Maharashtra News LIVE Update | राज कुंद्राने दीड वर्षात 100 पेक्षा जास्त पॉर्न मूव्ही बनवल्या 

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | राज कुंद्राने दीड वर्षात 100 पेक्षा जास्त पॉर्न मूव्ही बनवल्या 
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 22 Jul 2021 19:49 PM (IST)

  राज कुंद्राने दीड वर्षात 100 पेक्षा जास्त पॉर्न मूव्ही बनवल्या 

  मुंबई :राज कुंद्राने दीड वर्षात 100 पेक्षा जास्त पॉर्न मूव्ही बनवल्या

  अंधेरी स्थित वियानमध्ये धाड टाकून अश्लील मुव्हीचा साठा जप्त

  धाडीत TB ( टेराबाईट्स ) मध्ये सापडला आहे पॉर्न फिल्मचा

  मात्र मोठ्या प्रमाणात डेटा डिलीट करण्यात आल्याचं उघड

  डिलेटेड डेटा रिकव्हरी केला जाणार,

  उद्या राज कुंद्राची पोलीस कस्टडी वाढवण्याची मागणी करणार गुन्हे शाखा

 • 22 Jul 2021 18:42 PM (IST)

  बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला अखेर मुहूर्त, 27 जुलैला भूमिपूजन

  मुंबई : बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला अखेर मुहूर्त

  27 जुलै रोजी पुनर्विकासाचे भूमिपूजन

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या उपस्थित कार्यक्रम

 • 22 Jul 2021 17:37 PM (IST)

  विनायक राऊत मुंबई विमानतळावर पोहोचले, गाडीने चिपळूणला रवाना होणार

  मुंबई : शिवसेना खासदात विनायक राऊत मुंबई विमानतळावर पोहोचले

  गाडीने रस्ता मार्गे चिपळूणला रवाना होणार

 • 22 Jul 2021 16:44 PM (IST)

  पेगॅसस फोन टॅपिंगप्रकरणी नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राजभवनासमोर आंदोलन

  मुंबई : पेगॅसस फोन टॅपिंगप्रकरणी आणि महागाई विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राजभवनासमोर आंदोलन

  आंदोलनात अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत आदी मंत्री सहभागी

  मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, नगरसेवक आणि आमदारही सहभागी

  आंदोलनात आम्ही काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून सहभागी आहोत- नितीन राऊत

   

 • 22 Jul 2021 10:41 AM (IST)

  तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरूवात, साई मंदिर बंद

  तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरूवात
  काकड आरतीनंतर पोथी मिरवणुकीने उत्सवाला प्रारंभ…
  मोजक्या पुजारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्सवाला सुरूवात..
  साई मंदिर कोरोनामुळे सामान्य भक्तांसाठी बंद…
  कळस दर्शनाला भाविकांची मात्र गर्दी…
  दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सवाला होते मोठी गर्दी…
  सलग दुसऱ्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे साई मंदिर बंद…

 • 22 Jul 2021 10:38 AM (IST)

  नाशिकच्या गोदावरी किनारी पुन्हा अघोरी पूजेचा प्रकार, पुराच्या पाण्यात बसवून महिलेची पूजा

  नाशिक

  – नाशिकच्या गोदावरी किनारी पुन्हा अघोरी पूजेचा प्रकार
  – रामकुंडावर गोदावरीच्या धोकादायक पुराच्या पाण्यात बसवून महिलेची केली पूजा
  – गोदा काठावर 5 निंबु,5 नारळ,हळद, कुंकू,गुलाल, काळे मिरे,तसेच इतर अघोरी पूजेचे साहित्य ठेऊन मांडली होती पूजा
  – पूजा संपताच सर्व साहित्य लोटल गंगेच्या पाण्यात
  – महिलेच्या अंगात देव देवता आल्याचं सांगत महिला आणि पुरुष मांत्रिकाने केली पूजा / मांत्रिक मात्र साध्या वेशात

 • 22 Jul 2021 08:32 AM (IST)

  औरंगाबादेत कुख्यात गुन्हेगाराच्या साथीदाराला पोलिसांनी केले जेरबंद

  औरंगाबाद  :-

  पोलिसांच्या अटकेत असलेल्या कुख्यात गुन्हेगाराच्या साथीदाराला पोलिसांनी केले जेरबंद..

  मोठ्या चलाखीने चोरी केलेल्या सात दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त..

  पोलिसांनी सापळा रचून केला चोरांचा पर्दाफाश..

  पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई..

  क्रांती चौक पोलीसांची पोलिसांची कारवाई

 • 22 Jul 2021 08:08 AM (IST)

  औरंगाबाद शहरात सशस्त्र चोरांच्या टोळीचा वावर, जिल्ह्यात भीतीचे वातावरण

  औरंगाबाद :-

  औरंगाबाद शहरात सशस्त्र चोरांच्या टोळीचा वावर..

  सहा चोर फिरत आहेत अर्धनग्न आणि हातात घेऊन शस्त्र..

  हातात लाठ्याकाठ्या धारदार शस्त्र घेऊन मध्यरात्री विविध भागात फिरतात चोरांची टोळ्या..

  औरंगाबाद शहरात पोलिसांचा वाढला गस्त..

  औरंगाबाद जिल्ह्यात भीतीचे वातावरण

 • 22 Jul 2021 06:51 AM (IST)

  गोदावरी नदीला रात्रीच्या पावसाने आला नाल्याचा पूर

  नाशिक –

  गोदावरी नदीला रात्रीच्या पावसाने आला नाल्याचा पूर..

  धरणाचं पाणी न सोडताच रस्त्यावर आलं नाल्याचं पाणी..

  गोदाघाटावर साचलं नाल्याच पाणी..

  महापालिकेच्या नाले सफाईचे पहिल्याच पावसात तीन तेरा

 • 22 Jul 2021 06:50 AM (IST)

  अवघ्या काही तासांच्या पावसात त्रंबकेश्वर नगरी पाण्यात

  नाशिक –

  अवघ्या काही तासांच्या पावसात त्रंबकेश्वर नगरी पाण्यात..

  रात्री झालेल्या पावसाने नाल्याचं पाणी रस्त्यावर

  अनेकांच्या घरात पाणी घुसल

  नगरपालिकेचे नाले सफाईचे दावे ठरले फोल

  पावसाने सध्या घेतली उसंत

 • 22 Jul 2021 06:50 AM (IST)

  रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचे धुमशान

  रत्नागिरी –

  रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचे धुमशान

  मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

  रत्नागिरीजवळच्या काजळी नदीला पूर

  चांदेराई बाजारपेठेमध्ये तीन फुटांचे पाणी

  खेडमधील जगबुडी नदीला देखील पूर

  खेड मटन मार्केट…ख्वाजा स्वामिल …..गांधी चौक इथं पुराचं पाणी …

  गांधी चौक इथं चौक येते ३ फूट पाणी

 • 22 Jul 2021 06:49 AM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू

  कोल्हापूर

  कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच

  पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल

  पंचगंगा नदीचे पाणी पातळी 34 फूट 9 इंचावर

  नदीची इशारा पातळी आहे 39 फुटावर तर धोका पातळी आहे 43 फुटांवर

  कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराच पाणी

  मांडुकली इथं कुंभी नदीच एक फूट पाणी

  कोल्हापूर गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद

  गेळवडे धरणातील विसर्ग वाढल्यान बरकी गावात जाणार पूल पाण्याखाली

  बरकी गावचा संपर्क तुटला

 • 22 Jul 2021 06:49 AM (IST)

  मध्यरात्रीपासून वसई-विरारमधील पाऊस थांबलेला

  वसई विरार

  मध्यरात्रीपासून वसई-विरारमधील पाऊस थांबलेला आहे

  शहरातील सर्व व्यवहार सुरळीत.. सकल भागातील पाणी ही ओसरले आहे..

  विरार वुन चर्चगेट ला जाणाऱ्या सर्व लोकल सुरळीत सुरू..

  आभाळ पूर्णपणे भरलेलेच आहे..

 • 22 Jul 2021 06:48 AM (IST)

  भिवंडीत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे

  भिवंडीत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे

  कामवारी नदी ओव्हर फ्लो होऊन वाहत असल्याने नदीनाका पुलावर पाणी त्या सोबतच शहरातील नदीनाका, म्हाडा कॉलनी, ईदगाह, अंबिका नगर, ब्राह्मण आळी, पद्मानगर भागातील अनेक घरांमध्ये शीतल पाणी

 • 22 Jul 2021 06:45 AM (IST)

  जळगाव-हतनूर धरणाच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

  जळगाव

  जळगाव-हतनूर धरणाच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

  हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण उघडले

  5650 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू