LIVE | नाशिकमध्ये शिवसेना नेत्या सत्यभामा गाडेकर यांचं निधन

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | नाशिकमध्ये शिवसेना नेत्या सत्यभामा गाडेकर यांचं निधन
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 09 May 2021 23:50 PM (IST)

  नाशिकमध्ये शिवसेना नेत्या सत्यभामा गाडेकर यांचं निधन

  नाशिक : शिवसेना नेत्या सत्यभामा गाडेकर यांचं निधन

  गाडेकर शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी संपर्क प्रमुख

  गेल्या काही दिवसांपासून कोरोना झाल्याने सुरू होते उपचार

  सत्यभामा गाडेकर यांच्या निधनाने उत्तर महाराष्ट्रातील महिला आघाडीला मोठा धक्का

 • 09 May 2021 21:30 PM (IST)

  पार्लेश्वर प्रतिष्ठानकडून आगळा वेगळा मदर्स डे साजरा

  – मातेला निरोगी आयुष्य लाभावे यासाठी मातृदिनाचे अवचित्य साधून पार्लेश्वर प्रतिष्ठानकडून ऑन ड्युटी काम करणाऱ्या महिला पोलिसांना वृक्षाची अनमोल भेट देण्यात आली

  – सध्याच्या ह्या महामारीत दिवसभर घराबाहेर राहून आपला जीव धोक्यात घालून काम करत असलेल्या मातेला निरोगी आयुष्य लाभूदेत यासाठी निसर्गाकडे साकडं घालत त्या मातेच्या पदरी एक वृक्षाची अनमोल भेट तरूण तरुणांनी दिली

 • 09 May 2021 20:23 PM (IST)

  परमबीर सिंग आणि जवळच्या अधिकाऱ्यांपासून जिवाला धोका, पोलिसांनी सुरक्षा द्यावी, पोलीस निरीक्षक बी.आर. घाडगे यांची मागणी

  मुंबई : तक्रारदार पोलीस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी पेलीस प्रोटेक्शनची केली मागणी, परमबीर सिंग आणि जवळच्या अधिकाऱ्यांपासून जिवाला धोका असल्याने पोलिसांनी सुरक्षा द्यावी अशी केली मागणी
  – घाडगे यांनी डीसीपी पराग मणेरेंवरही केले अनेक गंभीर आरोप, सगळ्या अधिकाऱ्यांची बदली झाली पण परमवीर यांच्या मर्जीतले असल्याने मणेरे यांची बदली झाली नाही, असा आरोप
  – मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि पोलीस महासंचालक लाचलुचपत विभाग यांना लिहीलं १४ पानी पत्र
  – २८ एप्रिलच्या एफआयआरमध्ये डीसीपी पराग मणेरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप…
  – १७ मार्च, २०१५ ते ३१ जुलै, २०१८ दरम्यान परमबीर सिंग यांनी केलेल्या कुकर्माचा वाचला पाढा…
  – ठाणे आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदलीत १ कोटी ते ५० लाख रुपये घेण्यात येत होते असा आरोप…, परमबीर सिंग यांनी हद्दीतील उपायुक्तांकडून सोन्याची बिस्किटे, तर सहाय्यक आयुक्तांकडून ३० ते ४० तोळे सोने घेतल्याचा आरोप….
  – कल्याणच्या बाजार पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोज २५० ते ३०० डंपर वाळूमाफियांचे वाहतूक करीत होते. त्यात पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांची भागीदारी होती असा आरोप…
  – रोज कोट्यवधींची उलाढाल होत होती. रेती उत्खनन ते वाहतूक असा व्यवहार होता. त्यात जे अधिकारी डंपरवर कारवाई करतील त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत होते. असा खुलासा, अशाच एका गुन्ह्यात आपलेयाला अडकवल्याने तक्रारदार घोडगे यांनी १७ मार्च २०१६ रोजी लेखी तक्रार दाखल केली होती.
  – तर परमबीर सिंग याचा मुलगा रोहन याने सिंगापूरमध्ये २००० कोटीची गुंतवणूक केली ती संपत्ती आली कुठून? असाही विचारला जबाब…
  – या बेहिशोबही मालमत्तेची चौकशी लाचलुचपत खात्यामाध्यमातून करावी अशी मागणी घाडगेंनी केल्याने परमबीर सिंग सोबत उपायुक्त पराग मणेरे यांचंही माव समोर आलंय, त्यामुळे त्यांची एसीबीकडून चौकशी करा आणि न्याय द्या अशी घाडगेंची मागणी

 • 09 May 2021 20:20 PM (IST)

  सोलापूर शहरात मुसळधार पाऊसाला सुरुवात, सिव्हील हॉस्पिटलमध्ये जुने झाड पडले, रुग्णांच्या नातेवाईकांची पळापळ

  सोलापूर शहरात मुसळधार पाऊसाला सुरुवात, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, सिव्हील होस्पिटलमध्ये पडले जुने झाड, होस्पिटल परिसरात साठले पाणी, रुग्णांच्या नातेवाईकांची पळापळ

 • 09 May 2021 19:01 PM (IST)

  जळगावात रुग्णवाहिका जळून खाक, जीवीतहानी टळली

  जळगाव – पाचोरा रुग्णालयाच्या मालकीची रुग्णवाहिका जळून खाक

  रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने मोठी दुर्घटना टळली

  नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या आटोक्यात आणली आग

 • 09 May 2021 18:11 PM (IST)

  दिव्यात भारतीय मराठा संघाकडून मुंडन, मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे आंदोलन            

  ठाणे :  मराठा समाजाची बाजू मांडण्यात राज्य आणि केंद्र सरकार असमर्थ ठरल्याचा आरोप होत आहे. याच कारणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून भारतीय मराठा संघ रस्त्यावर उतरला आहे. दिव्यातील भारतीय मराठा संघाच्या वतीने दिव्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सामूहिक मुंडन केले

 • 09 May 2021 17:15 PM (IST)

  राजकीय अपरिपक्वतेतून लिखाण करणे थांबवा, संजय काकडेंचा राऊतांना टोला

  पुणे : अर्धवट व राजकीय अपरिपक्वतेतून लिखाण करणे थांबवा

  शिवसेना खासदार संजय राऊतांना भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडेंचा टोला

  “संजय राऊत यांनी आज ‘मोदी-शहा का हरले’ हा लेख लिहून स्वत:च्याच राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडवलं”

  “संजय राऊत हे ज्येष्ठ पत्रकार त्यांनी अभ्यासपूर्ण लिखाण करावे ही अपेक्षा”

  मात्र, डोळ्यावर पट्टी बांधून लिखाण केल्यामुळे संजय राऊत यांना भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमधील निवडणुकीत मिळवलेले यश दिसले नाही, असा टोला संजय काकडे यांनी लगावला.

 • 09 May 2021 16:40 PM (IST)

  नगरसेविकेच्या पतीचे आत्महत्ये प्रकरण, चौघांविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा

  पुणे : काँग्रेसच्या माजी नगरसेविका निता राजपुत यांच्या पतीच्या आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, त्यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांच्यासह कुटुंबियांवर गुन्हा दाखल

  संशयित आरोपींनी पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन मानसिक त्रास दिल्यामुळे राजपुत यांनी 28 ऑक्‍टोबर रोजी त्यांच्या कार्यालयामध्ये केली होती आत्महत्या, असा आरोप केला जातोय.

 • 09 May 2021 16:12 PM (IST)

  वाशिममध्ये मालेगाव शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

  वाशिम : मालेगाव शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू

  जिल्ह्यात चौथ्या दिवशी पूर्वमोसमी पावसाची हजेरी

  या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

  मात्र जिल्ह्यातील उन्हाळी पिकांच नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

 • 09 May 2021 13:33 PM (IST)

  नालासोपाऱ्यात तुळींज रोड टँकरची धडक, एकाचा मृत्यू

  नालासोपारा:-नालासोपारा पूर्वेकडील तुळींज रोड येथे एका टँकरने धडक दिल्याने एका इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे.

  घटनेनंतर टँकर चालक फरार झाला आहे.आज सकाळी 8 ते 8:30 सुमारास ही घटना घडली आहे…

  तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अद्यापही इसमाची ओळख पटली नसून तुळींज पोलिस आदीकचा तपास करत आहेत…

 • 09 May 2021 13:07 PM (IST)

  केंद्र सरकारकडून राज्याच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थासाठीचा निधी सुपूर्द, महाराष्ट्राला 861 कोटींचा निधी

  केंद्र सरकारकडून राज्याच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थासाठीचा निधी पहिला हप्ता दिला गेला
  एकूण 8 हजार 923 कोटीचा निधी देण्यात आला
  महाराष्ट्राला 861 कोटीचा निधी देण्यात आला
  महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाला यामुळे चालना मिळणार
  सार्वधिक निधी उत्तराखंड राज्याला मिळाला 1441 कोटीचा दिला गेला

 • 09 May 2021 13:06 PM (IST)

  नाशिकमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी मद्याचे गोडाऊन फोडले, 27 लाखांचा मद्यसाठा चोरीला

  नाशिक

  – नाशिकच्या शिंदे पळसे परिसरात मध्यरात्री चोरट्यांनी मद्याचे गोडाऊन फोडले
  – 27 लाखांचा मद्यसाठा चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती
  – चोरट्यांचा कारणामा CCTV मध्ये कैद…

 • 09 May 2021 12:30 PM (IST)

  सिंधुदुर्गात मोर्ले गावात टस्कर हत्तीची पुन्हा दहशत, वनविभागाचं माञ दुर्लक्ष

  सिंधुदुर्ग:-

  दोडामार्ग मोर्ले गावात टस्कर हत्तीची पुन्हा दहशत.

  चार हत्तीचा कळप गावात भरवस्तीत येऊन फणसाची करतायत नासधूस.

  जिव धोक्यात घालून हत्तीना हूसकावण्यासाठी येथील यूवकांचा राञीचा पहारा.

  वनविभागाचं माञ दुर्लक्ष.

 • 09 May 2021 11:55 AM (IST)

  पुण्यातील सांगवडे गावातील मादी बिबट्या अखेर जेरबंद

  मावळ,पुणे

  -सांगवडे गावातील मादी बिबट्या अखेर जेरबंद,

  -त्वरित ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा लावल्याने मादी बिबट्या जेरबंद झाला अजून दोन बिबट्यांची पिल्ले परिसरात असल्याने सांगवडे गावं मध्ये दहशत कायम

  -7 तारखेच्या मध्यरात्री शेतकऱ्याच्या घरातून कुत्रा घेऊन जाताना बिबट्या दिसला होता

  -सांगवडे गावच्या ग्रामस्थांकडून अजून दोन पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे

 • 09 May 2021 11:54 AM (IST)

  अहमदनगरमध्ये दरोडेखोरांच्या टोळीला कर्जत पोलिसांनी केले जेरबंद, आरोपींकडून 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

  अहमदनगर

  दरोडेखोरांच्या टोळीला कर्जत पोलिसांनी केले जेरबंद…

  एकूण 5 आरोपींना अटक केली असून आरोपींमध्ये अल्पवयीन मुलाचा समावेश…

  आरोपींकडून 15 लाख रुपायांचे 30 तोळे सोनं, चाकू, लोखंडी कटावणी, रोख रक्कम, मोबाईल आणि कार असा 20 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त…

 • 09 May 2021 10:15 AM (IST)

  हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस, बळीराजा हवालदिल

  हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाला सुरुवात

  विजेच्या कडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात

  टरबूज, खरबूज ,कांदा, उन्हाळी ज्वारी शिजवून टाकलेल्या हळदीच प्रचंड नुकसान

  पुन्हा एकदा बळीराजा हवालदिल..

 • 09 May 2021 09:53 AM (IST)

  सोलापूर हतूरच्या माजी सरपंचाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

  सोलापूर : हतूरच्या माजी सरपंचाने स्वतःवर गोळी घालून केली आत्महत्या;

  इब्राहिम दस्तगीर नदाफ असे आहे आत्महत्या केलेल्या माजी सरपंचाचे नाव

 • 09 May 2021 09:00 AM (IST)

  पुण्यात अवैधरित्या हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा,दोन आरोपीना अटक

  खेड,पुणे

  -अवैधरित्या हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर खेड-राजगुरूनगर पोलिसांचा छापा,दोन आरोपीना अटक

  -चांदूस गावामध्ये सुरु होती हि हातभट्टी,या छाप्यामध्ये राजगुरूनगर पोलिसांकडून लाखो रुपये किंमतीचे रसायन व साधनसामुग्री केली नष्ट

  -या प्रकरणी सुरेश राठोड आणि राजू राठोड या दोघांना खेड-राजगुरूनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे

 • 09 May 2021 08:56 AM (IST)

  सांगलीत हापूस म्हणून कर्नाटकी आंब्याची विक्री, कृषी बाजार समितीकडून कारवाई

  सांगली

  हापूस म्हणून कर्नाटकी आंब्याची विक्री

  फळ मार्केट मधील वैपारी ला भरारी पथकाने पकडले

  तोंडी समज देत केला 1हजार रुपये चा दंड

  सांगली कृषी बाजार समितीने केली कारवाई

 • 09 May 2021 07:36 AM (IST)

  प. बंगालमधील रक्तरंजित राज्यक्रांती! मोदी-शहा का हरले? शिवसेनेचा सवाल

  प. बंगालमधील रक्तरंजित राज्यक्रांती! मोदी-शहा का हरले? सामना रोखठोकमधून सवाल

  पं. बंगालात ममता बँनर्जी यांचा एकतर्फी विजय झाला. निवडणुक आयोग, लाखोंच्या संख्येने उतरवलेले केंद्रीय सुरक्षा दल, सीबीआयसारख्या संस्थांचा वारेमाफ वापरही भाजपाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मोदी-शहा यांनी धार्मिक मतविभागणीसाठी ‘जय श्रीराम’ला प्रचारात उतरविले. 25 वर्षांच्या देवांशू भट्टाचार्यने त्यावर ‘खेला होबे’चा उतारा दिला व पारडे फिरले. मोदी-शहा म्हणजे जय हे समीकरण ‘खेला होबे’ने तोडले, असे शिवसेनेनं म्हटलं आहे.

 • 09 May 2021 06:53 AM (IST)

  परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता, तक्रारदारांना जबाबासाठी समन्स पाठवण्यात येण्याची शक्यता

  परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता..

  एसीबीकडून म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तीन प्रकरणाची गोपनीय चौकशी (डिस्क्रीट इन्कवायरी) सुरू असल्याची सूत्रांची माहिती

  पोलीस निरीक्षक बी आर घाडगे, पोलीस निरीक्षक अनुप डांगे आणि बुकीं सोनू जालान यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर ही चौकशी सुरू असल्याची माहिती…

  ही प्राथमिक स्वरूपाची चौकशी असते जी तीन महिन्यांच्या कालावधीत पार पडते त्यानंतर जे पुरावे प्राथमिक चौकशीत मिळतात त्यानुसार खुली चौकशी किंवा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ठरते.

  सध्या तरी या तीनही प्रकरणामध्ये गोपनीय चौकशीला सुरुवात झाली असून लवकरच संबंधित तक्रारदारांना जबाबासाठी समन्स पाठवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती…

  पोलीस निरीक्षक बी आर घाडगे यांनी परमबीर यांच्यावर करोडो रुपयांचे भ्रष्ट्राचार केल्याचे आरोप केलेत शिवाय अनुप डांगे यांनीही सिंग यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केलेत..

  सोनू जालान याने परमबीर यांनी त्याच्याकडून बेकायदेशीर पैसे उकळल्याचा आरोप केलाय..

  या तिघांच्याही तक्रारी पोलीस महासंचालक कार्यालयाला मिळल्यांनातर त्या एसीबीला पाठवण्यात आल्या होत्या आणि प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले होते अस सूत्रांनी सांगितलंय…

 • 09 May 2021 06:51 AM (IST)

  कल्याण ग्रामीणमधील गावात पाणी प्रश्न सुटल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण

  कल्याण ग्रामीण परिसरात अमृत योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरळीत
   नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
  अनेक वर्षापासून गावात पाणी प्रश्न उद्भवत होता.
  माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांनी अखेर पाण्याचा प्रश्न सुटला