Maharashtra News LIVE : मिरा-भाईंदरकरांच्या जिवाशी खेळ! जसल पार्क परिसरात चिखलाचं साम्राज्य
दोन दिवस पावसाने विश्रांतीघेतल्यानंतर रात्रीपासून पुन्हा मुसळधार पावसाची सुरुवात झाली. मुंबई देखील अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. तर, पर्यटन नगरी लोणावळ्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. दुसरीकडे, खासदार भाऊसाहेब वाकचौरेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

अनेक ठिकाणी आता पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. पर्यटन नगरी लोणावळ्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. गेल्या 24 तासांत तब्बल 131 मिलीमीटर पाऊस बरसलाय. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झालीये. मात्र यंदा आत्तापर्यंत अवघे 393 मिलीमीटर इतकाच पाऊस झालाय. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत तब्बल 1885 मिलीमीटर इतका पावसाची नोंद झाली होती. तर नवी मुबंईत पावसाला सुरवात झाली आहे. APMC मार्केट परिसरात पाणी भरलं आहे. नवी मुबंईतील सखल भागात पाणी भरलं आहे. नवी मुबंईतील जुईनगर, वाशी, पनवेलमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. तर दुसरीकडे, राजकारणात तणावाचं वातावरण आहे. आज उद्धव ठाकरेंचा शिर्डी येथे कार्यकर्ता मेळावा आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. ठाकरे वाकचौरेंचा कसा समाचार घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
LIVE NEWS & UPDATES
-
मिरा-भाईंदरकरांच्या जिवाशी खेळ! जसल पार्क परिसरात चिखलाचं साम्राज्य
पावसाळ्यात मिरा-भाईंदरकरांच्या जिवाशी खेळ पाहायला मिळत आहे. जसल पार्क परिसरातील रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं आहे. त्यामुळे निष्काळजीपणामुळे कंत्राटदारावर कारवाई होणार का? असा सवाल आता स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
-
धुळ्यात विरोधकांकडून राम मंदिर प्रकरणाच्या विरोधात आंदोलन
धुळ्यात विरोधकांकडून राम मंदिर प्रकरणाच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे. काँग्रेस, ठाकरेंची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून हे आंदोलन केलं जातंय. विरोधकांकडून धुळ्यातील पुरातन श्री राम मंदिरात आरती करुन यांना शाप लागोत असं म्हणत आंदोलन करण्यात आलं. राम मंदिर मंदिराच्या नावावर देणगीदारांकडून जमा केलेल्या निधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांचा आहे.
-
-
सिया गोयल आणि चेतन चौधरीच्या पोलीस कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ
केतन अगरवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरीच्या पोलीस कोठडीत 3 जुलै पर्यंत वाढ झालीये. आज न्यायालयात सरकारी पक्षाने सिया आणि चेतनचा आणखी तपास करायचा आहे. चेतनचे रिक्रियेशन करायचं आहे? पॅन्ट रिकव्हर करायची आहे? या हत्येत आणखी कोणाचा सहभाग आहे का? हत्येचा सराव कुठं केला? असा बराच तपास करायचं असल्याचं म्हटलं, त्यानंतर आता सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत तीन जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
-
विदर्भात जून महिन्यात 50 टक्के पावसाची तूट
जून महिन्यात विदर्भाकडे पावसाची पाट
जून महिन्यात विदर्भात तब्बल 50 टक्के पावसाची तूट
गडचिरोली जिल्ह्यात तर 70 ते 80 टक्के पावसाची तूट
तर नागपूर जिल्ह्यात जवळपास 45 टक्के पावसाची तूट
ही तूट लवकर भरून निघण्याची शक्यता कमी
नागपूर हवामान विभागाचा नवा अंदाज
-
विदर्भात तीन ते सात जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज
विदर्भात तीन ते सात जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा
विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
मात्र तीन तारखेपर्यंत विदर्भाच्या काही भागांमध्ये हलका तर काही भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता
-
-
तिरोडा येथे काँग्रेसचे एक दिवसीय धरणे आंदोलन
तिरोडा येथे काँग्रेसचे एक दिवसीय धरणे आंदोलन
शेतकरी विद्यार्थी महिला आणि बेरोजगारांच्या समस्यांच्या मुद्द्यावर आंदोलन
विविध कामांमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप
निष्पक्ष चौकशी करावी, आंदोलकांची मागणी
-
जळगाव : सोन्याच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 200 रुपयांची घसरण झाली आहे. मात्र आज चांदीच्या दरात कुठलही घसरण झालेली नसून दर स्थिर आहेत. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 46 हजार 260 रुपयांवर आले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 33 हजार 810 रुपयांवर स्थिर आहे.
-
अलिबाग : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्लॅबचा काही भाग कोसळला
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने, ज्या ठिकाणी स्लॅब कोसळला त्या वेळी तेथे कोणताही रुग्ण किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे सार्वजनिक रुग्णालयांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रुग्णालयाच्या इमारतीची नियमित तपासणी, देखभाल आणि दुरुस्ती झाली होती का, याची चौकशी करण्याची मागणी आता होत आहे.
-
चिपळूण : सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; पाणीटंचाई संपुष्टात
चिपळूण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून, गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेला पाणीटंचाईचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. धरणे, नद्या आणि जलस्रोतांतील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने लोटे एमआयडीसीतील पाण्याअभावी बंद असलेल्या अनेक उद्योगांना दिलासा मिळाला आहे. शेतीसाठीही मशागतीला आवश्यक पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
-
नसरापूर प्रकरणातील आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा – CM फडणवीस
नसरापूर प्रकरणातील आरोपीला आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली, यावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले की, नसरापूर प्रकरणातील आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा देण्यात आली असल्याची माहिती देत तपास यंत्रणांचे कौतुक केले.
-
नदीच्या पुलावरून अर्टिका कार खाली कोसळली
गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा-नवेगावबांध मार्गावरील चुलबंद नदीच्या पुलावर एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या अर्टिका कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाचे संरक्षक कठडे तोडून कार थेट नदीपात्रात कोसळली. या अपघातात कारमधील नऊ प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
-
जळगावात मुसळधार पावसाची हजेरी, विजांचा कडकडाट
जळगाव शहरात वादळीवाला तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी लावली आहे. गेल्या पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती. पावसाने दांडी मारल्याने वातावरणात पुन्हा उकाड्यात वाढ झाली होती. आता जळगाव शहरासह जिल्ह्याती इतर भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
-
नामांकित कंपनीच्या पॅकेटबंद दूध पिशव्या फेकल्या, परिसरात दुर्गंधी
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. तुकाईवाडी हद्दीतील नवीन पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात अज्ञात व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात नामांकित कंपनीच्या पॅकेटबंद दूध पिशव्या, आमरसाचे पॅकेज आणि पनीर बेवारस अवस्थेत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. पावसाच्या पाण्यामुळे हे संपूर्ण दूध पनीर लोकवस्तीत आल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
-
भीमराव कांबळेला भर चौकात फाशी द्या- नागरिकांची मागणी
नसरापूर येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यात संतापाची लाट पाहायला मिळाली. आता या प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निकालानंतर सोलापूरातील नागरिक संतापले आहेत. त्यांनी आरोपीला भर चौकात फाशी देण्याची मागणी केली आहे.
-
पुण्यातील राजगुरुनगरमध्ये पावसाचा कहर
पुण्यातील राजगुरुनगरमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळालाय.. व्यापारी संकुल पाण्यात बुडाल्याचं चित्र.. व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान.. व्यापारी संकुलात कमरेभर पाणी साचल्याने फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्याचे नुकसान..
-
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जुलैला
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जुलैला. आरोपी जयराम चाटेच्या जामीन अर्जाला सरकारी पक्षाचा विरोध. पुराव्यांमध्ये आरोपी हत्या एन्जॉय करत असल्याचं निदर्शनास आणलं. सर्व अर्जांवर 10 जुलैला सुनावणी होऊन निर्णय दिला जाणार
-
TET पेपफुटीच्या विषयावरुन आक्रमक होत विरोधकांनी सभात्याग
TET पेपफुटीच्या विषयावरुन आक्रमक होत विरोधकांनी सभात्याग केलाय… TETचा पेपर आपण राज्यात सेट करू शकत नाही का?… असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय.. तर TET पेपरफुटीबाबत SIT गठीत, आजच निवेदन सादर करणार… असं उत्तर शिक्षणमंत्री दादा भुसेंनी दिलंय
-
नसरापूर निकालावर फडणवीसांकडून समाधान व्यक्त
नराधमांना समाजात राहण्याचा अधिकार नाही… योग्य निर्णय घेतल्याने न्यायालयाचे आभार… नसरापूर निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांकडून समाधान व्यक्त…
-
दोन महिन्यांपासून वेतन थकल्याने लातूर महानगर पालिकेचे कर्मचारी संपावर
दोन महिन्यांपासून वेतन थकल्याने लातूर महानगर पालिकेचे कर्मचारी, अधिकारी संपात उतरले आहेत. ठिय्या आंदोलन वेतन सुरळीत करण्याची मागणी केली जाते आहे. लातूर महानगर पालिकेकडे 1200 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. सातत्याने थकीत वेतनाच्या अडचणीला कर्मचारी सामोरे जात आहेत. त्यामुळे मनपा कर्मचारी,अधिकाऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे.
-
नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा दिल्याबद्दल सोलापुरातील महिलांकडून समाधान व्यक्त
नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा दिल्याबद्दल सोलापुरातील महिलांकडून समाधान व्यक्त, सोलापुरातील वर्ल्ड ऑफ वुमन संघटनेकडून सरकार आणि न्यायव्यवस्थेचे आभार. न्याय व्यवस्था आणि सरकारने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तात्काळ निकाल दिल्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. न्यायव्यवस्थेने ज्या तत्परतेने निकाल दिला तेवढ्याच तत्परतेने त्याला फासावर चढवावे ही मागणी आहे. या निकालामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटनांवर आळा बसेल अशी अपेक्षा आहे.
-
गोंदिया जिल्ह्यात युरियाचा 9 हजार मेट्रिक टन साठा आहे.
गोंदिया जिल्ह्यात युरियाचा 9 हजार मेट्रिक टन साठा आहे. जिल्ह्यात खतटंचाई नसल्याचा कृषी विभागाचा दावा. खरीपपूर्व खतांचे नियोजन पूर्ण. जिल्ह्यासाठी 76 हजार मेट्रिक टन खत मंजूर. घाबरून खत खरेदी करू नका. गरजेनुसारच खरेदीचे कृषी विभागाचे आवाहन
-
नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर एकनाथ शिंदेचीं प्रतिक्रिया
नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर एकनाथ शिंदेचीं प्रतिक्रिया “मी कोर्टाचे अभिनंदन करतो, त्यांचे धन्यवाद. अमानवीय, अमानुष कृत्याला आळा घालण्यासाठी फाशीचीच शिक्षा द्यावी अशी केस तयारी केली होती. ज्यांनी यात सहभाग घेतला एसपी, डिजी यांनाही धन्यवाद दिले पाहिजे. पोलिसांनी जलदगतीने दोन आठवड्यात आरोपपत्र दाखल केले. यामध्ये तीन वेगवेगळ्या केस होत्या. पॉस्को, बलात्कार आणि हत्याचे गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यातंर्गत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.”
-
गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात अनेक वैद्यकीय डॉक्टरांचे पद रिक्त असल्यामुळे नगरसेवकांचे आंदोलन
अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात अनेक वैद्यकीय डॉक्टरांचे पद रिक्त असल्यामुळे नगरसेवक अमोल मुक्कावार व त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयासमोर आंदोलन पुकारला. या रुग्णालयाचे उद्घाटन होऊन एक वर्ष लोटले तरी अनेक रिक्त पदे असल्याने तत्काळ भरण्यात यावी यासाठी हा आंदोलन पुकारण्यात आला असून या अगोदर रिक्त पद भरण्यास पक्षांनी ही मागणी केली. आज अमोल मुक्कावार यांच्या समर्थकांनी रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचे प्रयत्न केल्यामुळे आंदोलन कर्त्याना चार व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनाला शांत करण्यासाठी अहेरी येथील वैद्यकीय अधीक्षक यांनी आरोग्य विभागाच्या उप संचालकांसोबत दूरध्वनीवर संवाद साधला. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालय, महिला बाल रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. याला घेऊन नागरिकांनी राज्य सरकार विरोधात रोष व्यक्त केला
-
शिर्डीतून उद्धव ठाकरेंची सभा
फुटीर खासदार वाकचौरेच्या मतदारसंघात म्हणजे शिर्डीत उद्धव ठाकरेंची सभा सुरु आहे.
-
हा भाऊसाहेब वाकचौरे एक रुपयाही खर्च न करता खासदार झाला आणि 100 कोटीला विकला गेला- संजय राऊत
“इकडचा खासदार एक नंबरचा बदमाश माणूस. चार दिवसांपूर्वी या खासदाराने बैठकीत साईबाबांची शपथ घेतली. उद्धव ठाकरेंनी विचारल्यावर याने तीन वेळा साईबाबांची शपथ घेतली. साहेब मरेपर्यंत मी तुमच्यासोबत राहील, अशी शपथ घेतली. आता कुठे गेला मरायला? हा भाऊसाहेब वाकचौरे एक रुपयाही खर्च न करता खासदार झाला आणि 100 कोटीला विकला गेला. ये धंदा है लेकीन गंदा है! वाकचौरेला भीक लागली म्हणून तो तिकडे गेला. शिवसैनिकांनो तुमची निष्ठा जोपर्यंत अटळ आहे तोपर्यंत या वाकचौरेसारखे गद्दार येतील आणि जातील. उद्धव ठाकरे फिरले नसते तर हा वाकचौरे खासदार झाला नसता,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
-
ज्यादिवशी नराधमाला फाशी होईल, त्या दिवशी चिमुकलीला न्याय मिळेल- सुप्रिया सुळे
महाराष्ट्र पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस आणि कोर्टाचे मी आभार मानते. ज्यादिवशी आरोपीला फाशीची शिक्षा होईल, त्याच दिवशी त्या चिमुकलीला न्याय मिळेल. माझी मुख्यमंत्री आणि कोर्टाला विनंती आहे की या नराधमाला भर चौकात आणि लवकरात लवकर फाशी द्या, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-
सर्वांसमोर आरोपीला फाशी द्यावी, अशी माझी मागणी- सुप्रिया सुळे
सर्वांसमोर आरोपीला फाशी द्यावी, अशी माझी मागणी आहे. जेणेकरून कोणीच वाईट नजरेने आपल्या मुलाबाळांकडे पाहू शकणार नाही. फाशीची शिक्षा दिल्याने एन्काऊंटरचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
-
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जुलै रोजी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जुलै रोजी होणार आहे. आरोपी जयराम चाटेच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. जे पुरावे सादर करण्यात आले त्यात आरोपी हा खून एन्जॉय करत असल्याचं सरकारी पक्षाने निदर्शनास आणून दिलं. सरकारी पक्षाने जयराम चाटेच्या जामीन अर्जाला विरोध केला. आरोपी पक्षाने माझे डिस्चार्ज ॲप्लिकेशन रिजेक्ट झाले म्हणजे मला जामीन मागता येणार नाही हे चुकीचं असल्याचं म्हणणं न्यायालयासमोर मांडलं. दरम्यान आज झालेल्या युक्तिवादावर दहा जुलै रोजी न्यायालयाकडून निर्णय दिला जाणार आहे.
-
नसरापूर प्रकरणात 55 दिवसांनी निकाल
नसरापूर प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1 मे रोजी आरोपी भीमराव कांबळेनं साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर क्रूरपणे अत्याचार केले आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली.
-
नसरापूर प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा
नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या केल्याच्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
-
नसरापूर घटनेला दुर्मिळातील दुर्मिळ घटना बोललं पाहिजे- न्यायाधीश
नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी कोर्टात आरोपीच्या शिक्षेसंदर्भात सुनावणी सुरू आहे. यावेळी न्यायाधीश म्हणाले, “बच्चन सिंग प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. नसरापूर घटनेला दुर्मिळातील दुर्मिळ घटना बोललं पाहिजे. सत्र न्यायालयाचा निकाल वरच्या कोर्टात बदललाही जातो. काही वेळा मृत्यूदंडाची शिक्षा वरच्या कोर्टानं बदलली आहे.”
-
वयाव्यतिरिक्त नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या बाजूनं काहीही नाही- न्यायाधीश
“वासनेसाठी केलेलं कृत्य हे मृत्यूदंडाला पात्र आहे. वयाव्यतिरिक्त आरोपीच्या बाजूनं काहीही नाही. शिक्षेपासून वाचवण्यासाठी आरोपीकडे कुठलाही पुरावा नाही. या प्रकरणात आरोपीविरोधात सबळ पुरावे आहेत. स्वत:ची वासना शमवण्यासाठी आरोपीने हे कृत्य केलं” असं नसरापूर प्रकरणात न्यायाधीश म्हणाले. यावेळी सरकारी वकिलांनी युक्तिवादात 12 केसेसचा उल्लेख केला. न्यायाधीशांकडून शंकर खाडे केसचाही दाखला देण्यात आला.
-
सरकारवर गुन्हा दाखल केला पाहिजे – निलेश लंके
“प्रत्येक शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. हे फसवं सरकार आहे. शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. प्रत्येक दिवसाला आठ ते नऊ आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. याला सरकार जबाबदार आहे. सरकारवर गुन्हा दाखल केला पाहिजे” असं खासदार निलेश लंके म्हणाले.
-
अतिशय असंवेदनशील सरकार – सुप्रिया सुळे
आंदोलन हे गरजेचं आहे, कारण हे जे सरकार आहे, एवढं मोठं बहुमताचं सरकार आहे पण जो काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी आहे त्याचं कंबरडं मोडण्याचं पाप सातत्याने हे सरकार करतंय. अतिशय असंवेदनशील सरकार आहे. आणि त्यांच्या विरोधात हे आंदोलन आज होतंय, कारण न्याय मागून प्रेमाने बघितलं, आदराने बघितलं पण त्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, त्याची सरसकट कर्जमाफी होत नाही, त्याच्यामुळे लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-
महाराष्ट्रातील माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्यात गैर नाही – उद्धव ठाकरे
महाराष्ट्रातील माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्यात गैर नाही. मागे गडकरीचं नाव पंतप्रधानपदासाठी घेतलं जात होतं. त्यांना संघाचा पाठिंबा होता. त्यांना बदनाम करण्यात आलं असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
फडणवीसांची मला मनापासून काळजी वाटते – उद्धव ठाकरे
“महिला आरक्षण या क्षणापासून लागू व्हायला पाहिजे. आता 550 खासदार आहेत, त्या पासून सुरुवात करा. संपूर्ण देशाचं मत विचारात घेणं गरजेचं आहे. फोडाफोडी करुन दोन तृतीयांश बहुमत जमवण्याचा काही फायदा नाही. नितीन गडकरी संघाचा चेहरा असूनही त्यांना बदनाम केलं गेलं. फडणवीसांची मला मनापासून काळजी वाटते” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
नसरापूर प्रकरणात थोड्याचवेळात येणार निर्णय
नसरापूर प्रकरणात आज कोर्टाकडून शिक्षा सुनावली जाईल. हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण मानून कोर्टाने आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. आरोपी भीमराव कांबळेवर साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा आरोप आहे.
-
रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्या
जळगावच्या पारोळा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्याची घटना समोर आली आहे. पारोळा येथील ईश्वर ठाकूर यांच्या मालकीची रुग्णवाहिका असून याबाबत त्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अज्ञात व्यक्तीने रुग्णवाहिकेच्या काचा फोडून नुकसान केल्याची माहिती समोर आली असून पोलीस घटनेचा तपास करत आहे.
-
शिर्डी – उद्धव ठाकरे साईबाबांच्या मंदिरात, बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात आज धडाडणार तोफ
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिर्डी येथे पोहोचले असून थोड्याच वेळात ते साई मंदिरात जाऊन दर्शन घेतील. उद्धव ठाकरेंचा आज शिर्डीत कार्यकर्ता मेळावा आहे. शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात आज ठाकरेंची तोफ धडाडणार . साई दर्शनानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद आणि त्यानंतर कार्यकर्ता मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरे हे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर काय टीका करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
जाणूनबुजून पेपर फोडले जात आहेत का ? भास्कर जाधव यांचा सवाल
जाणूनबुजून पेपर फोडले जात आहेत का ? काही ठराविक लोकांसाठी पेपरफुटी सुरू आहे का ? भास्कर जाधव यांनी उपस्थित केला सवाल
-
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी कोर्टात हजर, थोड्याच वेळात सुनावली जाणार शिक्षा
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कोर्टात हजर करण्यात आल आहे. थोड्याच वेळात न्यायालयाकडून त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं होतं. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी आज एल्गार अन्नदात्याचा आंदोलन
छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी आज एल्गार अन्नदात्याचा आंदोलन. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली केंब्रिज चौकात हे आंदोलन होणार आहे. विनाअट सरसकट कर्जमाफीसह विविध शेतकरी मागण्यांसाठी सरकारविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे. खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथे बिबट्याचा मुक्तसंचार, ग्रामस्थ दहशतीत
निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथे बिबट्याचा मुक्तसंचार सुरू आहे. हरिभाऊ सांगळे यांच्या द्राक्षबागेत बिबट्या सावजाच्या शोधात फिरताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. स्थानिकांना माहितीसाठी सोशल मीडियावर बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला . बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं अशी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची मागणी आहे.
-
धाराशिव जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, तरीही पेरण्या खोळंबल्या
धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. कळंब, वाशी आणि धाराशिव परिसरात पाऊस झाला, तर इतर तालुक्यांतही हलक्या पावसाची नोंद झाली.मात्र, हा पाऊस पेरणीसाठी पुरेसा नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप खोळंबलेल्या आहेत. जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण न झाल्यामुळे अनेक शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 96 मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरणीवर सावट कायम आहे.
-
आमिषाने तरूण ‘गोल्डन ट्रँगल’ च्या जाळ्यात
उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील 25 तरुणांना म्यानमार-थायलंड सीमेवरील कुख्यात ‘गोल्डन ट्रँगल’ परिसरात ओलिस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्यानमार, थायलंड आणि लाओस या देशांच्या सीमा जिथे मिळतात, त्या भागाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘गोल्डन ट्रँगल’ म्हटले जाते.
-
उद्धव ठाकरेंचा दौऱ्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याचे राजीनामे
उद्धव ठाकरेंचा दौऱ्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याचे राजीनामे. यवतमाळ तालुका प्रमुखासह 15 जणांनी दिले राजीनामे. तालुकाप्रमुख गजानन पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख अमोल धोपेकर, महिला आघाडी प्रमुख अंजली गिरी, अक्षय ठाकरे तालुका प्रमुख युवासेना आधीचा समावेश. यवतमाळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी चा राजीनामा
-
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी
मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, गावाला जोडणारा वाहतुकीचा मुख्य रस्ता पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात पूर्णपणे वाहून गेला आहे. रस्ता खचल्यामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली असून ग्रामस्थांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
-
जालना जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू
जालना जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या घटनेत 3 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या.जालना अंबड महामार्गावर कार आणि ट्रकच्या धडकेमध्ये जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील दोन जिवलग मित्रांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला,विकास चव्हाण आणि सागर बर्डे अशी मृत्यू झालेल्या दोन जिवलग मित्रांची नावे आहेत तर दुसरीकडे बदनापूर तालुक्यातल्या अकोला गावातील पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण देवानंद गीते याचा देखील दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू झालाय.
-
आज संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वरात हजारो वारकरी-भाविकांची गर्दी जमली आहे. सिंहस्थ कामांमुळे यंदा पालखीच्या पारंपरिक मार्गात बदल करण्यात आलेत, पालखीसाठी आकर्षक रथ व मंदिराची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रशासनाकडून सुरक्षा, वाहतूक व सुविधांचे विशेष नियोजन करण्यात आलं आहे. मंत्री गिरीश महाजन, अमित ठाकरे पालखी सोहळ्याला लावणार हजेरी लावणार आहेत.
-
सोलापुरात काल रात्री झालेल्या पहिल्याच पावसात शहरातील अनेक घरात शिरले पाणी
सोलापूर जिल्ह्यात काल रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे शहरातील नागरिकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले. रस्त्यावर आणि घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने अनेक नागरिकांनी रात्र जागून काढली. शहरातील घरकुल, 256 गाळा परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले, पहिल्याच पावसात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने सोलापूरकरांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
-
केतन अग्रवाल हत्याकांडा मधील आरोपीची आज पोलीस कोठडी संपणार
केतन हत्याकांडामधील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला न्यायालयाने 8 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती ती आज संपणार आहे, आज दुपारच्या सत्रात मावळ तालुक्यातील वडगांव न्यायालयात ह्या दोघांना हजर करणार. काल सकाळच्या सुमारास लोणावळा पोलिसांनी लोहगडावर आरोपींना घेऊन जात क्राईम सीन रिक्रिएशन करण्यात आलं. त्यानंतर पोलीसानी दोनही आरोपीकडे कसून तपास करण्यात आला. ह्या प्रकरणात आतपर्यंत 10 ते 12 लोकांचे जवाब लोणावळा पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. या मध्ये प्रामुख्याने सिया गोयल चे आई-वडील,भाऊ तसेच गोयल आणि अग्रवाल यांचे नातेवाईक मित्तल यांची चौकशी करत महत्वाचे जबाब नोंदवून घेतले आहेत. या मधून अनेक खुलासे देखील समोर आले आहेत.
-
नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील गोडसे मळा परिसरात मादी बिबट्या जेरबंद
संसारी गावातील गोडसे मळा परिसरात बिबट्याचा वावर होता. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याने आठ दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता. वनविभागाने पिंजरा लावल्यानंतर चार वर्षाची मादी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची नागरिकांनी माहिती दिल्यानंतर वनविभागाने रेस्क्यू केले.
-
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील ऐतिहासिक अमृतकुंडाच्या तळाशी असलेले शिवलिंगांचे अनेक वर्षांनंतर प्रथमच झाले दर्शनास
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण कडून संवर्धनाच्या कामाअंतर्गत अमृतकुंडातील पाणी उपसून स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेदरम्यान कुंडाच्या तळाशी असलेले शिवलिंग स्पष्टपणे दिसून आले. सुमारे ६५ फूट खोल असलेले अमृतकुंड पेशवेकालीन असल्याचे मानले जाते. याच कुंडातील पाण्याचा उपयोग श्री त्र्यंबकेश्वराच्या नित्यपूजा व अभिषेकासाठी केला जातो. सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना अमृतकुंडात प्रवेशास परवानगी नाही. या दुर्मिळ दर्शनामुळे मंदिर प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले गेले.
-
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागपूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
रविवारी जिल्ह्यात 3 लाख 24 हजार 322 बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्यात आला. ग्रामीण भागात 98 टक्के तर नागपूर शहरात 93 टक्के लसीकरण करण्यात आले. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी 29 जून ते 3 जुलै दरम्यान आरोग्य पथके घरोघरी जाऊन डोस पाजणार आहेत.
-
जळगाव : शेतात पेरणी करत असताना विजेचा धक्का लागून बैलाचा मृत्यू
जळगाव, भुसावळ : आज शेतात पेरणी करत असताना विजेचा धक्का लागून बैलाचा मृत्यू तर थोडक्यात पेरणी करणाऱ्या महिला बचावल्या आहेत. भुसावळच्या गोजोरे शिवारात ही घटना घडली आहे. मात्र शेतकऱ्याचा बैल गेल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट येऊन या शेतकऱ्याची पेरणी खोळंबली आहे.
-
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मध्ये मोठा पाऊस
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मध्ये मोठा पाऊस झाला आहे, या पावसाने शहरातल्या रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे . उदगीरच्या नांदेडनाका भागात नालीचे पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने वाहतुकीला अडचण झाली आहे. वाहनांना रस्त्यावर आलेल्या पाण्यातून वाट काढत पुढे जावे लागते आहे. रस्त्याला तलावाचे स्वरूप आल्याने नागरिकांचीही अडचण झाली आहे.
-
KDMC महासभेत आज विविध प्रश्नांवर जोरदार चर्चा; नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता
प्रभाग फेररचना, रिंगरोड प्रकल्प आणि शहरासाठी स्वतंत्र पार्किंग पॉलिसी हे विषय चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहेत. २७ गावांतील विकासकामे, आरोग्य सुविधा आणि मूलभूत नागरी प्रश्नांवर सभागृहात खडाजंगी होणार. सार्वजनिक उद्यानांची दुरावस्था, आचार्य अत्रे रंगमंदिराची अवस्था आणि रखडलेल्या कामांवर प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे. शहराच्या विकासाशी निगडित महत्त्वाच्या निर्णयांमुळे आजच्या महासभेकडे नागरिकांचे लक्ष लागले.
-
“लाखो प्रवाशांचे स्टेशन, पण सुविधा रामभरोसे; कल्याण स्टेशनवरील शौचालयाची दयनीय अवस्था”
कल्याण रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील शौचालयाची दुरावस्था सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुटलेले दरवाजे, साचलेली घाण आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांचा तीव्र संताप होत आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना शौचालय वापरताना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. शौचालय परिसरातच काही व्यक्ती आंघोळ करत असल्याचे दृश्य व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती व स्वच्छता मोहीम राबवण्याची प्रवाशांनी मागणी केली आहे.
Published On - Jun 29,2026 8:02 AM
