Maharashtra News LIVE Update | ईडी नोटीसला कायदेशीर उत्तर देऊ, अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | ईडी नोटीसला कायदेशीर उत्तर देऊ, अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 29 Aug 2021 22:08 PM (IST)

  मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात सामील होण्यासाठी आतापर्यंत 50 हुन अधिक गोविंदा पथकांची नोंद

  ठाणे :

  मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात सामील होण्यासाठी आतापर्यंत 50 हुन अधिक गोविंदा पथकांची नोंद,

  50 हुन अधिक गोविंदा पथक लावणार मनसेच्या दहीहंडी उत्सवात हजेरी..

  मुंबई, ठाणे,डोंबिवली, वसई-विरार मधील गोविंदा पथकाने केली नोंद

  काही महिला गोविंदा पथकाने देखील केली आहे नोंद, तुम्ही थर लावायला तयार असाल तर मी दहीहंडी बांधायला तयार आहे, अशा शब्दात मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलं होतं गोविंदा पथकांना आवाहन

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी उत्सवावर बंदी आणली असतांना मनसे करणार ठाण्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्याच्या तयारीत

 • 29 Aug 2021 20:08 PM (IST)

  ईडी नोटीसला कायदेशीर उत्तर देऊ, अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया

  ईडीच्या नोटीसनंतर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया :

  आज संध्याकाळी मला ईडीची नोटीस मिळाली आहे. त्यात कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे कशासी संबंधित आहे, हे मला सांगता येणार नाही. जोपर्यंत प्रकरण कळत नाही तोपर्यंत सांगण कठीण आहे. नोटीसमध्ये फक्त इन्व्हेस्टीगेशनचा पार्ट असल्याचा उल्लेख केला आहे. त्याला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. मला कारणं कळली पाहिजे. मी या प्रक्रियेवर कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन निर्णय घेईन. नोटीस कायदेशीर आलेली आहे त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल. नोटीस मागचं कारण काय हे जेव्हा समजेल तेव्हा आम्ही उत्तर देऊ

 • 29 Aug 2021 19:05 PM (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 106 नवे कोरोनाबाधित, दोघांचा मृत्यू

  नाशिक :

  आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 106

  आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 90

  नाशिक मनपा- 26
  नाशिक ग्रामीण- 56
  मालेगाव मनपा- 01
  जिल्हा बाह्य- 07

  नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8574

  आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 02
  नाशिक मनपा- 00
  मालेगाव मनपा- 00
  नाशिक ग्रामीण- 02
  जिल्हा बाह्य- 00

 • 29 Aug 2021 18:07 PM (IST)

  परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस

  परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. कायदेशीरपणे लढाई लढू, असंही राऊत म्हणाले आहेत.

 • 29 Aug 2021 16:45 PM (IST)

  शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शेखर सावरबांधे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

  नागपूर :

  शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख शेखर सावरबांधे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

  प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत प्रवेश

  प्रफुल पटेल यांनी सावरबांधे यांच्या घरी येऊन दिला पक्ष प्रवेश

  येणाऱ्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी तयारी करत आहे

  सावरबांधे यांची पक्षाला वाढविण्यात मोठी मदत होणार असून विदर्भात पक्ष वाढविला जात असल्याच पटेल यांनी सांगीतलं

 • 29 Aug 2021 16:43 PM (IST)

  कर नाही तर डर कशाला? : एकनाथ खडसे

  एकनाथ खडसे यांची ईडी आणि भाजपाचे चंद्रकांत पाटील यांच्यावर खळबळजनक प्रतिक्रिया :

  -कर नाही तर डर कशाला? त्यामुळे मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे

  चंद्रकांत दादांचा मी आभारी आहे त्यांनी मान्य केलं की माझी ईडीची चौकशी त्यांनी लावली

  चंद्रकांत दादांनी म्हटले आहे जे आमच्याकडे भ्रष्टाचार गैरव्यवहार करतात त्या लोकांवर कारवाई करतो. त्यामुळे मलाही अपेक्षा आहे की चंद्रकांत दादांच्या शेजारी बसणाऱ्या लोकांचीही चौकशी करावी. एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांना खडसेंनी नाव न घेता टोला लावला

  ईडी लावली तर मी सिडी लावेल ही गोष्ट खरी आहे

  योग्य वेळेस सिडी बाहेर येईल

  सीडीची चौकशी पोलिसांकडून महिनाभरापासून सुरू आहे सीडीचा अहवाल आल्यावर त़ो मी जाहीर करेल खडसे

 • 29 Aug 2021 16:41 PM (IST)

  पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नाना पटोले एकाच मंचावर

  पुणे –

  – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नाना पटोले एकाच मंचावर,

  – १३० घरांच्या चावी वाटप आणि करारनामा लोकार्पण सोहळ्याला हे दोन्ही नेते उपस्थित,

  – झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पाअंतर्गत साकरलेला प्रकल्प

 • 29 Aug 2021 16:41 PM (IST)

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं दोडामार्ग येथे आगमन

  सिंधुदुर्ग-

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं दोडामार्ग येथे आगमन

  आगमनवेळेला जोरदार पावसाच्या सरी

  ढोल-ताशांच्या गजरात नारायण राणे यांचा केला जातंय जंगी स्वागत

  जन आशीर्वाद यात्रा पोहोचली दुर्गम अशा दोडामार्गमध्ये

  थोड्यावेळात नारायण राणे व्यासपीठावरुन संबोधित करणार

 • 29 Aug 2021 15:43 PM (IST)

  राज्यमंत्री अदिती तटकरे राळेगणसिद्धीत दाखल, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची घेतली भेट

  अहमदनगर :

  राज्यमंत्री अदिती तटकरे राळेगणसिद्धीत दाखल

  जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची घेतली भेट

  अदिती तटकरे आणि अण्णांची चर्चा सुरू

  आमदार निलेश लंके आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित

 • 29 Aug 2021 15:38 PM (IST)

  भिवंडी वाडा मनोर रस्त्यावर पुन्हा टोल वसुल सुरू केल्यास टोल नाका पेटवून देऊ, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा इशारा

  भिवंडी :

  भिवंडी वाडा मनोर रस्त्यावर पुन्हा टोल वसुल सुरू केल्यास टोल नाका पेटवून देण्याचा केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा इशारा

  सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यावर टोल वसुली पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत तर केंद्र सरकार कडून या रस्त्यास राष्ट्रीय महामार्ग करण्यास दिली तत्वतः मान्यता .

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI