Maharashtra News LIVE Update | औरंगाबाद जिल्ह्यातील विवाह मांडवा गावात भर पावसात लसीसाठी गर्दी

| Updated on: Jul 27, 2021 | 12:01 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | औरंगाबाद जिल्ह्यातील विवाह मांडवा गावात भर पावसात लसीसाठी गर्दी
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Jul 2021 11:20 PM (IST)

    दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    मुंबई : दुधाची भेसळ करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम

    मालाड आणि गोवंडी येथे केली कारवाई

    मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    गोवंडी येथील दूध डेरीचे नमुने तपासणीसाठी पाठवले

    महाराष्ट्रातील पुरामुळे मुंबईत कमी येणाऱ्या दूध साठ्यामुळे दुधात भेसळीची शक्यता

    अन्न आणि औषध प्रशासन सज्ज आहे , भेसळ करणाऱ्यांवर करडी नजर

  • 26 Jul 2021 07:06 PM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील विवाह मांडवा गावात भर पावसात लसीसाठी गर्दी

    औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील विवाह मांडवा गावात भर पावसात लसीसाठी गर्दी

    भर पावसात भिजत महिला पुरुषांची मोठी गर्दी

    लसींचे कुपन मिळवण्यासाठी झाली तुंबळ गर्दी

    एकीकडे पावसामुळे हाहा:कार तर दुसरीकडे लसीसाठी मारामार

  • 26 Jul 2021 07:05 PM (IST)

    नागपुरात आज 6 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    नागपूर कोरोना अपडेट

    नागपुरात आज 6 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    9 जणांनी केली कोरोनावर मात

    तर कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंद

    एकूण रुग्णसंख्या - 492822

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 482483

    एकूण मृत्यू संख्या - 10115

  • 26 Jul 2021 07:04 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 139 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

    पुणे कोरोना अपडेट

    दिवसभरात 139 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

    - दिवसभरात 284 रुग्णांना डिस्चार्ज.

    - पुण्यात करोनाबाधित 8 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 3

    -225 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 485855

    - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2642

    - एकूण मृत्यू -8736

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 474477

  • 26 Jul 2021 06:29 PM (IST)

    अभिनेत्री शर्लीन चोपड़ाला गुन्हे शाखेकडून समन्स 

    मुंबई : अभिनेत्री शर्लिन चोपड़ाला गुन्हे शाखेकडून समन्स

    प्रोपर्टी सेलमध्ये चौकशी साठी समन्स

    राज कुंद्रा पॉर्न प्रकरणात चौकशीसाठी समन्स जारी

  • 26 Jul 2021 05:19 PM (IST)

    भुईगाव समुद्रकिनारी सुटकेसमध्ये आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

    वसई : वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी एका सुटकेसमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाला

    या महिलेची हत्या करून, मुंडक धडापासून वेगळ करून तो मृतदेह सुटकेसमध्ये भरून समुद्रात फेकलेला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

    वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी आज दुपारी हा मृतदेह मिळाला आहे

    सुटकेसमधील मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून मृतदेहाच्या अंगात ड्रेस घातलेला आहे.

    वसई पोलिसांनी सुटकेससह मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी जेजे रुग्णालयात पाठविला आहे

    याबाबत अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून, तपासासाठी स्वतंत्र 4 पथक तयार केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

  • 26 Jul 2021 04:22 PM (IST)

    नागपुरातील निर्बंध कमी करण्याची मागणी घेऊन व्यापारी उतरले रस्त्यावर

    नागपूर - नागपुरातील निर्बंध कमी करण्यात यावे यासाठी व्यापारी उतरले रस्त्यावर

    संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा

    मोठ्या प्रमाणात व्यापारी झाले सहभागी

  • 26 Jul 2021 03:52 PM (IST)

    पुणे-बंगळुरू महामार्गावर मद्यधुंद चालकामुळे थरार

    कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर मद्यधुंद चालकामुळे थरार

    पोलिसांचे लक्ष चुकवत चालकाने कमरेएवढ्या पाण्यात घातली कार

    पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनधारकांला अडवण्याचा प्रयत्न

    वाहनधारकांना थांबवण्यासाठी पोलीस उपाधीक्षकासह कर्मचाऱ्यांना करावी लागली धावाधाव

    वाहनधारक आणि पोलिसांमधील थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद

  • 26 Jul 2021 03:45 PM (IST)

    वडाळा नाका परिसरात दोघा भावांवर जीवघेणा हल्ला, हल्लेखोर फरार 

    नाशिक - वडाळा नाका परिसरात दोघा भावांवर जीवघेणा हल्ला

    शेजारील चिकन दुकानाची तक्रार पोलिसात दिल्याचा राग आल्याने शेजारील दुकानदाराने केला हल्ला

    दुकानात असलेल्या कोयत्याने दोन भावांवर केला हल्ला

    हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद

    हल्लेखोर दुकानदार फरार

    पोलिसांनी वेळेवर कारवाई न केल्याने दुकांदारांमध्ये संताप

    अमीर खान आणि मझर खान यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचारात सुरू

  • 26 Jul 2021 02:39 PM (IST)

    भाजप कार्यकर्ते गोविंद केंद्रे यांना मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू

    औरंगाबाद :-

    भाजप कार्यकर्ते गोविंद केंद्रे यांना मारहाण

    शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी मारहाण केल्याचा आरोप

    गोविंद केंद्रे यांच्यावर सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू

    भाजप कार्यकर्ते गोविंद केंद्रे यांची प्रकृती नाजूक असल्याची भाजपची माहिती

    शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात नेहून मारहाण केल्याचा भाजपचा आरोप

  • 26 Jul 2021 12:41 PM (IST)

    पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करा, अमरावतीत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

    अमरावती

    अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोझरी येथे रास्ता रोको आंदोलन सुरू

    पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करा व केन्द्र सरकारने लागू केलेला कृषि कायदा रद्द करण्याची मागणी

    मोठ्या प्रमाणावर काँग्रेस व युवा संघर्ष संघटनेचे कार्यकर्त्यांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग

    केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

    पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    वाहनांच्या लागल्या रांगा

  • 26 Jul 2021 11:40 AM (IST)

    चंद्रपुरात भोजनालय चालविणाऱ्या संचालक दाम्पत्याची आत्महत्या, अधिक तपास सुरु

    चंद्रपुर :- चंद्रपुरात भोजनालय चालविणाऱ्या संचालक दाम्पत्याची आत्महत्या,

    बल्लारपुर रोड वरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया समोरिल मा ममता भोजनालयचे होते मालक,

    चंद्रभान दुबे-60 वर्ष व त्यांची पत्नी मंजू दुबे- 50 यांचे मृतदेह भोजनालयात आढळले,

    लगतच्या टॉवर टेकडी जूनोना रोड बाबुपेठ येथे होते वास्तव्य,

    दोघांच्या भोजनालयात गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ,

    शवाच्या कुजलेल्या स्थितीवरून ही आत्महत्या 3/4 दिवसांपूर्वीची असल्याचा अंदाज

    आत्महत्येचे कारण अद्याप अज्ञात, शहर पोलिस करत आहेत अधिक तपास

  • 26 Jul 2021 11:13 AM (IST)

    अंधेरीतील सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश, दोन मुलींची सुटका करण्यात पोलिसांना यश

    अंधेरी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश....

    दोन  मुलींची सुटका करण्यात मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेला यश आले आहे.

    या मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यातून मिळाणाऱ्या पैशांचा स्वत:साठी वापर करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

    संदीप कुमार सिन्हा, (दलाल) विकास उर्फ मनोज यादव, सिकंदर उर्फ जुगल सिंग अशी या अटक आरोपीं नावे आहेत.

    या प्रकरणातील दोन आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

  • 26 Jul 2021 10:12 AM (IST)

    नाशिकच्या सराफ बाजार परिसरात दरोडा, रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पसार

    नाशिक - शहरातील मध्यवस्तीत असलेल्या सराफ बाजार परिसरात दरोडा..

    चिंतामणी सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर दरोडा

    घराचा दरवाजा तोडून घरातील सोन्या,चांदीच्या वस्तूंची चोरी

    दरोडेखोरांनी सोसायटीमधील इतर घरांना लावली बाहेरून कडी

    घरातील रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पसार..

    पोलीस घटनास्थळी दाखल

  • 26 Jul 2021 09:25 AM (IST)

    औरंगाबादेत शेततळ्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू

    औरंगाबाद :-

    शेततळ्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू..

    सावंगी येथील शेतात फिरण्यासाठी गेले आणि पोहताना पाण्यात बुडून झाला दुर्दैवी मृत्यू..

    एका आठवड्यात 8 जनांचा पाण्यात बुडून मृत्यूच्या घटना समोर..

    मोहंमद अरसलाम नियाजी आणि शेख साजिद शेख याकूब असे मृताचे नाव..

    पाण्याचा अंदाज न लागल्याने बुडून मृत्यू, अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतांना काढले बाहेर..

    पाण्यात बुडून मृत्यूचे सत्र सुरूच.

  • 26 Jul 2021 08:46 AM (IST)

    नाशिकमध्ये पर्यटनस्थळांवर कोरोना नियम धाब्यावर, अनेक ठिकाणी पर्यटकांची तुफान गर्दी

    नाशिक - जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर कोरोना नियम धाब्यावर..

    त्रंबकेश्वर, पाहिने, भावली वॉटर फॉलवर पर्यटकांची तुफान गर्दी

    पोलिस यंत्रणेकडून मात्र पर्यटन स्थळांवर दुर्लक्ष..

    नागरिकांना कोरोना नियमांचा विसर अन पोलीस यंत्रणा बेअसर अशी परिस्थिती..

  • 26 Jul 2021 08:41 AM (IST)

    नागपुरात भाजपचं मिशन महापालिका, महिला आघाडीची जम्बो कार्यकारिणी घोषित

    नागपूर -

    नागपुरात भाजपच मिशन महापालिका

    भाजप महिला आघाडीची जम्बो कार्यकारिणी घोषित

    184 ओदाधिकाऱ्यांचा समावेश

    आगामी महापालिका निवडणुका बघता सगळ्याच घटकातील महिलांचा समावेश

    महिला आघाडी च्या अध्यक्षा नीता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बनली जम्बो कार्यकारिणी

  • 26 Jul 2021 08:36 AM (IST)

    नागपूर 2 लाख 27 हजार 900 मतदारांनी छायाचित्र न दिल्याने मतदार यादीतून वगळले जाणार

    नागपूर -

    वेळोवेळी मुदत वाढवूनही 2 लाख 27 हजार 900 मतदारांनी छायाचित्र दिले नसल्याने त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार.

    नागपूर जिल्ह्यात 12 विधानसभा क्षेत्र असून 42 लाख 30 हजार 388 मतदार आहेत,

    त्यातील 2 लाख 46 हजार 928 मतदारांचे छायाचित्र यादीत नव्हते.

    मनपा निवडणुकीसाठी हीच यादी असणार असल्याने राजकीय पक्ष लागले कामाला.

  • 26 Jul 2021 08:24 AM (IST)

    सिंहगडाच्या पायथ्याजवळ सुरु असलेली पार्टी पोलिसांनी उधळली, हॉटेल चालकासह 7 जणांवर कारवाई

    पुणे

    सिंहगडाच्या पायथ्याजवळ सुरु असलेली पार्टी रविवारी पोलिसांनी उधळली

    मौजे गोळेवाडी गावचे हद्दीतील हॉटेल सानवी रिसॉटमध्ये करण्यात आली कारवाई

    याप्रकरणी हॉटेल चालकासह सात जणांवर केली कारवाई

    हॉटेल मालक नामे विनय सुभाष कांबळे व त्याचा मित्र डॉ. निखील भाकरे या दोघांनी केलं होतं पार्टीच नियोजन

    डॉ. निखील भाकरे हा अंधाराचा फायदा घेवून गेला पळून

  • 26 Jul 2021 08:20 AM (IST)

    नाशिकच्या पखालरोड परिसरात 100 वर्ष जुन्या झाडांवर कुऱ्हाड, वृक्षप्रेमी नागरिकांकडून संताप व्यक्त

    नाशिक - पखालरोड परिसरात 100 वर्ष जुन्या झाडांवर कुऱ्हाड..

    वृक्षप्रेमी नागरिकांकडून संताप व्यक्त..

    कोणताही धोका नसताना मोठे वटवृक्ष तोडण्याचा महापालिकेचा प्रताप..

    खाजगी शाळेला मदत व्हावी म्हणून झाडं तोडले जात असल्याचा स्थानिकांचा आरोप..

    चिंच,वड,लिंबाराचे मोठे वटवृक्ष जमिनदोस्त झाल्याने वृक्षप्रेमींमध्ये हळहळ..

    संबंधित ठेकेदारांची चौकशीची मागणी.

  • 26 Jul 2021 07:42 AM (IST)

    हातनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडले, चार दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरु

    भुसावळ तालुक्यातील हातनूरचे दरवाजे गेल्या चार दिवसापासून पूर्णत: उघडले

    - हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडले

    धरणातून 64520 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू

    हातनुर धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडले

  • 26 Jul 2021 07:41 AM (IST)

    नागपूर जिल्ह्याला दिलासा, 14 महिन्यानंतर पहिल्यांदाच केवळ 3 कोरोना रुग्णांची नोंद

    नागपूर-

    नागपूर जिल्ह्याला मोठा कोरोना दिलासा

    चौदा महिन्या नंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात केवळ 3 बाधित

    तर सलग नवव्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद

    24 तासात 7 हजार 351 चाचण्या करण्यात आल्या

    बरं होणाऱ्यांची टक्केवारी 97.90 वर पोहचली आहे

  • 26 Jul 2021 07:40 AM (IST)

    नागपूरच्या मनपा केंद्रात मर्यादित स्वरुपात लसीकरण

    नागपूर -

    आज नागपूर मनपा केन्द्रांमध्ये मर्यादित स्वरूपात लसीकरण

    राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसी कमी प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे मर्यादित स्वरूपात लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर होणार आहे.

    त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केन्द्रात गर्दी करु नये.

    या वयोगटातील १०० लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

    सध्या नागपूर मनपा आणि अन्य शासकीय केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत,

    अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची माहिती

  • 26 Jul 2021 07:34 AM (IST)

    औरंगाबादेतील कारागृहात दोन अट्टल गुन्हेगारांकडे सापडले मोबाईल

    औरंगाबाद :-

    हर्सूल कारागृहात दोन अट्टल गुन्हेगारांकडे सापडले मोबाईल..

    दोन अट्टल गुन्हेगार वापरत होते हिरो स्टाईल कारागृहात मोबाईल..

    मोबाईल कोणी आणून दिले याचा तपास सुरू..

    अक्षय शामराव आठवले आणि विजय शामराव गोयर या कैद्यांजवळ सापडले मोबाईल..

    कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण..

    रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान झाडाझडती घेऊन केले मोबाईल जप्त..

  • 26 Jul 2021 07:33 AM (IST)

    औरंगाबादेत भविष्य सांगण्याच्या बहाण्याने गुंगीचे भस्म देऊन लूट, 2 भोंदूबाबांना अटक

    औरंगाबाद :-

    भविष्य सांगण्याच्या बहाण्याने गुंगीचे भस्म देऊन लुटणाऱ्या 2 भोंदू बाबांना अटक..

    भविष्य सांगण्याच्या कारणाने घरात घुसून गुंगीचे औषध देऊन करत होते लूट..

    मुकुंडवाडी पोलिसांनी चोरी गेलेली मालमत्ता हस्तगत करून 2 भोंदू बाबांना केले अटक..

    पोलिसांनी जप्त केला लुटेत वापरला जाणारा भस्म..

    भोंदू बाबा आणि अनोळखी लोकांना घरी प्रवेश टाळण्याच्या पोलिसांनी दिल्या सूचना..

  • 26 Jul 2021 06:54 AM (IST)

    मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकी दारांच्या मालमत्ता होणार महापालिकेच्या नावावर

    नागपूर -

    मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकी दारांच्या मालमत्ता होणार महापालिकेच्या नावावर

    लिलावाच्या कार्यात सहकार्य न केल्यास कारवाई

    वारंवार सूचना आणि संधी देऊन सुद्धा अनेक थकबाकी दार कर भरत नाही , त्यांची मालमत्ता लिलाव केली जाते

    मात्र अनेक जण लिलाव प्रक्रियेला सहकार्य करत नाही

    अश्याची मालमत्ता आता महापालिकेच्या नावावर करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे

    महापालिकेची 900 कोटी रुपयांची थकबाकी आहे

    त्यात प्रामुख्याने मोठया थकबाकी दारांचा समावेश आहे

    तर 119 मालमत्ता धारकांकडे 5 लाख पेक्षा जास्त थकबाकी आहे

  • 26 Jul 2021 06:51 AM (IST)

    सरकार जागवा, व्यापार वाचवा, कोरोना निर्बंधाविरोधात व्यापारी आक्रमक

    नागपूर -

    सरकारने घालून दिलेल्या कोरोना निर्बंधाविरोधात आता व्यापारी करणार हल्लाबोल

    सरकार जागवा, व्यापार वाचवा

    नागपुरात कोरोना स्थिती नियंत्रणात असताना प्रशासन निर्बंध शिथिल का करत नाही

    नागपूर पहिल्या टप्प्यात आहे मात्र निर्बंध तिसऱ्या टप्प्यातील लागू असल्याने व्यापारी संतप्त

    रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी

    आज संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय करणार पदयात्रा

    तर उद्याला संपूर्ण शहरात बाईक व कार रैली काढत करणार शासनाचा विरोध

  • 26 Jul 2021 06:45 AM (IST)

    सांगली जिल्ह्यात पूरस्थिती, 1 लाख 96 हजाराहून अधिक व्यक्तींचे स्थलांतर

    सांगली जिल्ह्यात पूरस्थिती

    41 हजार 84 कुटुंबातील 1 लाख 96 हजाराहून अधिक व्यक्तींचे स्थलांतर

    32 हजाराहून अधिक जनावरांचेही स्थलांतर

    जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती

Published On - Jul 26,2021 6:37 AM

Follow us
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.