Mumbai Pune Expressway update | मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक पूर्ववत

| Updated on: Aug 04, 2023 | 7:18 AM

Maharashtra Mumbai Rains IMD Monsoon Alert LIVE : मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Mumbai Pune Expressway update | मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक पूर्ववत

मुंबई | 28 जुलै 2023 :र

Mumbai Pune Expressway update

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे, यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे, कामशेत बोगद्याजवळ काही माती घसरुन खाली आली होती, तसेच वर काही दगड खाली येण्याची शक्यता होती. ते काढून घेण्याचे तसेच मातीचा ढिगारा उचलण्याचे काम सुरु होते.

यापूर्वी

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर कामशेत बोगद्याजवळ मातीचा ढिगारा खाली आला आहे. या ढिगारा काढण्यात आला आहे. पण वरती आणखी काही दगड सैल झाले असल्याचं निदर्शनास आल्याने ते देखील काढण्याचं काम करण्यात येणार आहे, सायंकाळी ४ पर्यंत हे काम चालणार आहे.

————

चंद्रपुरात पावसाने थैमान घातलं आहे, यामुळे शहराला पुराचा मोठा तडाखा बसला आहे, शहरात ८ ते १० फूट पाण्याचा स्तर आहे. एनडीआरएफकडून जोरदार बचावकार्य सुरु आहे.  Chandrapur flood news  पुराचं पाणी घरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. राज्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचं थैमान सुरू आहे. काही जिल्ह्यात तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची पिकं जमीनदोस्त झाली आहेत. Chandrapur flood  कालप्रमाणे आजही हवामान खात्याने मुंबई, गडचिरोली आणि यवतमाळला रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, नागपूर, गोंदिया आणि भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अतिमुसळधार पाऊस पडण्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आज इयत्ता पहिली ते 12च्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Jul 2023 06:12 PM (IST)

    काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी केली शेत नुकसानीची पाहणी

    माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी शेत नुकसानीची पाहणी केली आहे. नांदेड येथील अर्धापूर तालुक्यातील लोन या गावात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नांदेडमध्ये काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर जमिनीवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  • 28 Jul 2023 06:01 PM (IST)

    Sangli Rain | नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा 

    गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार व चांदोली धरणातील विसर्ग त्यामुळे वारणा नदीची पाण्याची पातळी वाढली असून नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले असून वारणा नदीवरील ऐतवडे खुर्द येथील पुल पाण्याखाली गेला आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

  • 28 Jul 2023 01:24 PM (IST)

    chandrapur flood news | चंद्रपूर शहरात पुराचं पाणी, शहरात आठ ते दहा फूट पाणी | chandrapur flood

    chandrapur flood

    चंद्रपूर शहरात पुरामुळे हाहाकार, छतावर चढून जीव वाचवण्याचा प्रयत्न, एनडीआरएफची जोरदार कामगिरी, इरई नदीचं पाणी चंद्रपूर शहरात शिरलं. chandrapur flood कुणाला बोटीस बसून सुरक्षित ठिकाणी यायचं आहे का, एनडीआरएफच्या जवानांकडून विचारणा, शहरात आठ ते १० फुटाचा पाण्याचा स्तर, चंद्रपूर शहरात पावसाच्या पाण्याने हाहाकार उडवला आहे. chandrapur flood news एनडीआरएफचे जवान संपूर्ण भाग पिंजून काढत आहेत, अडकलेल्या लोकांना सोबत यायचं असेल तर सोबत येऊ शकतात असं आवाहन करत आहेत. चंद्रपूर शहराला मोठी सरकारी मदतीची निश्चितच गरज आहे.

  • 28 Jul 2023 01:20 PM (IST)

    विदर्भात पावसाचा जोर कमी होणार

    विदर्भात पावसाचा जोर काही दिवसांत कमी होणार आहे. येत्या रविवारपासून विदर्भात पावसाचा कुठलाही अलर्ट नाही. यामुळे ३० जुलैपासून विदर्भात पावसाचा जोर कमी होणार आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने हा अंदाज व्यक्त केला आहे.

  • 28 Jul 2023 12:57 PM (IST)

    सिंधुदुर्ग पाणीसाठा ७९ टक्क्यांवर

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणीसाठा ७९ टक्क्यांवर पोचला आहे. जिल्ह्यातील ४१ छोट्या मोठ्या धरणांमधील पाणीसाठा आतापर्यंत ७८.९४ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. ४१ पैकी १९ धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.

  • 28 Jul 2023 12:22 PM (IST)

    चंद्रपूरमध्ये नदीचे पाणी घरात

    चंद्रपूरमध्ये वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. चंद्रपूर शहराजवळील इरई आणि झरपट नद्यांच्या पाणीपातळी वाढल्यामुळे गावात पाणी शिरले आहे. राजनगर आणि सहारा पार्क भागात शिरले इरई नदीचे पाणी आले आहे.

  • 28 Jul 2023 11:52 AM (IST)

    वसमत तलावाचे पाणी शहरात

    वसमत शहरातील गुरुद्वारा तलावाच्या भिंतीचा काही भाग तुटल्याने तलावाचे पाणी घरात घुसले. यामुळे अनेक घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. नागरिकांना उर्दू शाळा, आरोग्य केंद्राच्या बिल्डिंगमध्ये स्थलांतरित करण्यात आले.

  • 28 Jul 2023 11:40 AM (IST)

    वसमत शहरात एक तलाव फुटला

    हिंगोली जिल्ह्यातील वसमत संपूर्ण तालुक्यात ढगफुटी झाली आहे. त्यामुळे एक लाख लोकवस्तीच्या गावात घरा घरात पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि अन्नधान्याचे नुकसान झाले आहे.

  • 28 Jul 2023 11:17 AM (IST)

    पालघर अडकलेल्या पाच जणांची सुटका

    पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. 5 जण वडवली तालुक्यात पुरत अडकली होती. त्यात दोन महिला, दोन पुरुष आणि एक लहान मुलाचा समावेश होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ एनडीआरएफची मदत त्या ठिकाणी पाठवली.

  • 28 Jul 2023 10:50 AM (IST)

    गंगापूर धरण 68 टक्के भरले

    नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 68 टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून आज 500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.

  • 28 Jul 2023 10:27 AM (IST)

    वेण्णा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग

    वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा धरण, बेंबाळ प्रकल्प आणि वेण्णा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे वर्धा नदीच्या पात्रात होत आहे. वर्धा नदीचं पाणी पुलावरून जात असल्यामुळे गुरुवारपासून धानोरा-भोयेगाव-गडचांदूर हा मार्ग बंद आहे.

  • 28 Jul 2023 09:34 AM (IST)

    नाशिककरांसाठी एक चांगली बातमी

    नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. दारणा धरणातून 8300 क्यूसेस पाण्याचा विसर्ग दारणा नदीत करण्यात आल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दारणा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे इशारा दिलाय. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात देखील 65 टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काही धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

  • 28 Jul 2023 09:29 AM (IST)

    मुंबईत लोकल वाहतूक किती मिनिटं उशिराने?

    मुंबईत गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस शुक्रवारी सकाळी कायम आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल 8 ते 10 मिनिट उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक 12 ते 15 मिनिट उशिराने धावत आहे. हार्बर रेल्वे मार्गावर ट्रेन 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहेत. ट्रान्स हार्बरमार्गावर लोकल 10 ते 15 मिनिट उशिराने धावतायत.

  • 28 Jul 2023 09:28 AM (IST)

    पैनगंगा नदीवरील पूल गेला वाहून

    यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील उमरी कापेश्वर जवळील पैनगंगा नदीवरील पूल गेला वाहून. गेल्या दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसाने पैनगंगा नदीला पूर आल्याने पूल गेला वाहून. मराठवाडा विदर्भ च्या सीमेवर हा पूल होता. पूल वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला होता. सध्या पुलावर तात्पुरता रस्ता करण्याच काम सुरू आहे.

  • 28 Jul 2023 09:20 AM (IST)

    धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडले

    पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे सर्वात मोठी पाणी क्षमता असलेलं धामणी धरणाचे पाचही दरवाजे २०० सेंटीमीटरने उघण्यात आले आहे. धामणीमधून ७२३ क्युमेक आणि कवडास मिळून १९४० क्यूमेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात आला आहे.

  • 28 Jul 2023 08:59 AM (IST)

    नाशिकमध्ये पाऊस

    नाशिक शहरात पावसाला सुरुवात झाली आहे रिमझिम पावसामुळे रस्त्यांवर चिखल झाला आहे. शहरातील द्वारका सिग्नलवर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहे.

  • 28 Jul 2023 08:50 AM (IST)

    पंचगंगाचे पाणी रस्त्यावर

    कोल्हापुरात रस्त्यावर पंचगंगा नदीचे पाणी यायला सुरुवात झाली आहे. केर्ली गावाजवळ नदीचे पाणी रस्त्यावर आले आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास कोल्हापूर रत्नागिरी मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.

  • 28 Jul 2023 08:40 AM (IST)

    कोयना धरणात 66.90 जलसाठा

    कोयना धरणाचा पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. धरणात 66.90 टीएमसी जलसाठा झाला आहे. धरणात 31,416 क्यूसेक पाण्याची आवक सुरु आहे.

  • 28 Jul 2023 08:30 AM (IST)

    गडचिरोलीत पुराचा धोका

    तेलंगणात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे तेथील धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील नदी काठावरील गावांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

  • 28 Jul 2023 08:18 AM (IST)

    पुण्यातील रास्ता पेठेत झाड कोसळले, दोघेजण जखमी

    पुणे शहरातील रास्ता पेठेतील पॉवर हाऊससमोरील जुने वडाचे झाड कोसळले. या घटनेत दोघेजण जखमी झाले आहे. तसेच तीन दुचाकी, टेम्पो आणि हातगाडीचे नुकसान झाले आहे.

  • 28 Jul 2023 08:07 AM (IST)

    वसई परिसरात पावसाची रिपरिप

    पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळाना सुट्टी दिली आहे. गुरुवारी दुपारपासून रात्रभर पडलेल्या पावसाने शहरातील मुख्य रस्त्यावर दोन फूट पाणी साचलेले आहे.

  • 28 Jul 2023 07:58 AM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी भरलं

    कल्याण-डोंबिवलीत सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. काल दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक सखल भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने काही भागातील रहिवाशांचे प्रशासनाने स्थलांतर केले आहे. तर ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्याने कल्याण-डोंबिवली परिसरातील सर्व शाळांना पालिकेकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  • 28 Jul 2023 07:44 AM (IST)

    नागपुरात आज दुसऱ्या दिवशीही रिमझिम पाऊस, हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा

    नागपुरात आज दुसऱ्या दिवशीही रिमझिम पाऊस सुरू आहे. नरेंद्र नगर पुलाखाली गेल्या 24 तासांपासून पाणी साचलंय. मध्यरात्री नागपूर जिल्ह्यातील काही भागात मुसळाधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही काही सखल भागात पाणी साचलं आहे. हवामान विभागाकडून आज नागपूरसह परिसरात मुसळाधार पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  • 28 Jul 2023 07:32 AM (IST)

    नांदेड आणि हिंगोलीला पावसाचा मोठा फटका, आसना नदीला महापूर

    नांदेड आणि हिंगोलीमध्ये काल दमदार पाऊस झाला. नांदेडमधील पुसदगाव येथील असना नदीला मोठा महापूर आला आहे. त्यामुळे गावात पाणी शिरलं असून रस्तेही पाण्याखाली गेले आहेत.

  • 28 Jul 2023 07:31 AM (IST)

    पावसाचा फटका, इयत्ता दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलल्या

    राज्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता हा पेपर 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होईल. राज्य परीक्षा मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली आहे.

  • 28 Jul 2023 07:26 AM (IST)

    मुंबई, गडचिरोली, यवतमाळमध्ये रेड तर ठाणे, पुणे आणि कोकणात ऑरेंज अलर्ट

    आजही मुंबई, गडचिरोली आणि यवतमाळला रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, नागपूर, गोंदिया आणि भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अतिमुसळधार पाऊस पडण्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आज इयत्ता पहिली ते 12च्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Published On - Jul 28,2023 7:20 AM

Follow us
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.