Maharashtra Breaking Marathi News Live : 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती

| Updated on: Aug 05, 2023 | 7:19 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाचं आज सूप वाजणार आहे. आज शेवटच्या दिवशी महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता.

Maharashtra Breaking Marathi News Live : 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई | 4 जुलै 2023 : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाचं आज सूप वाजणार आहे. त्यामुळे आज सभागृहात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता अधिक आहे. लोकसभेत दिल्ली सेवा बिल मंजूर करण्यात आलं आहे. आता राज्यसभेत हे बिल मंजूर होतं का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह येत्या 6 ऑगस्ट रोजी पुण्यात येणार. पुण्यात सहकार विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. जळगावच्या गोंडगाव येथे एका नऊ वर्षीय मुलीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. त्यामुळे जळगावमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Aug 2023 07:05 PM (IST)

    Maharashtra Assembly Session Date 2023 | नागपूरमध्ये 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन

    मुंबई | महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संस्थगित करण्यात येत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधासनभेत केली. यापुढील हिवाळी अधिवेशन नागपुर येथे होईल. नागपूर येथे गुरुवार 7 डिसेंबर 2023 पासून हे अधिवेशन सुरु होईल अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.

  • 04 Aug 2023 05:26 PM (IST)

    Cm Eknath Shinde | आमचं सरकार फेसबूकवर काम करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

    मुंबई | “आमचं सरकार फेसबूकवर काम करणार नाही. आमचं सरकार हे ऑनलाईन काम करणार नाही”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लगावला. मुख्यमंत्री विधानसभेत बोलत होते.

  • 04 Aug 2023 05:21 PM (IST)

    Cm Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला

    मुंबई | "विरोधकांमध्ये आत्मविश्वास डगमगलेला दिसतो. विरोधकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी शेवटी निवड झाली. निवड आधी झाली असती तर आणखी धार आली असती, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.

  • 04 Aug 2023 05:04 PM (IST)

    नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    गोसीखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. प्रशासनाकडून 62 हजार 935 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. भाम धरण भरल्याने त्यातील पाणी सोडण्यात येत आहे. पवना धरण काही दिवसात पुर्णपणे भरण्याची शक्यता आहे. पवना नदी पात्रात 1310.02 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • 04 Aug 2023 04:52 PM (IST)

    Rahul Gandhi | शिक्षेवरील स्थगितीनंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले?

    सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधींच्या शिक्षेला स्थिगिती दिली. तसेच पुढे जपून वक्तव्य करावीत असे निर्देशही न्यायालयाने राहुल गांधींना दिले. यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान राहुल गांधींनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.

    "आज न उद्या सत्याचा विजय होतो. ज्यांनी मला मदत केली मी त्यांचा आभारी आहे. तसेच पाठींब्यासाठी जनतेचेही आभार मानतो" , अशा शब्दात गांधींनी सर्वांचे आभार मानले.

  • 04 Aug 2023 04:37 PM (IST)

    दहशतवाद्यांनी उभारली प्रयोगशाळा

    पुणे शहरातून इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली होती. एटीएसने या प्रकरणात इतर तिघांनाही अटक केली आहे. या दहशतवाद्यांनी पुणे, मुंबईत बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. त्यांनी एक प्रयोगशाळाही उभारली होती. त्या प्रयोगशाळेतून अनेक आक्षेपार्ह ऐवज जप्त करण्यात आले आहेत.

  • 04 Aug 2023 03:34 PM (IST)

    Mumbai Hc Nagpur Bench Justice Resign | नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांचा राजीनामा

    नागपूर | एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती रोहित देव यांनी भर कोर्टातच राजीनामा दिलाय. देव यांनी निवृत्तीला फक्त 1 वर्ष शिल्लक असताना राजीनामा दिलाय. राजीनाम्याचं कारण अजून अस्पष्ट आहे.

  • 04 Aug 2023 03:08 PM (IST)

    राहुल गांधी ऐवजी जयराम रमेश घेणार पत्रकार परिषद

    राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी दुपारी 3.15 वाजता दिल्ली येथील पक्ष कार्यालयात येणार असून बैठकीत सहभागी होणार आहेत. परंतू सव्वा चार वाजता कॉंग्रेस नेते जयराम रमेश आणि अभिषेक मनु सिंघवी पत्रकार परिषद घेणार आहेत असे म्हटले जात आहे.

  • 04 Aug 2023 02:38 PM (IST)

    राहुल गांधी यांना दिलासा, काँग्रेसचा जल्लोष

    राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर काँग्रेसमध्ये जल्लोष सुरु झाला आहे. विधानभवनाबाहेर सर्व काँग्रेस आमदार एकत्र आले. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.

  • 04 Aug 2023 01:49 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधींना दिलासा

    सर्वाच्च न्यायालयाने कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना मोदी सरनेम अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांची खासदारकी देखील गेली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिल्याने त्यांची खासदारकी बहाल होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे.

  • 04 Aug 2023 01:47 PM (IST)

    राहुल गांधींना मोठा दिलासा

    मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली.

  • 04 Aug 2023 01:43 PM (IST)

    आशिष देशमुख यांच्याकडून ऑफर

    भाजप नेते आशिष देशमुख यांनी स्वाभिमानी संघटनेचे नेते रविंकात तुपकर यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

  • 04 Aug 2023 12:36 PM (IST)

    राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

    आमदार सांभाळण्याच्या नादात महाराष्ट्र हातून निघून जाईल, असा टोला शिंदे यांनी फडणवीसांना लगावला.

  • 04 Aug 2023 12:34 PM (IST)

    राहुल गांधी यांच्या शिक्षेच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू

    राहुल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी पंधरा मिनिटे युक्तिवाद करणार. त्यानंतर पुरनेश मोदी यांच्या वतीने वकील पंधरा मिनिटे युक्तिवाद करणार.

  • 04 Aug 2023 12:04 PM (IST)

    इंदापूरमधील विहिर दुर्घटनेतील दुसरा मृतेदह सापडला

    म्हसोबावाडीतील विहिर दुर्घटनेप्रकरणी 68 तासांच्या अथक प्रयत्नांतर दुसरा मृतदेह सापडला. दुपारपर्यंत शोध कार्य पूर्ण होण्याची शक्यता.

  • 04 Aug 2023 12:02 PM (IST)

    Nitin Desai News | वाढदिवसापूर्वी नितीन देसाई यांनी घेतला स्वतःला संपवण्याचा निर्णय

    कलादिर्गर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नितीन देसाई यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी स्वतःला संपवलं. स्वतः उभारलेल्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी शेवटचा श्वास घेतला. बुधवारी सकाळी नितीन देसाई यांचा मृतदेह एनडी स्टुडीओमध्ये कर्मचाऱ्यांना आढळून आला. वाढदिवसाच्या चार दिवस आधी नितीन देसाई यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. ९ ऑगस्ट रोजी नितीन देसाई यांचा वाढदिवस आहे.

  • 04 Aug 2023 11:41 AM (IST)

    एनसीसी विद्यार्थी मारहाण प्रकरण

    जोशी-बेडेकर कॉलेजबाहेर विविध संघटनांचं आंदोलन सुरु. कॉलेजबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात.

  • 04 Aug 2023 11:36 AM (IST)

    कलाम हिरो असू शकतात पण औरंगजेब नाही- फडणवीस

    भारतीय मुस्लिमांचा हिरो औरंगजेब होऊ शकत नाही. कलाम हिरो असू शकतात पण औरंगजेब नाही. औरंगजेबाचा वाद एकाच वेळी अनेक जिल्ह्यांमध्ये होणं हा योगयोग नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

  • 04 Aug 2023 11:27 AM (IST)

    राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन

    शरद पवार यांचा 15 ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा सुरु होत आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सभांचं नियोजन करण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. उद्याच्या बैठकीत सभांचं नियोजन ठरणार.

  • 04 Aug 2023 11:24 AM (IST)

    भाजप खासदारांसाठी पक्षाकडून व्हीप जारी

    भाजपकडून 7 ते 11 ऑगस्ट दरम्यान खासदारांसाठी पाच दिवसांसाठी व्हीप जारी करण्यात आलाय. 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान सरकारच्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा होणार. चर्चेच्या निमित्ताने भाजपकडून व्हीप जारी करण्यात आला.

  • 04 Aug 2023 10:49 AM (IST)

    मुंबई सर्वात सुरक्षित शहर- देवेंद्र फडणवीस

    मुंबई सर्वात सुरक्षित शहर असून त्यांना कोणतंही शहर हे सुरक्षित वाटणं महत्त्वाचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं.

  • 04 Aug 2023 10:15 AM (IST)

    मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित, CSMT कडे जाणाऱ्या गाड्या होणार लेट

    रेल्वे ट्रॅकमध्ये खड्डा पडल्याने ही मध्ये रेल्वेची वाहतूक उशिरा होणार आहे.  त्यामुळे बदलापूर स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे.

  • 04 Aug 2023 10:03 AM (IST)

    महिला म्हणाली, बॉम्ब आहे...

    पुणे विमानतळावरुन दिल्लीला निघालेली प्रवासी महिला चेकींग करताना म्हणाली, माझ्याकडे बॉम्ब आहे. यामुळे पुणे विमानतळावर खळबळ उडाली.

  • 04 Aug 2023 09:56 AM (IST)

    म्हसोबावाडी गावातील मजुरांचा शोध सुरुच

    इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी या गावातील विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना मातीचा मलबा कोसळला. त्या मलब्याखाली चार जण अडकल्याची घटना मंगळवारी घडली होती. आतापर्यंत युद्ध पातळीवरती शोधकार्य सुरू आहे. परंतु अजूनही मजुरांचा शोध लागला नाही.

  • 04 Aug 2023 09:44 AM (IST)

    बेस्ट कामगार तिसऱ्या दिवशी संपावर

    मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी बेस्टचे कंत्राटी कामगार संपावर आहेत. मुंबईतील सर्व आगारात कंत्राटी पद्धतीने काम करणारे बीएसटी बस कर्मचारी वेगवेगळ्या मागण्यांसाठी संपावर आहेत. त्यांचे काही सहकारी कर्मचारी आझाद मैदानावर धरणे देत आहेत.

  • 04 Aug 2023 09:30 AM (IST)

    पवना धरणातून विसर्ग

    मावळात दमदार पडलेल्या पावसामुळे पवना धरणाची वाटचाल शंभरीकडे झाली आहे. यामुळे शुक्रवारी धरणातील पाणीसाठा 93.08 टक्के झाला. आता विज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदी पात्रात 1310.02 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.

  • 04 Aug 2023 09:19 AM (IST)

    Nitin Desai यांचं 'या'ठिकाणी होणार अंत्यदर्शन; पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

    Nitin Desai News | शुक्रवार म्हणजे आज सायंकाळी ४ वाजता नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याआधी दुपरी १२ ते २ वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव शरीर एनडी स्टुडीओमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

  • 04 Aug 2023 09:09 AM (IST)

    art director nitin desai news : नितीन देसाई आत्महत्येची चौकशी होणार- अजित पवार

    नितीन देसाई आत्महत्या प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ज्या क्लिप मिळाल्या आहेत, त्याचे सखोल विश्लेषण करण्यात येणार आहे. कायद्यातील नियमाप्रमाणे दोषींवर कारवाई होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

  • 04 Aug 2023 09:08 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा हेसुद्धा उपस्थित होते.

  • 04 Aug 2023 09:03 AM (IST)

    art director nitin desai news : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे.जे.मध्ये

    आर्ट डायरेक्टर नितीन देसाई यांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे.जे. रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांनी नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवार यापूर्वीच जे.जे. रुग्णालयात आले होते.

  • 04 Aug 2023 08:49 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार नितीन देसाई यांच्या अंतिम दर्शनासाठी जे.जे रुग्णालयात दाखल

    उपमुख्यमंत्री अजित पवार नितीन देसाई यांच्या अंतिम दर्शनासाठी जे.जे रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर थोड्याचं वेळात शिंदे आणि फडणवीस देखील अंतिम दर्शनासाठी जे.जे रुग्णालयात दाखल होणार आहेत.

  • 04 Aug 2023 08:42 AM (IST)

    नाशिक शहरात पुन्हा बस सेवा ठप्प

    नाशिक शहरात पुन्हा बस सेवा ठप्प झाली आहे. सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने आजपासून पुन्हा संपाला सुरवात करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वारंवार वेतन थकत असल्याने कर्मचारी संपावर जात आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वीच संप झाल्यानंतर वेतन वेळेवर देण्याचे ठेकेदाराने आश्वासन दिले होते.

  • 04 Aug 2023 08:36 AM (IST)

    एडलवाईज कंपनीमुळे मानसिक त्रास झाल्याचा ऑडिओक्लिपमध्ये उल्लेख केला

    नितीन देसाईच्या ऑडिओक्लिपची माहिती टिव्ही ९ च्या हाती लागली आहे. एडलवाईज कंपनीमुळे मानसिक त्रास झाल्याचा ऑडिओक्लिपमध्ये उल्लेख केला आहे. एडलवाईज कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी कंपनीच्या सीईओंची चौकशी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

  • 04 Aug 2023 08:18 AM (IST)

    मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ, पोलिसांना संशय

    मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह सापडले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दीपक बिश्त (वय 25) आणि हरदेव सिंग (वय 26) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही हरियाणाचे रहिवासी आहेत, पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदन करून घेतले आहेत, पोलिसांनी सांगितले की त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या निशाण नाहीत. दोघांची ओळख आधार कार्डवरून झाली आहे. सध्या पोलीस त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधत आहेत. वर्सोवा पोलीस एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • 04 Aug 2023 08:12 AM (IST)

    पाणीसाठा झाला 79.70 टीएमसी

    कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 79.70 टीएमसी झाला आहे. धरणातून एकुण 2100 क्युसेक पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात 19297 क्युसेक पाणी आवक सुरु झाली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात, कोयना नगर परिसरात 50 मिलिमीटर, नवजा 116 मिलीमीटर, महाबळेश्वर 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

  • 04 Aug 2023 08:08 AM (IST)

    विनातिकीट प्रवास करणाऱ्या 20 हजार प्रवाशांवर कारवाई

    जूलै महिन्यात रेल्वेच्या पुणे विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 20 हजार प्रवाशांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत तब्बल 1 कोटी 53 लाख 43 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. 150 प्रवाशांकडून 15 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. विनातिकिट प्रवास न करण्याचं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे.

  • 04 Aug 2023 07:59 AM (IST)

    प्रसिद्ध कवी ना. धो. महानोर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, पळसखेडमध्ये होणार अत्यंसंस्कार

    प्रसिद्ध कवी ना. धो. महानोर यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी पळसखेड इथे सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याआधी महानोर यांच्या पळसखेड या गावातील पानकळा या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून महानोर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे.

  • 04 Aug 2023 07:41 AM (IST)

    कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

    प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्येच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. दोन दिवसांपूर्वी देसाई यांनी याच स्टुडिओत गळफास घेऊन जीवन संपवलं होतं.

  • 04 Aug 2023 07:32 AM (IST)

    धुळ्यातील लाटीपाडा धरण 100 टक्के भरलं, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

    धुळ्यातील साखरी तालुक्यातील लाटीपाडा धरण शंभर टक्के फूल भरलं आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या पिण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच शेतीच्या सिंचनाचा प्रश्नही सुटला आहे. विशेष म्हणजे मुसळधार पाऊस नसतानाही हे धरण भरलं आहे.

  • 04 Aug 2023 07:24 AM (IST)

    उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज नागपूर दौऱ्यावर, विद्यापीठाच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी

    उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज नागपूर दौऱ्यावर येत आहेत. विद्यापीठाच्या शताब्दी निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला धनखड हजेरी लावणार आहेत. तसेच राष्ट्रीय कर अकादमीच्या कार्यक्रमालाही हजेरी लावणार आहेत.

Published On - Aug 04,2023 7:20 AM

Follow us
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.