AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : मोशीतील दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू, बचावकार्य थांबवलं

| Updated on: Jul 12, 2026 | 10:11 AM
Share

Maharashtra live update : मोशीत घडलेल्या दुर्घनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आज बचावकार्य थांबवण्यात आले आहे.

Maharashtra News LIVE  : मोशीतील दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू, बचावकार्य थांबवलं

LIVE NEWS & UPDATES

  • 12 Jul 2026 10:09 AM (IST)

    ब्रेक घाटनांदुर येथे चाकूने वार करून 21 वर्षीय एकाचा खून रात्रीची घटना

    अंबाजोगाई तालुक्यातील पट्टी वडगाव येथील ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे वय 21 वर्षे या युवकाच्या रात्री घाटनांदुर येथे साठे चौकात चाकूने वार करून खून करण्यात आला आहे. खुनाच कारण मात्र अजून समजू शकले नाही पोलिसांनी चार जणांना संशयत म्हणून ताब्यात घेतले आहे. मयताची बॉडी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय या ठिकाणी नेण्यात आली आहे

  • 12 Jul 2026 09:57 AM (IST)

    सिडकोच्या घराची प्रतीक्षा पडली लांबणीवर

    अनेक जण सिडकोच्या घराच्या सोडतीच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु 4 महिन्यांपासून सिडकोची सोडत काढली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे पैसे मागील 4 महिन्यांपासून अडकले आहेत.

  • 12 Jul 2026 09:46 AM (IST)

    सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या ‘बूस्टर’ कंपनीविरोधात गुन्हा

    सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या ‘बूस्टर’ कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोयाबीनचे 7 नमुने अप्रामानित ठरले आहे. तर 500 हून अधिक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर ही कारवाई झाली.

  • 12 Jul 2026 09:27 AM (IST)

    पुण्यात सदाशिव पेठेत दुकानाला लागली आग, दुर्घटनेत जीवितहानी नाही

    पुण्यात सदाशिव पेठेत दुकानाला आग लागल्याची घटना घडली. आगीचे अद्याप कारण समजले नाही. पाच मजली इमारत असलेल्या भागात पहिला व दुसरा मजला दुकानाचा असल्याचे समजतेय. या दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर आयक्रॅलिक मशीन, कच्चे सामान, पीओपी, वायरिंग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

  • 12 Jul 2026 09:01 AM (IST)

    मोशी दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू, मध्यरात्री एकाचा मृतदेह सापडला, शोधकार्य थांबवलं

    मोशी दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. एका व्यक्तीचा मृतदेह मध्यरात्री एक वाजता सापडला. बुधवारी दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू असलेलं बचावकार्य मध्यरात्री एक वाजता थांबवण्यात आलं. या ढिगाऱ्यात एकूण 23 जण अडकले होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मोशीत कचरा डेपोमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. काल मोशीत अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. मागील दोन दिवसांत राज्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. दुसरीकडे राज्यातील धरणक्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील दारणा, भावली, भाम, वाकी, वालदेवी धरणात पाणीसाठा वाढला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट जाणून घ्या.

Published On - Jul 12,2026 8:57 AM

Follow Us
सडलेलं अन्न, Unsafe Products?; स्विगी इन्स्टामार्टवर FSSAIचा मोठा दणका
ऑनलाइन अन्न मागवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! Expired अंडी, सडलेलं अन्न, Unsafe Products?; स्विगी इन्स्टामार्टवर FSSAIचा मोठा दणका
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी