AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच, 20 जिल्ह्यातून 42 मंत्री, कोणत्या जिल्ह्यात कुणाची वर्णी लागणार?

26 दिवसांनी खातेवाटपानंतर आता पालकमंत्रीपदावरुन सत्ताधारी नेत्यांमध्ये दावेदारी रंगणार आहे. एकाच जिल्ह्यातून अनेकांना गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्यामुळे खात्यांनंतर आता पालकमंत्री कोण होतो? याचीही चढाओढ रंगेल.

पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच, 20 जिल्ह्यातून 42 मंत्री, कोणत्या जिल्ह्यात कुणाची वर्णी लागणार?
mahayuti
| Updated on: Dec 22, 2024 | 10:35 PM
Share

रायगडचा पालकमंत्री मीच होणार म्हणून शिंदे गटाच्या भरत गोगावलेंनी दावा केला आहे. नाशिकमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दादा भुसे मंत्री आहेत. यात पालकमंत्रीपदावर आपलाच दावा असल्याचं कोकाटेंनी म्हटलं आहे. भुसेंनी पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळायला हवं म्हणून आग्रह धरलाय. छत्रपती संभाजीनगरमधूनही भाजपचे अतुल सावे, शिंदेंकडून संजय शिरसाट मंत्री आहेत. पण पालकमंत्री आपणच होण्याचा दावा शिरसाटांनी केला आहे.

मंत्रि‍पद वाटपात एकाच जिल्ह्यात अनेक मंत्रीपदं आल्यामुळे पालकमंत्रीपदासाठी कुणाचा नंबर लागणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांमध्ये एकही मंत्री नाही. तर उर्वरित 20 जिल्ह्यातून 42 मंत्री झाले आहेत. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या फक्त तीनच जिल्ह्यातून उपमुख्यमंत्र्यांसह 10 मंत्री आहेत. जळगाव, धुळे आणि नाशिक या तीन जिल्ह्यातून 7 जणांची मंत्रीपदी वर्णी लागलीय. सातारा या एकच जिल्ह्यात ४. नागपूर-जळगाव-नाशिक-यवतमाळ-मुंबई-ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी 3, कोल्हापूर, संभाजीनगर, बीड, रायगड जिल्ह्यात प्रत्येकी 2 मंत्री आहेत.

बीडच्या परळीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोन्हींपैकी परळीचा पालकमंत्री कोण होणार? सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रीपदं मिळाल्यामुळे पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार? पुण्यात दोन्ही दादांपैकी कोणते दादा पालकमंत्री म्हणून कायम राहणार? या प्रश्नांवर अंतिम निर्णय वरिष्ठच घेतील म्हणून इतर सत्ताधारी नेत्यांनी म्हटलं आहे.

खातेवाटपात कुणाकडे कोणती खाती?

दरम्यान, खातेवाटपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे 5 खाती ठेवली आहेत. ज्यात गृह, ऊर्जा, न्याय, सामान्य प्रशासन आणि माहिती प्रसारण मंत्रालय आहे. तर एकनाथ शिंदेंकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम हे तीन पदं आहेत. अजित पवारांकडे अर्थ आणि उत्पादन शुल्क या दोन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

उर्वरित भाजप नेत्यांपैकी चंद्रशेखर बावनकुळेंना महसूल, राधाकृष्ण विखेंना जलसंपदा, चंद्रकांत पाटलांना उच्च व तंत्रशिक्षण, गिरिश महाजनांना जलसंपदा, मंगलप्रभात लोढांकडे रोजगार, जयकुमार रावलांना पणन, पंकजा मुंडेंना पर्यावरण, अतुल सावेंकडे ओबीसी विकास, अशोक उईकेंकडे आदिवासी विकास, आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान, शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम, जयकुमार गोरे ग्रामविकास, संजय सावकारे वस्रोद्योग, नितेश राणे मत्स्य बंदरे आणि आकाश फुंडकरांकडे कामगार खातं देण्यात आलंय.

शिंदेंच्या नेत्यांपैकी गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री, दादा भुसे शालेय शिक्षण, संजय शिरसाट सामाजिक न्याय, उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा, शंभुराज देसाई पर्यटन आणि खाण, संजय राठोड मृदा व जलसंधारण, प्रताप सरनाईक परिवहन, भरत गोगावले रोजगार हमी आणि प्रकाश आबिटकरांना आरोग्य मंत्री करण्यात आलंय.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दत्तात्रय भरणेंकडे क्रीडा आणि अल्पसंख्याक देण्यात आलाय. अदिती तटकरे महिला बालविकास मंत्री, माणिकराव कोकाटे कृषी, नरहरी झिरवाळ अन्न औषध प्रशासन, मकरंद पाटील मदत पुनर्वसन, धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा, बाबासाहेब पाटील सहकार, आणि हसन मुश्रीफांना वैद्यकीय शिक्षण मंत्री करण्यात आलंय.

राज्य मंत्र्यांमध्ये योगेश कदम ग्रामविकास राज्यमंत्री, आशिष जैस्वाल अर्थ/विधी, माधुरी मिसाळ सामाजिक न्याय, मेघना बोर्डीकर आरोग्य, इंद्रनील नाईक उच्च तंत्र शिक्षण आणि पंकज भोयरांना गृहनिर्माण विभागाचं राज्यमंत्री करण्यात आलंय. अधिवेशन काळात खातेवाटप झालं नसलं तरी आता मंत्री आपापल्या मतदारसंघात परतत असताना खातंही मिळाल्यामुळे नेत्यांचं जल्लोषात स्वागत होत आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.