Eknath Shinde : एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय घेणार, भाजपची धाकधूक वाढली ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मात्र नवे सरकार गठित होण्यास सतत विलंब होतोय. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गावी दरेगावात गेल्याने शुक्रवारी होणारी महायुतीची बैठक स्थगित करण्यात आली. शनिवार संध्याकाळपर्यंत शिंदे मोठा निर्णय घेऊ शकतात असं वक्तव्य शिवसेना संजय शिरसाट यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता रविवारी मुंबईत ही बैठक आयोजित केली जाऊ शकते.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय घेणार, भाजपची धाकधूक वाढली ?
एकनाथ शिंदेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 9:21 AM

महाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेबद्दला सस्पेन्स दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एकीकडे महायुतीचे नेते दिल्लीत अमित शाहांची भेट घेतात, मुंबईत महायुतीची बैठक आयोजित करण्यात येते. आणि दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री साताऱ्यातील त्यांच्या गावाता, दरेगावात गेल्याची बातमी समोर येते. यामुळे शुक्रवारची महायुतीची मोठी आणि प्रस्तावित बैठक स्थगित करण्यात आली. यानंतर नव्या चर्चांना उधाण आलं. त्यातच शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्या आगामी निर्णयाबद्दल संकेत देणारं एक वक्तव्य केलं. मुख्यमंत्री शिंदे यांना जेव्हा एखाद्या मोठ्या निर्णयावर विचारविनिमय करायचा असतो तेव्हा ते आपल्या गावी जातात, उद्या संध्याकाळपर्यंत ते मोठा निर्णय घेतील असं शिरसाट म्हणाले.

मात्र याच विलंबामुळे विधानसभा निवडणुकींचा निकाल जाहीर होऊन एक आठवडा उलटला तरी राज्यात अद्याप नवं सरकार स्थापन झालेलं नाही. शिवसेनेच्या सूत्रांच्या सांगण्यानुसार, शुक्रवारी स्थगित झालेली बैठक आका रविवारी मुंबईत आयोजित करण्यात येऊ शकते. तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यानुसार, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी ते केंद्रीय निरीक्षकांच्या येण्याची वाट पाहत आहेत.

दिल्लीत अमित शाहांशी चर्चा

एकनाथ शिंदे यांनी गुरूवाकी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन नव्या सरकारस्थापनेबाबत चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगत शुक्रवारी मुंबईतील बैठकीदरम्यान ही बोलणी पुढे जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र भाजपच्या सूत्रांच्या सांगण्यानुसार, शुक्रवारी महायुतीची कोणतीही बैठक होणार नव्हती. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नेत्यांनी अमित शाह आणि जेपी नड्डा यांची दिल्लीत भेट घेऊन सत्तावाटपावर चर्चा केली होती

शिंदे उपमुख्यमंत्री बनण्यास तयार नाहीत ?

नव्या सरकारमधील शिंदे यांच्या भूमिकेवरून शिवसेनेत मतभेद निर्माण होत आहेत. काही नेते शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा सल्ला देत आहेत. पण अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यावर आता ही भूमिका त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार नाही, असे काहींचे मत आहे. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही तर हे पद त्यांच्या पक्षातील अन्य कोणत्या तरी नेत्याकडे जाईल, असे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सांगितले.

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचं मत काय ?

नवीन सरकारमध्ये शिंदे यांची प्रमुख भूमिका असावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंभूराज देसाई म्हणाले. तर शिंदे रागावलेले नसून, प्रकृतीच्या कारणामुळे गावी गेल्याचे सामंत यांचे म्हणणे आहे. आता रविवारी बैठक झाली नाही तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढील आठवड्यात होऊ शकतो शपथविधी सोहळा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 132, शिवसेनेने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) 41 जागा जिंकल्या. नव्या सरकारचा शपथविधी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, सत्तावाटप आणि शिंदे यांच्या भूमिकेवरून सुरू असलेली धुसफूस यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. महायुतीच्या रविवारी होणाऱ्या प्रस्तावित बैठकीत या दिशेने मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.