Maharashtra News LIVE Update | जळगाव जिल्ह्यातील तळई येथे वीज पडून दोघांचा मृत्यू
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत प्रवासी वाहतूक, गुहागरमध्ये खासगी बसचालकांचा अतिरेक सुरूच
रत्नागिरी – गुहागरमध्ये खासगी बसचालकांचा अतिरेक सुरूच
कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत प्रवासी वाहतूक करणाऱ्या 6 बसेस गुहागर पोलिसांनी घेतल्या ताब्यात
गेली तासभर सर्व बस एकाच ठिकाणी उभ्या
सर्व बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी
गुहागर पोलीस घटनास्थळी कारवाई सुरू
-
जळगाव जिल्ह्यातील तळई येथे वीज पडून दोघांचा मृत्यू
जळगाव – तळई येथे वीज पडून दोघांचा मृत्यू
भूषण पाटील आणि विक्रम चौधरी अशी मृतांची नावे
-
-
मुसळधार पावसामुळे बुलडाण्यात खडकपूर्णा नदीला पूर
बुलडाणा : खडकपूर्णा नदीला पूर
वाळू वाहतूक करणारी 20 वाहने अडकली नदीपात्रात
आलेल्या पावसाने ओढ्याचे पाणी आले नदीत
नदीपात्रातून वाहने काढण्याचे प्रयत्न सुरू
पावसामुळे वाहनांचे नुकसान
-
परभणी शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस
परभणी : परभणी शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस
परभणी, गंगाखेड, सेलू, पाथरी, पूर्णा, जिंतूर तालुक्यात पावसाला सुरुवात
ग्रामीण भागात पेरणीच्या कामांना येणार वेग
-
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू
मृग नक्षत्र लागताच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
या पावसामुळे खरिपातील पेरणीला होणार सुरुवात
-
-
औरंगाबाद जिल्ह्यातील जुई नदीला तुफान पूर, औरंगाबाद जळगाव महामार्ग गेल्या दोन तासापासून ठप्प
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील जुई नदीला तुफान पूर
जुई नदीला आलेल्या पुरात नदीवरील पूल गेला वाहून
औरंगाबाद जळगाव महामार्ग गेल्या दोन तासापासून ठप्प
सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव परिसरातील घटना
प्रशासनाचा रस्ता सुरू करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
-
पुढील चार दिवस कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा, पुणे हवामान वेधशाळेनं वर्तवला अंदाज
मुंबई : पुढील चार दिवस कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा
तर विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज
नैऋत्य मोसमी पावसानं कोकण आणि महाराष्ट्र व्यापला
उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टी भागात द्रोणीय क्षेत्र तयार झाल्यानं पावसाचा अंदाज
तर पुणे जिल्ह्यातही पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा
पुणे हवामान वेधशाळेनं वर्तवला अंदाज .
-
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर
आज दुपारी दिलीप कुमार यांच्या डाव्या फुफ्फुसातून 350 CC इतके पाणी एका छोट्या शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आले.
या शस्त्रक्रियेसाठी त्यांना ICU मध्ये स्थलांतरित करण्यात आले होते.
डॉ. नितीन गोखले आणि डॉ. जलील परकार यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप कुमार यांच्यावर खार येथील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलीप कुमार यांना उद्या सकाळी नियमित कक्षात हलवण्यात येईल. डॉ. गोखले त्याबाबत आज सायंकाळी निर्णय घेतील.
दिलीप कुमार यांना गेल्या रविवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
-
कल्याणमध्ये बाळाची चोरी करणारी टोळी गजाआड, पाच जणांना अटक
कल्याण : सहा दिवसांपूर्वी स्टेशन परिसरातून सहा महिन्याचे बाळ गेले होते चोरीला
सीसीटीव्हीच्या सहाय्याने बाळास चोरणारी टोळी गजाआड
कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी पाच आरोपीना केली अटक
अटक आरोपीत दोन महिलांचा समावेश
बाळ विकण्यासाठी चोरी केल्याचा खुलासा
-
विदर्भात वेळेआधीच मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांना आनंद, 12 आणि 13 जूनला मुसळधार पावसाचा इशारा
नागपूर : विदर्भात मान्सून दाखल
विदर्भात वेळेआधीच मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांना आनंद
11 , 12 आणि 13 जूनला मुसळधार पावसाचा इशारा
नागपूर हवामान विभागाने दिली माहिती
जून महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज
या वर्षी विदर्भात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज
-
पालघरमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता गेला वाहून
पालघर : पालघरमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ताच गेला वाहून
कोळगाव येथील पालघर बोईसर रोडवर जिल्हा मुख्यालया समोर असलेला रस्ता गेला वाहून
पालघर बोईसर रोड वाहतूक दोन तासापासून पूर्णपणे बंद
-
यवतमाळमध्ये आज पुन्हा मुसळधार पाऊस
यवतमाळ- यवतमाळमध्ये आज पुन्हा मुसळधार पाऊस
विजेच्या कडकडाटसह जोरदार पावसाला सुरूवात
पेरणीच्या कामाला येणार वेग
-
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, कन्नड तालुक्यात पावसाची हजेरी
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातही पावसाची एन्ट्री
वैजापूर, गंगापूर, कन्नड तालुक्यात पावसाची हजेरी
गेल्या अर्ध्या तासापासून धुवांधार पावसाला सुरुवात
तिन्ही तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात
मराठवड्यातही मान्सून पोहोचल्याची शक्यता
-
नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड, दुनेश्वर पेठेंचं नाव सर्वात आघाडीवर
– नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड
– दुनेश्वर पेठे यांचं नाव सर्वात आघाडीवर
– प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करणार नविन अध्यक्षांच्या नावाची घोषणा
– दुनेश्वर पेठे राष्ट्रवादीचे नागपूरातील नगरसेवक
-
नागपूरच्या बर्डी मार्केटमध्ये लोकांची मोठी गर्दी
– नागपूरच्या बर्डी मार्केटमध्ये लोकांची मोठी गर्दी
– हजारोंच्या संख्येनं लोक खरेदीसाठी बर्डी मार्केटमध्ये
– कोरोनाचे नियम धाब्यावर, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
– काही लोक वावरतात विनामास्क
– बाजारातील गर्दी, कोरोनाची तिसरी लाट घेऊन येण्याची भिती
-
नाशिक शहरातील अनेक ठिकाणच्या नाल्यांवर अनधिकृत बांधकाम, महापौरांच्या पाहणी दौऱ्यात धक्कादायक बाब समोर
नाशिक शहरातील अनेक ठिकाणच्या नाल्यांवर अनधिकृत बांधकाम
महापौर सतीश कुलकर्णी यांच्या पाहणी दौऱ्यात धक्कादायक बाब समोर
नाल्यामध्ये केमिकल युक्त पाणी सोडल्याचं देखील उघड
नाल्यांवर रस्ते आणि बांधकाम करून आले बुजवण्यात
लवकरच या संदर्भात नोटीस देऊन करणार कारवाई महापौर यांनी दिला इशारा
-
नाना पटोले हे पोहरादेवी येथे दाखल
वाशिम :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे तीर्थक्षेत्र बंजाऱ्याची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दाखल
संत सेवालाल महाराज ,संत रामराव महराजांच्या समाधीचे व जगदंबा मातेचं घेत आहेत दर्शन
-
राज्य शासनाच्या विविध विभागातील महत्वाची पदं कंत्राटी पद्धतीने भरण्यास विद्यार्थ्यांचा विरोध
राज्य शासनाच्या विविध विभागातील महत्वाची पदं कंत्राटी पद्धतीने भरण्यास विद्यार्थ्यांचा विरोध,
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहीलं पत्र,
विविध विभागात महत्वाची पदं ही कंत्राटी पद्धतीने भरण्यास मान्यता न देण्याची केली मागणी,
दरवर्षी 7 ते 8 लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांनी करायचं काय ? विचारला सवाल,
सगळ्या पदभरती परीक्षा कंत्राटी पद्धतीने न राबवता आयोगामार्फत घेण्याची केली मागणी
-
राज्याला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते – संजय राऊत
– राज्याला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते
– सकारात्मक दृष्टीने या भेटीकडे पाहायला हवं, मेट्रो शेड अडकलीये, सकारात्मक चर्चा झालीये
– या राज्याच्या विरोधी पक्षाने या भेटीचं स्वागत करायला हवं
– विरोधी पक्षाला नेण्याने राज्याला जर मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं
– त्यांच्याच पक्षाचं केंद्र सरकार आहे, विरोधी पक्ष नेते जाणकार आहेत, या बाबत विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांना सल्ला आणि सुचना द्यायला हव्यात
– राज्याच्या प्रश्नांवर जर भाजप चिंतन करत असेल तर त्यांच्या बैठकीचं स्वागत आहे
– पक्ष वाढवणं गरजेचं आहे, त्यासाठी माझा दौरा सुरु आहे, इतर गोष्टी होत राहतील
-
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण वाशिष्टी नदीचा पूल वाहतूकीसाठी आज रात्री राहणार बंद
चिपळूण –
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण वाशिष्टी नदीचा पूल वाहतूकीसाठी आज रात्री राहणार बंद
आज रात्री १०.३० ते सकाळी ५ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे..
हा पूल जीर्ण झाला असून बाजूला चौपदरीकरणात नवीन पुलाचे काम चालू आहे..
या पुलाचा आज स्लॅब ओतण्याचे काम चालू असल्याने जुना पूल वाहतूकीस बंद ठेवण्यात येणार आहे.
या महामार्गावरील वाहतूक चिपळूण फरशी वरुन गुहागर बायपास मार्गे वळवीण्यात येणार आहे
-
पनवेल शहरातील सखल भागात साठले पाणी
पनवेल शहरातील सखल भागात साठले पाणी
महाराष्ट्र बँक जवळ असलेल्या दुकानांमध्ये साचले पाणी
दुकानात पाणी गेल्याने आतील वस्तू, फर्निचरचे झाले नुकसान
नगरसेविका दर्शना भोईर यांनी 2 पंप लाऊन पाणी उपसण्याचे काम सुरू
काल रात्री पासून पनवेल मध्ये जोरदार पाऊस
-
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय स्थितीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बैठक घेणार
सोलापुर –
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय स्थितीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बैठक घेणार
15 जून रोजी पुण्यात घेणार बैठक
उजनी धरणातील पाणी इंदापूरला पळण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसवर माघार घेण्याची आलेली नामुष्की
पंढरपूर विधानसभा निवडणूक निकालावर चर्चा
उजनी धरणातील पाणी या विषयावर जिल्ह्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधींची नाराजगी
भविष्यात याचा फटका राष्ट्रवादीला कॉंग्रेसला बसण्याची शक्यता
या सर्व घडामोडीवर पदाधिकाऱ्यांची काय भूमिका आणि मत जाणून घेण्यासाठी होणार बैठक
-
मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची बॅटिंग सुरु
– मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची बॅटिंग सुरु
– परिणामी सायन गुरूकृपा हाॅटेलच्या आसपासचा परिसर जलमय
– घरात, दुकानात, गाड्यांमध्ये शिरलं पाणी
– कमरेपर्यंत पाण्यातून नाग काढताना मुंबईकरांची ऊडाली दमछाक
– पावसाने जनजिवन विस्कळीत
-
खेड येथील ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
सातारा – खेड येथील ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
6,500 हजार रुपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाने केली कारवाई
ज्ञानेश्वर दगडु गायकवाड असे ग्रामविकास अधिकारयाचे नाव
रस्त्याच्या कामाची पोट ठेकेदाराकडुन 3 टक्के रक्कम मिळावी यासाठी मागितली होती लाच
सातारा लाचलुपत विभागाची कारवाई
-
औरंगाबादेतील कर्जबाजारी व्हिडीओकॉन कंपनीचे अखेर होणार अधिग्रहण
औरंगाबाद –
कर्जबाजारी व्हिडीओकॉन कंपनीचे अखेर होणार अधिग्रहण
वेदांता कंपनीची ट्वीन स्टार टेक्नॉलॉजी करणार व्हिडीओकॉनचं अधिग्रहण
30 अब्ज रुपयात होणार व्हिडीओकॉन कंपनीचे अधिग्रहण
90 दिवसांच्या आत कर्जदात्यांना मिळणार 5 अब्ज रुपये
व्हिडीओकॉन कंपनीवर आहे 635 अब्ज रुपयांचे कर्ज
कर्ज परतावा न झाल्यामुळे व्हिडीओकॉन कंपनी निघाली होती दिवाळखोरीत
रिझर्व्ह बँकेकडून प्रशासक नेमून सुरू होता व्हिडीओकॉन कंपनीचा व्यवहार
अखेर वेदांताची ट्वीन स्टार कंपनी करणार वेदांताचे अधिग्रहण
अधिग्रहनाला दिवाळखोरी न्यायालयाने दिली परवानगी
-
उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात सकाळपासून पावसाची संततधार
उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात सकाळपासून पावसाची संततधार
पहाटेपासून सर्व परिसरात अखंडपणे पाऊस सुरू
अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क
अद्याप कुठेही पाणी साचलेलं नाही, काही दुर्घटनाही नाही
-
महाड, पोलादपुर, माणगाव, अलिबाग, खालापुर, खोपोली सह अनेक भागात रिमझीम सुरु
रायगड
महाड, पोलादपुर, माणगाव, अलिबाग, खालापुर, खोपोली सह अनेक भागात रिमझीम सुरुच.
रात्री पासुन पावसाची रिमझीम सुरुच
उद्या पासुन दोन दिवसाचा अतिव्रुष्टी व वादळवा-याचा ईशारा प्रशासनाने दिला आहे.
१०३ गावानां स्थलांतरीत व नदी,समुद्र, खाडी, तलाव, धरण क्षेत्रात नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
-
नाशकात चाईल्ड पॉर्न व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांसह बघणाऱ्यांवर गुन्हे दाखल
नाशिक – चाईल्ड पॉर्न व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांसह बघणाऱ्यांवर गुन्हे दाखल
नाशिकच्या सायबर सेलची मोठी कारवाई
सोशल मीडिया वापरणाऱ्यांसह 80 जणांची नाव तपासात निष्पन्न
या प्रकरणी 80 जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता
-
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पुढच्या 2 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा
नाशिक – नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पुढच्या 2 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा
महापौर सतीश कुलकर्णी आज घेणार पावसाळा पूर्व आढावा बैठक
बैठकीला सर्व विभाग प्रमुख राहणार हजर
पावसाळा पूर्व नियोजन आणि नाले सफाईची घेणार माहिती
शहरातील खोदून ठेवलेल्या रस्त्यांबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता
-
रात्रभर रत्नागिरीत पावसाची बॅटिंग
रत्नागिरी- रात्रभर रत्नागिरीत पावसाची बॅटिंग
पहाटेपासून सरीवर पाऊस
उद्यापासून मुसळधार पावसाचा इशारा
प्रशासन सतर्क, रात्रीपासून किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक
-
औरंगाबादेत पोलिसांना गुंगारा देण्यासाठी चोरांचा गटारात लपंडाव
औरंगाबाद –
पोलिसांना गुंगारा देण्यासाठी चोरांचा गटारात लपंडाव
औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील प्रकार
जुगार खेळणाऱ्या आरोपींनी पोलिसांपासून सुटण्यासाठी थेट गटाराचा घेतला आसरा
नालीच्या काठावर पोलिसांची शोधाशोध तर आरोपींचं गटारात लोटांगण
आरोपींच्या किळसवाण्या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
शेवटी पोलिसांनी आरोपींच्या मूसक्या आवळून केला गुन्हा दाखल
-
मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस
– मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात
– मुंबई उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावलीये
– बांद्रा, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, मलाड आणि दहिसरमध्ये काळेकुट्ट ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस सुरु झालाय
– सायन-चेंबूरमध्ये पावसामुळे रस्त्यावरची दृश्यता कमी झालीये, त्यामुळे रस्त्यावर गाड्या धीम्या गतीने जाताना पाहायला मिळाल्या.
– इसेटर्न एक्स्प्रेस हायवेवरची परिस्थितीही अशीच आहे
-
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पुढच्या 2 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा
नाशिक – नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पुढच्या 2 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा
महापौर सतीश कुलकर्णी आज घेणार पावसाळा पूर्व आढावा बैठक
बैठकीला सर्व विभाग प्रमुख राहणार हजर
पावसाळा पूर्व नियोजन आणि नाले सफाईची घेणार माहिती
शहरातील खोदून ठेवलेल्या रस्त्यांबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता
-
फडणवीसांच्या काळातील भरती राज्यपालांनी रोखलं, आरोग्य विभागातील २७० पदे थेट भरण्यास नकार
सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि विशेषज्ञ या दर्जाची एकूण २७० पदांची भरती प्रक्रि या राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून तीन वर्षांसाठी वगळून ही पदे थेट निवड मंडळामार्फत भरण्यास मंजुरी देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला आहे
-
मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरात 9 ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा
ठाणे :
मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरांत ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला
ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत
संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरात झाडे उन्मळून पडणे, झाडांच्या फांद्या पडणे, सखल भागात पाणी साचणे, दरड कोसळणे इत्यादी घटना घडू शकतात, याबाबत करावयाच्या उपाययोजनांकरिता त्यांनी आढावा बैठक घेतली
-
कानपूर येथे भीषण अपघात, 17 जणांचा मृत्यू
उत्तरप्रदेशातील कानपूर येथे भीषण अपघात झाला आहे
भरधाव टेम्पो आणि ट्रॅवल्स बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
-
उल्हासनगरातील 505 इमारतींना स्ट्रक्चर ऑडिटच्या नोटिसा
उल्हासनगर :
मोहिनी व साईशक्ती इमारतीच्या दुर्घटनेच्या पाश्वभूमीवर महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ५०५ इमारती असुरक्षित असल्याचे उघड झाले
त्यांना स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या नोटिसा बजावल्याची माहिती अतिरिक आयुक्त करुणा जुईकर यांनी दिली
Published On - Jun 09,2021 6:22 AM
