Maharashtra Breaking News Live : सोलापुरात युवक काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

| Updated on: Mar 28, 2023 | 7:33 AM

Maharashtra Breaking News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : सोलापुरात युवक काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक
Maharashtra Breaking News Image Credit source: tv9 marathi

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट आजपासून तीन दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याच्या निषेधार्थ आजही देशभर काँग्रेस निदर्शने करणार. ठाकरे गटातील उरलेले लोकही शिवसेनेत प्रवेश करणार, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा दावा. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Mar 2023 05:56 PM (IST)

    नवी दिल्ली : राहुल गांधी यांना बंगला खाली करण्याचे आदेश

    राहुल गांधी यांना बंगला खाली करण्याचे आदेश

    तुघलक 12 लेनचा बंगला खाली करावा लागणार

    राहुल गांधी यांची खादसदारकी रद्द झाल्यानंतर बंगला खाली करण्याचे आदेश

    लोकसभा हाऊस कमिटीने बंगला खाली करण्याची नोटीस काढली

  • 27 Mar 2023 05:28 PM (IST)

    शिंदे-फडणवीसांच्या आरोपांना चंद्रकांत खैरेचं उत्तर

    आमची शिवसेनेची भूमिका उध्दव ठाकरे यांनी मांडली आहे

    पण यात भाजप आणि एकनाथ शिंदे हे राजकारण करत आहेत.

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या म्हणायचे पण यांनी सावरकरांना भारतरत्न दिला नाही आणि हे काय आता प्रेम दाखवतात

    हे दोघेही बडबड करत आहेत

  • 27 Mar 2023 05:00 PM (IST)

    ऐरोली येथील साई केअर सेंटर येथील वृद्धास केअर टेकर कडून मारहाण

    हा व्हिडिओ नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे

    या साई केअर सेंटरमध्ये ही धक्कादायक घटना समोर येत आहे

  • 27 Mar 2023 04:20 PM (IST)

    चंद्रकांत पाटील अजूनही माझ्यावर नाराज आहेत- आमदार रविंद्र धंगेकर

    आज बैठकीत चंद्रकांत पाटलांनी माझ्याकडे पाहिलंच नाही

    आजच्या बैठकीत आमदारांना निमंत्रण होणं मात्र भाजपचे पदाधिकारी याला उपस्थित होते

    जर बैठक भाजपची घ्यायची होती तर मग आम्हाला का बोलावलं

    गणेश बीडकर बैठकीत येऊन अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत होते

    मग आमदार म्हणून आमचं काय आहे की नाही

    म्हणून मी बैठकीतून निघून आलो

    आमदार रविंद्र धंगेकरांची प्रतिक्रिया

  • 27 Mar 2023 03:32 PM (IST)

    डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकांना पालिकेकडून जप्तीच्या नोटीसा

    वारंवार नोटीस पाठवून उद्योजकांनी भूखंड मालमत्ता कर न भरल्याने पालिकेने धाडली अंतिम जप्तीची नोटीस

    पालिकेच्या नोटीशीनंतर उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण

    पूर्वी ग्रामपंचायतीकडून उद्योजकांच्या भूखंडांना कमी कर लावला जात होता, मात्र पालिकेमध्ये गावे समाविष्ट करण्यात आल्यानंतर महापालिकेकडून शंभरपट कर लावले जात असल्याचा संघटनेचा आरोप

    उद्योजकांना दिलासा देणारी कर दुरुस्ती प्रणाली महापालिकेच्यावतीने करण्यात यावी असे सांगत उद्योजकांच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन

    वारंवार संबंधित कंपनी चालकांना कर भरण्याच्या आव्हान करून नोटीस बजावले असून यावर कंपनीकडून कुठल्याच प्रकारे कर भरत नसल्याने ही जप्तीची नोटीस काढली असल्याचं सूत्रांनी सांगितलं

  • 27 Mar 2023 03:30 PM (IST)

    अंबरनाथच्या ज्वेलर्स व्यापाऱ्याला लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी

    20 हजार रुपये न दिल्यास मुलीचं अपहरण करू

    मुलीचं अपहरण केल्यास 20 लाख रुपये द्यावे लागतील!

    शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

    फ्रॉड कॉल असल्याचं पोलिसांकडून स्पष्टीकरण

  • 27 Mar 2023 03:27 PM (IST)

    सोलापुरात युवक काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

    राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधींच्या समर्थनार्थ दुग्धाभिषेक

    सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने हा दुग्धाभिषेक करण्यात येत आहे

    असंख्य काँग्रेस कार्यकर्ते एकवटले

  • 27 Mar 2023 02:20 PM (IST)

    अंबरनाथच्या ज्वेलर्स व्यापाऱ्याला लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी

    अंबरनाथच्या ज्वेलर्स व्यापाऱ्याला लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी

    २० हजार रुपये न दिल्यास मुलीचं अपहरण करू

    मुलीचं अपहरण केल्यास २० लाख रुपये द्यावे लागतील!

    शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

    फ्रॉड कॉल असल्याचं पोलिसांकडून स्पष्टीकरण

  • 27 Mar 2023 12:44 PM (IST)

    नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी निलंबन प्रकरण

    29 मार्चला काँग्रेसची पत्रकार परिषद

    देशभरात काँग्रेस पक्ष घेणार पत्रकार परिषद

    हायकमांड कडून राज्यातील नेतृत्वांना पत्रकार परिषदा घेण्याचे आदेश

    29 तारखेला एकाच वेळी देशभरात काँग्रेस पत्रकार परिषदा घेणार

  • 27 Mar 2023 12:21 PM (IST)

    कोल्हापुरात छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी

    कोल्हापूर : कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस,

    आमदार सतेज पाटील शक्ती प्रदर्शनासह समर्थकांचे अर्ज दाखल करण्यासाठी आले,

    आमचं ठरलंय आता कंडका पाडायचा,

    म्हणत सतेज पाटलांनी महाडिक गटाला दिलं थेट आव्हान,

    28 वर्ष छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना हुकुमशाही पद्धतीने चालला आहे,

    सतेज पाटील यांचा माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर घणाघात.

  • 27 Mar 2023 11:48 AM (IST)

    इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील वादात तृप्ती देसाईंची उडी

    इंदुरीकरांविरोधात पुन्हा एकदा तृप्ती देसाई मैदानात.....

    तृप्ती देसाईची इंदुरीकर महाराजांवर टीका

    महिला आपल्यापुढे गेलेली बघवत नाही म्हणूनच इंदुरीकरांची गौतमी पाटीलवर टीका

  • 27 Mar 2023 11:32 AM (IST)

    पुण्यात काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन

    राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ सत्याग्रह आंदोलन

    स्वारगेट चौक येथे काँग्रेस कार्यकर्ते बसले आंदोलनाला

    दुपारी दोन वाजेपर्यंत काँग्रेस करणार सत्याग्रह आंदोलन

  • 27 Mar 2023 11:20 AM (IST)

    लक्षद्वीपच्या खासदारांबाबत आज सुनावणी

    लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैझल यांच्या याचिकेवर उद्या होणार सुनावणी

    लोकसभा सचिवालयाने अजूनपर्यंत निलंबन मागे घेतल्याची घोषणा न केल्याने याचिका

    हायकोर्टाच्या स्थगितीनंतरही लोकसभा सचिवालयाकडून अध्यादेश नाही

  • 27 Mar 2023 11:09 AM (IST)

    संसदेत विरोधी पक्ष नेत्यांची बैठक सुरू

    सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात

    काँग्रेस सह विरोधी पक्षातील खासदारांनी काळे कपडे परिधान करून केला संसदेत प्रवेश

  • 27 Mar 2023 11:09 AM (IST)

    नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील विरूद्ध निलेश लंके छुपा संघर्ष

    पुणे : माझी कामं कोणी अडवली हे सगळ्यांना माहिती आहे,

    मी हट्टि माणूस आहे एकदा जोपर्यंत निवीदा निघत नाही तोपर्यंत मी उठणार नाही,

    माझी 29 कोटी रुपयांची कामं अडवली आहे,

    राज्यातील सरकार जाड कातडीचं सरकार आहे,

    माझ्या मतदारसंघातील बंधाऱ्यांची कामांची निवीदा काढा,

    मंजूर कामं आहेत मात्र स्थगिती दिली आहे,

    निलेश लंके आज शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार.

  • 27 Mar 2023 11:04 AM (IST)

    नवी दिल्ली | थोड्याच वेळात संसदेचे अधिवेशन

    अधिवेशनापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांच्या वेगवेगळ्या बैठका

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सत्ताधारी गटाची बैठक सुरू

    मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत विरोधी पक्ष नेत्यांची बैठक

  • 27 Mar 2023 10:37 AM (IST)

    कोरोना बाबत 10 आणि 11 एप्रिलला देशव्यापी मॉक ड्रिल

    नवी दिल्ली : आरोग्य यंत्रणांचा आढावा केंद्र सरकारकडून घेतला जाणार,

    केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी बोलावली बैठक,

    आज संध्याकाळी देशातल्या सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांशी आणि अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार बैठक,

    मॉकड्रिल पूर्वी कोरोना बाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार.

  • 27 Mar 2023 10:31 AM (IST)

    शिवसेनेसंदर्भात मोठी बातमी

    सुप्रीम कोर्टात जोपर्यंत पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण सुरू आहे

    तोपर्यंत ठाकरेंना केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेलं पक्षाचं नावं आणि चिन्ह वापरता येणार

    सुप्रीम कोर्टानं तशी मान्यता दिली आहे

    अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मशाल चिन्ह शिवसेनेला देण्यात आलं होतं

    त्याची मुदत आज संपत आहे मात्र

    कोर्टाच्या अंतिम निर्णयापर्यंत नावं आणि चिन्ह ठाकरेंना वापरता येणार

    विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती

  • 27 Mar 2023 09:58 AM (IST)

    WPL 2023 Purple Cap Winner : धावांची कसर विकेटने भरुन काढली, फायनलमध्ये घातला धुमाकूळ, बनली बॉलिंग क्वीन

    WPL 2023 Purple Cap Winner : WPL 2023 मध्ये भारतीय महिला गोलंदाजांची कामगिरी कशी होती? ते सुद्धा जाणून घ्या.

  • 27 Mar 2023 09:58 AM (IST)

    शारजाहमध्ये पाकिस्तानची लाज गेली, अफगाणिस्तानने रचला इतिहास

    अफगाणिस्तानची टीम पाकिस्तान विरुद्ध नेहमी त्वेषाने खेळते हे पुन्हा एकदा दिसून आलं. वाचा सविस्तर....

  • 27 Mar 2023 09:57 AM (IST)

    SA vs WI : दक्षिण आफ्रिकेने करुन दाखवलं त्याला म्हणतात क्रिकेटमधला तुफानी विजय

    SA vs WI : वेस्ट इंडिजने दिलेलं टार्गेट सोपं नव्हतं. पण दक्षिण आफ्रिकेच्या टीमने T20 क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाहीय, हे सिद्ध केलं. वाचा सविस्तर....

  • 27 Mar 2023 09:56 AM (IST)

    WPL 2023 Prize Money : फायनल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या टीमला किती कोटी मिळाले? जाणून घ्या अवॉर्ड्सची पूर्ण लिस्ट

    विजेतेपदच मिळवलं नाही, तर अवॉर्ड्समध्येही मुंबईच्या खेळाडूंचा जलवा. प्राइज मनीपोटी कुठल्या खेळाडूला किती रक्कम मिळाली जाणून घ्या सर्वकाही.

  • 27 Mar 2023 09:55 AM (IST)

    आज पुण्यात आमरण उपोषण

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंकेच आज पुण्यात आमरण उपोषण

    पारनेर मतदारसंघातील बंधारे स्थगिती निवीदांची स्थगिती उठवण्यासाठी करणार आंदोलन

    शेतकऱ्यांना घेऊन करणार आंदोलन

    निलेश लंके स्वतः आंदोलनात बसणार,

  • 27 Mar 2023 09:29 AM (IST)

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वाघिणीने 4 शावकांना जन्म दिला

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वाघिणीने 4 शावकांना जन्म दिला

    मुंबईतील बोरिवली परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वाघाने अनेक वर्षांच्या कालावधीनंतर चार पिल्लांना जन्म दिला आहे.

    श्रीवल्ली या चार वर्षांच्या वाघिणीने शनिवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (SGNP) चार पिल्लांना जन्म दिला.

    वाघिणी आणि तिच्या पिल्लांना किमान ४८ तास सीसीटीव्हीद्वारे निगराणीखाली ठेवले जाईल.

    नवीन आगमनाने शहरातील राष्ट्रीय उद्यानात वाघांची संख्या 10 वर पोहोचली आहे.

  • 27 Mar 2023 09:24 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या विराट सभेचे आज स्तंभपूजन

    2 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगरात महाविकास आघाडीची विराट जाहीर सभा

    बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाने गाजलेले प्रसिद्ध मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर सभा

    वज्रमुठ महाविकास आघाडीची असे सोशल मीडियावर सभेचे पोस्टर व्हायरल

    आज सकाळी साडेनऊ वाजता होणार महाविकास आघाडीच्या विराट सभेचे स्तंभपूजन

    विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते होणार स्तंभपूजन

  • 27 Mar 2023 08:20 AM (IST)

    देहू परिसरात एच 3 एन 2 चा रुग्ण आढळून आल्यानं खळबळ

    पुणे : देहुगाव येथे एच३एन२ चा रुग्ण मिळून आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सर्वे करण्याचे आरोग्य विभागाला आदेश

    सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड़ शहरात कोरोना सारख्या विषाणुची लक्षणे असलेल्या एच३एन२ चे रुग्ण आढळून येत आहेत.

    त्यामुळे पिंपरी-चिंचवड़ शहरालगत असलेल्या देहूत एच३एन२ चा रुग्ण मिळून आल्याने भीतीच वातावरण

  • 27 Mar 2023 08:02 AM (IST)

    मावळातील सांगावडे गावात दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन

    मावळ,पुणे

    -मावळातील सांगावडे गावात दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन

    -शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनमध्ये भीतीच वातावरण

    -सांगावडे मधील एका शेतकऱ्यांने धाडसाने या बिबट्याचा व्हिडीओ मोबाईल मध्ये कैद केला परंतु नको ते धाडस शेतकऱ्याच्या अंगलट आले असते,परंतु सुदैवाने बिबट्याने शेतातून धूम ठोकली

    -गेल्या अनेक महिन्यांपासून सांगावडे,नेरे,जांभे,आणि हिंजवडी परिसरात या बिबट्याचा मुक्त संचार असल्याने शेतकरी भीतीच्या छायेत शेतात काम करत आहे

    -त्यामुळे मावळ आणि मुळशी वनविभागाने येथे पिंजरा लावावा अशी मागणी सांगावडे ग्रामस्थनी केलीये

  • 27 Mar 2023 07:52 AM (IST)

    मुंबई : हार्डवेअरच्या दुकानाला आग

    साकीनाका परिसरात काल रात्री एका हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली

    घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यात यश आले

    या आगीत लाखोंचे हार्डवेअरमधील सामान जळून खाक झाले

    आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे याचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत

  • 27 Mar 2023 07:51 AM (IST)

    पुण्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं

    राज्यापाठोपाठ पुण्यातही कोरोनानं चिंता वाढवली

    पुण्यातही दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ व्हायला सुरुवात

    राज्यातील सर्वाधिक सक्रीय रुग्णसंख्या अजूनही पुण्यात

    सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार 2 हजार 117 एवढी राज्यात सक्रीय रुग्णसंख्या आहे

    त्यापैकी 527 एवढी सक्रीय रुग्णसंख्या पुण्यात आहे

    23 मार्चला पुण्यात 198 रुग्णांची नोंद झाली होती

    मात्र 24 ला 343 आणि 25 तारखेला 437 रुग्णांणी नोंद झाली.आहे

    रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर

  • 27 Mar 2023 06:27 AM (IST)

    पहिल्या महिला उपमहाराष्ट्र केसरीला चांदीची गदा

    वैष्णवी पाटीलचा मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून सन्मान

    वैष्णवी अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गावातील रहिवासी

    राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील वैष्णवी पाटील ही उपविजेती ठरली

  • 27 Mar 2023 06:23 AM (IST)

    सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे ग्रामदैवताच्या रथयात्रेत दुर्घटना

    ग्रामदैवत श्री परमेश्वराच्या रथाचे एका बाजूचे चाक अचानक निखळल्याने दोन भाविकांचा मृत्यू

    वागदरीचे ग्रामदैवत श्री परमेश्वराच्या यात्रेमध्ये रथ ओढण्याची परंपरा आहे

    काल सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली

    परमेश्वर मंदिर ते बसस्थानक भागापर्यंत असंख्य भाविक हा रथ ओढतात

    साधारणपणे 12 फूट रुंद असलेल्या या रथाला दगडी चाकं आहेत

    रथ ओढत असताना अचानक एका बाजूचे चाक निखळल्याने दोन भाविकांचा मृत्यू झाला

    दरम्यान या घटनेनंतर ग्रामदेवत परमेश्वर यात्रेतील पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेत

  • 27 Mar 2023 06:21 AM (IST)

    भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात 750 नृत्यांगणांकडून कला सादर

    पुण्यातील पंडित फार्ममध्ये पार पडला कार्यक्रम

    शास्त्रीय नृत्याला चालना देण्यासाठी केलं होतं कार्यक्रमाचं आयोजन

    नृत्यांगण कलाकारांनी जिंकली उपस्थितांची मनं

  • 27 Mar 2023 06:20 AM (IST)

    बारामती तालुक्यातील खांडज येथील आटोळे कुटुंबियांना भाजपकडून मदत

    आटोळे कुटुंबियाना भाजपच्यावतीने साडे तीन लाख रुपयांची मदत जाहीर

    चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन मदतीची केली घोषणा

    15 मार्च रोजी जनावरांच्या गोठ्यातील टाकी साफ करीत असताना चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता

  • 27 Mar 2023 06:17 AM (IST)

    आजपासून तीन दिवस मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद राहणार

    मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण नजीक आहे परशुराम घाट

    दुपारी 12 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय

    लहान वाहनांसाठी पिरलोटे - चिरणी - आंबड्स पर्यायी मार्ग

    अवजड वाहतूक दिवसभर बंद राहणार

    27 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत परशुराम घाट दिवसा वाहतुकीसाठी बंद

Published On - Mar 27,2023 6:14 AM

Follow us
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.