Maharashtra News Live Updates : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मुंबईत एकत्र लढणार

| Updated on: Dec 17, 2021 | 7:01 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

Maharashtra News Live Updates : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मुंबईत एकत्र लढणार

नागपूर : नागपुरमध्ये आज तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेची घंट वाजणार आहे. पहिले ते सातवीपर्यंत वर्ग सुरू करण्यास मान्यता मिळाल्यानंतर, आजपासून शहरात शाळा सुरू करण्यात येत आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून, सुरक्षीत वातावरणात शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. आजपासून शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थांमध्ये देखील उत्साह असल्याचे पहायला मिळत आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Dec 2021 12:25 AM (IST)

    पुणे

    काँग्रेस नेते हार्दिक पटेल पुण्यात दाखल,

    उद्या कर्जत नगरपंचायतीच्या प्रचाराला लावणार हजेरी,

    काँग्रेस युवक कार्यकर्त्यांनी विमानतळावर केलं स्वागत .

  • 16 Dec 2021 11:19 PM (IST)

    पुणे

    नजीकच्या 40 ते 45 वर्षात भाजपाला कोणीच हरवू शकत नाही

    मी काल एका मोठ्या विश्लेषणकाराला भेटलो होतो

    त्यांनी मला सांगितल की गेल्या वेळेस मोदींना 22 कोटी मतं मिळाली 303 खासदार निवडून आले

    प्रशांत किशोर हे ममता दिदींचे सल्लागार आहेत ते200 250 कोटी रुपये फी.घेतात

    पैसे घेऊन त्यांनी ममता दिदींना सांगितल की 2024 आणि 2029 ला मोदींना हरवणं सोपं नाही

    चंद्रकांत पाटलांची ममता बँनर्जींवर टिका

  • 16 Dec 2021 11:10 PM (IST)

    पुणे

    छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली

    सर्वधर्म समभावाची नाही , त्यांनी शंकराची पुजा केली आणि हिंदू धर्माची पुजा केली

    कारण हिंदू धर्म हा सर्वधर्म समभाव शिकवतो

    चंद्रकांत पाटलांच पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

    तर मी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होटबँक तयार केली

    त्याचा अर्थ असा नाही ईव्हीएम मशीन घेऊन तयार केली

    तर त्यांनी जनमत तयार केलं

    त्यात चुकीचं काय ? याच विधानाला घेऊन कोणतरी निदर्शने करणार होतं,

    मला धमकी आली मात्र हम किसीको टोकेंगे नही किसीने टोका तो छोडेंगे भी नही

    चंद्रकांत पाटलांचा इशारा

  • 16 Dec 2021 10:48 PM (IST)

    अहमदनगर

    कर्जत नगरपंचायत निवडणूक रणधुमाळी

    भाजपच्या उमेदवारांनी निवडणुकीतुन माघार घेतल्या नंतर प्रथमच केला खुलासा

    रोहित पवारांनी खेळी करत राम शिंदे यांना दिला होता धक्का

    आम्हाला दमदाटी करून आमचा अर्ज काढून घेतल्याचा आरोप

    भाजपाचे अधिकृत उमेदवार नीता कचरे यांचे दिर आणि पूजा अनिल कचरे यांचे पती अनिल कचरे यांनी केला खुलासा आम्ही राम शिंदे साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहोत

    साहेबांचे उपकार आम्ही शेवटपर्यंत होऊ शकत नाही

  • 16 Dec 2021 10:48 PM (IST)

    अहमदनगर

    अहमदनगर जिल्हयात भीषण अपघात... अपघातात 3 ठार तर 10 जख्मी... राहुरी तालुक्यातील गुहा पाटाजवळ घडली घटना.... नगर - मनमाड महामार्गावर भिषण अपघात... कंटेनर , जिप आणि मोटारसायकलचा अपघात... अपघातात जिप मधील तिघे ठार... तर अपघातात दहा जण जख्मी... दहापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक... जख्मींना उपाचारासाठी प्रवरा रुग्णालयात केले दाखल... महामार्गाचे काम सुरू असल्याने सुरू होती एकेरी वाहतुक... पोलिस घटनास्थळी दाखल... पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने केले मदतकार्य.... महामार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न....

  • 16 Dec 2021 08:20 PM (IST)

    बाळा नांदगावकर 121

    मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे विश्वासू बाळा नांदगावकर शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत या चर्चा म्हणजे अफवा आहेत अस स्पष्टीकरण मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केल आहे

    मी आज तुम्हाला प्रतिक्रिया देतोय ते कुठे उभा राहून मनसेच्या शिवडी गड च्या कार्यालया बाहेर उभा राहून देत आहे या सर्व चर्चा मीडिया जाणीवपूर्वक सुरु करत आणि त्याच्या बातम्या दाखवत

    मी कुठेही जाणार नाही शनिवारी माझ्या कार्यालयाच उद्घाटन करण्यासाठी राजसाहेब ठाकरे येत आहेत

    मी अनेक मंत्र्यांना प्रश्नासाठी भेटतो तसेच अभिजीत पानसे ही भेटले असतील राज ठाकरे अनेक मंत्र्यांना कामानिमित्त फोन करतात त्यात विशेष काही नाही

    ज्यांना जायचे त्यांना जाऊद्या आताची पिढी हुशार आहे त्यांना योग्य निर्णय घेता येतो

  • 16 Dec 2021 06:49 PM (IST)

    उस्मानाबाद

    शिक्षकाकडुन 25 हजारांची लाच घेताना एक शिक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

    वरीष्ठ वेतन श्रेणी मंजूर करण्यासाठी केली 50 हजारांची मागणी ,तडजोड करून 25 हजार स्वीकारले

    संस्थेच्या बांधकामासाठी घेतली 25 हजार लाच

    संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी लाच मागून एका शिक्षक मार्फत घेतली लाच , चौकशी सुरू

    पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या पथकाची कारवाई

  • 16 Dec 2021 06:44 PM (IST)

    पालघर

    पालघर मत्स्यव्यवसाय विभागाची एका बोटी वर कारवाई

    डहाणू येथील सुमद्रात 10 नोटिकल मैल वर बेकायदेशीररित्या पर्ससीन मासेमारी करताना मत्सयव्यवसाय अधिकाऱ्याने बोटीवर केली कारवाई.

    बोटी वर करवाई करत ताब्यात घेण्यात आली असून बोटीवरील 2लाख 30 हजार रुपयांचे मासेमारी केलेली मच्छी घेतली मत्स्यव्यवसाय विभागाने ताब्यात.

    बोटीवरील खलाशी, तांडेलसह बोट पोलिसांच्या ताब्यात देण्याची कारवाई सुरू

  • 16 Dec 2021 06:40 PM (IST)

    पुणे

    टीईटी परीक्षा प्रकरण

    महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी चौकशीला बोलावले.

    आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांचा घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू

    पुणे सायबर च्या कार्यालयांमध्ये ही चौकशी सुरू आहे...

  • 16 Dec 2021 06:39 PM (IST)

    परमबीर सिंग - कांदिवली प्रकरण

    गोरेगाव खंडणी प्रकरणात मुंबई पोलीस क्राइम ब्रँचने विनय सिंग ला केली अटक मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या झोन 11 ने अटक केली आहे. कांदिवली येथील एका कॉफी शॉपमधून त्याला पकडण्यात आले

    एका व्यावसायिकाने वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग, विनय सिंग, रियाझ भाटी आणि सचिन वाझें यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.

    त्याला लवकरच अटक करून न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे.

  • 16 Dec 2021 06:03 PM (IST)

    पुणे

    कन्हैया कुमारनंतर हार्दिक पटेल महाराष्ट्र दौऱ्यावर,

    उद्या कर्जतला नगरपंचायत निवडणूकीच्या प्रचारार्थ हार्दिक पटेल आणि धनंजय मुंडेची जाहीर सभा,

    काँग्रेसनं महाराष्ट्रात युवा आघाडी उतरवली मैदानात !

  • 16 Dec 2021 05:58 PM (IST)

    भंडारा

    प्रकाश आंबेडकर

    हे श्रीमंत मराठ्याचे सरकार..

    महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात लुड़बुड करत ओबीसी चे राजकीय आरक्षण घालविले..

    बैलगाड़ी शर्याती वरील बंदी उठवून खेळ चालू करने ही चांगली गोष्ठ आहे.

  • 16 Dec 2021 05:42 PM (IST)

    लोणावळा,पुणे

    बाईट-बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

    On बैलगाडा शर्यत -बैलगाडा शर्यतीवर बंदी नसावी ह्या मताचा आम्ही होतो जसे अनेक खेळ आहेत जसा माणसाची कुस्ती कबड्डी खेळ असतो आपण जर म्हणलो त्यात त्रास होत असे नसत ग्रामीण भागात बैलगाडा शर्यत हा आनंद देणारा महोत्सव असतो ह्या शर्यतीत बैलाचा सन्मान असतो त्यामुळे खूप चांगला हा निर्णय झालाय

    On अवकाळी पाऊस -अवकाळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले ह्या संदर्भात राज्य शासनाने सूचना दिल्या आहेत कुठं सर्व्ह करायचं ती एक पध्दत असते केंद्र सरकारच्या काही अटी असतात त्याप्रमाणे जो योग्य निर्णय होईल तो आपण देतो

    On ओबीसी आरक्षण -ओबीसी आरक्षण राखलं गेलं पाहिजे ह्या मताची महाविकास आघाडी आहे.आम्ही पूर्ण काळजी घेतली होती आम्ही सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला होता त्या पद्धतीने ओर्डनस काढला होता सुप्रीम कोर्टाला जे अभिप्रेत आहेत त्या प्रकारचा निर्णय आम्ही घेतला होता मात्र दुर्दैवाने सुप्रीम कोर्ट चा निर्णय झाला आहे आजही आमचा इच्छा आहे त्यासाठी काल आम्ही मंत्रिमंडळात निर्णय घेतला जो पर्यंत ओबीसी आरक्षण निश्चित होत नाही आम्ही इंपेरियल डाटा तयार करण्यास आम्ही तयार आहोत आम्हला वेळ द्या त्यानंतर निवडणूक घ्या ओबीसी समाजावर अन्याय होता नये

  • 16 Dec 2021 05:42 PM (IST)

    नाशिक

    रहिवासी भागात सिलेंडर ब्लास्ट

    ब्लास्ट झाल्याने घरात लागली आग

    घरात कोणी नसल्याने मोठी जीवित हानी टळली

    माने नगर येथील रघुवर शिव पुष्प रो हाऊसमधील घटना

    रासबिहारी लिंक रोड परिसरात अग्निशमन पथक दाखल

  • 16 Dec 2021 05:30 PM (IST)

    नवी दिल्ली

    भाषिक अल्पसंख्यांक कार्यालय बेळगाव मधून हलवल जाणार

    कार्यालय चेन्नईला हलवायला मराठी भाषकांचा विरोध

    बेळगाव मधील कार्यालय मुंबईत हलवण्याची मागणी

    बेळगाव मधील मराठी युवकांच शिष्टमंडळ नवी दिल्लीत दाखल

    केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुक्तार अब्बास नकवी यांची घेतली भेट

    सीमाभागात महामार्गांवर मराठी फलक लावावेत , नितीन गडकरी यांच्याकडे शिष्टमंडळाची मागणी

    शरद पवार यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांची शिष्टमंडळाने घेतली भेट

    महाराष्ट्र राज्य सरकारने अल्पसंख्याक आयोग कार्यालयासाठी मुंबईत जागा उपलब्ध करून द्यावी - बेळगाव मधील युवकांची मागणी

  • 16 Dec 2021 05:28 PM (IST)

    आमदार गोपीचंद पडळकर

    बैलगाडी ही महाराष्ट्राची संस्कृती आमची परंपरा

    आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली गेली 8-10 वर्ष हा संघर्ष सुरू होता

    2014 ला फडणवीस सरकार आल तेव्हा 2017 साली कायदा करून शर्यत चालु केली होती

    सुप्रीम कोर्टातही सरकारनं चांगले वकील त्यावेळी तत्कालीन सरकारनं दिले

    फडणवीस सरकारनं दिलेल्या अहवालाचा आज कोर्टात फायदा झाला

    हे सरकार आल्यापासून काहीच पाठपुरावा करत नव्हत

    आम्ही केलेल्या शर्यत आयोजनातही पोलिस बळाचा वापर केला

    पण आम्ही ही शर्यत करून दाखवली आमदार महेश लांडगे हे ही इथ आले होते

    आमच्या या सर्व बैलगाडा मालकांना आणि महेश लांडगे यांना जात

    आजही महेश लांडगे दिल्लीत ठाण मांडून आहेत

  • 16 Dec 2021 05:27 PM (IST)

    यवतमाळ

    प्रेमी युगलाची विष प्राशन करून आत्महत्या

    यवतमाळ च्या पारवा पोलीस ठाण्यातील गुडा शिवारातील घटना

    सख्ये मावस भाऊ बहीण असल्याची माहिती याच्यात प्रेम प्रकरण होते

    लग्न करायला घरच्यांनी विरोध केल्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती

    पूनम संजय राऊत 22,रा धोंडगव्हाण ता माहूर जी नांदेड, विशाल दत्ता आगीरकर 28 राणी धानोरा ता आर्णी जी यवतमाळ असे मृतकाची नावे

  • 16 Dec 2021 05:26 PM (IST)

    चंद्रपूर

    जिल्ह्यात 24 तासात वाघ मृत्यूची दुसरी घटना,

    सावली तालुक्यात वाघाची शिकार झाल्याचे प्रकरण उघडकीस,

    गुप्त माहितीच्या आधारावर वनविभागाने आज सकाळी पेंढरी गावात घातली धाड,

    पांडुरंग गेडाम या इसमाच्या घरून वाघाच्या 11 मिशा केल्या जप्त,

    या आरोपीला ताब्यात घेतल्यावर त्याने हिराचंद भोयर याच्या शेतात अंदाजे 3 महिने आधी जिवंत वीज तारा लावून शिकार केल्याची दिली कबुली,

    मारोती गेडाम आणि रामदास शेरकी यांच्या मदतीने शव जंगलात पुरल्याची पुष्टी,

    वनविभागाने सर्व आरोपींना घेतले ताब्यात,

    उद्या वरिष्ठ अधिकारी आणि पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिकार झालेल्या जागेचा पंचनामा -खोदकाम होण्याची शक्यता

  • 16 Dec 2021 04:40 PM (IST)

    कोल्हापूर

    हसन मुश्रीफ बाईट

    On बैलगाडी शर्यत

    न्यायालयाचे निर्णयाचे स्वागत

    कोल्हापुरात बैलगाडी शर्यत आणि कुस्तीला मोठ महत्व

    बळीराजा आज आनंदी झाला ..............

    On गवा

    वन विभागाशी चर्चा केली आहे

    ताबडतोब बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत

    गव्याला बेशुद्ध करून सुरक्षितपणे जंगलात सोडण्याची गरज .....................

    On विनय कोरे

    महापालिकेत विनय कोरे यांच्यासोबत मी होतो पण पैसे देताना मी नव्हतो

    त्यांच्या बोलण्याचा उद्देश वेगळा होता तो चुकीच्या पद्धतीने घेतला गेला

    घोडेबाजार थांबविण्यासाठी कोर यांनी पुढाकार घेतला होता त्याच्या आठवण त्यांनी सांगितली

    त्याला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही ...................

    On महाविकास आघाडी

    महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही ते ज्या त्या पक्षाच्या ताकदीनुसार ठरेल

    ...........

    On obc आरक्षण

    भाजप महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षण घालवल्याचा आरोप करते मात्र वस्तुस्थिती तशी नाही

    2011 ला जातिनिहाय जनगणना झाली असताना त्यांनी डेटा उपलब्ध करून दिला नाही

    देवेंद्र फडणवीस,पंकजा मुंडे यांनी केंद्राला यासंदर्भात पत्र पाठवली होती

    मग कोणत्या आधारे केंद्र शासनाकडून डाटा मागण चुकीचा आहे असं आज भाजप म्हणतय .....................

    On गोपीचंद

    भारतीय जनता पक्षाने पडळकर आवरल पाहिजे

    अशा वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात

    आमदार झालो म्हणजे असं बोलण्याचं लायसन मिळाले असे समजण्याची गरज नाही

    बोलताना भान राखण्याची गरज

    अशा लोकांमुळे आपल्या पक्षाची पातळी घसरत चालली आहे हे भाजप ने ओळखण्याची गरज

  • 16 Dec 2021 04:36 PM (IST)

    पुणे

    ऍड. बी. एल. सगर-किल्लारीकर, सदस्य राज्य मागासवर्गीय आयोग

    आजची बैठक ही पूर्वनियोजित होती तरी यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर चर्चा झाली

    जातनिहाय जनगणना म्हणजे इमपीरिअल डाटा नव्हे

    राज्य सरकारने जातनिहाय जनगणनेची आकडेवारी उपलब्ध करून द्यावी

    जातनिहाय जनगणना ही खासगी संस्थेमार्फत न करता राज्य सरकारनेच करावी

    सर्वात महत्वाचे म्हणजे आयोगाला कामकाजासाठी कार्यालयीन जागा आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावं

    मनुष्यबळ दिल्याशिवाय कामाला सुरुवात करता येणार नाही

    पुरेसे आवश्यक मनुष्यबळ, आणि निधी उपलब्ध दिला तर साडेतीन ते चार महिन्यात डाटा गोळा करण्याचे काम करता येईल

  • 16 Dec 2021 04:28 PM (IST)

    नागपूर

    नागपुरातील पहिल्या ओमायक्रोन बाधित रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह,

    आरोग्य यंत्रणेने सोडला सुटकेचा निश्वास,

    रुग्णाची प्रकृती ठणठणीत, रुग्णालयातून दिली सुट्टी,

    नियमानुसार सात दिवस राहावं लागेल होम कोरोंटाइन,

    रुग्ण 5 डिसेंबर ला आला होता ओमायक्रोन पॉझिटिव्ह,

    हा रुग्ण पश्चिम आफ्रिकेतून दिल्ली आणि त्यानंतर पोहचला होता नागपूरात

  • 16 Dec 2021 03:46 PM (IST)

    यवतमाळ

    उद्याचा पुसद येथे निघणार बंजारा समाजाचा मोर्चा होणारच गोर सेनेने केले मोर्च्यांचे आयोजन

    पोलीस अधीक्षकानी कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून

    मोर्च्याला परवानगी नाकारली 144 लागू केले आहे तरी देखील मोठ्या संख्येने मोर्चा काढणार असल्याचं गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेश चव्हाण यांनी सांगितले पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा केला आरोप.

    काळी दौलत गावात बंजारा समाजातील तरुणांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर त्या भागात 2 गटांत तणाव निर्माण झालं होता दंगल झाली होती त्या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून उद्या पुसद मध्ये मोर्च्यांचे आयोजन करण्यात आले आहे

  • 16 Dec 2021 03:45 PM (IST)

    पुणे

    बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळल्यानं पुरंदर तालुक्यात काँग्रेस आमदारांनी केला जल्लोष,

    प्रातिनिधिक स्वरुपात आयोजित केली बैलगाडा शर्यत,

    बैलगाडा मालकांनी एकत्र येत साजरा केला जल्लोष,

    आमदार संजय जगतापांनी डीजेच्या तालावर धरला ठेका,

  • 16 Dec 2021 03:35 PM (IST)

    उदय सामंत

    - टीका होणे स्वाभाविक आहे. कारण काही लोकांच्या हे विरोधात आहे. केंद्र सरकारची जी पद्धत आहे,त्याचेच आम्ही अनुकरण करणार आहोत. - राज्यपालांचे अधिकार कमी होणार नाहीत. तेच कुलगुरू नेमणार आहेत. ही प्रक्रिया पारदर्शकच असेल - कुणाशी तरी तुलना करून कुलगुरू होणा-यांचा अपमान करू नये - भाजपशासित राज्यांमध्येही प्रकुलपती आहेत - मुंबई विद्यापीठाच्या भूखंडावर सुरू असलेला एसआरए प्रकल्प मी बंद पाडला आहे. भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही व करणार नाही. असं झाल्यास मी राजीनामा द्यायला तयार आहे - विद्यापीठाच्या जागा शैक्षणिक कामासाठीच वापरल्या जातील. कुणालाही बंगला बांधायला देणार नाही. -उच्च व तंत्र शिक्षण विभागाची कलिनातील ३ एकर वेगळी जागा ही दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी देणार आहोत -अभिजीत पानसे मनसेचे नेते आहेत. त्यांच्या वडिलांच्या एका कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी आले होते. राजकीय चर्चा झालेली नाही. - केंद्राच्या कुठल्या किचन कॅबिनेटमधून मग कुलगुरू नेमले जातात. कारण त्यांचेच धोरण आम्ही राबवणार आहोत - दोन वर्षे असे आरोप ऐकतोय. मागील वेळीही असंच झाले होते.त्यातून काय निष्पन्न झाले का? ( करणच्या पार्टीतील मंत्री कोण)

    राज्य सरकारने आपला ठराव निवडणूक आयोगाकडे पाठवलेला आहे निवडणूक पुढे ढकलण्याचा आयोग जो निर्णय घेईल तो महत्त्वाचा आहे

  • 16 Dec 2021 03:35 PM (IST)

    मुक्ताईनगर

    एकनाथ खडसे ऑन बैलगाडी शर्यत

    बैलगाडी शर्यत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय हा नागरिकांच्या भावनेचा आदर सर्वोच्च न्यायालयाने केला

    मात्र बैलगाडी शर्यतीत पक्षुला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेणे महत्त्वाचे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे

  • 16 Dec 2021 02:47 PM (IST)

    नवी दिल्ली

    ओबीसी आरक्षण रद्द होण्याला राज्य सरकारच जबाबदार

    ओबीसींना आरक्षण देण्याचे हित राज्य सरकारला नाही

    खासदार नवनीत राणा यांचा आरोप

  • 16 Dec 2021 02:23 PM (IST)

    मुंबई

    मुंबईत आघाडी एकत्र लढणार

    शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मुंबईत एकत्र लढणार

  • 16 Dec 2021 02:17 PM (IST)

    पुणे

    पौष पौर्णिमेला आंबेगाव तालुक्यातील थापलिंगच्या यात्रेत बैलगाडा शर्यत होणार

    पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून थापलिंगची यात्रा प्रसिद्ध

    जानेवारीत होणार थापलिंगची यात्रा

    या यात्रेत खासदार अमोल कोल्हे स्वतः घोडी धरणार

  • 16 Dec 2021 02:17 PM (IST)

    विजय वडेट्टीवार बाईट - बैलगाडा शर्यत

    2017 मध्ये काही एनजीओ च्या पिटीशन वरून बैलगाडा शर्यत वर सुप्रीम कोर्ट कडून बंदी घालण्यात आली होती

    बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांच्या शेती हंगाम नंतर शेतकऱ्यांसाठी विरंगुळा म्हणून असते

    शेतकऱ्यांच्या भावनांची कदर आज झाली याचा मला आनंद आहे

    काही अटी नुसार ही परवानगी देण्यात आली असली तरी ती शेतकऱ्यांना आनंद देणारी आहे

    आजचा निकाल हा शेतकऱ्याला आनंद देणारा आहे

  • 16 Dec 2021 02:17 PM (IST)

    येवला

    - नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश...

    - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांच्या उपस्थितीत येवल्यात राष्ट्रवादीत प्रवेश..

    - नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश केल्याने प्रवेशाला महत्व..

    - माजी आमदार संजय पवार हे २००४ ते २००९ या काळात होते शिवसेनेचे आमदार..

    - माजी आमदार संजय पवार यांचा शिवसेना - राष्ट्रवादी - शिवसेना - भाजप व पुन्हा राष्ट्रवादी असा प्रवास..

    - अखेरपर्यंत भुजबळांसोबत व राष्ट्रवादीतच राहणार

  • 16 Dec 2021 02:16 PM (IST)

    उदय सामंत 121

    ही टीका अपेक्षित होती, पण आशीष शेलार यांच्यासारख्या अभ्यासू आमदारांकडून ते अपेक्षित नव्हतं

    कुलगुरू निवडीबाबत केंद्र शासनाची यंत्रणा आम्ही राज्यात राबवत आहोत.

    आतापर्यंत केंद्र विद्यापीठात जे कुलगुरू झाले ते कुठल्या केंद्राच्या कुठल्या किचन कॅबिनेटमध्ये झाले ? हा देखील प्रश्न उपस्थित होते.

    सचिन वाझेंचे नाव घेऊन भविष्यात होणाऱ्या कुलगुरूंना बदनाम करण्याचे काम आशीष शेलार यांनी केलंय.

    कुलगुरू ठरवण्याचा एक क्रयटेरिया आहे त्यातच बसवुन निर्णय घ्यावा लागतो. यापुढे आर एस एस किंवा भाजपचा कुलगुरू नसेल या भावनेतून आशीष शेलात यांनी टीका केली असेल.

    राज्यपापांचे अधिकार अबाधित आहेत.

    शोध समितीत राज्यपाल नियुक्त सदस्यांना कुठेही कात्री लावली नाही. त्यांचे 2 सदस्य असणार आहेतच. आम्ही यंत्रणा अधिक पारदर्शक केली आहे.

    सचिन वाझेंचा उल्लेख हा राज्यपालांवर घेतलेला आक्षेप आहे. गैरसमज पसरवू नका असे माझे आवाहन आहे.

    कुलगुरू निवडीसाठी आम्ही केंद्र शासनाची निंयम-यंत्रणा स्वीकारला आणि त्यावर भाजप नेते आक्षेप घेत असतील तर केंद्र शासनाची यंत्रणा चुकीची आहे असा त्यातून अर्थ निघतो.

    विद्यापीठाची जागा मी खाजगी वापरासाठी दिली हे कुणी पुराव्यानिशी सिद्ध करेल त्यादिवशी मी राजकारणातून निवृत्ती घेईन.

    विद्यापीठाच्या जागेत एस आर ए प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न झाला त्याला माझ्या उच्च व तंत्र विभागाने छेद देण्याचे काम केले. इंडिया बुल्स कंपनीला हा भूखंड देण्यासाठी कोणी प्रयत्न केला त्याची आशिष शेलार यांनी चौकशी लावावी. त्यावेळी कुलगुरू, राज्यपाल कोण होते ? याची चौकशी लावावी.

    करणं जोहर पार्टीत राज्याचा मंत्री सहभागी होता हे आशिष शेलार यांनी संशय बळावण्यासाठी केलंय. महाराष्ट्राच्या जनतेला वाटणार की शेलार यांच्याकडे पुरावे आहेत. माझे असे म्हणणे की त्यांनी पुरावे, सीसिटीव्ही फुटेज यंत्रणेला द्यावे. पार्टीत मंत्री सहभागी होते असे मला वाटत नाही. पण कोरोना दृष्टीने पाहाता महापालिकेने कलाकार व्यक्ती किती होते याचा खोलात जाऊन तपास केला पाहिले. विलगिकरण नियम पाळले जात आहेत की नाही हेसुद्धा तपासले पाहिजेत.

  • 16 Dec 2021 01:00 PM (IST)

    रासायनिक खतांना पर्याय शोधणे गरजेचे, मोदी यांचा शेतकऱ्यांशी संवाद

    शेती पध्दतीमधील बदल आणि रासायनिक खतांचा वाढता वापर याबद्दल (Prime Minister Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. काळाच्या ओघात शेती व्यवसायातून उत्पादनात वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती किंवा ( Natural Agriculture) नैसर्गिक शेती म्हणजेच झिरो बजेट शेतीचा अवलंब केला पाहिजे हाच आग्रह पंतप्रधान मोदी यांचा राहिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील आनंदमध्ये आयोजित नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषदेला संबोधित करत आहेत.  यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, हे खरे आहे की, रासायनिक खतांमुळे जमीनीची उत्पादकता वाढली आहे. मात्र रासायनिक खतांचे भविष्यकाळलीन दुष्परिणाम हे मोठे असल्यामुळे रासायनिक खतांना विकल्प शोधणे गरजेचे झाले आहे.

  • 16 Dec 2021 12:22 PM (IST)

    महाराष्ट्रात धुराळा उडणार; बैलगाडा शर्यतीला अखेर परवानगी

    मुंबई : राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळणार का? या निर्णयाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. अखेर निकाल आला आहे. बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. मात्र शर्यतीचे आयोजन करताना आयोजकांना न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

  • 16 Dec 2021 12:12 PM (IST)

    अनिल परब यांचा किरीट सोमय्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

    मुंबई : शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजापा नेते किरीट सोमय्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी एसटी कामगारांना देखील इशारा दिला आहे. आतापर्यंत दहा हजार कामगारांचे निलंबन करण्यात आले आहे. कामावर हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परब यांनी ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. एसटी कामगारांवर कारवाई झाली तर, सदावर्ते यांचे नुकसान होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • 16 Dec 2021 10:50 AM (IST)

    देशातील पहिली सहकार परिषद महाराष्ट्रात, अमित शाह उपस्थित राहणार, शरद पवारांना निमंत्रण नाही

    देशातील पहिल्या सहकार परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन करण्यात येणार आहे. या सहकार परिषदेला केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह हे उपस्थित राहणार आहेत. प्रवरामध्ये ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. मात्र अद्याप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना परिषदेसाठी निमंत्रण दिले गेले नसल्याची माहिती समोर येत आहे.

  • 16 Dec 2021 10:22 AM (IST)

    अत्यंत कमी दरामध्ये नवी मुंबईकर करू शकणार मेट्रोने प्रवास

    मुंबई : नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. वाहतूक कोंडीशिवाय आणि कमी पैशांमध्ये आता नवी मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे हा प्रवास एकदम फास्ट आणि गारेगार असणार आहे. मेट्रोने नवी मुंबईकरांना (Navi Mumbai Metro ticket) नवीन वर्षांचे गिफ्ट आताच दिले आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. या तिकिटाची खास गोष्ट म्हणजे एनएमएमटी वातानुकूलित बसपेक्षाही मेट्रोचा तिकिट दर कमी आहे. यामुळे आता सर्वसामान्य लोकही मेट्रोने प्रवास करू शकणार आहेत. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या मेट्रो प्रवासाच्या दराची घोषणा केली आहे.

  • 16 Dec 2021 10:10 AM (IST)

    पवार साहेबांना आशीर्वाद देतील असे ‛हात’ नाहीत; रूपाली पाटील म्हणाल्या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार

    पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ((Maharashtra Navnirman Sena) पुण्यातली मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॅशिंग नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे या अखेर महाविकास आघाडीत आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावणार आहेत. अगदी कालपर्यंत कळतेय, समजतेय अशा चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी स्वतःच एक सूचक ट्वीट करून ही माहिती दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यातच त्यांना हा धक्का बसला आहे.रूपाली पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार …त्यामुळे त्यांना आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश नक्की झाला आहे, हे अखेर जाहीर केले आहे.

  • 16 Dec 2021 09:26 AM (IST)

    कोरोना नियम झुगारत आलिया भट दिल्लीत, कारवाईची टांगती तलवार

    कोरोनाचे सावट कमी होत असतानाच आता पुन्हा नव्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत भर झालेली पाहायला मिळत आहे. असे असतानाच बॉलिवूडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. नुकतच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले. आणि आता आलिया भटने कोरोना नियम झुगारत दिल्लीला गेल्याचे कळत आहे.  करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीनंतर करीना कपूर हिला कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले. पार्टीतील करिना आणि करिष्मा कपूरसह चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. या पार्टी आलिया भट्टदेखील सहभागी झाली होती त्यामुळे तरी ती एका हाय रिस्क कोविड 19 संसर्ग बाधीत रुग्णाच्या संपर्कात आली असल्यामुळे तिला होम क्वारंटाईन रहाण्याचं बंधन बीएमसीने दिलं होतं. मात्र तरी ही आलिया भट्ट बीएमसीच्या नियमांचे उल्लंघन करत शुटींगसाठी दिल्लीला मुंबईहून चार्टट प्लेनने गेली.

  • 16 Dec 2021 07:05 AM (IST)

    Bank: तिढा खासगीकरणाचा, राष्ट्रीय बँक कर्मचारी आजपासून दोन दिवसांच्या संपावर

    नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपाला आजपासून सुरूवात होत आहे. संपाचा सरकारी बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. संपादरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि आरबीएल बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम दिसून येऊ शकतो. दरम्यान, बँक व्यवस्थापनांनी कामकाजावर होणारा परिणाम टाळण्यासाठी सर्व शाखांमध्ये पर्यायी कामकाजाची व्यवस्था निर्माण केली आहे.

Published On - Dec 16,2021 6:54 AM

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.