Live Updates : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

| Updated on: Jan 17, 2023 | 7:39 AM

Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Live Updates : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंडमधील डाव्होस येथे वर्ल्ड इकॉनिमिक फोरमने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी रवाना. नेपाळ येथील विमान दुर्घटनेत चार भारतीयांचा मृत्यू. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Jan 2023 08:51 PM (IST)

    ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या सुनावणी

    नवी दिल्ली : 

    ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या सुनावणी

    सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार

    कोर्टाच्या कामकाजात प्रकरणाचा समावेश

    उद्या दुपारी बारा वाजता सुनावणी होण्याची शक्यता

  • 16 Jan 2023 08:50 PM (IST)

    पुण्यात सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

    – – पुण्यात सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

    – पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल

    – प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात फसवणूक आणि खंडणीचे अनेक कलम लावत गुन्हा

    – याप्रकरणी सुरज झवर या फिर्यादीने डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे

    – फर्यदिने चव्हाण यांच्या विरोधात एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार केली होती

    – याप्रकरणी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यासह डेक्कन पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे

  • 16 Jan 2023 06:55 PM (IST)

    शिवसेनेच्या नावाबाबत आणि पक्षाच्या नावाबाबत उद्या सुनावणी

    नवी दिल्ली :

    शिवसेनेच्या नावाबाबत आणि पक्षाच्या नावाबाबत उद्या सुनावणी

    केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होणार सुनावणी

    उद्या संध्याकाळी चार वाजता होणार सुनावणी

    ठाकरे गटाकडून अनिल देसाई निवडणूक आयोगात उपस्थित राहण्याची शक्यता

  • 16 Jan 2023 04:38 PM (IST)

    अमरावती पदवीधर निवडणूक

    एका जागेसाठी २३ उमेदवार रिंगणात

    शेवटच्या दिवशी १० उमेदवारांची माघार

    भाजप, माविआ, वंचित व आपचे उमेदवार रिंगणात

    भाजप आमदार व उमेदवार रणजीत पाटील, माविआचे धीरज लिंगाडे आणि वंचितचे अनिल अमलकार यांच्यात होणार लढत

    आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरवात

  • 16 Jan 2023 12:16 PM (IST)

    चाळीसगाव शहरात तरुणाचा खून, धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या

    चाळीसगाव शहरातील पोद्दार शाळेजवळ तरुणाचा निर्घृण खून झाल्याने एकच खळबळ उडाली

    तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला

    चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पंचनामा करुन गून्हा नोंद केला आहे

  • 16 Jan 2023 11:24 AM (IST)

    नाशिकमधील वणी येथून शेतकऱ्यांच्या बिऱ्हाड मोर्चाला सुरुवात

    वणी येथून पिंपळगाव बसवंत, चांदवड आणि मालेगावपर्यंत जाणार मोर्चा

    पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर निघणार मोर्चा

    शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी करणार या मोर्चाचे नेतृत्व

    राजू शेट्टी मोर्चात अग्रस्थानी सहभागी, खंडेरायाचे दर्शन घेऊन मोर्चा निघाला

  • 16 Jan 2023 10:08 AM (IST)

    भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक

    राजधानी नवी दिल्लीत भाजपची पोस्टरबाजी

    चौकाचौकात भाजपचे झेंडे आणि पदाधिकाऱ्यांचे पोस्टर्स लागले

    आज दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो

    देशभरातील भाजपचे पदाधिकारी आज राजधानी दिल्लीत एकवटणार

    संध्याकाळी 4 वाजता सुरू होणार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

  • 16 Jan 2023 08:45 AM (IST)

    भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल

    किरीट सोमय्या यांचं कोल्हापुरात जल्लोषात स्वागत

    सोमय्या घेणार महालक्ष्मीचं दर्शन

    राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडल्यानंतर सोमय्या पहिल्यांदाच कोल्हापुरात

  • 16 Jan 2023 08:02 AM (IST)

    पुण्यातील तळेगांव दाभाडे नगरपरिषदेची केवळ 29 टक्के कर वसुली

    कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर होणार कारवाई

    नगरपरिषदेला सर्व कराच्या माध्यमातून 43 कोटी 24 लाख इतकी कर वसुली होत होती

    मात्र यावर्षी केवळ 29 टक्के कर इतकी वसुली

    पुढील 3 महिन्यात 71 टक्के कर वसुली करण्याचे आव्हान नगरपरिषदे समोर

    ही थकबाकी वसूल करण्यासाठी नगरपरिषदे कडून 2 वसुली पथके निर्माण करण्यात आली

    50 हजारा पेक्षा अधिक थकीत कर असेल तर संबंधित करदात्याला नोटीस देण्यात येणार

    जर नोटीस देऊनही कर भरला नाही तर भविष्यात मालमत्तेची जप्ती अथवा लिलाव करण्यात येणार

    त्यामुळे शहरातील थकीत मालमत्ताधारकानी आपला थकीत कर लवकरात लवकर भरण्याच आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आलंय

  • 16 Jan 2023 07:27 AM (IST)

    वर्षभरात विदर्भात १ हजार ४४९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

    - वर्षभरात विदर्भात १ हजार ४४९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
    -  सर्वाधिक १ हजार ११० आत्महत्या अमरावती विभागात
    - यापैकी ६८३ आत्महत्या पात्र ठरल्या असून ४८० आत्महत्या अपात्र
    -  २८६ शेतकरी आत्महत्या चौकशी करिता अजूनही प्रलंबित
    - ओला दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे वाढल्या शेतकरी आत्महत्या
  • 16 Jan 2023 06:32 AM (IST)

    चंद्रपूर शहरातील बाबूपेठ, लालपेठ आणि नांदगाव परिसरात जाणवले भूकंप सदृश्य धक्के

    रात्री अंदाजे 9:30 च्या दरम्यान जाणवले भूकंप सदृश्य धक्के

    अंदाजे 2 किलोमीटर भागामध्ये हा प्रभाव जाणवल्याने या घटनेची कुठल्याच भूकंप मापक यंत्रात नोंद नाही

    तज्ज्ञांच्या मते हे धक्के वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) च्या भूमिगत खदनींमध्ये अंतर्गत भूस्खलन झाल्याने बसल्याची शक्यता

    प्रशासन सध्या या घटनेनंतर कारणांचा घेत आहे शोध

  • 16 Jan 2023 06:28 AM (IST)

    जळगावच्या धरणगावमध्ये संक्रांती सणाला गालबोट

    धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने 10 वर्षीय बालकाचा मृत्यू

    अक्षय संजय महाजन असे मृत बालकाचे नाव

    अक्षय हा गावाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत पतंग उडवत होता

    मात्र तोल गेल्याने जवळच असलेल्या विहिरीत पडून मृत्यू

  • 16 Jan 2023 06:25 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर

    त्यानिमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना व भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक

    प्रमुख नेतेमंडळीच्या उपस्थितीत काल बैठक संपन्न

    या बैठकित शक्तीप्रदर्शन करण्यात येणार, त्यादृष्टीने नियोजन होणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या विकास कामांचे उद्घाटन होणार आहे, त्या विविध विकास कामांचा आढावाही या बैठकित घेण्यात आला

  • 16 Jan 2023 06:17 AM (IST)

    अन्न धान्याचे दर स्थिर राहतील, मात्र नैसर्गिक संकटाची शक्यता वर्तविली

    ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील भाकणुकीतील भाकीत

    ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेमध्ये भाकणुकीचा विधी महत्त्वाचा मानला जातो

    यंदाच्या वर्षी वासराने सुरुवातीलाच बिथरून विचित्र आवाज काढल्याने नैसर्गिक संकटाची शक्यता आहे.

    यापूर्वी 1993 साली वासरू अशाच प्रकारे बिथरले होते तेव्हा लातूरच्या किल्लारी येथे भूकंप झाल्याचा इतिहास आहे

    त्याचबरोबर वासराने सुरवातीलाच मल-मूत्र विसर्जन केले, त्यामुळे यंदाच्या वर्षी भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे

    दरम्यान वासरासमोर गूळ, गाजर, बोरं, खोबरं, खारीक, पान, सुपारी आणि विविध प्रकाराचे धान्य ठेवण्यात आले

    मात्र वासराने कशालाच स्पर्श केले नाही. यावरुन सर्वच वस्तूंच्या किमती स्थिर राहतील

    सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी हिरेहब्बू यांनी याबाबत भाकीत केले

  • 16 Jan 2023 06:13 AM (IST)

    नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरात प्रथमच बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलंय

    या धम्म परिषदेला जिल्ह्यातील हजारो बौद्ध अनुयायांनी हजेरी लावलीय

    यावेळी काढण्यात आलेल्या धम्म रॅलीमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या

    त्यानंतर उपस्थित नामवंत भिक्खू संघाने बौद्ध बांधवांना धम्म देसना दिलीय

Published On - Jan 16,2023 6:11 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.