Maharashtra News Live Update : उत्तर कोल्हापूरच्या जागेसाठी सतेज पाटलांची फिल्डिंग, भाजप नेत्यांना भेटणार

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

Maharashtra News Live Update : उत्तर कोल्हापूरच्या जागेसाठी सतेज पाटलांची फिल्डिंग, भाजप नेत्यांना भेटणार
सांकेतिक फोटो

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 24, 2022 | 10:57 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोमिक्रॉनचे (Omicron) संकटही आणखी गडद होताना दिसतेय. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलेले आहे. पाच राज्यांचा निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे देशपातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, माणिपूर या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना या महाराष्ट्रातील पक्षांनी गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठवरले आहे.तसेच सध्या कडाक्याची थंडी असताना वातावरणात बदल झाला आहे. मुंबई, सिधुदुर्गच्या काही भागात पावसाच्या सरी बरसत आहे. पावसामुळे वातावरणातील गारवा वाढला आहे. या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 24 Jan 2022 10:42 PM (IST)

  उत्तराखंड विधानसभा निवडणूक

  उत्तराखंडसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

  काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना रामनगरमधून उमेदवारी

 • 24 Jan 2022 08:28 PM (IST)

  नागपूर जिल्ह्यात पुन्हा अश्लील नृत्य

  नागपूर जिल्ह्यात पुन्हा अश्लील नृत्य

  लावणीच्या नावावर अश्लील नृत्य झाल्याचा व्हिडीओ व्हायरल,

  नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील भुगाव येथे लावणीच्या कार्यक्रमात अश्लील नृत्य,

  पोलिसांनी केले चार आयोजकांवर गुन्हे दाखल,

  मात्र व्हायरल व्हिडीओ याच लावणी कार्यक्रमातील आहे का, याबाबत पोलीसांना नाही खात्री,

  पोलिसांनी केलेल्या चौकशी वरून असा डान्स झाला नसल्याची माहिती,

  मात्र, गुन्हा दाखल करत पोलिसांचा पुढील तपास सुरू

 • 24 Jan 2022 08:05 PM (IST)

  जितेंद्र आव्हाड विरुद्ध महापालिका वाद चिघळण्याची शक्यता

  नाशिक - जितेंद्र आव्हाड यांचा पुन्हा महापालिका आयुक्तांवर निशाणा

  म्हाडातील प्रकल्पांची आकडेवारी लपवल्याचा आरोप

  एक एकर वरील नेमक्या किती सदनिका याचा कुठलाही हिशोब द्यायला महापालिका तयार नसल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

  महापालिका आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

  ट्विट करून जितेंद्र आव्हाड यांनी केला महापालिकेवर आरोप

  यापूर्वीदेखील सदनिकांच्या गैरव्यवहाराचा ठेवला होता महापालिकेवर ठपका

  जितेंद्र आव्हाड विरुद्ध महापालिका वाद चिघळण्याची शक्यता

 • 24 Jan 2022 06:24 PM (IST)

  मुंंबई काबीज करण्यासाठी भाजपचं बैठकसत्र

  ऊद्या संध्याकाळी भाजपच्या कोर टिमची मनपा निवडणुकांबाबत मुंबईत महत्वाची बैठक…

  - आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा आणि इतर नेते राहणार ऊपस्थित…

  - या बैठकीत नितेश राणे ऊपस्थित राहणार का ?, याकडे सगळ्याचं लक्ष… नितेश राणेही आहेत मनपासाठी भाजपने तयार केलेल्या कमिटीचे महत्वाचे सदस्य…

  - संतोष परब हल्ला प्रकरणानंतर नितेश राणेंचा जामिन फेटाळल्यानंतर नितेश राणे अद्याप समोर आले नाहीयेत… आज दुपारी त्यांची १ तास पोलिसांनी चौकशी केल्याची सुत्रांनी माहीती दिलीये…

 • 24 Jan 2022 05:51 PM (IST)

  अखेर तमाशा कलावंताच प्रश्न लागला मार्गी

  1 तारखेपासून राज्यात 50 टक्के क्षमतेनं तमाशाला परवानगी मिळण्याची शक्यता,

  शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेल्फेअर फंडातून 1 कोटी रुपयांची तमाशा कलावंतासाठी केली घोषणा,

  सकाळी तमाशा कलावंतांच्या शिष्टमंडळाने घेतली पवारांची भेट

  आमदार अतुल बेनकेंच्या नेतृत्वात भेटल शिष्टमंडळ !

  तमाशाला परवानगी देण्याचं आश्वासन ,

  अखेर तमाशाला परवानगी मिळाली...

 • 24 Jan 2022 04:33 PM (IST)

  अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 च्या मुलाखती पुढे ढकलल्या

  महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 अमरावती इथं होणाऱ्या मुलखातीचा कार्यक्रम ढकलला पुढे ..

  उद्या आयोजित करण्यात आल्या होत्या मुलाखती

  प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याची एमपीएससी आयोगाची माहिती

  उमेदवारांच्या मुलाखती आता 2 फेब्रुवारीला त्याच ठिकाणी होणार...

 • 24 Jan 2022 03:33 PM (IST)

  मुंबई

  ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात राजकीय घडामोडींना वेग

  ओबीसी संदर्भात मुख्यमंत्र्यांन बरोबर महत्त्वाची बैठक

  साडे तीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक सुरु होणार

  सुप्रीम कोर्टातली पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे

  याचबरोबर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठकीत आढावा

 • 24 Jan 2022 03:32 PM (IST)

  केंद्रीय मंत्री भरती पवार बाईट

  - राज्यात काँग्रेसची परिस्थिती अत्यंत खराब - काँग्रेस ला येत असलेल्या पराभवांमुळे या नैराश्यातून पटोले असे वक्तव्य करत आहेत - पराभवाच्या मानसिक धक्क्यातून सावरता सावरता त्यांना जळी स्थळी मोदी दिसायला लागले आहेत - वैयक्तिक टीका करणे ही आपल्या राज्याची आणि देशाची संस्कृती नाही - नाना पटोले याना प्रसिद्धीच्या हव्यासाचा नवीन छंद जडलेला दिसतोय - राज्यातील प्रश्नांना समोर न जाता पळ काढण्यासाठी पटोले यांच्याकडून मोदींवर टीका - नाना पटोले यांच्या बुद्धिमतेची दिवाळखोरी आली समोर - नाना पटोले यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही ? - आमच्या नेत्यांना वेगळा न्याय, नाना पटोले यांना एक न्याय - पटोले यांनी अस वक्तव्य करण्यासाठी परवाना काढळणाचे काय ?

 • 24 Jan 2022 03:32 PM (IST)

  देवळाली प्रवरा / अहमदनगर

  विज कार्यालयाला ठोकले टाळे... अधिकार्यांसह कर्मचारी आणि आंदोलकांनी स्वत:ला देखील घेतले कोंडून... देवळाली प्रवरा येथील कार्यालयाला ठोकले टाळे... स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक... स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन... शेतीचे रोहित्र बंद केल्याने शेतकरी हवालदिल... जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न झालाय निर्माण... थकीत विज बिल वसुलीसाठी शेतीची विज केली बंद... राहुरी तालुक्यातील अनेक गावात महावितरणची कारवाई... महावितरण विरोधात स्वाभिमानी आक्रमक... जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतःला कार्यालयात घेतले कोंडून... विज सुरू केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा...

 • 24 Jan 2022 03:31 PM (IST)

  अहमदनगर राळेगणसिद्धी

  जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच केंद्रीय मंत्री अमित शहाना पत्र

  सहकारी कारखान्यांन विरोधात अण्णांच शहा याना पत्र

  महाराष्ट्रातील अनेक पक्ष पार्ट्यांचे लोक आणि अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांनी आपल्या भाग भांडवल आणि जमिनी देऊन उभे केलेले सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने संगनमताने विकत घेतले

  अंदाजे 25 हजार कोटी रूपयांचा घोटाळा आणि सहकार क्षेत्र मोडीत काढून खाजगीकरण वाढीला लावले त्याची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी अण्णांची मागणी

 • 24 Jan 2022 03:29 PM (IST)

  संजय राऊत

  गोव्यातलं सरकार सर्वात भ्रष्टाचारी सरकार

  शिवसेनेचे आकडे मोजू नको, तुम्हाला भारी पडतील

  उद्धव ठाकरेंच्या भाषणाची दखल का घ्यावी लागली?

  शिवसेनेचा जन्म 1969 मध्ये झाला

  जनता पक्षाच्या पतनानंतर भाजपचा जन्म

  भाजप हा देशातील एक नंबरचा विरोधी पक्ष

  अयोध्येच्या लढ्यात शिवसेनेची ऐतिहासिक कामगिरी

  राम मंदिर मोदींमुळे नाही सुप्रीम कोर्टामुळे

  राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने निकाली लावला

  उद्धव ठाकरे अयोध्येला गेल्याने काम सुरु झालं

  फडणवीसांनी औरंगाबादचं संभाजीनगर का करुन दाखलवं नाही?

 • 24 Jan 2022 02:30 PM (IST)

  औरंगाबाद शहरातील खंडोबा मंदिरात बुवाबाजीचा प्रकार

  औरंगाबाद शहरातील खंडोबा मंदिरात बुवाबाजीचा प्रकार

  भोंदू बाबाकडून भर मंदिरात सुरू आहे बुवाबाजीचा प्रकार

  खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भविकांसोबत सुरू भोंदूगिरी

  लोकांच्या कानात फुक मारून डोके कुरवाळत सुरू आहे बुवाबाजी

  भूत पिशाच्च आणि दुर्दशा घालवण्याच्या नावाखाली सुरू आहे बुवाबाजी

  खंडोबा यात्रेनिमित्त येणाऱ्या भविकांसोबत सुरू आहे भोंदूगिरी

  औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील खंडोबा मंदिरात सुरू आहे प्रकार

 • 24 Jan 2022 02:01 PM (IST)

  बिग बॉस हिंदीमधून अभिजीत बिचुकले बाहेर, सलमान खानवर केले गंभीर आरोप

  बिग बॉस हिंदीमधून अभिजीत बिचुकले बाहेर

  सलमान खानवर केले गंभीर आरोप

  सलमान स्वतःला भाई समजतो मी दादा आहे

  सलमानला मी सांगेन काय आहे ते,

  हिंदी बिग बॉसमध्ये चाललंय काय ?हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार

  हिंदी बिग बॉसनं मला बोलावून घेतलं मी गेलो नव्हतो,

  अभिजित बिचुकलेनं व्यक्त केला संताप

  सलमान खानवर केली टिका

 • 24 Jan 2022 01:48 PM (IST)

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

  ट्विट करत दिली माहिती

 • 24 Jan 2022 01:45 PM (IST)

  गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार 

  पुणे - गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार

  - वारजे आणि पाषाण जलकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार

  - शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

  - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती

 • 24 Jan 2022 01:40 PM (IST)

  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नागपुरातील घराची सुरक्षा वाढवली

  नागपूर - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नागपुरातील घराची सुरक्षा वाढवली

  - भाजप महिला आघाडीचं नाना पटोले यांच्या घराबाहेर आंदोलन

  - नाना पटोले यांच्या कालच्या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक

  - आंदोलनाला सुरुवात होणार

  - नाना पटोले यांना सदबुद्धी मिळण्यासाठी महिलांचे हवन

 • 24 Jan 2022 01:05 PM (IST)

  बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? देवेंद्र पडणवीस यांचा सवाल

  देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत आहेत. सोयीचा इतिहास आणि सिलेक्टिव्ह विसर त्यांच्या भाषणात पाहायला मिळाला. २५ वर्ष युतीत सडलो असो ते म्हणत आहेत. २०१२ पर्यंत बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे का असा सवाल आमच्या मनात येतो, असे फडणवीस म्हणाले.

 • 24 Jan 2022 12:36 PM (IST)

  रत्नागिरीत पारंपरिक अणि पर्सेसीन मच्छिमारांमधील वाद चिघळला

  रत्नागिरी - पारंपरिक अणि पर्सेसीन मच्छिमारांमधील वाद चिघळला

  सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय विभागाचा अनागोंदी कारभार उघड

  शासनाच्या कायद्याविरोधात उपोषण करणाऱ्या पर्सेसीन मच्छिमारांना दिलं गेलं अनधिकृत वीज कनेक्शन

  आंदोलनाच्या ठिकाणी अनधिकृत वीज जोडणी केल्याचा पारंपरिक मच्छिमारांचा आरोप

  नविन मच्छिमारी कायद्याला विरोध करण्यासाठी पर्सेसीन मच्छिमारांच काही दिवसांपासून सुरु आहे धरणे आंदोलन

  पारंपरिक मच्छिमारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

  अधिका-यांकडून माणुसकीला धरुन अनधिकृत वीज कनेक्शन दिल्याची कबुली

  पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याची पारंपरिक मच्छिमारांची मागणी

 • 24 Jan 2022 11:22 AM (IST)

  तुम्ही करा काहीही आणि ईडी आणि सीबीआय बाजूल ठेवा, असं कसं होईल- चंद्रकांत पाटील

  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत आहेत. निवडणूक जशी मोठी होते तसे मेरिट वाढते. आता लोकसभा आणि विधानसभेला काय होतं ते बघत राहा. तुम्ही करा काहीही आणि ईडी आणि सीबीआय बाजूल ठेवा, असं कसं. कर नाही तर डर कशाला. काहीही करा आणि सीबीआय नको असं कसं

 • 24 Jan 2022 11:08 AM (IST)

  मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रुपाली पाटील यांच्याकडे येणार पक्षाची मोठी जबाबदारी 

  - मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रुपाली पाटील यांच्याकडे येणार पक्षाची मोठी जबाबदारी

  - रुपाली पाटील यांना मिळणार पक्षाची राज्य पातळीवरील जबाबदारी

  - येत्या दोन दिवसात मिळणार पक्षाचे अधिकृत पत्र,सूत्रांची माहिती

  - शनिवारी पुण्यात रुपाली पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट

  - यावेळी खुद्द अजित पवारांनी दिलेत रुपाली पाटलांना शिस्तीचे धडे

 • 24 Jan 2022 10:41 AM (IST)

  इचलकरंजीमध्ये टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला आग, कोट्यवधीचे नुकसान

  सांगली- इचलकरंजी येथे टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला लागली आग

  यंत्रमाग कारखान्याला आग लागल्यामुळे कोरडो रुपयांचे नुकसान

  घटनास्थळी अग्निशामक गाड्या चार दाखल आग विजवायचे शर्तीचे प्रयत्न सुरू

  कोणतीही जीवितहानी नाही

 • 24 Jan 2022 10:30 AM (IST)

  ईडी, सीबीय काहीही असो, आम्ही लढायला, मरायला तयार आहोत- संजय राऊत

  भाजपमध्ये काम झालं की नेत्याला फेकून दिलं जातं. राजकारणात गरज संपली की दूर केलं जातं. लक्ष्मीकांत पारसेकर, पर्रिकर, एकनाथ खडसे यांचं काय झालं. मुंडे परिवारासोबत काय झालं. संपूर्ण देशात भाजपत असंच केलं जातं. आमची आम्हाला ताकद माहिती आहे. आमचा आत्मविश्वास हाच आम्हाला पुढे घेऊन जातो. आमच्याशी लढाल तर त्याचा परिणाम भोगावा लागेल. ईडी, सीबीय काहीही असो आम्ही लढायला आणि मरायला तयार आहोत

 • 24 Jan 2022 10:27 AM (IST)

  उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, पंजाबपर्यंत लढलो असतो तर शिवसेनेचा पंतप्रधान असता- संजय राऊत

  मुंबई : संजय राऊत माध्यमांशी बोलत आहेत. भाजपसोबत आम्ही 25 वर्षे काढली. बाबरीनंतर उत्तर भारतात आमची लहर होती. याच काळात आम्ही उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, पंजाब तसेच जम्मूपर्यंत आम्ही लढलो असतो तर आमचा पंतप्रधान असता. बाळासाहेब ठाकरे यांचे मन मोठे होते. देशात एक हिंदुत्वावादी पक्ष वाढत असेल तर ठीक आहे, असे बाळासाहेब यांचा विचार होता

 • 24 Jan 2022 10:04 AM (IST)

  ओबीसी आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक

  ओबीसी आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक

  दूपारी तीन वाजता होणार बैठक

  मागासवर्गीय आयोगाचे सगळे सदस्य, अध्यक्ष बैठकीला लावणार हजेरी

  गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल घेण्यास राज्य मागासवर्गीय आयोगाचा नकार

  सुप्रीम कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या अंतरिम अहवालावर होणार चर्चा

  इम्पेरीकल डेटा गोळा करण्यासंदर्भात होणार चर्चा

  आयोगातील सूत्रांची टीव्ही 9 मराठीला.माहिती

 • 24 Jan 2022 09:17 AM (IST)

  पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथे भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

  पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथे भीषण अपघात

  3 वाहनांमध्ये झाला विचित्र अपघात

  अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जणांची प्रकृती गंभीर

  ट्रक टू व्हीलर आणि फोर व्हीलर कार मध्ये झाला विचित्र अपघात

  रविवारी रात्रीची घटना !

 • 24 Jan 2022 08:53 AM (IST)

  महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा 6.5 अंशावर, त्रीपासून अचानक हवामानात बदल 

  सातारा : महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा गेला 6.5 अंशावर

  काल रात्रीपासून अचानक झाला हवामानात बदल

  महाबळेश्वरमध्ये काल 11.6 अंस इतकी तापमानाची झाली होती नोंद

 • 24 Jan 2022 08:52 AM (IST)

  निफाडचा पारा घसरला, वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

  नाशिक- निफाडचा पारा घसरला

  - 5.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

  - या थंडीच्या हंगामातील निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील हवामान विभागात नीचांकी नोंद

  - गारठून टाकणाऱ्या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी पेटवल्या जात आहेत शेकोट्या

  - वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

 • 24 Jan 2022 07:45 AM (IST)

  मुंबईतील हवा आज सगळ्यात दुषित… एयर क्वालिटी इंडेक्स 267

  मुंबईतील हवा आज सगळ्यात दुषित… एयर क्वालिटी इंडेक्स 267

  - मालाड येथील ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ 436 म्हणजेच ‘तीव्र प्रदूषण’ या श्रेणीत होता.

  भांडुप येथे 336, माझगाव येथे 372, वरळी येथे 319, वांद्रे कुर्ला संकुल येथे 307, चेंबूर 347, अंधेरी 340 असा ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ नोंदवला गेला.येथील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत. तर कुलाबा अथे हवा गुणवत्ता निर्देशांक’ 221 म्हणजेच ‘वाईट’ श्रेणीत आहे…

 • 24 Jan 2022 07:24 AM (IST)

  कोकणात आजही अवकाळी पावसाचा अंदाज, आंबा आणि काजू बागायतदारांना अवकाळीनं धडकी

  रत्नागिरी- कोकणात आजसुद्धा अवकाळी पावसाचा अंदाज

  पहाटेपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण

  आंबा आणि काजू बागायतदारांना अवकाळीनं धडकी

  अरबी समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढल्याने अवकाळी पावसाचा अंदाज

  काल देखील पावसाच्या दमदार सरी होत्या बरसल्या

 • 24 Jan 2022 07:24 AM (IST)

  नाशिक शहरात दुचाकी चोरीचा सपाटा सुरूच, दिवसभरात 5 दुचाकींची चोरी

  नाशिक - शहरात दुचाकी चोरीचा सपाटा सुरूच

  दिवसभरात शहरात 5 दुचाकींची चोरी

  पाचही दुचाकी पार्किंगमध्ये लावलेल्या असताना झाली चोरी

  विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल

  पोलिसांच्या करवाईकडे शहरवासीयांचे लागले आहे लक्ष

 • 24 Jan 2022 06:31 AM (IST)

  औरंगाबादेत माजी सैनिक चालवणार महानगरपालिकेची स्मार्ट सिटी बस 

  औरंगाबाद : एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा महानगरपालिकेला बसला फटका

  77 दिवसांपासून औरंगाबादमधील स्मार्ट सिटी बस बंद असल्याने माजी सैनिक चालवणार स्मार्ट बस

  56 माजी सैनिक चालवणार महानगरपालिकेची स्मार्ट सिटी बस

  आजपासून शहरात धावणार अकरा स्मार्ट सिटी बस

  महानगरपालिकेने केला होता राज्य परिवहन महामंडळसोबत करार

Published On - Jan 24,2022 6:21 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें