Maharashtra News LIVE : मोठी बातमी ! उद्धव ठाकरे नव्हे तर अंबादास दानवे मविआकडून विधानपरिषदेवर जाणार
Maharashtra News LIVE Updates : शिंदे गटाकडून प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यासाठी चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

1 मे पासून राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीचालक यांना मराठी सक्ती करण्यात आली. यादरम्यान ऑगस्टपर्यंत रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी वेळ देण्यात आला. मराठी सक्तीचा मुद्द्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका सरकारवर केली. राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आजही मोठा इशारा दिला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. शिंदे गटाकडून प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात बैठकाही झाल्या. याबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच शिवसेना शिंदे गटात हालचाली
शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी
अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच शिवसेना शिंदे गटातही हालचाली
निवडणुक बिनविरोध होणार नाही , शिवसेनेकडूनही या जागेसाठी ऊमेदवार दिला जाणार असल्याची सुत्रांची माहीती
आज रात्री एकनाथ शिंदे याबाबात महत्वाचा निर्णय घेणार असल्याची माहीती
-
नाशिकला हीटवेव्हचा इशारा
नाशिकला हीटवेव्हचा इशारा
नागरिकांनी दुपारी ११ ते ४ घराबाहेर पडणे टाळावे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचं आवाहन
भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी अति उष्णतेचा इशारा जारी केल्यानंतर प्रशासन सतर्क
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना उष्माघात टाळण्यासाठी अत्यावश्यक कारणांशिवाय भरदुपारी बाहेर न पडण्याचे आवाहन केले
बाहेर पडताना टोपी, स्कार्फ, छत्रीचा वापर करावा तसेच हलके सूती कपडे परिधान करण्याच्या सूचना
डी-हायड्रेशन टाळण्यासाठी नियमित पाणी, ओआरएस व द्रवपदार्थांचे सेवन करण्यावर भर
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन
-
-
वर्धा : तापमान वाढल्याने नागरिक त्रस्त
वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या झळा वाढल्या आहेत. अनेक भागातील तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक त्रस्त झाले आहेत, यामुळे ग्रामीण भागातही जनजीवनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
मोठी बातमी ! उद्धव ठाकरे नव्हे तर अंबादास दानवे मविआकडून विधानपरिषदेवर जाणार
राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याचे बोलले जात होते, मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना महाविकास आघाडीचे तिकीट देण्यात आले आहे.
-
नवी मुंबईत बनावट टमटम बाबाकडून महिलेची फसवणूक
नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट बाबा बनून काळी जादू व पूजा-विधीच्या नावाखाली महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात महिलेची एकूण 1 लाख 90 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
-
-
चाळीसगाव तालुक्यात तापमानाचा पारा 42 अंशांवर
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून तापमानाचा पारा गेल्या तीन दिवसांपासून तब्बल 42 अंशांवर स्थिर आहे. यंदाच्या हंगामातील उच्चांक म्हणून 43 अंश तापमानाची नोंद झाली असून नागरिक अक्षरशः उकाड्याने हैराण झाले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
-
गडचिरोलीचे तापमान 42.9 अंशांवर, जनजीवन विस्कळीत
गडचिरोली जिल्ह्यात तापमानाचा जोर वाढलेला असून आज 42.9 डिग्री तापमान नोंदवण्यात आले आहे. मागील दोन आठवड्यांपासून सतत तापमानाचा पारा वाढत चाललेला आहे. काल व आज 43 डिग्री जवळ तापमान असल्याने राष्ट्रीय महामार्ग रिकामे पडलेले आहेत. सध्या नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासन कडून करण्यात आले आहे.
-
ठाणे : बागेश्वर बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
बागेश्वर महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याच्या विरोधात शरद पवार पक्षाच्या वतीने नौपाडा पोलिसात तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
-
मानखुर्द परिसरात क्रेन कोसळून पोलीस कर्मचाऱ्याचा मृ्त्यू
मुंबईतील मानखुर्द परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी क्रेन कोसळून एका पोलीस कर्मचाऱ्याचा काल रात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुंबई पुणे हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. क्रेन न हटवल्याने वाहतूक कोंडी , वाहनांच्या १० किलोमिटर लांब रांगा….
-
राष्ट्रीय महामार्गावर दोन तास आंदोलन
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल सहा वर्षांनंतरही रखडलेले आहे. काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी स्थानिकांनी केला दोन तास राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन
-
सरकारने मुदतीच्या अगोदरच हरभरा हमीभाव खरेदी केंद्र गुंडाळली
सरकारने मुदतीच्या अगोदरच हरभरा हमीभाव खरेदी केंद्र गुंडाळली असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात हरभरा शिल्लक राहिला आहे. 29 एप्रिल खरेदीची मुदत असताना 25 तारखेलाच खरेदीचं पोर्टल केलं बंद.
-
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची रॅगिंगची तक्रार
जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅगिंगची तक्रार केलीय. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या नावाने निनावी मेलवरून महाविद्यालयाच्या मेलवर तक्रार करण्यात आली आहे. दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा छळ केल्याच तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन महाविद्यालय प्रशासनाने 13 सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे
-
सरकारने मुदतीच्या अगोदरच हरभरा हमीभाव खरेदी केंद्र गुंडाळली
सरकारने मुदतीच्या अगोदरच हरभरा हमीभाव खरेदी केंद्र गुंडाळली. शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात हरभरा शिल्लक. 29 एप्रिल खरेदीची मुदत असताना 25 तारखेलाच खरेदीचं पोर्टल केलं बंद. हरभरा हमी भाव खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. खरेदी केंद्रांची मुदत वाढवून शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा अशी शेतकरी मागणी करत आहेत.
-
नवनियुक्त सरपंच स्वरूपानंद देशमुख संतोष देशमुख यांच्या घरी दाखल
मस्साजोग येथील पोटनिवडणूकीत स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाल्यानंतर ते दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी दाखल झाले आहेत. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचले आहेत. संतोष देशमुख यांच्या न्यायाच्या लढ्यात आपण यापुढे देखील सोबत राहणार असल्याची प्रतिक्रिया स्वरूपानंद यांनी दिली होती.
-
नोटीसला मी काय घाबरत नाही – भाजप आमदार नरेंद्र मेहता
“नोटीसला मी काय घाबरत नाही. जे सत्य आहे ते मी लोकांपर्यंत आणलं. त्या एफआयआर मध्ये ज्या ठिकाणी भूमाफिया प्रताप सरनाईक यांनी जागा हडप केली. त्या एफआयआर मध्ये विहान ग्रुप आणि प्रताप सरनाईकचे नाव दिलं तशी तक्रार आहे. त्या हिशोबाने आम्ही पुढे गेलो आणि आम्ही सुद्धा माहिती घेतली अशा प्रकारची घटना घडली आहे” असं भाजप आमदार नरेंद्र मेहता म्हणाले.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेत झटापटी
छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेत झटापटी. महानगरपालिकेचे उपायुक्त वाहुळे व वकिलांमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेवरून बाचाबाची. कोर्टाने स्टे दिलेला असताना अतिक्रमण का काढलं? वकिलाचा सवाल. महानगरपालिका अधिकाऱ्याला सवाल. महानगरपालिकेने जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केलं, वकील पालास संचेती यांचा आरोप.
-
सरपंचपदाच्या निवडणुकीत रुपाली चाकणकरांचा भाऊ पराभूत
पुण्याच्या दौंड तालुक्यातील नांदूरमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा भाऊ पराभूत झाला. सरपंचपदाच्या निवडणुकीत विशाल थोरात 304 मतांनी विजयी झाले तर रुपाली चाकणकरांचे भाऊ संतोष बोराटेंचा पराभव झाला.
-
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटव मोहीम सुरू
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने सेवन हिल ते गजानन मंदिर परिसरात अतिक्रमण हटव मोहीम सुरू. रस्त्यावर आलेले पक्के व कच्चे अतिक्रमण बुलडोजरच्या साहाय्याने जमीनदोस्त केलं जात आहे. रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या हॉटेल, टपऱ्यावर बुलडोझर चालवण्यात येत आहे.
-
भोंदू अशोक खरात याला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी
भोंदू बाबा अशोक खरात याला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. आठव्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी एसआयटी कडून न्यायालयाला पत्र देण्यात आलं.
आठव्या गुन्ह्यात उद्या अशोक खरात याला पुन्हा व्हिसी द्वारे हजर करण्यात येईल. उद्या अशोक खरात यांच्या संदर्भातील आठव्या गुन्ह्याचा युक्तिवाद न्यायालयात होईल. अशोक खरात यांच्यावर आठवा गुन्हा देखील महिलेवर लैंगिक शोषणाचा आहे. उद्या अशोक खरात याला पोलिस कोठडी मिळविण्यासाठी तपास यंत्रणांकडून प्रयत्न केले जातील.
-
फक्त आमदारकीसाठी जाणारा मी नाही – बच्चू कडू
पद किंवा निवडणुकीसाठी युती करणारा मी नाही. फक्त आमदारकीसाठी जाणारा मी नाही – शिवसेनेशी युती करण्यावरून बच्चू कडू स्पष्टच बोलले.
-
निफाड तालुक्यात तापमान 40 अंशांच्या पार…
लासलगाव (नाशिक) : निफाड तालुक्यात तापमान 40 अंशांच्या पार गेलं आहे. लासलगाव येथे आज 41 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेचा जनावरांवर परिणाम. लासलगावच्या शेतकऱ्याचा फॉगर बसवण्याचा अनोखा प्रयोग, 7 हजार खर्चून गोठ्यात 16 फॉगर बसवले . गाईंच्या तब्येतीत सुधारणा; दुध उत्पादनात वाढ झाली. उष्णतेपासून जनावरांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
-
विधानपरिषदेसाठी शिवसेनेची ऑफर, काय म्हणाले बच्चू कडू ?
कर्जमाफीच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंची महत्वाची भूमिका होती. शब्दाचा पक्का माणूस अशी शिंदेंची ओळख आहे. मंत्रीपदापेक्षा चळवळ महत्वाची असते हे दाखवून दिलं असं बच्चू कडू म्हणाले.
-
अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया
मस्साजोगच्या सरपंचपदासाठीच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला. त्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. “आमचा भाऊ गेल्याने सर्वांत मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे हा पराभव त्यासमोर गौण आहे. झालेला पराभव आणि गावकऱ्यांनी दिलेला कौल आम्ही मान्य करतो”, असं ते म्हणाले.
-
शरीरसंबंधाचे व्हिडिओ शूट करुन दोन लाख रुपयांची मागितली खंडणी; सोलापुरातील घटना
शरीरसंबंधाचे व्हिडिओ शूट करुन दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना सोलापुरातील माढ्याच्या अंबड गावात घडली आहे. कुर्डूवाडी पोलिसांत याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुर्डूवाडी पोलिसांनी तीन पुरुषांसह एका महिलेला अटक केली आहे.
-
बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत अश्विनी देशमुख यांचा पराभव
बीडच्या मस्साजोगमधील सरपंचपदासाठी पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीचे निकाल समोर आले असून त्यात दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव झाला आहे. अश्विनी देशमुख यांचा सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला, तर स्वरुपानंद देशमुख 92 मतांनी विजयी झाले आहेत.
-
रोहित पवार राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या भेटीला; जित पवार विमान अपघात प्रकरणासह दुष्काळावर करणार चर्चा
आमदार रोहित पवार हे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या भेटीसाठी महाराष्ट्र लोकभावनात दाखल झाले आहेत. अजित पवार यांचं विमान अपघात प्रकरण आणि दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते राज्यपालांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. याआधी रोहित पवार यांनी राज्यातील विविध प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. कर्नाटकात दाखल गुन्हा सीआयडीकडे प्रकरण वर्ग केल्यानंतर त्यांनी डीजी सदानंद दाते यांचीही भेट घेतली होती.
-
राज्य सरकारकडून ‘महिला आरक्षण विधेयक’ मुद्द्यावर विशेष एक दिवसीय अधिवेशनासाठी एकमताने ठरावाची शक्यता
आजच्या कैबिनेट बैठकीत राज्य सरकारकडून ‘महिला आरक्षण विधेयक’ मुद्द्यावर विशेष एक दिवसीय अधिवेशनासाठी एकमताने ठराव करण्यात येण्याची शक्यता आहे. महिला आरक्षण विधेयक मुद्द्यावर आता महाराष्ट्रात विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. एकमत झाल्यास पुढच्या आठवड्यात एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकार एकमताने निर्णय घेणार आहे.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकार राज्याच्या राज्यपालांकडे विशेष अधिवेशन बोलण्यासाठी पत्र पाठवणार आहे. त्यानंतर राज्यपाल महाराष्ट्र विधिमंडळाला विशेष अधिवेशन घेण्याची परवानगी देणार आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर आता याच विधेयकावर महत्त्वाची चर्चा आणि मुद्दे मांडण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
-
विदर्भात उष्णतेचा कहर, गोंदियात तापमान 42 अंश सेल्सिअर पार; शाळांच्या वेळेत बदल
विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून गोंदिया जिल्ह्यातही तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. गोंदिया जिल्ह्याचं तापमान तब्बल 42 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम नागरिकांसह विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क झालं आहे. उष्णतेची तीव्रता लक्षात घेता गोंदिया जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, अंगणवाड्या तसेच कोचिंग क्लासेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार आता या सर्व शैक्षणिक संस्था सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.
-
भोंदू मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल
भोंदू मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा यांच्यावर करमाळा पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. चमत्काराच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित लोकांनी समोर येऊन तक्रार देण्याचं आवाहन सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केलं होतं. त्यानंतर आता पीडित समोर येताना पाहायला मिळत आहे. 1 लाख 21 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
अमरावतीच्या परतवाडा मध्ये आज मंत्री नितेश राणे यांची सभा…
नितेश राणेंच्या सभेला अखेर परतवाडा पोलिसांनी परवानगी दिली आहे. सायंकाळी 6 वाजता परतवाडाच्या जयस्थंभ चौकात नितेश राणे यांची भव्य सभा होणार आहे. काल नितेश राणे यांच्या सभेमुळे पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली होती. अमरावतीच्या परतवाडा मध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरण ताजं असतानाच आज नितेश राणेंची सभा होणार आहे.
-
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विहंग समूहाने भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांना बजावली नोटीस…
बदनामीकारक आणि खोटी विधाने तात्काळ थांबवावी अशा अनुषंगाने नोटीस बजावण्यात आली. तसेच मेहता यांची विधाने राजकीय हेतूने विकासावर दबाव आणण्यासाठी केल्याचे नोटिसात म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी घोडबंदर भाईंदर पाडा जमिनीच्या वादावरून प्रताप सरनाईक यांच्या विरोधात भाजप आमदार आणि स्थानिकांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात आणि ठाणे महानगरपालिका या ठिकाणी तक्रार केली होती.
-
मस्साजोग येथील पोटनिवडणूकीच्या सरपंच पदाच्या मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरूवात
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागली होती. काल त्यासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली असुन आज निकाल जाहीर होणार आहे. केज तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात थोड्याच होणार असून दुपारपर्यंत निकाल जाहीर होईल. मस्साजोग गावच्या गावकऱ्यांनी कोणाला कौल दिला आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात लढत झाली आहे. या दोघांपैकी कोण सरपंच होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
-
छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसीमध्ये भीषण आग
छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली आहे. आगीने रौद्र रूप धारण केल्याने भंगार गोदाम जळून खाक झालं आहे. अग्निशामक दलाच्या चार गाड्यांच्या मदतीने गेल्या तीन तासांपासून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र गोदामाचे मोठे नुकसान झालं आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून सकाळी पाच वाजल्यापासून धुमसत आहे.
-
नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा, अवघ्या १० दिवसांत ३ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा घटला
नाशिक जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने धरणसाठ्यात वेगाने घट होऊ लागली आहे. जिल्ह्यातील २६ प्रकल्पांमध्ये आता ४१.६१ टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्या १० दिवसांतच बाष्पीभवन आणि वाढत्या मागणीमुळे ३.४२ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. विशेषतः वाघाड आणि पुणेगाव धरणामधील साठा १० टक्क्यांच्या खाली आल्याने काही भागांत आतापासूनच पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. सध्या जिल्ह्यात ६१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, परिस्थिती पाहता जलसंपदा विभागाने नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत साठा काहीसा अधिक असला, तरी वाढते तापमान प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
-
नंदनवनवर हालचालींना वेग, एकनाथ शिंदे घेणार मंत्री आणि आमदारांचा क्लास
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी आपल्या नंदनवन या निवासस्थानी मंत्री आणि आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत प्रामुख्याने आमदार आणि मंत्र्यांच्या आतापर्यंतच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. विविध विभागांतील प्रलंबित विकासकामे, सुरू असलेल्या प्रकल्पांची प्रगती आणि आगामी काळातील राजकीय नियोजनावर या बैठकीत खलबतं होण्याची शक्यता आहे. विशेषतः प्रशासकीय समन्वय मजबूत करणे आणि जनतेशी थेट संवाद वाढवण्याबाबत एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी आणि कामांना गती देण्याच्या दृष्टीने या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
-
विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही…; उमेदवारी डावलल्याने भाजप आमदार संजय केनेकर नाराज?
भाजपने विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर विद्यमान आमदार संजय केनेकर यांचे नाव वगळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केनेकर यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एक सूचक कविता पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने” आणि “छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी” अशा ओळी पोस्ट करत त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. विधान परिषदेवर केवळ १३ महिन्यांची संधी मिळाल्यानंतर पुन्हा उमेदवारी नाकारल्याने केनेकर यांनी या पोस्टद्वारे आपली नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
-
महायुतीची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक, विधान परिषद उमेदवारी आणि अंतर्गत वादांवर होणार खलबतं
महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती समन्वय समितीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक लवकरच पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यत्वे विधान परिषदेसाठी महायुतीतील घटक पक्ष कोणाला उमेदवारी देणार, यावर सविस्तर चर्चा होऊन नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. केवळ निवडणूकच नाही, तर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली संजय गायकवाड प्रकरणे, आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वाद यांसारख्या अंतर्गत मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच महायुतीचे सर्व प्रमुख नेते या समन्वय बैठकीच्या निमित्ताने एकत्र येत असून, आगामी राजकीय रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरणार आहे.
-
नंदुरबार पोटनिवडणूक निकाल: ६७ ग्रामपंचायतींच्या ८० जागांसाठी आज फैसला
नंदुरबार जिल्ह्यातील ६७ ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या ८० जागांसाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत मतदारराजांनी ७१.१६ टक्के मतदानाद्वारे आपला उत्साह नोंदवला आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यानंतर आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, अवघ्या काही तासांतच गावगाड्याचा नवा कारभारी कोण होणार, याचे चित्र स्पष्ट होईल. विशेषतः नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायतीची निवडणूक स्थानिक आजी-माजी आमदारांच्या राजकीय प्रतिष्ठेची बनल्याने या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ७१ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्यामुळे निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, गावातील सत्तेचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
-
नाशिक महापालिका सभापती निवडणूक, 4 ठिकाणी बिनविरोध निवड, तर 2 जागांवर हाय व्होल्टेज सामना
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडणुकीत राजकीय हालचालींना वेग आला असून, ६ पैकी ४ प्रभागांमध्ये सभापतींची निवड बिनविरोध झाली आहे. यामध्ये नाशिक पश्चिम, पंचवटी, सातपूर आणि नवीन नाशिक या प्रभाग समित्यांचा समावेश आहे. मात्र, उर्वरित दोन जागांसाठी ३० एप्रिल रोजी निवडणूक होणार असून, तिथे चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. नाशिक पूर्वमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगणार आहे, तर नाशिक रोड प्रभागात शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) एकमेकांसमोर ठाकले आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप-शिंदे गट युतीने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
-
व्यापाऱ्याची ५ लाख २० हजार रुपयांना फसवणूक..
जळगावात एक लाख रुपयांचे ५ लाख रुपये करून देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची ५ लाख २० हजार रुपयांना फसवणूक. शनिपेठ पोलिस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तिघांना अटक. अटकेतील आरोपींमध्ये वाशिम येथील पोलिस दलातील पोलिस अंमलदार असलेल्या कर्मचाऱ्याचा देखील समावेश. जगदीश शंकर व्यास या ५८ वर्षीय धान्य खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाराची फसवणूक झाली आ
-
खार परिसरात शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली १८.६९ लाखांची फसवणूक
विकी वजूभाई बरेजिया ऊर्फ विकीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल. स्वतःला गुजरातच्या माजी खासदाराचा मुलगा असल्याचे सांगून विश्वास संपादन. ६ महिन्यांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक उकळली. पैसे शेअरमध्ये न गुंतवता परस्पर अपहार; आरोपी फरार
-
भोंदू अशोक खरातचा आज SIT पुन्हा घेणार ताबा
आठव्या गुन्ह्याच्या तपासासाठी SIT आज न्यायालयात अशोक खरातचा ताबा मागणार. आज अशोक खरात याची पुन्हा होणार न्यायालयात सुनावणी. लैंगिक शोषणाच्या 7 गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत अशोक खरात याला मिळाली आहे 42 दिवस पोलिस कोठडी तर आता पर्यंत भोंदू अशोक खरात याच्यावर 19 गुन्हे दाखल
-
फेरीवाल्यांविरोधातील हतबलतेवरून उच्च न्यायालयाचे टीकास्त्र
पोलीस कारवाई करू शकत नाहीत किंवा तसे अधिकार त्यांना नसल्याची हतबलता वारंवार व्यक्त करणाऱ्या राज्य सरकारच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने मंगळवारी कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. हतबलतेचा दावा करणाऱ्या सरकारला बेकायदा फेरीवाल्यांवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाईचे अधिकार आहेत हे सांगण्याची वेळ न्यायालय किंवा लाजिरवाणे असल्याची टीका याचिकाकर्त्यांवर यावी, ही न्यायालयाने केली.
-
मुंबई उच्च न्यायालयाचा धक्कादायक निर्णय; सुनावणी थेट २०४६ पर्यंत तहकूब
९० वर्षीय याचिकाकर्तीने सामंजस्याने तोडगा काढण्यास नकार. मानहानीच्या वादावरून सोसायटी सदस्यांशी दीर्घकाळापासून वाद. न्यायालयाचे निरीक्षण—“अहंकारामुळे न्यायव्यवस्थेत अडथळा निर्माण” बिनशर्त माफीने प्रकरण मिटू शकते, तरीही तडजोडीला नकार अशा प्रकरणांना प्राधान्य देऊ नये” असे न्यायालयाचे स्पष्ट मत. हट्टी भूमिकेमुळे खटला २० वर्षे लांबला; न्यायालयाच्या भूमिकेची जोरदार चर्चा!
-
नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कायम, मोठी पाणीटंचाई
नाशिक जिल्ह्यात 44 टँकर्स सुरू. 40 गावे आणि 87 पाड्यांना होतोय पाणीपुरवठा. एप्रिल महिन्यातच टँकर्स सुरू झाल्याने पाण्याची चिंता वाढली. कोकण खालोखाल पाणी टंचाईची तीव्रता नाशिक जिल्ह्यात वाढली. पाणी जपून वापरण्याचे जिल्हा प्रशासनाने केले आवाहन. आणखी उन्हाळ्याचा एक महिना जायचा असल्याने प्रशासनाची चिंता वाढली..
-
विमानसेवा बंद करण्याचा कंपन्यांचा इशारा
अमेरिका-इराण युद्ध सुरू झाल्यापासून विमान इंधनाच्या (एटीएफ) दरांनी विक्रमी उसळी घेतल्याने विमान वाहतूक कंपन्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच डॉलरच्या तुलनेत ढासळणारा रुपया आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक करणे अशक्यप्राय’ झाल्याचे फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने (एफआयए) म्हटले आहे. सरकारने तातडीने मदतीची पावले न उचलल्यास विमान वाहतूक बंद करावी लागेल, असा इशाराही या कंपन्यांनी दिला आहे. तसे घडल्यास ऐन उन्हाळी सुट्टीच्या हंगामात विमान वाहतूक विस्कळीत डोऊन प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
Published On - Apr 29,2026 8:19 AM
