AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे पाऊल, ही तयारी सुरु

maharashtra vidhan sabha election 2024: लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली. आयोगाने महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.

लोकसभेनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे पाऊल, ही तयारी सुरु
cm eknath shinde
| Updated on: Jun 21, 2024 | 1:38 PM
Share

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर देशात नवीन सरकार सत्तेवर आले. दोन महिन्यांपेक्षा दीर्घ काळ लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु होती. एकूण सात टप्प्यात ही निवडणूक होती. १९ एप्रिलपासून मतदान सुरु झाले. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी झाली. आता लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोग पुन्हा कामाला लागले आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पहिले पाऊल उचलण्यात आले आहे.

आयोगाकडून विधानसभेची तयारी सुरू

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली. आयोगाने महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. घरोघरी जाऊन मतदार याद्या अदयावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्या अडचणी दूर केल्या जाणार आहेत.

सप्टेंबर, ऑक्टोंबरमध्ये निवडणुका

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २१ ऑक्टोबर २०१९ रोजी झाली होती. राज्यातील सर्व २८८ जागांसाठी मतदान झाले. २४ ऑक्टोबर २०१९ रोजी निकाल जाहीर झाले. त्या निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. परंतु भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरुन मतभेद निर्माण झाले. त्यानंतर कोणत्याही पक्षाला सरकार बनवता न आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. जवळपास दोन महिने राष्ट्रपती राजवट होती. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०१९ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु या सरकारला बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यानंतर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी निर्माण झाली आणि राज्यात उद्धव ठाकरे यांचे युग सुरु झाले.

एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात सरकार

दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. आता २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्या महायुतीमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) भाजपसोबत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेससोबत राष्ट्रवादी (शरद पवार) शिवसेना (उद्धव ठाकरे) आहेत. यामुळे २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.