LIVE | अंजली दमानिया, प्रीती शर्मा मेमन यांच्याविरोधात अटक वॉरंट

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

 • Updated On - 1:38 am, Wed, 24 March 21 Edited By: prajwal prajwal.dhage
LIVE | अंजली दमानिया, प्रीती शर्मा मेमन यांच्याविरोधात अटक वॉरंट
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 23 Mar 2021 21:29 PM (IST)

  अंजली दमानिया, प्रीती शर्मा मेमन यांच्याविरोधात अटक वॉरंट

  जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि प्रीती शर्मा मेमन यांना अटक करण्याचे आदेश मुक्ताईनगर येथील न्यायालयाने दिले आहेत. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दमानीया आणि मेमन यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. मात्र, अंजली दमानिया आणि प्रीती मेमन या  कोर्टात हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने हे आदेश दिले. खडसेंकडून भाजप नेते रमेश ढोले यांनी हा खटला दाखल केला आहे. यावेळी मेमन आणि दमानिया यांना 10 मेपर्यंत हजर राहण्याचे आदेश मुक्ताईनगर न्यायालयाने दिले आहेत.

 • 23 Mar 2021 20:53 PM (IST)

  LIVE | वनप्लस 9 सिरीजचे दोन नवीन स्मार्टफोन आणि वनप्लस स्मार्टवॉच लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्यांबाबत

  नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी वनप्लसने आज बहुप्रतिक्षित वनप्लस 9 सिरीजचे लाँच केले आहे. कंपनीने आज या सिरीजअंतर्गत वनप्लस 9, वनप्लस 9 प्रो आणि वनप्लस 9 आर यासह तीन स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. यासोबतच कंपनीने वनप्लस स्मार्टवॉच देखील बाजारात लाँच केले आहे. कंपनीने या स्मार्टफोनचा कॅमेरा हॅसलब्लाडच्या सहकार्याने विकसित केला आहे, जो खूप खास आहे. कंपनीने वनप्लस 9 स्मार्टफोन 49,999 रुपये प्रारंभिक किंमतीसह बाजारात आणला आहे. तर वनप्लस 9 प्रो 64,999 रुपये प्रारंभिक किंमतीसह लाँच केला आहे.

 • 23 Mar 2021 20:47 PM (IST)

  बीड जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा, दहा दिवस कडकडीत बंद

  बीड: 26 मार्चपासून बीड जिल्ह्यात लॉकडाऊन, कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाचा निर्णय, 4 एप्रिलपर्यंत राहणार कडक लॉडाऊन, दहा दिवस राहणार लॉकडाऊन, मात्र जिल्हा प्रशासनाकडून अद्याप आदेश नाहीत, उद्या आदेश निघण्याची शक्यता

 • 23 Mar 2021 20:46 PM (IST)

  आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता रश्मी ठाकरे यांनासुद्धा कोरोनाची लागण

  मुंबई : राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंर आता त्यांच्या आई आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 20 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर  रश्मी ठाकरे यांचासुद्धा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 • 23 Mar 2021 20:28 PM (IST)

  गृहमंत्री अनिल देशमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला, काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष

  मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना 100 कोटींची वसुल करण्याचे  सांगितल्याचे आरोप झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत. देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख हे उद्धव ठाकरे यांना भेटायला आले आहेत.

 • 23 Mar 2021 20:23 PM (IST)

  अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह, सविस्तर अहवाल हायकमांडला पाठवणार

  मुंबई : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह

  एका गटाचा सूर आरोप खोटे आणि बेछूट त्यामुळे राजीनामा नको

  तर चौकशी होईपर्यंत देशमुखांनी पदमुक्त रहाणे महाविकास आघाडीच्या हिताचे

  काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीवर नाराजी

  भाजपाच्या आरोपांना उत्तर देण्यात महाआघाडी कमी पडत असल्याची भावना

  फडणवीसांचे बेछूट, राजकीय आरोप खोटे तरीही राष्ट्रवादीचे मंत्री बोलत का नाही?

  आज रात्रीच बैठकीचा सविस्तर अहवाल हायकमांडला पाठवणार

 • 23 Mar 2021 17:57 PM (IST)

  पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटसंदर्भात केंद्रीय गृहसचिव कारवाई करतील- देवेंद्र फडणवीस

  देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये असून ते माध्यमांशी संवाद साधत आहेत. यावेळी ते पोलीस दलातील बदल्यांच्या कथित रॅकेटसंदर्भात माहिती देत आहेत. त्यांनी केंद्रीय गृहसचिवाकंडे या प्रकरणाचे सर्व कागदपत्रे दिले आहेत. त्यांना मी विनंती केली आहे की, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करवी. कागदपत्रांचा अभ्यास करुन योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. 25 ऑगस्टपासून हा अहवाल सरकारकडे होता. तसेच तत्काली डीजीपी यांनी  सीआयडी चौकशी करण्याची शिफारस केल्यानंतरसुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. कोण उघडं पडेल यांची भीती राज्य सरकारला वाटत होती?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

  या प्रकरणात गरज पडली तर न्यायालयातही जाऊ. नवाब मलिक यांनी केलेला दावा खोटा आहे. बदल्यासंदर्भाताला अहवाल डीजीपी यांनी अतिरिक्त मुख्य सचिव यांना दिला होता. या अहवालातील काही रेकॉर्डिंग मुख्यमंत्र्यांनीसुद्धा ऐकल्या आहेत.

  सगळं प्रशासन पॅरालाईज झालं असं मी म्हणणार नाही. मात्र, सरकारला आत्मचिंतन करण्याची वेळ निर्माण झाली आहे. 15 वर्षे निलंबित असलेल्यांना पुन्हा सेवेवर घेतलं जातं. या अधिकाऱ्यांकडू बॉम्ब ठेवला जातो. खंडणी मागितली जाते. त्यामुळे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.

 • 23 Mar 2021 17:35 PM (IST)

  उद्धव ठाकरे आमचे नेते, तेच सर्व निर्णय घेतील- यशोमती ठाकूर

  यवतमाळ- राज्यात कुमारी मातांच्या संदर्भात गेल्या 5 वर्षात कोणतही काम झालं नाही, असा आरोप महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनीक केला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींसदर्भात भाष्य केलं. “महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. आमचा एक संघ आहे. आमचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.  ते या विषयावर निर्णय घेतील हे आमच्या पक्ष श्रेष्ठीनी सांगितले आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

 • 23 Mar 2021 16:19 PM (IST)

  बदल्या करताना महाराष्ट्रात वसुली होत आहे- रविशंकर प्रसाद

  केंद्रीय कायदेमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरु झाली आहे.  यावेळी ते महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल भाष्य करत आहेत. महाराष्ट्रात इमानदार पोलीस अधिकाऱ्यांवर अन्याय केला गेला. सचिन वाझे 15 वर्षांपर्यंत निलंबित होते. नंतर ते शिवसेनेचे सदस्य होतात. त्यानंतर कोरोना काळात त्यांना पुन्हा सेवेत घेतलं जातं. त्यांतर याच अधिकाऱ्याला शंभर करोड रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं जातं, असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला.

  मुंबईत जी स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीन आढळले होते, त्यांची चौकशी एनआयए करत आहे. एनआयएच्या सेक्शन 8 एकमध्ये एक तरदूत आहे. ज्यामध्ये अशा घटनांमध्ये एखादा संबंधित दुसरा गुन्हा असेल, तर त्याचा तपास एनआयएला करण्याचे अधिकार आहेत. मात्र, अजूनही एनआयएला मनसुख हिरेन यांच्या मृतत्यूचा तपास करण्याची जबाबदारी एनआयएला का दिली जात नाहीये. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या निष्पक्षप चौकशीला रोखलं जात आहे का? मनसुख हिरेने यांच्या मृत्यूची तार फक्त सचिन वाझेपर्यंतच ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केला जात आहे.

  भाजप कोणाचीही बाजू घेत नाहीये. फक्त सर्व गोष्टी सार्वजनिक करण्याचा प्रयत्न आमच्याकडून होत आहे. महाराष्ट्राचे सरकार कोण चालवत आहे?, असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी केला.

   

 • 23 Mar 2021 16:06 PM (IST)

  सचिन वाझेंनी जबाबात खोटी माहिती दिली, एटीएसची माहिती

  एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांची पत्रकार परिषद –

  मनसुख प्रकरणाचा तपास अनेक अँगलने

  सचिन वाझेंनी जबाबात खोटी माहिती दिली

  आरोपी विनायक शिंदे आणि नरेश भोरला अटक

  विनायक शिंदे वाझेंच्या संपर्कात

  अधिक तपास सुरु, आणखी आरोपी सापडण्याची शक्यता

   

 • 23 Mar 2021 16:04 PM (IST)

  आरोपीने काही सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केला- एटीएस

  उद्योजक मनसुख हिरेने मृत्यू प्रकरणी मुंबई एटीएसचे अधिकारी पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी ते मनसुख हिरेन यांच्या मृत्यूसंदर्भात सर्व माहिती देत आहेत.  मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी प्रमुख आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी सुरुवातील सर्व आरोप फेटाळून लावले. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची 7  मार्च रोजी एटीएसने गुन्ह्याची नोंद केली. या प्रकरणात अटक लेलेल्या आरोपींच्या साक्षी आणि पुरव्यांचे विश्लेषण केलेले आहे. सचिन वाझे यांनी आपल्या जबाबात खोटी माहिती दिली होती. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. आमच्याकडे अनेक नावं आहे. अनेक संशयित आहेत. या व्यक्तींसंबंधित आम्ही फक्त पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करतोय, असे एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले.

  या प्रकरणाशी संबंधित आम्ही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज जमा केले आहेत. या प्रकरणात आरोपीने काही सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे पुरवे समोर येत आहेत. तपास पथकाने आजपर्यंत झालेल्या तपासात अनेक साक्षीदारांचे जबाब नोंद केले आहेत. या गुन्ह्यातील काही आरोपी कोर्टात साक्ष देण्यासाठी तयार आहेत.  सचिन वाझे हे एनआयएच्या 25 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. सचिन वाझे यांचा ताबा एटीएसला मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

  या गुन्ह्याचा तपास महत्वाच्या टप्प्यात चालू आहे. एटीएस कसून तपास करत असून लवकरच या गुन्ह्याच्या मुळाशी जाण्याचा आम्ही प्रयत्न करु, असा विश्वास यावेळी एटीएसच्या अधिकाऱ्याने पत्रकार परिषदेत व्यक्त केलेय.

   

 • 23 Mar 2021 15:13 PM (IST)

  दिग्रस तालुक्यातील दत्तापूर येथे वीज पडून 5 बालके गंभीर जखमी

  यवतमाळ-

  दिग्रस तालुक्यातील दत्तापूर येथे वीज पडून 5 बालके गंभीर जखमी

  शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेले

  पाऊस सुरू असल्याने शेतातील बाभळीच्या झाडाखाली उभे असता झाडावर वीज कोसळून 5 बालके गंभीर जखमी झाले आहे

  राम भट, आहु शेळके, संतोष शेळके, वांशिका साळवे, मंगेश टाले असे जखमी झालेल्या बालकांची नावे

  जखमींना रुग्णालयात केले उपचारासाठी दाखल

 • 23 Mar 2021 14:40 PM (IST)

  डोंबिवलीत तरुणीला अश्लील मैसेज पाठवणाऱ्या परप्रांतीय तरुणाला चोप 

  डोंबिवलीत तरुणीला अश्लील मैसेज पाठवणाऱ्या परप्रांतीय तरुणाला चोप

  मनसे पदाधिकारी ओम लोके आणि रितेश माळी यांनी केली मारहाण

  मारहाणीच्या व्हिडिओ वायरल

  डोंबिवली येथील देसले पाडा परिसरातील घटना

  भीम साहनी नावाचा तरुण पाठवत होता अश्लील मैसेज

 • 23 Mar 2021 14:38 PM (IST)

  विरोधकांना आमदार रोहित पवारांचं सडेतोड उत्तर

  अहमदनगर

  विरोधकांना आमदार रोहित पवारांचं सडेतोड उत्तर

  हे सरकार पाच वर्षे टिकेल रोहित पवारांचा दावा

  सरकारच्या अडचणी वाढत चालल्याय की विरोधक असा भास करताय हे समजून घेतले पाहिजे

  तर पोलीस आयुक्तांनी पत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिल्या त्या तारखांमध्ये मेळ लागत नाही त्यामुळे ही गोष्ट राजकीय युती होते की काय असा संशय निर्माण होतो

  यात मोठ्या प्रमाणात राजकारण केले जाते

 • 23 Mar 2021 14:36 PM (IST)

  महाराष्ट्राचे मुख्य सचिव वर्षा बंगल्यावर, राज्याच्या कोरोना परिस्थितीवर बैठक

  महाराष्ट्राचे मुख्य सचिव सिताराम कुंठे वर्षा बंगल्यावर दाखल…
  मुख्यमंत्र्यांसोबत राज्याच्या एकंदरीत परिस्थितीवर बैठक सुरू…

 • 23 Mar 2021 14:33 PM (IST)

  नांदेडमधील पाच वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी

  नांदेड – नांदेड जिल्हयातील पाच वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी,

  भोकर न्यायालयाचा निकाल,

  64 दिवसात न्यायालयाने दिला निकाल,

  19 दिवसात तपास पूर्ण करून पोलिसांनी दाखल केला होता दोषारोपपत्र,

  35 वर्षीय आरोपी बाबू संगेराव याला फाशीची शिक्षा

 • 23 Mar 2021 14:31 PM (IST)

  नांदेड जिल्हयातील पाच वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी, 64 दिवसात न्यायालयाचा निकाल

  नांदेड –

  नांदेड जिल्हयातील दिवशी येथील पाच वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी

  भोकर न्यायालयाचा निकाल

  64 दिवसात न्यायालयाने दिला निकाल

  19 दिवसात तपास पूर्ण करून पोलिसांनी दाखल केला होता दोषारोपपत्र

  35 वर्षीय आरोपी बाबू संगेराव याला फाशीची शिक्षा

 • 23 Mar 2021 12:23 PM (IST)

  फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत, नवाब मलिकांचा आरोप

  देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत,

  मंत्री नवाब मलिकांचा फडणवीसांवर आरोप

  सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे

   

 • 23 Mar 2021 12:10 PM (IST)

  काँग्रेसच्या हायकमांडची महाराष्ट्रातील घडामोडींवर तीव्र नाराजी, राहूल गांधींनी स्वतः व्यक्त केली नाराजी

  काँग्रेसच्या हायकमांडची महाराष्ट्रातील घडामोडींवर तीव्र नाराजी

  राहूल गांधींनी स्वतः व्यक्त केली नाराजी

  पक्षश्रेष्ठींनी आजच्या आज बैठक घेवून मागवला अहवाल

  मुंबईतील बैठकीच्या अहवालावर स्वतः सोनिया गांधी आणि राहूल गांधी घेणार निर्णय

  परमबीर सिंग प्रकरणात कॉंग्रेस नाहक बदनाम होतंय ही हायकमांडची भुमिका

 • 23 Mar 2021 11:49 AM (IST)

  सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी इतक्या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं – फडणवीस

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या प्रकरणाचं गांभीर्य कळालं होतं

  सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी इतक्या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं

  इतक्या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्याचं नेमकं कारण काय हे मुख्यमंत्री सांगू शकतात

 • 23 Mar 2021 11:43 AM (IST)

  मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणावर पांघरुण घातलं, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही – फडणवीस

  मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणावर पांघरुण घातलं, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही

  या फार सेन्सिटीव्ह गोष्टी आहेत त्या मी उघड करु शकत नाही

  यात आयपीएस अधिकाऱ्यांची नावं आहेत, अधिकाऱ्यांची नावं आहेत

  त्यामुळे मी आज दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचिवांना भेटून ही सर्व सिल्ड माहिती, पुरावे त्यांना सुपुर्द करणार आहे

  मी त्यांना विनंती करणार आहे की याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणार

 • 23 Mar 2021 11:43 AM (IST)

  पोलीस दलाला आणि गृहविभागाला लाजीरवाणा हा प्रकार – फडणवीस

  पोलीस दलाला आणि गृहविभागाला लाजीरवाणा हा प्रकार

  मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई केली नाही याचं आश्चर्य, उलट ते गृहमंत्र्यांकडे पाठवलं

  ज्यांनी अशा प्रकारे सर्व बाहेर काढलं तरीही तेव्हाच्या सीओआयवर अन्याय का झाला

   

 • 23 Mar 2021 11:41 AM (IST)

  डीजींच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी कुठलीही कारवाई केली नाही – फडणवीस

  डीजींच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी कुठलीही कारवाई केली नाही

  उलट त्यांच्यासाठी एक सिव्हिल डिफेन्स म्हणून पोस्ट तयार करण्यात आली आणि त्यांचं तिथे बदली करण्यात आली

  त्यांच्यावर अन्याय झाला

  या अहवालात ज्यांचं नाव समोर आलं त्याचं लोकांना तिथे पोस्टिंग देण्यात आली

  यावेळी डीजींनी यावर ऑब्जेक्शन दर्शवलं, हे योग्य नाही असं ते म्हणालं

  पण, जेव्हा त्यांना कळालं की हे कोणाच्यातरी दबावाखाली होत आहे तेव्हा तत्कालिन डीजी सुबोध जौस्वाल यांनी सेंट्रल डेप्युटेशन घेतलं

  त्यांनी सांगितलं हे पाप माझ्या हातून करवू नका, तुम्ही कारवाई करत नाही

 • 23 Mar 2021 11:34 AM (IST)

  परमबीर सिंग अशा प्रकारची तक्रार करणारे पहिले व्यक्ती नाही – फडणवीस

  परमबीर सिंग यांनी एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपचा जो पत्रात पुरावा लावला आहे त्यात स्पष्टपणे त्यांनी विचारलं आहे की कधी भेटले, त्यात वाझे म्हणाले फेब्रुवारी अखेरीस

  पवार साहेबांनी चौकशी न करता राजीनामा देण्याची आवश्यकता नाही यासाठी जे कारणं दिली, मला असं वाटतं की त्यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे

  परमबीर सिंग अशा प्रकारची तक्रार करणारे पहिले व्यक्ती नाही, त्यापूर्वी डीजींनी एक रिपोर्ट दिलाय

  त्यावेळेच्या कमिशनर इंटेलिजेन्सची माझ्याकडे कॉपी आणि सहा जीबीचा डेटा आहे

   

   

 • 23 Mar 2021 11:24 AM (IST)

  बदल्याचं रॅकेट गुप्तचर विभागाने पकडलं – फडणवीस

  बदल्याचं रॅकेट गुप्तचर विभागाने पकडलं, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलं, 2017 मध्ये मी मुख्यमंत्री असताना मुंबईतील एका हॉटेलमध्ये डीलिंग होत असल्याचं समजलं होतं, आम्ही प्लॅन आखून अटक केली, आरोपपत्रही दाखल : देवेंद्र फडणवीस

   

 • 23 Mar 2021 11:23 AM (IST)

  गृहमंत्री 17 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर – फडणवीस

  गृहमंत्री 17 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर, 24 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता मंत्रालयाला, पवारांना नीट माहिती दिली नव्हती, राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची गोष्ट वदवली : देवेंद्र फडणवीस

   

 • 23 Mar 2021 11:19 AM (IST)

  पवारांना योग्य माहिती देण्यात आलेली नाही, देवेंद्र फडणवीस लाईव्ह

  देवेंद्र फडणवीस –

  पवार साहेबांनी हा विषय राष्ट्रीय केलाय, त्यामुळे प्रथेला छेद देत आधी हिंदीतून आणि नंतर मराठीत पत्रकार परिषद घेतो

  गृहमंत्री नागपुरात होम क्वारंटाईन असल्याचा दावा, मात्र 15 तारखेला ते प्रायव्हेट जेटने मुंबईला आल्याचं तिकीट,

  पोलिस विभागांच्या मूव्हमेंटचीही कागदपत्रं

  पवारांना योग्य माहिती देण्यात आलेली नाही

  अनिल देशमुख अनेकांना भेटल्याचं स्पष्ट

  17 फेब्रुवारीला देशमुख सह्याद्री अतिथी गृहात

  शरद पवारांकडून अनिल देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न उघड

 • 23 Mar 2021 10:17 AM (IST)

  दमन येथे छापा टाकून वोल्हवो कंपणीची महागडी गाडी एटीएसकडून जप्त

  ठाणे ATS ची कारवाई, दमन येथे टाकला होता छापा,  वोल्हवो कंपणीची महागडी गाडी केली जप्त, सचिन वाझेच्या पार्टनटरची गाडी असल्याचे बोलले जात आहे,  गाडीचा नेमका वापर काय करण्यात आलाय याचा तपासATS करतेये,  मात्र तपसात व्होल्वो गाडीचा सारखा उल्लेख आल्याने ATS ने केली कारवाई

 • 23 Mar 2021 10:16 AM (IST)

  सातारा शहरात दुकान व्यावसायिकाची गळफास घेत आत्महत्या

  सातारा शहरात दुकान व्यावसायिकाची गळफास घेत आत्महत्या

  स्वत:हाच्या दुकानातच गळफास घेऊन केली आत्महत्या

  रोहित बोधे असे युवकाचे नाव

  मल्हार पेठेत रोहित बोधे यांनी इलेक्ट्राॅनिकचे सुरु केले होते दुकान

  आत्महत्येचे कारण अस्पष्ट

  सातारा शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद

 • 23 Mar 2021 10:16 AM (IST)

  पुण्यातील पाषाण परिसरात अज्ञात गुन्हेगारांकडून गाड्यांची तोडफोड

  पुण्यातील पाषाण परिसरात अज्ञात गुन्हेगारांकडून गाड्यांची तोडफोड

  पाषाण परिसरात दोन कारची नुकसान करण्यात

  घराच्या समोर रात्री पार्किंग केलेल्या चार चाकी दोन वाहनांची तोडफोड करून नुकसान

  संध्या नगर येथे भरवस्तीत रात्री काही गुन्हेगार प्रवृत्तीचे अज्ञात गुन्हेगारांनी येऊन फक्त दोनच गाड्या टार्गेट

  अशा घटना यामुळे संध्या नगर येथे येथील स्थानिक नागरिकांन मध्ये घबराटीचे वातावरण

  गाड्या फोडणारा सीसीटीव्ही मध्ये कैद

 • 23 Mar 2021 09:11 AM (IST)

  नंदूरबार कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ, अर्थचक्र बिघडत असल्याची परिस्थिती

  नंदूरबार :- कोरोनामूळ वर्षभरापासून ठप्प झालेले अर्थचक्र पुन्हा मार्गावर येत असतानाच पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अर्थचक्र बिघडत असल्याची परिस्थिती सध्या दिसून येत आहे.

  त्यामुळं यंदा सारंगखेडा यात्रा होणार की नाही हा मोठा प्रश्न समोर आला आहे

  यात्रा आणि अर्थचक्र यांचा फार जवळचा संबंध आहे

  मात्र गेल्या वर्षी कोरोनामुळे यात्रा उत्सव व चेतक फेस्टिवल रद्द करावा लागला होता

  त्यामुळं अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावा लागला होता

 • 23 Mar 2021 08:14 AM (IST)

  कोल्हापुरात इमारतीवरुन उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न, त्यानंतर घरात जाऊन गळफास

  कोल्हापूर :

  इमारतीवरुन उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न फसला, पण घरात जाऊन घेतला गळफास

  कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे येथील धक्कादायक प्रकार

  स्थानिक तरुणांनी संबधित तरुणाला वाचवलं होतं, पण घरी गेल्यावर केली आत्महत्या

  आत्महत्या केलेला तरुण दारूच्या नशेत असल्याची माहिती

 • 23 Mar 2021 08:14 AM (IST)

  नाशिक शहरात 1200 रुपयात मिळणार रेमडीसिव्हर

  नाशिक – शहरातील 14 ठिकाणी 1200 रुपयात मिळणार रेमडीसिव्हर

  एफडीए च्या पुढाकाराने रुग्णांना मोठा दिलासा।

  आठवड्या भरात 9000 रुग्णांनी घेतला लाभ

  तर शहरातील 14 मनपा नियुक्त रुग्णालयांमध्ये देखील मिळणार रेमडिसिव्हर

  शासनाच्या निर्णयाने कोव्हिडं रुग्णाणची लूट थांबणार

 • 23 Mar 2021 08:10 AM (IST)

  नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांना कोव्हिड प्रतिबंधक लस देणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई

  सोलापूर–

  नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांना कोव्हिड प्रतिबंधक लस देणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई

  डॉक्टर फिरोज मुलाणी, परिचारिका योगिता जाधव, अनुराधा लोहार यांची सेवा समाप्त

  तर पालिका आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दूधभाते ,डाटा ऑपरेटर सुरज कारंडे यांच्या मानधनातुन 10 टक्के रक्कम कपातीचे आदेश

  केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 45 ते 59 वर्षापर्यंत आजारी व्यक्तीस तसेच साठ वर्षाच्या पुढील नागरिकांना लक्ष देणे आवश्यक

  मात्र नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांना नियम डावलून कोव्हीड प्रतिबंधक देण्यात होते आले

  पालिका आयुक्त पी शिवशंकर यांची कारवाई

 • 23 Mar 2021 08:08 AM (IST)

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रिया अर्जास 15 सप्टेंबरपर्यंत मुदत

  पुणे –

  – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रिया अर्जास 15 सप्टेंबरपर्यंत मुदत,

  – संरक्षणशास्त्र, व्यवस्थापन, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक सुरक्षा, सामाजिकशास्त्र या विभागातील पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन,

  – या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 15 सप्टेबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत,

  – याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाकडून प्रसिद्ध,

  – प्रवेश परीक्षेसाठी अर्ज आणि शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा आहे,

  – या अभ्यासक्रमांमध्ये दोन वर्षांच्या पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसोबतच पदविका अभ्यासक्रमांचा समावेश.

 • 23 Mar 2021 08:07 AM (IST)

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महाविद्यालयांना शॉक, विद्यापीठाने महाविद्यालयांच्या गुणवत्ता सुधार योजनेला थेट तब्बल ८ कोटींची लावली कात्री

  पुणे –

  – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महाविद्यालयांना शॉक,

  – विद्यापीठाने महाविद्यालयांच्या गुणवत्ता सुधार योजनेला थेट तब्बल ८ कोटींची लावली कात्री,

  – कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची आवश्‍यकता असताना विद्यापीठाने अशा पद्धतीने निधीत कपात केलीय,

  – त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये याचे पडसाद उमटलेत,

  – केवळ पाच कोटीने काय होणार? विद्यापीठाच्या निधीवर केवळ तेथील विभागांचाच अधिकार नाही अशी टीका,

  – अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी गुणवत्ता सुधार योजना सुरू केली.

  – त्यामध्ये महाविद्यालयांना व विद्यापीठाच्या विभागांना परिषदा, चर्चासत्र यासह महाविद्यालयासाठी आवश्‍यक वस्तू घेण्यासाठी मदत केली जात होती.

 • 23 Mar 2021 08:06 AM (IST)

  शहापुरात लहान मुलांच्या हॉस्पिटलला आग, सुदैवाने जिवीत हानी टळली

  शहापूर शहरातील SBI बँकेच्या बाजूला असलेल्या इमारतीला रात्री 4 वाजता अचानक आग लागल्याने आगीत इमारत जळाली असून इमारतीमध्ये असलेले लहान मुलांचे हॉस्पिटल पूर्णपणे जळून खाक झाले आहे, खासगी टँकरच्या साह्याने आग विझवण्यात आली असुन सुदैवाने जिवीत हानी टळली

 • 23 Mar 2021 08:05 AM (IST)

  नाशिक जिल्हा बँकेवर अखेर तीन सदस्यीय प्रशासक मंडळ

  नाशिक – जिल्हा बँकेवर अखेर तीन सदस्यीय प्रशासक मंडळ

  उच्च न्यायालयाने स्थगित उठवल्यानंतर बरखास्त झाले संचालक मंडळ

  डिसेंम्बर 2017 मध्ये आर्थिक अनियमितता असल्याने रिझर्व्ह बँकेने बरखास्त केले होते संचालक मंडळ

  न्यायालयात दोन वर्ष यावर दावे प्रतिदावे झाल्यानंतर बरखास्त झाले मंडळ

 • 23 Mar 2021 08:05 AM (IST)

  चाकण एमआयडीसीमधील कुरुळी गावजवळ दरोडा टाकून पळणारे पोलीसाच्या जाळ्यात

  पिंपरी-चिंचवड –

  – चाकण एमआयडीसी मधील कुरुळी गावजवळ दरोडा टाकून पळणारे पोलीसाच्या जाळ्यात

  – चाकण एमआयडीसी परिसरात ट्रक मध्ये झोपलेल्या चालकाच्या अंगावर चादर टाकून ट्रक मधून 19 लाख 99 हजार 405 रुपयांचा ऑटोमोबाईल पार्ट जबरदस्तीने काढून घेतले होते

  – ह्या गुन्ह्यातील आरोपी बिहार येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना चाकण म्हाळुगे पोलिसांनी त्यांना नाशिक रेल्वे स्थानकावरुण केली अटक

  – रणजितकुमार दास ,सुशील कामत,शैलेंद्रकुमार मडलं अशी अटक केलेल्या आरोपीची नावे

 • 23 Mar 2021 06:30 AM (IST)

  पालघर येथे विचित्र अपघातात, चौघांचा मृत्यू

  पालघर जिल्ह्यातील दादडे येथे विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून इतर 5 जणांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

 • 23 Mar 2021 06:29 AM (IST)

  काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित

  मालेगाव :-

  काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित

  25 तारखेला मुंबई येथील पार्टी कार्यलयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह करणार राष्ट्रवादी प्रवेश

  गेल्या महिन्यातच आसिफ शेख यांनी काँग्रेसला दिली होती सोडचिठ्ठी

  आसिफ शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मालेगावतील राज्यकीय परिस्थिती बदलणार

 • 23 Mar 2021 06:28 AM (IST)

  तेलंगणात मोठी दुर्घटना, कबड्डी सामन्यादरम्यान गॅलरी कोसळली, 100 हून अधिक जखमी

  तेलंगणात मोठी दुर्घटना, कबड्डी सामन्यादरम्यान भीषण गर्दीमुळे गॅलरी कोसळली, 100 हून अधिक जखमी

 • 23 Mar 2021 06:26 AM (IST)

  वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस

  वाशिम :

  वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी सकाळ पासून विजांच्या कडकडासह जोरदार पावसाला सुरवात….सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, आज पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली असून शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे