LIVE | सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांचं मुंबईमध्ये निधन

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांचं मुंबईमध्ये निधन

| Edited By: prajwal dhage

Apr 23, 2021 | 12:03 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 22 Apr 2021 10:57 PM (IST)

  सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांचं मुंबईमध्ये निधन

  सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांचं निधन

  कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईमध्ये निधन

  आशिकी, साजन, दिवाना, सडकसारख्या सिनेमांमधील सुप्रसिद्ध गितांना श्रवण यांचं संगीत

  90 च्या दशकातील अनेक प्रसिद्ध गितांना श्रवण यांचं संगीत

  श्रवण राठोड यांच्या जाण्याने बॉलीवूडमध्ये शोककळा

 • 22 Apr 2021 07:37 PM (IST)

  कुसुम्बा येथे पती- पत्नीचा गळा आवळून खून

  जळगाव : कुसुम्बा येथे पती- पत्नीचा गळा आवळून खून

  या घटनेने गावात प्रचंड खळबळ

  खुनाचे कारण अस्पष्ट, पोलीस पथक घटनास्थळी दाखल

 • 22 Apr 2021 07:29 PM (IST)

  लोकसत्ताचे जेष्ठ पत्रकार अशोक तुपे यांचे कोरोनामुळे निधन

  अहमदनगर : लोकसत्ताचे जेष्ठ पत्रकार अशोक तुपे यांचे कोरोनामुळे निधन

  नगर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर सुरु होते उपचार

  मागील महिनाभरापासून सुरु होते उपचार

  अशोक तुपे यांना कृषी विषयी आवड होती

  महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक कृषी पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते

 • 22 Apr 2021 06:37 PM (IST)

  पंढरपुरात चैत्र यात्रा रद्द, उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्याचा निर्णय

  पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणीमातेच्या प्रमुख चार यात्रांपैकी असलेली चैत्र यात्रा प्रतिकात्मक स्वरुपात करण्याचा मंदिर समितीचा निर्णय

  कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर मंदिर 30 एप्रीलपर्यंत भाविकांना आहे बंद

  राज्य सरकारनेही लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे चैत्र यात्रा रद्द करण्याचा निर्णय

  23 एप्रील रोजी आहे चैत्र यात्रा

  भाविकांनी घरात बसूनच यात्रा साजरी करावी असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांचे आवाहन

 • 22 Apr 2021 05:07 PM (IST)

  विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार: उदय सामंत

  राज्यात कठोर निर्बंधामुळे ऑफलाईन परीक्षा घेणं अशक्य आहे. विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. प्राध्यापकांच्या भरतीबाबत चर्चा झाली. प्राध्यापक भरती करायची आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्यात येईल.

 • 22 Apr 2021 04:37 PM (IST)

  उस्मानाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा यांचे निधन

  उस्मानाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा यांचे निधन

  कोरोनाची लागण झाल्यामुळे निर्धन

  हैद्राबाद येथे उपचारादरम्यान दुखद निधन

 • 22 Apr 2021 01:55 PM (IST)

  पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली कोरोना लस

  नाशिक - पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली लस

  महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात घेतली लस

  माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील घेतली लस

 • 22 Apr 2021 01:16 PM (IST)

  अत्यावश्यक सेवेसाठी एसटी सुरु राहतील, अनिल परब यांची माहिती

  अत्यावश्यक सेवेसाठी एसटी सुरु राहतील, अनिल परब यांची माहिती

  एस.टी अत्यावश्यक सेवेसाठीच सुरु राहतील त्यामुळे एसटीची संख्या अर्थातच कमी असेल

  आज मंत्रालयात ४.३० वाजता महत्वाची बैठक आहे

  या बैठकीत खाजगी वाहतूक, बेस्ट आणि एसटी कर्मचा-यांची सुरक्षा यांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतले जतील

 • 22 Apr 2021 12:08 PM (IST)

  मनमाडमध्ये कोव्हिड सेंटर अवघ्या काही तासात झाले फुल्ल

  मनमाड-डिसीएचसी कोविड सेंटर सुरू होताच अवघ्या काही तासात झाले फुल... आता रुग्णांना मिळत नाही बेड...काल दुपारी 30 बेड ऑक्सिजन कोविड सेंटरचे करण्यात आले होते उदघाटन...डिसीएचसी सेंटर सुरू होताच फुल होत असल्याने सर्वांची वाढली चिंता

 • 22 Apr 2021 11:48 AM (IST)

  ठाण्यात रिक्षावर झाड कोसळून दोघांचा मृत्यू

  पाऊस,वारा नसतानाही ठाण्यात भलामोठा वृक्ष कोसळून भीषण दुर्घटना घडली.

  ठाण्यातील तलावपाळी येथील डॉ. मुस रोडवरील गडकरी रंगायतन नजीक एक भले मोठे झाड रिक्षावर कोसळून रिक्षाचालकांसह रिक्षातील एक प्रवासी जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.

  अरविंद राजभर वय (२८)रा. रामनगर वागळे इस्टेट असे रिक्षाचालकाचे तर, चंद्रकांत केशव पाटील वय (५७) रा. रबाळे नवीमुंबई असे मृत प्रवाशाचे नाव आहे.

  घटनास्थळी अग्निशमन दल,पोलीस तसेच आपत्ती व्यवसथापन पथक पोहचुन रस्त्यावरील झाड बाजूला केले.

  दरम्यान,यापूर्वीही ठाण्यात झाड कोसळुन नागरीकांचा मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

 • 22 Apr 2021 10:51 AM (IST)

  नागपूरला रेमडेसिव्हीरचा पुरवठा न केल्याबद्दल न्यायालयाकडून नाराजी व्यक्त

  - ‘हतबलतेची आम्हालाही लाज वाटतेय’ नागपूर खंडपीठाची मौखिक टिपणी

  - उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केली अगतीकता

  - नागपूरला रेमडेसवीरचा पुरवठा न केल्याबद्दल न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

  - नागपूरला रेमडेसवीर च्या १० हजार व्हायल्स पुरवठ्याचा आदेश न्यायालयाने दिला होता

  - न्यायालयाच्या आदेशाचा पुर्तता करण्यात शासन अपयशी ठरलं

  - “कायद्याची कुणालाही भिती नाही, आम्ही या पापी समाजाचे घटक आहोत, रुग्णांलाठी काहीच करु शकत नसल्याच्या हतबलतेची आम्हालाही लाज वाटते”

  - अशी मौखिक टिपणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केलीय

 • 22 Apr 2021 10:38 AM (IST)

  मुंबईच्या मुलूंड इथल्या किराना दुकानाबाहेर खरेदीसाठी रांग

  - मुंबईच्या मुलूंड इथल्या किराना दुकानाबाहेर खरेदीसाठी रांग

  - नव्या आदेशानुसार सकाळी सात ते ११ या वेळेतच किराणा माल विकत घेता येणार

  - यानंतर मुंबईकरांना घराबाहेर पडता येणार नाही

  - दुकानदारांकडून लोकांना मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन करण्याचं आवाहन

 • 22 Apr 2021 10:28 AM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदर्श पुनावाला यांची ऑनलाईन चर्चा

  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आदर्श पूनावाला याची ऑनलाईन चर्चा झालीय

  18-45 लस मोहिमेच्या योजने संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदर पूनावाला मकरन आढावा घेतलाय

  1 मे पासून 18 वयोगटा पुढील लसीकरण मोहिमेची योजना केंद्र सरकारने योजली आहे .महाराष्ट्रातील अंदाजे . त्यामुळे 5..5 कोटी 18 वयोगटातील लस घेण्यास पात्र असतील. आतापर्यंत, 1.2 कोटी किमान एक डोस दिले गेले आहेत.

  कोविशिल्टची निर्मिती करणारी सीरम आपल्या आधीच्या वचनबद्धतेचा विचार करुन राज्याला किती पुरवठा करण्यास सक्षम असेल यावर चर्चा करण्यासाठी ही चर्चा झाल्याचं कळतंय. किंमतीच्या वाटाघाटींबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं कळत आहे

 • 22 Apr 2021 09:38 AM (IST)

  मुंबईच्या रेल्वेतून सर्वसामान्य मुंबईकरांना प्रवासाची परवानगी नाही

  - मुंबईच्या रेल्वेतून सर्वसामान्य मुंबईकरांना प्रवासाची परवानगी नाही

  - अत्यावश्यक सेवेतील केवळ १५ टक्के लोकांनाच ही परवानगी आहे

  - मुंबईच्या कुरिला रेल्वे स्थानकात आज पहाटेपासून प्रवासाला सुरवात झालीये

  - प्रवाशांची एकच गर्दी पाहायला मिळतेय, त्यामुळे सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा ऊडतोय

  - रेल्वेतून प्रवासाला परवानगी द्यायला हवी होती अशी प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिलीये

  - विनामास्क प्रवास करणार्यांचे फोटो ट्विट करा असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलंय

 • 22 Apr 2021 08:13 AM (IST)

  पुणे जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी कोव्हिड केअर सेंटर आणि रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश

  पुणे

  जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी कोव्हिड केअर सेंटर आणि रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश

  पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश

  शिवाय या रुग्णालयांमधील संभाव्य धोके टाळण्यासाठीची मार्गदर्शक नियमावलीही तयार

  या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचा आदेश

 • 22 Apr 2021 08:12 AM (IST)

  पिंपरी-चिंचवडमधील भोसरी पोलिसांनी 14 लाख रुपये किंमतीचा बेकायदेशीररित्या विदेशी दारुचा साठा जप्‍त

  पिंपरी चिंचवड

  - पिंपरी-चिंचवडमधील भोसरी पोलिसांनी 14 लाख रुपये किंमतीचा बेकायदेशीररित्या विदेशी दारूचा साठा केला जप्‍त

  -ह्या प्रकरणी दोन आरोपी विरुद्ध भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल

  - नाशिक फाटा भागातील फाल्कन बस लाईन्स प्रायव्हेट लिमिटेड या दुकानांमध्ये हा विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात आला

  -हे आरोपी लॉकडाऊन सुरू झाल्याने चढ्या भावाने विकण्यासाठी हा विदेशी दारूचा साठा आणला असल्याची माहिती,कडक लॉकडाऊन झाल्यानंतर हा दारू साठा तीन पट किंमतीने करणार होते

 • 22 Apr 2021 07:54 AM (IST)

  औरंगाबादच्या मेलट्रॉन रुग्णालयात उच्च दाबाच्या ऑक्सिजनअभावी एकाचा मृत्यू झाल्याचा संशय

  औरंगाबाद -

  औरंगाबादच्या मेलट्रॉन रुग्णालयातही एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची संशय

  उच्च दाबाच्या ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा संशय

  गंभीर रुग्णाला उच्च दाबाने ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती

  मात्र रुग्णालय प्रशासनाकडून घटनेचा इन्कार

  रुग्णाला घाटी रुग्णालयात शिफ्ट करताना मृत्यू झाल्याचा दावा

  मात्र मेलट्रॉन रुग्णालयात उच्च दाबाच्या ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याची माहिती उघड

 • 22 Apr 2021 06:43 AM (IST)

  नालासोपाऱ्यात रहिवाशी इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या जवानांनी 50 च्या वर लोकांचे प्राण वाचवले

  नालासोपारा -

  नालासोपारा पूर्व रश्मी क्लासिक या इमारतीत मध्ये रात्री 10 च्या सुमारास आग लागली

  आगीच्या धुराचे कल्लोळ इमारतीच्या 6 व्या माजल्यापर्यंत पोहोचले

  सर्वत्र धुरच धूर झाल्याने या आगीचे स्पष्ट कारण समजले नाही, मात्र मिटरबॉक्स मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज

  रहिवाशांत भीतीचे वातावरण

  वसई विरार अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहचून 50 च्या वर राहिवाशांना इमारतीच्या 7 व्या मजल्यावरील टेरेसवर रेस्क्यू करून ठेवून, आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

  या घटनेत एक तरुण शिडीवरून पडल्याने तो किरकोळ जखमी

  रात्रीची वेळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही

 • 22 Apr 2021 06:31 AM (IST)

  जीएसटी, आयकर तरतुदींच्या अंमलबजावणीची तारीख स्थगित करा

  नागपूर : कोरोनाच्या काळात लॉकडाऊनचा व्यवसायावर परिणाम झाला आहे, ही बाब ध्यानात ठेवून केंद्र सरकारने जीएसटी व आयकर तरतुदींच्या अंमलबजावणीची तारीख स्थगित करण्याची मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

 • 22 Apr 2021 06:30 AM (IST)

  काँग्रेसने पश्चिम बंगालमधील प्रचार थांबवला

  नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ पैकी ११२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचे ३ टप्पे अद्याप पार पडावयाचे आहेत. परंतु, नेमक्या याचवेळी काँग्रेसने येथील प्रचारातून पूर्णपणे अंग काढून घेतल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी रविवारी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतरच काँग्रेसने या राज्यातील प्रचार जवळज‌वळ थांबवल्याचे दिसत आहे.

Published On - Apr 22,2021 10:59 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें