM (IST)

    गडचिरोली नाका-बंदी दरम्यान कर्तव्यावर असलेल्या पोलीस नायकास आयसर गाडीची जबर धडक

    गडचिरोली : आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत नाकाबंदी करीत असताना आष्टी चंद्रपूर मार्गावरील फारेस्ट चेक पोस्ट नाक्यावरती नाकाबंदी कर्तव्यावर असलेल्या पोलीस नाईक गजानन ठाकूर यांना एका आयसर गाडीने धडक दिली. चंद्रपूर दिशेने येणारी गाडी आयसर या गाडीला थांबवत असता सदर गाडी वेगाने येऊन पोलीस शिपायास जबर धडक दिली. धडकेमध्ये पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला असून त्याला वेळेवर उपचाराकरिता आष्टी ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्यात आल्य आहे. सदर घटना नाका-बंदी दरम्यान नाक्याजवळ घडली

  • 13 Apr 2021 02:41 PM (IST)

    जमावबंदीचा आदेश असताना कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या काठावर म्हशी पळवण्याच्या स्पर्धेची ईर्षा

    कोल्हापूर -

    पोलीस आल्याचे पाहताच म्हशींसोबत ठोकली धूम

    पाडव्याच्या निमित्ताने म्हशी पळवण्याची कोल्हापुरात परंपरा

    जमावबंदीचा आदेश असताना कोल्हापूरातील पंचगंगा नदीच्या काठावर स्पर्धेची ईर्षा

    जवळपास तीनशेहून अधिकांची पळताभुई थोडी

    पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

  • 13 Apr 2021 12:11 PM (IST)

    अजितदादांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन घेतली शरद पवार यांची भेट

    अजितदादांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन घेतली शरद पवार यांची भेट

    तब्येतीची विचारपूस केली

    शरद पवारांना दोन दिवसांत डिस्चार्ज मिळणार

  • 13 Apr 2021 11:11 AM (IST)

    वसंतदादा पाटील सिव्हील हॉस्पिटलचा पोर्च अचानक ढासळला, सुदैवाने जीवित हानी नाही

    सांगली येथील वसंतदादा पाटील सिव्हील हॉस्पिटलचा पोर्च रात्री अचानक ढासळला. रात्रीची वेळ असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. हॉस्पिटलच्या समोरील बाजूचा हा स्लॅब ढासळला.

  • 13 Apr 2021 10:23 AM (IST)

    पुणे शहरातील अनेक भागात आज गुढी पाडव्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

    शहरातील अनेक भागात आज गुढी पाडव्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी,

    - निर्बंध असतांना अनेक भागात नियमांची पायमल्ली,

    - भाजी मंडईसह किराणा खरेदीसाठी नागरिक गर्दी करतायत,

    - प्रशासनाने मात्र गर्दीकडे दुर्लक्ष,

    - पुण्यात सध्या 53 हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहेत

  • 13 Apr 2021 10:22 AM (IST)

    वणी मंदिर भाविकांसाठी बंद

    साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणीच्या मंदिरात गुढीपाडवा साध्य पद्धतीने साजरा

    निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा विधी संपन्न

    वणी मंदिर भाविकांसाठी बंद

  • 13 Apr 2021 09:57 AM (IST)

    नागपूरातील लेबर ठिय्यावर मजुरांची गर्दी

    नागपूरातील लेबर ठिय्यावर मजुरांची गर्दी

    - लॉकडाऊन लागलं तर पोटाची खळगी भरण्यासाठी कामाचा शोध

    - लॉकडाऊनच्या काळात जगण्याची अन्नधान्य, किराण्याची सोय व्हावी म्हणून मजुरांची भटकंती

    - प्रतापनगर परिसरात मजुरांची गर्दी

    - काम मिळत नसल्याने मजुरांचा जगण्याचा प्रश्न

  • 13 Apr 2021 09:50 AM (IST)

    अभिनेते विरा साथीदार यांना कोरोनाने गाठलं, उपचारादरम्यान अखेरचा श्वास

    नागपुरातील विचारवंत, लेखक, अभिनेते विरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन

    ‘कोर्ट’ चित्रपटात बजावली होती मुख्य भूमिका

    -मध्यरात्री उपचारादरम्यान एम्समध्ये झालं निधन

    पाच दिवसांपासून सुरु होते उपचार, आठ दिवसांपूर्वी कोरोनाची लागण

    Vira Sathidar Pass Away

    वीरा साथीदार

  • 13 Apr 2021 09:35 AM (IST)

    ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

    नाशिक - ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

    निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा विधी आणि धार्मिक कार्यक्रमाना सुरुवात

    कोरोना च्या पार्शवभूमीवर यंदा देखील मंदीर भाविकांसाठी बंद

    सलग दुसऱ्या वर्षी कोरोना मुळे रामनवमी उत्सव साधेपणाने

    मात्र मंदिरावर विद्युत न केल्याने भाविकांमध्ये नाराजी

  • 13 Apr 2021 09:24 AM (IST)

    नाशकातील ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

    नाशिक -

    ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

    निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा विधी आणि धार्मिक कार्यक्रमाना सुरुवात

    कोरोना च्या पार्शवभूमीवर यंदा देखील मंदीर भाविकांसाठी बंद

    सलग दुसऱ्या वर्षी कोरोना मुळे रामनवमी उत्सव साधेपणाने

    मात्र मंदिरावर विद्युत न केल्याने भाविकांमध्ये नाराजी

  • 13 Apr 2021 09:14 AM (IST)

    ड्रग्ज प्रकरण : मुंबई एनसीबीचे तीन ठिकाणी धाड

    सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरण -

    मुंबई एनसीबीने काल रात्री मुंबईतील 3 ठिकाणी छापा टाकला, मालाड, परळ आणि सांताक्रूझ भागात छापा टाकण्यात आला.

    या छाप्यात 2 ड्रग्स पेडलर्सना ताब्यात घेण्यात आले असून या ड्रग पेडलर्सकडून ड्रग्जही जप्त करण्यात आली आहेत.

    या 2 ड्रग्स पेडलर्सपैकी एक म्हणजे पोलिस होणार होता पण तो ड्रग्स पेडलर बनला

    अधिक तपास एनसीबी मार्फ़त शुरू आहे

  • 13 Apr 2021 08:53 AM (IST)

    आदित्य ठाकरे यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

    पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह... - लवकरच समाज माध्यमासमोर येतील, जोमाने काम करतील, असं मत केलं व्यक्त.. - झूमद्वारे केलं वरळी एनएससीआय इथे कोविड रुग्णालयाचं लोकार्पण

  • 13 Apr 2021 07:34 AM (IST)

    नाशिक महापालिकेची जम्बो भरती

    नाशिक

    - नाशिक महापालिकेची जम्बो भरती - 1321 जागांवर केली भरती - यातील 721 उमेदवार झाले रुजू - मात्र 600 उमेदवारांची टाळाटाळ - ऑर्डर घेऊनही हजर न झाल्यानं, प्रशासनाचा कठोर निर्णय - पदनाम,मानधनात वाढ करूनही उमेदवारांची पाठ - या 600 उमेदवारांना,साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोटीस जारी - पालिका आयुक्त कैलास जाधव यांचे आदेश - त्वरीत हजर न झाल्यास,भविष्यात कोणत्याही सरकारी नौकरिला अपात्र ठरवण्याची कठोर भूमिका

  • 13 Apr 2021 07:33 AM (IST)

    मुस्लीम धर्मियांचे रमजान पर्व येत्या बुधवारपासून होणार सुरू

    मुस्लिम धर्मियांचे रमजान पर्व येत्या बुधवार पासून होणार सुरू नाशिक शहरासह जिल्ह्यासह अन्य शहरांमध्येही चंद्रदर्शन न घडल्याने मुस्लीम समुदायाचा निर्णय रमजान पर्व येत्या बुधवारपासून सुरु होणार असल्याची शहर ए खतीब यांची हाफिज हिसमुद्दीन यांची घोषणा

  • 13 Apr 2021 06:45 AM (IST)

    हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय, आनंद शिंदेंचं फडणवीसांना उत्तर

    आनंद शिंदे यांच्या सभेआधी भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मंगळवेढ्यात सभा झाली होती. त्या सभेत फडणवीस यांनी सरकार पाडण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यावर आता गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता 'त्यांना सांगायचंय मला' असे म्हणत फडणवीसांच्या वक्तव्याचा एका गाण्याच्या माध्यमातून समाचार घेतला.

    तुम्ही चिडवताय, आम्ही चिडणार नाय. तुम्ही लय काय करताय, तसं काय घडणार नाय. तुम्ही रडवताय पण आम्ही रडणार नाय. हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय.

  • 13 Apr 2021 06:43 AM (IST)

    मंगळ ग्रह दोन तास चंद्राआड जाणार

    मंगळ ग्रह दोन तास चंद्राआड जाणार आहे

    दुर्मीळ खगोलीय घटना येत्या 17 एप्रिल रोजी घडणार

    मंगळ ग्रह सुमारे दोन तास चंद्रबिंबाआड लपण्याची एक दुर्मीळ खगोलीय घटना घडणार आहे

    खगोलप्रेमींना सूर्यमालेतील लाल ग्रह असलेल्या मंगळाच्या बाबतीत एक मेजवानी मिळणार आहे

  • 13 Apr 2021 06:41 AM (IST)

    संगीतकार अजय-अतुल यांच्याविरूद्ध तक्रार

    संगीतकार अजय-अतुल यांच्याविरूद्ध तक्रार,

    अण्णा भाऊ साठे यांच्या गीताचे विडंबन

    परभणी येथील लालसेनेचे प्रमुख गणपत भिसे यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

  • 13 Apr 2021 06:40 AM (IST)

    मुरळीधर मोहळ यांनी घेतली ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांची भेट

    पुणे -

    मुरळीधर मोहळ यांनी घेतली ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांची भेट

    ससून रुग्णालयाचे किमान ६० टक्के बेड्स कोविडसाठी उपलब्ध करावे आणि ससूनमधील सरकारी RT-PCR चाचण्यांची क्षमता वाढवावी, या संदर्भात केली चर्चा

Published On - Apr 13,2021 6:11 PM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.