Maharashtra Breaking News Live : उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी उर्दूतून बॅनर

| Updated on: Mar 26, 2023 | 6:14 AM

Maharashtra Breaking News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी उर्दूतून बॅनर
Maharashtra Breaking NewsImage Credit source: tv9 marathi

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर आता काँग्रेसच्या सर्वच खासदारांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा घेतला आहे. त्यामुळे भाजपची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याचे आज देशभरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ. बागेश्वर बाबा विरोधात उदयपूरमध्ये गुन्हा दाखल. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Mar 2023 07:52 PM (IST)

    सोन्याची शुद्धता कशी पारखाल

    ही आहे खऱ्या सोन्याची ओळख, आता झाले आणखी सोपे

    हॉलमार्किंगचे जाणून घ्या कसब, लागलीच पकडाल नकली सोने,

    तुमची फसवणूक टाळण्यासाठी सरकारचे महत्वपूर्ण पाऊल

    काय आहे हॉलमार्किंग, कसा होईल तुम्हाला फायदा, वाचा बातमी 

  • 25 Mar 2023 07:29 PM (IST)

    पुण्यात पुरुष मंडळींचं अनोखं आंदोलन

    पुणे :

    पुण्यात पुरुष मंडळींचं अनोखं आंदोलन

    स्त्रियांसारखा समान कायदा आम्हालाही द्या, या मागणीसाठी पुण्यात पुरुष मंडळी बसले आंदोलनाला

    सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या वैवाहिक बलात्कार विरोधात पुरुषांच्या हक्कासाठी आंदोलन सुरू

    अनेक कायदे हे फक्त महिलांच्या बाजूने, पुरुषांचा देखील विचार व्हावा, आंदोलनकर्त्या पुरुषांची मागणी

    आंदोलनकर्त्या पुरुषांकडून ट्विटरचे सर्वासर्वे Elon Musk यांची पूजा आणि आरती

    पुरुषांना न्याय देण्याची पुरुषांचीच मागणी

    आंदोलकांचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र

  • 25 Mar 2023 07:28 PM (IST)

    चंद्रशेखर बावनकुळे उद्या पुन्हा बारामती दौऱ्यावर

    पुणे :

    - मिशन बारामतीला बळ देण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे उद्या पुन्हा बारामती दौऱ्यावर,

    - बारामती,इंदापूर आणि कर्जत जामखेडमध्ये बावनकुळे करणार 52 भाजप शाखांचे उदघाटन,

    - तर उद्या संध्याकाळी 5 वाजता बावनकुळे यांची इंदापूरात जाहीर सभा,

    - पवारांच्या बारामतीत आणि रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघावर भाजपचे विशेष लक्ष

  • 25 Mar 2023 07:27 PM (IST)

    संजय राऊत यांची मुस्लिम बांधवांशी चर्चा

    मालेगाव :

    संजय राऊत यांची मुस्लिम बांधवांशी चर्चा

    शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष युसूफ भाई नॅशनल वाले यांच्या घरी दिली भेट

    उद्याच्या सभेच्या पार्शवभूमीवर चर्चा

    पावर लूम संदर्भातील विषयांवर केली चर्चा

    भिवंडी आणि मालेगावमधील पावर लूम व्यवसाया संदर्भात चर्चा

  • 25 Mar 2023 06:54 PM (IST)

    हा गोड आवाज करेल घात, आला आता पॅनकार्ड स्कॅम

    हा गोड आवाज करेल घात, आला आता पॅनकार्ड स्कॅम

    मुलगी करेल कॉल, विचारेल पॅनकार्ड आणि इतर माहिती

    त्यानंतर तुमचे बँक अकाऊंट होईल एकदम साफ

    कसा केला जातो हा फ्रॉड, कशी होते फसवणूक, वाचा बातमी 

  • 25 Mar 2023 06:02 PM (IST)

    करदात्यांना लागली लॉटरी

    ऑडिटनंतर मिळणार 41104 रुपये

    केंद्र सरकारने दिली मोठी अपडेट, मिळणार का रुपये

    तुम्हाला आला की नाही ई-मेल, प्रकरण नेमकं आहे तरी काय

    सत्यता कोण तपासणार, खरे-खोटेपणा तपासा, वाचा बातमी 

  • 25 Mar 2023 05:08 PM (IST)

    मुकेश अंबानी यांची ही मुलाखत झाली व्हायरल

    आशियातील सर्वात धनाढ्य व्यक्तीचा किस्सा व्हायरल

    यांच्या खिशात कधीच नसतो पैसा

    कधीच नाही वापरत क्रेडिट कार्ड

    व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय

    पैशाच्या महत्वाविषयी सांगितली ही बाब

  • 25 Mar 2023 03:35 PM (IST)

    उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मालेगावमध्ये उर्दूत बॅनर

    उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मालेगावमध्ये उर्दूत बॅनर

    भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी कठोर शब्दात केली टीका

    तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरेंना मौलवीकडे जाऊन उद्धवोद्दिन ठाकरे असे नामकरण करण्याचा दिला सल्ला

  • 25 Mar 2023 02:58 PM (IST)

    कालीचरण महाराजांनी राज ठाकरे यांचे केले कौतूक

    अध्यात्मिक गुरु कालीचरण महाराज यांनी सोलापुरातील रूपा भवानी देवीचे दर्शन घेतले

    देवीच्या दर्शनानंतर कालीचरण महाराजांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे.

    राज ठाकरे जसजसे हिंदूंचे मुद्दे उचलत राहतील त्यामुळे त्यांना हिंदूंचा सपोर्ट प्राप्त होईल

  • 25 Mar 2023 02:22 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

    आज आणि उद्या असा दोन दिवसांचा राज ठाकरे यांचा पुणे दौरा

    ठाकरेंचा दौरा खाजगी असला तरी उद्या पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक घेण्याची शक्यता

    पुण्यात पुणेश्वर आणि नारायणेश्वर मंदिरावरून मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे

  • 25 Mar 2023 02:01 PM (IST)

    नवी मुंबईतील दर्ग्याविषयी मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे आक्रमक

    नवी मुंबई : दर्गा हा पामबीच मार्गावर असलेल्या मरीन नेव्ही युनिव्हर्सिटी असलेल्या चाणक्या इमारतीच्या पाच मिनिटांच्या अंतरावर नेरुळकडे जाणाऱ्या मार्गावर उभारण्यात आला आहे.

    पामबीचला लागून या दर्गाकडे जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे.

    त्याठिकाणी नमाज पठण केला जातो. अनेक मुस्लिम बांधव त्याठिकाणी येतात.

    शेजारी कांदळवन, समुद्रकिनारा आणि समोर करावे गाव आहे

    याबाबत मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी सिडको, वन, मेरीटाईम बोर्डा, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे चौकशी करण्याची मागणी केली

  • 25 Mar 2023 12:21 PM (IST)

    सोलापूर शहरातील कोरोना रुग्ण संख्येत वाढ, रुग्णसंख्या पोहोचली 35 वर

    काल एकाच दिवशी 9 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यातील 5 पुरुष तर 4 स्त्री रुग्ण

    113 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यातील 104 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले तर 9 कोरोना पॉझिटिव्ह आढळले

    दाराशा हॉस्पिटल, जिजामाता रुग्णालय, मुद्रा सनसिटी, रामवाडी, साबळे नगर, सोरेगाव नागरी आरोग्य केंद्राच्या हद्दीत हे रुग्ण आढळले

    कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

    नागरिकांनी मास्क वापरावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे

    ज्यांनी अद्यापपर्यंत पहिला, दुसरा आणि बुस्टर डोस घेतला नाही त्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले

  • 25 Mar 2023 12:17 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर, वसंत मोरे यांच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी

    वसंत मोरेंच्या डॉग पाँड उद्घाटन कार्यक्रमाला लावणार हजेरी

    गेल्या आठवड्यात राज ठाकरेंनी वसंत मोरेंना 26 तारखेची दिली होती वेळ

    उद्या सकाळी 10 वाजता राज ठाकरे पुण्यात

    मनसेनं पुण्यातील दर्ग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यातचं राज ठाकरेंचा उद्या पुणे दौरा होतोय

  • 25 Mar 2023 12:10 PM (IST)

    अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार

    पुण्येश्वर मंदिरासंदर्भात एका महिन्याच्या आत कारवाई करा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार

    पुण्येश्वर मंदिराच्या कारवाई संदर्भात मनसेचा राज्य सरकारला एका महिन्याचा अल्टीमेटम

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा पोटनिवडणूकीत पुण्येश्वर मंदिराच्या घोषणा दिल्या होत्या

    या घोषणा राजकीय न राहता त्यावर थेट कारवाई व्हावी, मनसेची मागणी

  • 25 Mar 2023 12:02 PM (IST)

    राहुल गांधीवरील कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक

    कल्याण : डोक्याला काळ्या फिती लावून नारेबाजी करत रस्ता रोको आंदोलन,

    अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

  • 25 Mar 2023 11:21 AM (IST)

    राहुल गांधींची खासदारकी रद्द, पुण्यात काँग्रेसच आंदोलन

    पुण्यात काँग्रेसचं आंदोलन

    राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक

    केंद्र सरकारच्या विरोधात पुणे शहर काँग्रेसच आंदोलन

    केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसची सह्यांची मोहीम

    पुण्यातील एम. जी रोड परीसरात काँग्रेसचं आंदोलन

  • 25 Mar 2023 11:16 AM (IST)

    महाविकास आघाडीची जनता चौकामध्ये भाजपा व मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने

    महाविकास आघाडीची जनता चौकामध्ये भाजपा व मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने

    राहुल गांधी यांचे खासदारकी पद रद्द केल्यामुळे जोरदार निदर्शने

    काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे शिवसेना गट आक्रमक

    भाजप सरकार सूडबुद्धीने वागत आहे येणाऱ्या 20 24 च्या निवडणुकीमध्ये भाजपाला जनता धडा शिकवेल

  • 25 Mar 2023 11:07 AM (IST)

    NPS करणार ज्येष्ठ नागरिकांना मालामाल

    काय आहे केंद्र सरकारचा तगडा प्लॅन

    जुनी पेन्शन योजनेसाठी आग्रही कर्मचाऱ्यांना गिफ्ट

    मोदी सरकार खेळणार इलेक्शन कार्ड

    नवीन पेन्शन योजना होणार अधिक आकर्षक

    अनेक गोष्टींचा होणार समावेश

    पण मोदी सरकार तिजोरीवर ही पडू नाही देणार मोठा भार, वाचा बातमी 

  • 25 Mar 2023 10:51 AM (IST)

    राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, विरोधकांचे तोंडाला काळ्यापट्ट्या लावून विधानभवनाच्या पायरीवर आंदोलन

    केंद्र सरकारच्या निषेधार्थ विरोधकांचे तोंडाला काळ्यापट्ट्या लावून आंदोलन

    हातात फलक घेऊन केला केंद्र सरकारचा निषेध

    विरोधकांची मुस्कटदाबी होतेय, देशात हुकूमशाही असल्याचा आरोप

    राहुल गांधी यांची काल खासदारकी रद्द झालीय, त्यामुळे विरोधक आक्रमक

  • 25 Mar 2023 10:41 AM (IST)

    लोकप्रतिनिधी कायद्याला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात

    नवी दिल्ली

    लोकप्रतिनिधी कायद्याला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात

    लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील अनुच्छेद 8 मधील तरतुदीविरोधात याचिका दाखल

    याच कायद्यामुळे आमदार, खासदारांचे पद धोक्यात

    राहुल गांधी यांच्या निलंबनानंतर सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

    पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता

  • 25 Mar 2023 10:41 AM (IST)

    नदी प्रदूषणाविरोधात सांगलीकर रस्त्यावर

    कृष्णा नदीचे पाणी सतत प्रदूषण होत आहे. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये सांडपाणी आणि कारखान्यांचे दूषित पाणी सतत सोडत असल्यामुळे कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. आणि त्याला विरोध करण्यासाठी आज सर्व सांगलीकर रस्त्यावर उतरून मानवी साखळी करत आहे.

  • 25 Mar 2023 10:10 AM (IST)

    कोल्हापूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ

    कोल्हापूर शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट

    एकाच रात्रीत शेकडो पाणी मीटर चोरीला

    शिवाजी पेठ, मिरजकर टिकटी, कदमवाडी सह उपनगरातील मीटर चोरीला

    कुलूप बंद घराच्या दारातील पाणी मीटर चोरट्यांनी केले लक्ष

    एकाच रात्रीत शेकडो पाणी मीटर चोरीला गेल्यान आश्चर्य

    पाणी मीटर चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशय

  • 25 Mar 2023 09:53 AM (IST)

    मुंबई आणि सांगलीनंतर आता पुण्याच्या दर्ग्याबाबत मनसे आक्रमक

    पुण्यात दर्ग्याबाबत आज मनसेची पत्रकार परिषद

    पुण्येश्वर, नारायणेश्वर आणि शनिवार वाडा परिसरात दर्ग्याचे अनाधिकृत बांधकामाचा आरोप

    मनसेच्या आरोपानंतर मंदिर परिसरात पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त

  • 25 Mar 2023 09:30 AM (IST)

    डॉलर नीच्चांकावरुन पुन्हा वधारला

    सात आठवड्यानंतर डॉलर झाला मजबूत

    आंतरराष्ट्रीय बाजारात काय झाला बदल

    सोने-चांदीवर आता काय होणार परिणाम

    आज सकाळच्या सत्रात सोन्याचा भावात वाढ

    चांदीही लवकरच मोडणार यापूर्वीचा रेकॉर्ड, वाचा बातमी 

  • 25 Mar 2023 08:59 AM (IST)

    नवी मुंबईच्या वाशी खाडीकिनारी पुन्हा एकदा फ्लेमिंगोच दर्शन

    नवी मुंबई : शहरात अनेक ठिकाणी पाणथळे आहेत त्या ठिकाणी फ्लेमिंगो आपल्याला पाहायला मिळत आहे,

    मात्र वाशी खाडी किनाऱ्यावर हजाराचे संख्येने फ्लेमिंगो पक्षी पाहायला मिळत आहे.

  • 25 Mar 2023 08:43 AM (IST)

    कच्चा तेलात पुन्हा घसरण

    रशियाने कच्चा तेलाचे उत्पादन घटवले

    इंधनाच्या किंमती भडकल्या नाहीत

    अमेरिकेतील, युरोपातील घडामोडींमुळे घसरण सुरुच

    देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काय झाला बदल, बातमी एका क्लिकवर

  • 25 Mar 2023 08:33 AM (IST)

    पुण्यात पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिरांचा मुद्दा चर्चेत

    पुण्यात पुन्हा एकदा पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांचा मुद्दा चर्चेत

    मंदिर परिसरात अनधिकृत मस्जिदचं बांधकाम केलं जात असल्याचा मनसेचा आरोप

    मनसे सरचिटणीस अजय शिंदे आज पत्रकार परिषद घेणार

    मनसेच्या आरोपानंतर मंदिर परिसरात पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त

    पत्रकार परिषदेत शिंदे कागदपत्रांसह पुरावे मांडणार

  • 25 Mar 2023 08:17 AM (IST)

    पुण्यात पुन्हा एकदा पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांचा मुद्दा चर्चेत

    - पुण्यात पुन्हा एकदा पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांचा मुद्दा चर्चेत,

    - मंदिर परिसरात अनधिकृत मस्जिदचं बांधकाम केलं जात असल्याचा मनसेचा आरोप,

    - यासंदर्भात मनसे सरचिटणीस अजय शिंदे आज पत्रकार परिषद घेणार,

    - मनसेच्या आरोपानंतर मंदिर परिसरात पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त,

    - पत्रकार परिषदेत शिंदे कागदपत्रांसह पुरावे मांडणार,

    - राज्य सरकारने या ठिकाणी उत्खनन करावं, मनसेची मागणी

  • 25 Mar 2023 07:52 AM (IST)

    आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी (25 आणि 26 मार्च) कार्यालय सुरू ठेवण्याचे निर्देश

    प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले निर्देश

    कर्मचाऱ्यांनी 14 ते 20 मार्च या कालावधीत केलेल्या संपामुळे आर्थिक कामकाज झाले होते ठप्प,

    राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुंबईच्या शिक्षण निरीक्षकांना या संदर्भातील सूचना गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या

    आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मंजूर तरतूद, पूरक मागणीपत्राद्वारे मंजूर तरतूद आणि सुधारित अंदाजपत्रकामध्ये नमूद केलेली तरतूद 100 टक्के उपलब्ध होणार

  • 25 Mar 2023 07:51 AM (IST)

    बेकायदा गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला

    मावळ,पुणे

    -पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्यावर शिरगाव परंदवडी पोलिसांची मोठी कारवाई,बेकायदा गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला

    -टेम्पोत 5 टन गोमांस,हा टेम्पो सांगलीवरून मुबंईकडे जात असताना एका सजग नागरिकाच्या लक्ष्यात हा प्रकार येताच त्याने उर्से टोलवर तैनात पोलीसांना ही बाब सांगताच पोलिसांनी टेम्पो चालकाला हटकले असता गोमांस मुंबईला विक्रीसाठी घेऊन जात असल्याचं उघड झालंय

  • 25 Mar 2023 07:49 AM (IST)

    तीन लाख महिलांचा पन्नास टक्के सवलतीत प्रवास

    एका आठवड्यात तीन लाख महिलांचा पन्नास टक्के सवलतीत प्रवास

    २३ मार्चपर्यंत एसटीच्या पुणे विभागात एकूण ३ लाख १० हजार १३८ महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला

    यातून एसटी महामंडळाला ८९ लाख १४ हजार १३८ रुपयांचे उत्पन्न मिळाले

    १७ मार्चपासून महिला सन्मान योजना कार्यान्वित करण्यात आली आहे

  • 25 Mar 2023 07:42 AM (IST)

    एप्रिल महिन्यात नाशिक जिल्हा सहकारी बँकेकडून मिळणार पीककर्ज

    नाशिक : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपये अल्प मुदतीचे कर्ज मिळणार,

    सन 2022-23 या हंगामात जिल्हा बँकेला 515 कोटींचे होते कर्ज वितरण लक्ष्यांक,

    त्यातील जवळपास 80 टक्के पीककर्ज वाटप केल्याचा जिल्हा बँकेचा दावा.

  • 25 Mar 2023 07:41 AM (IST)

    आरटीई अंर्तगत राज्यातील राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्ज करण्याची मुदत आज संपणार

    पुणे : प्रक्रियेत आतापर्यंत ३ लाख ५३ हजार ६७२ अर्ज दाखल,

    या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती,

    पालक आणि संघटनांच्या मागणीमुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने अर्जांसाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती.

  • 25 Mar 2023 07:16 AM (IST)

    राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक

    राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक

    केंद्र सरकारच्या विरोधात पुणे शहर काँग्रेस आज आंदोलन करणार

    शिवाय सरकारच्या विरोधात सह्यांची मोहीम राबवणार

    काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

  • 25 Mar 2023 06:30 AM (IST)

    धारावी पोलीस ठाण्यातील पीआय विजय माने एसीबीच्या जाळ्यात

    40 हजारांची लाच घेताना एसीबीने केली रंगेहाथ अटक

    गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी मागितला होता आयफोन किंवा एक लाख

    एसीबीने सापळा कारवाई करत त्यापैकी 40 हजार स्वीकारताना केली रंगेहाथ अटक

  • 25 Mar 2023 06:28 AM (IST)

    आरटीई प्रवेश अर्जासाठी आज शेवटचा दिवस

    शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्ज करण्याची मुदत आज संपणार

    आतापर्यंत 3 लाख 53 हजार 672 अर्ज दाखल

    प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी 17 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती

    तांत्रिक अडचणींमुळे काही पालकांना अर्ज करता न आल्याने, कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने अर्ज करता आला नाही.

    त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने अर्जांसाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली

  • 25 Mar 2023 06:26 AM (IST)

    देशात जुन्नर वनविभागात सर्वांत जास्त बिबट्यांची संख्या

    आंबेगाव तालुक्‍यातील मंचर विभाग आणि शिरूर तालुक्‍याचा पश्‍चिम भाग येथे बिबट्यांची संख्या वाढली

    जुन्नर वनविभागाचे उपसंरक्षक अमोल सातपुते यांची माहिती

    बिबट्याची संख्या वाढली असल्याचे निदर्शनास आल्यामुळे बिबट्यांचा हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ

  • 25 Mar 2023 06:25 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात लम्पी स्कीनची नुकसानभरपाई 31 मार्चपर्यंत मिळणार

    लम्पी आजारामुळे जिल्ह्यातील 1 हजार 226 पशुधनांचा आतापर्यंत मृत्यू

    त्यामध्ये 682 गाई, 161 बैल आणि 163 वासरांचा समावेश

    यापैकी सुमारे 700 पशुधन मालकांना मोठे पशुधन 30 हजार रुपये आणि लहान पशुधनसाठी 16 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली

  • 25 Mar 2023 06:20 AM (IST)

    केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ

    केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला आहे

    केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीला मंजुरी

    ही वाढ जानेवारी 2023 पासून म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे

    महागाई भत्तावाढीमुळे केंद्रावर दरवर्षी 12,815 कोटींचा बोजा पडणार

    वाढीव महागाई भत्त्याचा 47.58 लाख कर्मचारी आणि 69.76 निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार

Published On - Mar 25,2023 6:14 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.