Mumbai Maharashtra News Live | 29 दिवसांनंतर धनगर समाज रस्त्यावर उतरेल, गोपीचंद पडळकर यांचं राज्य सरकारला अल्टीमेटम

| Updated on: Oct 23, 2023 | 7:21 AM

Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींसह जगातील सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.

Mumbai Maharashtra News Live | 29 दिवसांनंतर धनगर समाज रस्त्यावर उतरेल, गोपीचंद पडळकर यांचं राज्य सरकारला अल्टीमेटम

मुंबई | 22 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. पुण्यातील स्वामी चिंचोलीत अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी तिन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. दसरा मेळाव्याच्या तयारीच्या निमित्ताने ठाकरे गटाची आज बैठक होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आता थेट नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. यासह राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Oct 2023 07:50 PM (IST)

    Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर धनगर आरक्षणासाठी आक्रमक, राज्य सरकारला इशारा

    सांगली | धनगर आरक्षणावरुन आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीमध्ये कोणी विरोधात गेले तर त्याला तुडवून जाण्याची आमची सगळ्यांची भूमिका आहे, असं म्हणत पडळकर यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.

    60 दिवसांची मुदत दिली ,पण सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा पाउले उचलली नाहीत. 29 दिवसांनंतर धनगर समाज रस्त्यावर उतरेल, असं अल्टीमेटमही पडळकर यांनी राज्य सरकार दिलं आहे.

  • 22 Oct 2023 05:25 PM (IST)

    गृहमंत्री काय करत आहेत- सुप्रिया सुळे

    गृहमंत्री काय करत आहेत? आम्ही नावे सांगणार असे ते म्हणाले. ड्रग्स नेक्सस सांगा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. राज्यातील तरुणांशी आपण बरोबर थांबल पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

  • 22 Oct 2023 05:14 PM (IST)

    दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने आढावा बैठक

    आझाद मैदान येथे शिवसेनेचा होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेण्यात येत आहे. आझाद मैदान येथे आसन व्यवस्था आणि वाहन पार्किंग व्यवस्था बद्दल आढावा घेण्यात येतोय. ट्रॅफिक पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलीस स्टेशन अधिकारी उपस्थित आहेत.

  • 22 Oct 2023 05:04 PM (IST)

    गोपीचंद पडळकर यांच्या दसरा मेळाव्याला सुरुवात

    भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दसरा मेळाव्याला सुरुवात. कवठेमहांकाळच्या आरेवाडीच्या बनात पार पडतो हा दसरा मेळावा. बिरोबा देवाचं दर्शन घेऊन आमदार गोपीचंद पडळकर मेळाव्याच्या ठिकाणी दाखल. आमदार गोपीचंद पडळकर स्टेजवर आले आणि दोन्ही गुडगे खाली टेकवून सर्वाना हात जोडून नमस्कार केला

  • 22 Oct 2023 04:23 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये 500 कोटींचे ड्रग्ज जप्त

    छत्रपती संभाजीनगरमध्ये पुणे डीआरआयने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 500 कोटींचे ड्रग्ज जप्त केल्याची वृत्त समोर येत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणात दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

  • 22 Oct 2023 04:19 PM (IST)

    दसऱ्या मेळाव्याची आढावा बैठक

    मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. ठाकरे गट या ठिकाणी मेळाव्याची तयारी करत आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासंदर्भात ठाकरे गटाची बैठक सुरु आहे. अनिल देसाई हे या बैठकीत आढावा घेत आहेत.

  • 22 Oct 2023 04:11 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांनी केली पुढाऱ्यांना गावबंदी

    येत्या 24 ऑक्टोबर रोजी मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे. त्यानंतर अंतरवाली सराटी येथे पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय पण त्यांनी जाहीर केला. उपचार, अन्न-पाणी घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • 22 Oct 2023 04:06 PM (IST)

    राष्ट्रवादीतील दोन गट एकाच मंचावर

    राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादीतील दोन गट प्रथमच एकाच मंचावर आले आहेत. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर आले आहेत. भिगवणमधील अनंतराव पवार शाळेचं उद्धघाटनाच्या कार्यक्रमात हे सर्व एकत्र आले आहेत.

  • 22 Oct 2023 03:49 PM (IST)

    ड्रग प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी, पुणे पोलिसांची कोर्टात मोठी माहिती

    पुणे : ड्रग प्रकरणातील आरोपी अरविंद लोहारेला २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी. भूषण पाटील आणि अरविंद बालकवडे यांना १ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांची कोर्टात मोठी माहिती दिलीय. चाकणच्या ड्रग्ज प्रकरणात अरविंद लोहारे याला अटक करण्यात आली होती.

  • 22 Oct 2023 03:40 PM (IST)

    भिवंडीत 110 ग्रॅम एम डी ड्रग्ज पावडर जप्त

    भिवंडी : भिवंडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्या तरुणाकडून पोलिसांनी सात लाख रुपये किमतीची 110 ग्रॅम एम डी ड्रग्ज पावडर पोलिसांनी जप्त केली आहे.

  • 22 Oct 2023 03:36 PM (IST)

    दसरा मेळाव्यात कुणाचा बाजूने बोलणार? नरेश म्हस्के यांची ठाकरे गटावर टीका

    ठाणे : ज्या शिवसैनिकांनी शिवसेना स्थापन होताना समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षाशी लढा दिला. त्यात कित्येक लोकांचे बळी गेले त्यांच्याशी आपण आघाडी करता. आपण शत्रूला भेटणारे आहात त्याची तुम्हाला लाज वाटली नाही. ते रडत राऊत कायम रडत राहतात. दसरा मेळाव्यात तुम्ही सावरकरांच्या बाजूने बोलणार आहात, हिंदुत्वाच्या बाजूने बोलणार आहात की काँग्रेसच्या विरोधात बोलणार आहात याचं पहिलं उत्तर द्या अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली.

  • 22 Oct 2023 03:19 PM (IST)

    २५ तारखेपासून परिणाम दिसतील, जरांगे पाटील यांचा इशारा

    जालना : आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी. आम्ही तुमचा सन्मान राखला तुम्ही मराठ्यांचा सन्मान राखा. आता काही वेळ देत नाही. आरक्षण कसे द्यायचे हे आम्ही सांगितले. आता २५ तारखेपासून परिणाम दिसतील. राज्यभर साखळी उपोषण करणार.

  • 22 Oct 2023 03:14 PM (IST)

    अन्न, पाणी, औषध घेणार नाही - जरांगे पाटील

    जालना : सरकारने आरक्षण देण्यासाठी वेळ दिला होता त्याबाबत आम्ही दिशा स्पष्ट करत आहोत. राज्य सरकारने 24 तारखेच्या आत मराठा आरक्षण निर्णय घेतला नाही तर 25 तारखेपासून मी आमरण उपोषण सुरू करणार. त्या उपोषणात अन्न, पाणी, औषध घेणार नाही अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.

  • 22 Oct 2023 02:55 PM (IST)

    Maharashtra News : राष्ट्रवादी फुटल्यानंतर काका-पुतणे पहिल्यांदाच एकत्र

    राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार पहिल्यांदाच एकत्र आले आहे. दौंड येथे एका शाळेच्या इमारतीच्या उद्धघाटनासाठी काका पुतण्याने एकत्र हजेरी लावली. शरद पवार यांनी लाल फित कापून उद्धाघाटन केले. ते तोघेही एकाच मंचावर असले तरी एकमेकांच्या शेजारी बसणार नाहीत.

  • 22 Oct 2023 02:46 PM (IST)

    Maharashtra News : शरद पवार आणि सुप्रिया सुळे कार्यक्रम स्थळी हजर

    दौंड येथे एका शालेय इमारतीच्या उद्धाटन कार्यक्रमाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे हजर झाले आहेत. आताच त्यांचे आगमण झाले. तर अजित पवारही या कार्यक्रमाला हजर राहाणार आहेत.

  • 22 Oct 2023 02:40 PM (IST)

    Maharashtra News : आज शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार

    शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर येणार आहेत. एका कार्यक्रमाला सुप्रिया सुळे, अजित पवार आणि शरद पवार हे उपस्थित राहाणार आहेत. दौंडमध्ये शाळेच्या इमारतीच्या उद्धघाटन सोहळ्याला हे सर्व उपस्थित राहतील.

  • 22 Oct 2023 02:15 PM (IST)

    सरकारने EWS हे नव पिल्लुं आणलं आहे - मनोज जरांगे

    आरक्षणाच्या मुद्दयावर सरकारने वेळकाढूपणा करु नये. सरकारने 1 महिना मागितला आम्ही 40 दिवस दिले. आता सरकारने EWS हे नवे पिल्लू आणलं आहे. पण आम्ही कुठे मागितलं असेही मनोज जरांगे यांनी सांगत आम्ही दिलेली मुदत 24 तारखेला संपत आहे असा इशाराही दिला आहे.

  • 22 Oct 2023 01:54 PM (IST)

    पवार काका-पुतणे एका मंचावर आले तरी शेजारी बसणार नाहीत

    दौंड येथील एका शाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असले तरी ते शेजारी-शेजारी बसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या मध्ये व्यासपीठावर पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांचे आसन ठेवण्यात आले आहे.

  • 22 Oct 2023 01:37 PM (IST)

    मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे दु. 2 वा. महत्वाची बैठक घेणार

    शासनाला दिलेली 24 तारीख जवळ आल्याने मराठा आरक्षण प्रकरणाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मराठी नेते मनोज जरांग आज दुपारी 2 वाजता महत्वाची बैठक घेत आहेत.

  • 22 Oct 2023 01:05 PM (IST)

    कल्याण सूचक नाका परिसरात वाहन चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक चढला डिव्हायडरवर

    कल्याण सूचक नाका परिसरात वाहन चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक चढला डिव्हायडरवर. मुंबईवरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक असून पहाटेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात. ट्रकमध्ये काच बनवणारे केमिकल पावडर असून सध्या क्रेनच्या सहाय्याने ट्रक मधले सामान बाजूला ठेवत ट्रक बाहेर काढण्याचे काम सुरू.

  • 22 Oct 2023 12:35 PM (IST)

    तुळजा भवानी, आई एकविरा देवी, कोल्हापूरची देवी, कालीमाता, मुंबादेवी...एकाच ठिकाणी

    नवरात्र उत्सवाला देवीची मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या रूपात स्थापन होते. नवी मुंबईतील वाशी येथे आई तुळजा भवानी, आई एकविरा देवी,कोल्हापूरची देवी, कालीमाता, मुंबादेवी, अशा सर्व प्रकारच्या देवी येथे नवी मुंबई अनिल कौशिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून नऊ दिवस बसविण्यात आल्या आहेत. अशा विविध देवीचे नऊ दिवस भक्तांना दर्शन एकाच जागेवर घेता येत आहे. नवरात्र उत्सवाला 29 वर्ष झाली असून ह्या मंडळाचे 9 दिवस सर्व काम हे महिला पाहतात एकाच जाग्यावर सर्व देवीचं दर्शन मिळत असल्यामुळे अनेक भक्त आवर्जून देवीच्या दर्शनाला येत आहेत.

  • 22 Oct 2023 12:12 PM (IST)

    आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

    आमदार सुरेश धस यांच्या पत्नीवर आदिवासी महिलेला धमकावल्याचा आरोप. सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. आरोप खोटा, राजकीय दबावापोटी हा आरोप झाल्याचं आमदार सुरेश धस यांचं स्पष्टीकरण.

  • 22 Oct 2023 11:59 AM (IST)

    Nashik News : नाशिकच्या येवला तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ

    सध्या नाशिकच्या येवला तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. नगरसुल इथं मध्यरात्रीच्या दरम्यान दरोडा पडला.  दरोडेखोरांच्या मारहाणीत 10 ते 11 जण जखमी झालेत.  जखमींमध्ये महिलांचाही समावेश आहे.  जखमींवर येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  या दरोड्या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

  • 22 Oct 2023 11:45 AM (IST)

    सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

    सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीसांनी माफी मागतली पाहिजे. शरद पवार काय मंत्रिमंडळात नव्हते. आज देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जे सहकारी आहेत तेच आधी सरकारमध्ये होते. गैरसमज पसरवला म्हणूम त्यांनी माफी मागितली पाहिजे.  मला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सहानुभूती आहे की मुख्यमंत्री असणार माणूस हा उपमुख्यमंत्री झाला आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

  • 22 Oct 2023 11:30 AM (IST)

    प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या भेटीवर शरद पवार यांचं भाष्य; म्हणाले...

    प्रकाश आंबडेकरांची कालची भेट ही महाविकास आघाडीत समावेशाबाबत नव्हती.  मात्र त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्याबाबतीत मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, असं म्हणत शरद पवार यांनी काल प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या बैठकीवर भाष्य केलंय.

  • 22 Oct 2023 11:14 AM (IST)

    Navneet Rana : नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या पदयात्रेला सुरवात

    अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या पदयात्रेला सुरवात झाली आहे. अमरावतीत राणा दाम्पत्याची अनवायी पायाने पदयात्रा करत आहेत.  विदर्भाच कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवीच्या दर्शनासाठी राणा दाम्पत्याची पदयात्रा करत आहेत.  गंगा -सावित्री निवासस्थाना पासून 2 किलोमीटरच्या अंबादेवी पर्यंत पदयात्रा सुरु आहे.  अंबादेवीची राणा दाम्पत्य महाआरती करणार आहेत.  अंबादेवीला साकडंही घालणार आहेत.

  • 22 Oct 2023 11:00 AM (IST)

    पुन्हा देशाचे नरेंद्र मोदी व्हावे यासाठी अंबादेवीकडे घालणार- नवनीत राणा

    पंतप्रधान नरेंद्र मोदीं विरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीची बिघाडी होणार आहे. पुन्हा देशाचे नरेंद्र मोदी व्हावे यासाठी अंबादेवीकडे घालणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी सांगितंल आहे.

  • 22 Oct 2023 10:45 AM (IST)

    पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींनाच महाराष्ट्रातील लोकांची पसंती- चंद्रशेखर बावनकुळे

    आतापर्यंत ३३ हजार मतदारांशी थेट संवाद साधला आहे. महायुतीचे ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून येणार असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

  • 22 Oct 2023 10:30 AM (IST)

    ललित पाटील याला पोसणारा तुमच्या मंत्रिमंडळात- संजय राऊत

    ललित पाटील याला पोसणारा तुमच्या मंत्रिमंडळात, दादा भुसे यांनी ललित पाटील याला शिवसेनेत आणलं. राज्य सरकारच्या आशीर्वादाने ड्रग्जचं साम्राज्य सूरू असल्याचं संजय राऊत म्हणाले.

  • 22 Oct 2023 10:05 AM (IST)

    बनावट माल येतो आणि जातो- संजय राऊत

    शिवतीर्थावर यंदाचा दसरा मेळावा अभूतपूर्व होणार आहे. बनावट माल येतो आणि जातो, असं म्हणत राऊत यांनी शिंदे गटाला मारला टोला

  • 22 Oct 2023 09:57 AM (IST)

    Live Update : नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाची विशेष तयारी सुरू

    नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाची विशेष तयारी सुरू झाली आहे. लाखो अनुयायी हजेरी लावणार आहेत. त्यामुळे विशेष तयारी केली जात आहे. प्रशासन आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष तयारी सुरू केली. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी असणार...

  • 22 Oct 2023 09:40 AM (IST)

    Live Update : आज राज्यातील मराठा समाजाला दिशा देणार - जरांगे पाटील

    आज राज्यातील मराठा समाजाला दिशा देणार, तुम्ही तयारीला लागा असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. २४ तारखेला सरकारला दिलेली मुदत संपत असून आज पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे. म्हणून आज सकाळी जरांगे यांच्याकडून एक बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाय दुपारी तीन वाजता जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद असणार आहे.

  • 22 Oct 2023 09:25 AM (IST)

    Live Update : शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण; सुप्रीम कोर्टात 20 नोव्हेंबरला सुनावणी

    केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्याच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात 20 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. उध्दव ठाकरे गटाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय खंडपीठापुढे होणार सुनावणी.

  • 22 Oct 2023 09:11 AM (IST)

    Live Update : ललित पाटील याला घेऊन मुंबई पोलीस नाशिकमध्ये

    ललित पाटील याला घेऊन मुंबई पोलीस नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. शिंदेवाडी गावात ललित पाटील याचा ड्रग्ज कारखाना असल्याची माहिती समोर आली आहे. ललित पाटीलच्या मोडस ऑपरेंडीचा पोलिसांकडून तपास सुरु...

  • 22 Oct 2023 08:57 AM (IST)

    Maharashtra News | शरद कोळी यांच्या निवडीनंतर सोलापूर शिवसेनेत नाराजी

    शरद कोळी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात नाराजी पसरली आहे. सहसंपर्कप्रमुख साईनाथ भाऊ अभंगराव यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शरद कोळी यांचे शिवसेनेत योगदान काय आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.

  • 22 Oct 2023 08:49 AM (IST)

    Maharashtra News | बारामतीत विमानाचा अपघात

    बारामतीत रेडबर्ड प्लाईट ट्रेनिंग सेंटरच्या विमानाचा पुन्हा आपघात झाला आहे. या विमानात एक पायलट ट्रेनर आणि प्रशिक्षणार्थी होता. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. बारामती तालुक्यातील गाडीखेल परिसरात अपघात झाला.

  • 22 Oct 2023 08:33 AM (IST)

    Maharashtra News | दसरा मेळाव्यात आणखी एका मेळाव्याची भर

    दसरा मेळाव्याच्या परंपरेत आणखी एका मेळाव्याची भर पडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी येथे धनगर समाजाचा दसरा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यशवंत सेना या संघटनेने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी हा मेळावा होणार आहे.

  • 22 Oct 2023 08:17 AM (IST)

    Maharashtra News | रावणदहनासाठी क्रॉस मैदानाची जागा

    आझाद मैदानावर होणाऱ्या शिवसेनेच्या ( शिंदे गट) दसरा मेळाव्यामुळे तेथील रामलीला आयोजकांना रावणदहनासाठी क्रॉस मैदानात जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे 'रावणदहना' ने रामलीलाची सांगता विजयादशमीलाच होणार आहे.

  • 22 Oct 2023 08:09 AM (IST)

    Maharashtra News | पुण्यातील २३ गावासंदर्भात बैठक

    पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावाच्या विकास आराखड्याबाबत मुंबईत बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ही बैठक घेणार आहे. २३ गावांचा डीपी तयार करण्याच काम पीएमआरडीएकडे आहे. मात्र इतर काम पुणे महापालिकेला करावी लागणार आहे.

  • 22 Oct 2023 08:00 AM (IST)

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक, दसरा मेळाव्याचा आढावा घेणार

    येत्या 24 तारखेला ठाकरे गटाचा दसरा मेळावा होत आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कात हा मेळावा होत आहे. त्यामुळे या मेळाव्याच्या आढाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. या ऑनलाईन बैठकीला ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 22 Oct 2023 07:45 AM (IST)

    Manoj Jarange Patil : डेडलाईनला दोन दिवस बाकी, मनोज जरांगे पाटील सांगणार पुढचा प्लान

    राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेल्या डेडलाईनला दोन दिवस बाकी आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज समाजातील कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत. जालन्याच्या अंतरवली सराटीत ही बैठक होणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे जरांगे काय भूमिका जाहीर करतात? काय प्लान सांगतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 22 Oct 2023 07:29 AM (IST)

    Ashok Chavan : अशोक चव्हाणांकडे तेलंगना निवडणुकीची जबाबदारी, काँग्रेस अध्यक्षांची घोषणा

    काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्याकडे तेलंगना निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची तेलंगनाचे विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही नियुक्ती केली आहे.

  • 22 Oct 2023 07:17 AM (IST)

    Sharad Pawar : शरद पवार, अजितदादा आणि सुप्रिया सुळे आज एकाच व्यासपीठावर; भाषणाकडे लक्ष

    राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या वास्तूचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

    या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच हे नेते या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येत आहेत. त्यामुळं या कार्यक्रमाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे..

Published On - Oct 22,2023 7:14 AM

Follow us
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....