Maharashtra News LIVE Update | भिवंडी शहरात पुन्हा अग्नितांडव, प्लास्टिकचे मणी बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | भिवंडी शहरात पुन्हा अग्नितांडव, प्लास्टिकचे मणी बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 29 May 2021 23:16 PM (IST)

  भिवंडी शहरात पुन्हा अग्नितांडव, प्लास्टिकचे मणी बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग

  भिवंडी :
  भिवंडी शहरात पुन्हा अग्नितांडव
  शहरातील नारायण कंपाऊंड परिसरातील प्लास्टिकचे मणी बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग .आगीचे कारण अस्पष्ट.
  आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल
  दाटीवाटीच्या परिसरात आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

 • 29 May 2021 22:11 PM (IST)

  अहमदनगर शहरात जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे उकड्यापासून नागरिकांना दिलासा

  अहमदनगर :

  अहमदनगर शहरात जोरदार पावसाची हजेरी

  सकाळ पासून होते ढगाळ वातावरण

  पावसामुळे उकड्यापासून नागरिकांना दिलासा

 • 29 May 2021 21:47 PM (IST)

  सोसायटीचे गेट उशिरा का उघडले? बुलेटच्या चैनने केली वॉचमनला मारहाण

  कल्याण : सोसायटीचे गेट उघडण्यास उशीर का केला. या कारणावरुन एका तरुणाने वॉचमनला बुलेटच्या चैनने बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी स्टॅली जॉर्ज नावाच्या या तरुणावर कारवाई केली आहे.

 • 29 May 2021 20:02 PM (IST)

  संगमनेर तालुक्यातील पठार भागात वीज अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू, चार शेळ्यांचा सुद्धा मृत्यू

  संगमनेर तालुक्यातील पठार भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस
  वीज अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू
  महिलेसह चार शेळ्यांचा सुद्धा झाला मृत्यू
  संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथील घटना
  शेळ्या चरण्यासाठी गेलेले असताना घडली घटना
  काही वेळापूर्वीची घटना
  अनिता वनवे अस मयत महिलेच नाव

 • 29 May 2021 18:34 PM (IST)

  पुण्यात शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, सणसवाडी, पिंपळे जगताप परिसराला पावसाने झोडपलं

  पुणे-शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, सणसवाडी, पिंपळे जगताप परिसराला पावसाने झोडपलं

  विजांच्या कडकडाटासह वादळी वारा

  पावसामुळे अहमदनगर रोड आणि चाकण शिक्रापूर रोडवरील वाहतूक संथ गतीने चालू होती

  वाहनचालकांना कसरत करून गाडी चालवावी लागत होती

 • 29 May 2021 18:26 PM (IST)

  पिंपरी चिंचवडमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

  पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये आज सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने लावली हजेरी

  -काही भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली

  -तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या

  -गेल्या काही दिवसापासून पाऊस थांबला होता मात्र आज सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली

 • 29 May 2021 18:24 PM (IST)

  परभणीच्या पुर्णा तालुक्यातील सुपुत्र जिजाभाऊ किशनराव मोहीते यांना विरमरण

  परभणी : परभणीच्या पुर्णा तालुक्यातील महागाव येथील सुपुत्र जिजाभाऊ किशनराव मोहीते यांना विरमरण

  पंजाबमधील पठानकोट येथे हवाई दलात होते कार्यरत

  काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने पठाणकोट येथील रुग्णालयात सुरू होते उपचार

  उपचारादरम्यान जिजाभाऊ मोहिते यांना वीरमरण

  पूर्णा तालुक्यातील महागाव येथे त्यांच्या मूळ गावी होणार आज अत्यंसंस्कार

 • 29 May 2021 17:53 PM (IST)

  बुलडाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस

  बुलडाणा : जिल्ह्यात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस

  जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार हवा

 • 29 May 2021 17:52 PM (IST)

  पंतप्रधांनानी छत्रपती संभाजीराजेंना वेळ न देणं हा महाराष्ट्राचा अपमान : अशोक चव्हाण

  अशोक चव्हाण टिकटँक

  मराठा आरक्षणावर भाजपनं पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घालून पुढे जावे

  मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे आवाहन

  राजे यांनी चुकीची भूमिका घेतलेली नाही

  समाजाला न्याय मिळावा ही त्यांची भूमिका आहे

  पंतप्रधांनानी त्यांना वेळ न देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे

  केंद्र सरकारनं याबाबत संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं

  भाजपनं याला राजकीय रंग देऊ नये

 • 29 May 2021 17:48 PM (IST)

  जळगावमध्ये गुलाबराव पाटलांचा ताफा महिलांनी अडवला

  जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे गावातील महिलांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफा अडवला

  गावात पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ महिला संतप्त

  महिलांनी थेट गुलाबराव पाटील यांचा ताफा अडवल्याने खळबळ

  नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील हे मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील दौऱ्यावर आहेत

  यावेळी पाटील यांचा ताफा अडवण्यात आला.

 • 29 May 2021 17:17 PM (IST)

  नमाड शहर परिसरात दुसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

  मनमाड : मनमाड शहर परिसरात दुसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

  वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू

  उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा मिळाला दिलासा

 • 29 May 2021 17:16 PM (IST)

  मान्सूनपूर्व पावसाने येवला शहर, तालुक्यातील गावांना झोडपले

  नाशिक – मान्सूनपूर्व पावसाने येवला शहर व तालुक्यातील गावांना चांगले झोडपले

  – अचानक दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, एक तासाच्या जवळपास पावसाची हजेरी

  – उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा

 • 29 May 2021 17:15 PM (IST)

  मुसळधार पावसामुळे मालेगावात हॉटेलच्या इमारतीचा पुढचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती

  मालेगाव : मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे एकता हॉटेलच्या इमारतीचा पुढचा भाग कोसळला

  मुंबई-आग्रा महामार्गला लागून चाळीसगाव फाट्यावरील घटना

  ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

  घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल

 • 29 May 2021 17:13 PM (IST)

  पुण्यात पावसाला सुरुवात, शिवाजीनगर, डेक्कन भागात पावसाच्या जोरदार सरी 

  पुणे : पुण्यात पावसाला सुरुवात

  शिवाजीनगर, डेक्कन भागात पावसाच्या जोरदार सरी

  दोन दिवस पावसाचा हवामान विभागानं दिला होता इशारा

  शहरात पावसामुळं गारवा

 • 29 May 2021 17:13 PM (IST)

  बऱ्याच दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांची भेट घ्यायची होती : संभाजी छत्रपती

  मुंबई : खासदार संभाजी छत्रपती यांनी वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना मला बऱ्याच दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांची भेट घ्यायची होती, असे ते म्हणाले. तसेच भेट घेण्याचं एकच कारण ती म्हणजे जातीय विषमता कमी करता येईल आहे. बहूजन समाज एकाच छताखाली राहील त्यामुळेही मी आंबेडकरांना भेटलो. मराठा आरक्षण हा एक भेटीचा भाग होईल. जातीय विषमता कमी करता येईल. आरक्षण शाहू महाराजांनी सुरुवातीला दिलं. बाबासाहेब आंबेडकरांचीही मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी इच्छा होती. शाहू महाराजांचा आणि आंबेडकरांचा मला वारसा आहे. मला आंबेडकरांना भेटायची इच्छा होती. त्यामुळे मी भेट घेतली. शाहू महाराज आणि आंबेडकर एकत्र होते, असे संभाजी छत्रपती म्हणाले.

 • 29 May 2021 17:06 PM (IST)

  महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला, संभाजीराजेंनी पुढाकार घेतल्यावर ताजेपणा येऊ शकतो

  मराठा आरक्षणाविषयी प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना संभाजीराजेंनी जो विषय घेतला आहे, त्याला राजकीय पक्षांमध्ये रस नव्हता. आरक्षणाच्या मुद्यावरुन बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता. काँग्रेस वर्किंग कमिटीने मान्य केल्यानंतर बाबासाहेबांनी राजीनामा मागे घेतला होता.  आरक्षण हे समाजाला व्यवस्थेशी जोडणारा एक भाग आहे.आता प्रशासनाशीही जोडण्याचं प्रिन्सिपल आहे. मात्र ते मान्य करायला तयार नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

  तसेच पहिली घटना दुरुस्ती झाली ती आरक्षणाच्या मुद्द्यावरुनच झाली. ही घटनादुरुस्ती बाबासाहेबांनी केली त्यावेळचं भाषण महत्त्वाचं होतं. येणाऱ्या सरकारला आरक्षणाचा मुद्दा हा त्रासदायक ठरणार आहे.

  मराठा आरक्षणासाठी रिवह्यू पिटीशन नाही, तर राष्ट्रपती किंवा राज्यपालांमार्फत करता येईल. म्हणूनच राज्यसत्तेची गरज आहे. राज्यसत्ता असेल तर आपण राज्यपालांमार्फत रिव्ह्यू मागू शकतो आणि कोर्टाच्या अडचणीवर मात करु शकतो. हा एक मार्ग मला दिसतोय, असे  प्रकाश आंबेडकर म्हणाले.

  आताच्या परिस्थितीत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय त्यामध्ये दोन मार्ग आहे. 1 रिव्ह्यू पिटीशन आणि ती फेटाळल्यावर क्युरेटिव्ह हे दोन मार्ग आहेत. तेव्हा राज्य सत्तेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.

  महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. तो ताजेपणा आणायचा असेल, तर संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर तो येऊ शकतो.

 • 29 May 2021 14:40 PM (IST)

  कोरोनाचा आजार अंगावर काढू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे महत्त्वाचे मुद्दे

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता

  आपल्या कुटुंबाची काळजी घ्या

  पावसाळ्यात सर्वाधिक काळजी घेणं गरजेचे

  औषधांचा अनाठायी वापर टाळायला हवा

  कोरोनाचा आजार अंगावर काढू नका

   

 • 29 May 2021 14:39 PM (IST)

  केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन

  केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन

  केंद्राच्या सात वर्षाच्या कारभाराविरोधात करणार कांग्रेस आंदोलन

  काँग्रेसचे बडे नेते राज्यभरात पत्रकार परिषदा घेणार

  नाशिकमध्ये बाळासाहेब थोरात, पुणे-पृथ्वीराज चव्हाण, लातूर-अमित देशमुख असे नेते पत्रकार परिषद‌ घेणार

 • 29 May 2021 13:49 PM (IST)

  बहुजनांचे नेतृत्व करताना संभाजीराजेंना ओबीसाचा विसर का पडतो? प्रकाश शेंडगेंचा सवाल

  ओबीसी नेता प्रकाश शेंडगे यांची संभाजी महाराजांवर घणाघाती टिका…

  – महाराज स्वताला बहूजनांचा नेता म्हणतात मग बहूजनांचं नेतृत्व करताना महाराजांना ओबीसीचा विसर कसा पडतो… महाराज केवळ मराठ्यांची मागणी करता.. धनगर आरक्षणावर कधी बोलणार महाराज ? असा सवाल…
  – महाराजांनी अभ्यास करून विषय मांडले… मराठ्यांना ओबीसीत घ्यावं की नाही याबाबतचं त्यांचं वक्तव्य हे संशयास्पद आहे…
  – राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांनी आधीच निर्णय घेतलाय की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही.. मग समाजात संभ्रम निर्माण का केला जातोय…ही भुमिका महाराजांनी बदलली पाहीजे…
  – मराठा समाज जो पर्यंत मागासवर्गिय होत नाही तोपर्यंत तो ओबीसीत येऊ शकत नाही… ऊपवर्गीकरण शक्य नाही…
  – महाराजांनी सारथीसाठी १ हजार कोटींची मागणी केली, पण महाज्योतीसाठी मागणी केली नाही… त्यांनाही २ हजार कोटी द्या, अशी आमची मागणी…नाहीतर संघर्ष अटळ…
  – बहूजनांचे नेते म्हणवत असाल तर पदोन्नत्तीच्या आरक्षणाबद्दल बोलावं…
  – हक्कभंग करण्याचा गोपीचंद पडळकर यांना अधिकार.. हे प्रकरण २००६ पासून आहे… ओबीसी समाजालाही पदोन्नतीत आरक्षण द्या, नाहीतर संघर्ष अटळ

 • 29 May 2021 12:49 PM (IST)

  सरकार जाणार हे चंद्रकांत पाटील जागे असताना बोलले की झोपेत असताना..? अजित पवारांचा टोला

  बारामती :
  सरकार जाणार हे चंद्रकांत पाटील जागे असताना बोलले की झोपेत असताना..? अजित पवार यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला..
  – ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आलं, तेव्हापासून भाजप नेत्यांना असह्य झालंय..
  – त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत असतं..
  – कार्यकर्त्यांनी सोबत रहावं यासाठी काही ना काही बोलत राहतात..
  – जोपर्यंत तीन्ही पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सरकार राहणार..

 • 29 May 2021 12:05 PM (IST)

  परिवहन मंत्री अनिल परब अडचणीत, आरटीओच्या निलंबित अधिकाऱ्याची पोलिसात तक्रार

  नाशिक – परिवहन मंत्री अनिल परब अडचणीत

  आरटीओच्या निलंबित अधिकाऱ्याची पोलिसात तक्रार

  परिवहन चे मोटर वाहन निरीक्षक असलेले गजेंद्र पाटील यांची पंचवटी पोलिसात तक्रार

  पदोन्नती मध्ये गैरव्यहार केल्याचा आरोप

  प्रकरणाचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे पोलीस आयुक्तांचे क्राईम ब्रांचला आदेश

  गजेंद्र पाटील यांना चौकशीला बोलावण्याची शक्यता

 • 29 May 2021 11:57 AM (IST)

  मनपाच्या बेलापूर येथील वॉर्ड ऑफिसला लागली आग

  नवी मुंबई

  मनपाच्या बेलापूर येथील वॉर्ड ऑफिसला लागली आग

  सकाळी 5 वाजेची घटना

  शॉर्ट सर्किट ने आग लागल्याची शक्यता

  आगीत स्टोअर रूम जळून खाक

  अनेक महत्वाच्या फाईल्स , कागदपत्रे आगीच्या भक्ष्य स्थानी पडल्याची भीती

  महत्वाची कागपत्रे जळाल्याने संशयाचा धूर

  सकाळी अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग विझली

 • 29 May 2021 11:57 AM (IST)

  परिवहन मंत्री अनिल परब अडचणीत, आरटीओच्या निलंबित अधिकाऱ्याची पोलिसात तक्रार

  नाशिक – परिवहन मंत्री अनिल परब अडचणीत

  आरटीओ च्या निलंबित अधिकाऱ्याची पोलिसात तक्रार

  परिवहन चे मोटर वाहन निरीक्षक असलेले गजेंद्र पाटील यांची पंचवटी पोलिसात तक्रार

  पदोन्नती मध्ये गैरव्यहार केल्याचा आरोप

  प्रकरणाचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे पोलीस आयुक्तांचे क्राईम ब्रांचला आदेश

  गजेंद्र पाटील यांना चौकशीला बोलावण्याची शक्यता

 • 29 May 2021 10:44 AM (IST)

  मालेगावात अज्ञात वाहनाची कोंबड्या घेऊन गाडीला धडक, एकाचा जागीच मृत्यू

  मालेगाव :- कोंबड्या घेऊन जाणाऱ्या गाडीला अज्ञात वाहनाने टक्कर मारल्याने गाडी रस्त्यावर जाणाऱ्या दुचाकीवरून जाणाऱ्यावर पडल्याने भीषण अपघात

  अपघातात कोंबड्या च्या गाडी मधील एक आणि दुचाकीवर असलेल्या एका चा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

  मुंबई- आग्रा महामार्ग क्र 3 वरची घटना

  रात्री 3 वाज्याच्या दरम्यान ची घटना

  दुचाकी स्वार मालेगावतील रहिवासी तर गाडी मधील मृत्य व्यक्ती राजस्थान मधील रहिवासी

 • 29 May 2021 10:42 AM (IST)

  पिंपरी चिंचवडमध्ये नाकाबंदी सुरु असताना दुचाकीस्वाराची दादागिरी, पोलीस अधिकारी जखमी

  पिंपरी चिंचवड

  -पिंपरी चिंचवड मधील वाकड परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असताना दुचाकीस्वराने फरफटत नेल्याची घटना समोर

  – या घटनेमध्ये हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस शंकर इंगळे हे जखमी

  -या प्रकरणी आरोपी संजय शेडगे यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक

 • 29 May 2021 09:27 AM (IST)

  वर्ध्यात चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळला, चालक गंभीर जखमी

  वर्धा

  – चालकाचा नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळला

  चालक गंभीर जखमी, जीवहानी नाही

  -राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव (श्यामजीपंत) जवळील सत्याग्रही घाटातील घटना

  – चालकाला झोपेची डुलकी आल्याने ट्रकवरील संतुलन सुटल्याने अपघात

  – मोसीद रियाज गफ्फार (२४) अस चालकाच नाव

 • 29 May 2021 07:59 AM (IST)

  सोलापुरात दारू अड्ड्यावर छापा टाकण्यास गेलेल्या पोलिसावर जमावाचा हल्ला

  सोलापूर-  दारू अड्ड्यावर छापा टाकण्यास गेलेल्या पोलिसावर जमावाचा हल्ला

  50 ते 60 पुरुष व महिलांनी पोलिसावर केला प्राणघातक हल्ला

  पुणे रस्त्यावरील हॉटेल ऐश्वर्या च्या पाठीमागे असलेल्या पारधी वस्तीवर हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेले होते पोलीस

  पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

  माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील घटना

  पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके, हेडकॉन्स्टेबल दीपक मेहरेकर यांच्यावर हल्ला

  जखमीवर अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु

 • 29 May 2021 07:58 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरात लग्न मंडपातंच नवरदेवाला अटक

  – नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरात लग्न मंडपातंच नवरदेवाला अटक

  – अल्पवयीन वधू पाच महिन्यांची गर्भवती

  – अल्पवयीन मुलीला गर्भवती करुन आरोपी करत होता लग्न

  – नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत रामगड येथील घटना

  – आरोपी शैलेश संतोष राऊतला पोलिसांनी केली अटक

  – बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठान यांच्या प्रयत्नाने थांबलं लग्न

 • 29 May 2021 07:41 AM (IST)

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या होणाऱ्या द्वीतीय सत्र परीक्षेच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्याची मागणी

  पुणे

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या होणाऱ्या द्वीतीय सत्र परीक्षेच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्याची मागणी,

  विद्यापीठ 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित घेणार आहे परीक्षा,

  मात्र अभ्यासक्रमच शिकवून पुर्ण झाला नाही, त्यामुळे 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा नको,

  70 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घ्या, बीएस्सी या शाखेचा अभ्यासक्रम शिकवून न झाल्यानं 30 टक्के अभ्यासक्रमात कपात करण्यात आलीये,

  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नीतीन कळमळकर, प्र.कुलगुरू एन एस उमराणी यांच्याकडे विद्यार्थ्यांनी ही मागणी केलीये,

  पुढच्या महिन्यात द्वीतीय सत्राची परीक्षा विद्यापीठ घेणार आहे…..

 • 29 May 2021 07:23 AM (IST)

  नागपुरात तरुणाची गुंडांनी केली दगडाने ठेचून हत्या

  नागपूर –

  पाचपावली, लष्करीबाग परिसरात तरुणाची गुंडांनी केली दगडाने ठेचून हत्या,

  20 वर्षीय कपिल शशिकांत बेन असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव,

  आरोपींसोबत झालेल्या वादातून हत्या,

  प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय,

  आरोपी फरार, परिसरात तणाव, पोलिसांचा शोध सुरू

 • 29 May 2021 06:43 AM (IST)

  58 दिवसांमध्ये पुणेकरांनी 585 कोटी 14 लाख रुपयांचा मिळकत कर जमा केला

  पुणे

  1 एप्रिल ते 28 मे या 58 दिवसांमध्ये 4 लाख 43 हजार 399 पुणेकरांनी 585 कोटी 14 लाख रुपयांचा मिळकत कर केला जमा

  मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कर जमा होण्यात दुपटीने वाढ

  ज्या मिळकतधारकांची सर्वसाधारण कराची रक्कम २५ हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना सर्वसाधारण करामध्ये १० टक्के तर ज्यांचा सर्वसाधारण कराची रक्कम २५ हजारांपेक्षा पेक्षा जास्त आहे, त्यांना ५ टक्के सवलत

  ही सवलत मिळण्याकरिता ३१ मेपूर्वी मिळकतकराची संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक

 • 29 May 2021 06:36 AM (IST)

  उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळल्याने सात जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत जाहीर

  उल्हासनगरात पाच मजली इमारतीचा स्लॅब पत्त्या सारखा कोसळली

  दुर्घनेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू तर एक जण जखमी

  शासनाकडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत

  महिन्याभरतील अश्याच प्रकारची तिसरी घटना

 • 29 May 2021 06:35 AM (IST)

  पत्नीच्या डोक्यात जड वस्तूने वार करत हत्या, बुलडाण्यातील घटना

  बुलडाणा

  नांदुरा तालुक्यातील नारायणपूर येथील घटना, पतीने केली पत्नीची हत्या, पती विष्णू खैरे यांनी केली पत्नीचि हत्या, पत्नीच्या डोक्यात जड वस्तूने केले वार, रात्रीची घटना

 • 29 May 2021 06:33 AM (IST)

  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 140 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा

  पुणे

  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 140 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा

  खेत्रपाल मैदानावर होतोय दीक्षांत सोहळा

  नाैदल प्रमुख अ‍ॅडमिरल करंबीरसिंग लांबा विद्यार्थ्यांची मानवंदना स्वीकारणार

  जवळपास 300 कॅडेसट्ची तुकडी सशस्त्र दलात समाविष्ट होणार

  कोरोनामुळे मोजक्याच मान्यवरांना या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यास परवानगी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI