Marathi News Maharashtra Massajog dhananjay deshmukh protest at water tank for justice in santosh deshmukh murder case see thes five photos
Dhananjay Deshmukh : फक्त हे 5 PHOTO बघा, मस्साजोगमध्ये सकाळी 11 ते दुपारी 1.15 या वेळेत काय घडलं? ते लगेच समजेल
Dhananjay Deshmukh : मस्साजोगमध्ये आज मोठ आंदोलन झालं. संतोष देशमुख हत्या प्रकणात न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांचे बंधु धनंजय देशमुख थेट पाण्याच्या टाकीवर चढले. त्यांना खाली उतरवण्यासाठी प्रशासनाला बरच काही करावं लागलं. हा सगळा घटनाक्रम फक्त पाच फोटोंमधून समजून घ्या.
खंडणीमधल्या गुन्हेगारांना पूर्ण आरोपी करत नाहीय. पुरावे असताना त्यांना आरोपी करत नाहीयत. आरोपींना कुठेतरी वाचवायचा प्रयत्न होतोय, म्हणून धनंजय देशमुख यांनी आज मस्साजोगमधील पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन केलं. वाल्मिक कराडला अजून संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी बनवलेलं नाही.
1 / 5
"तुम्हाला काय झालं, तर मी यांचं जीण मुश्किल करेन. तुम्ही खाली या, तुमची कुटुंबाला गरज आहे. आपल्याला संतोष भय्याला न्याय द्यायचा आहे. माझा समाज तुमच्या पाठिशी आहे. आत्महत्या करायची नाही, खाली या" अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
2 / 5
धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करताना त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या दोन सहकाऱ्यांनी त्यांना तिथे झोपवलं. कोणी आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी दुसऱ्या मजल्यावरुन वर येणारी शिडीच त्यांनी हटवली. "माझ्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी आंदोलन करणार, असं धनंजय देशमुखांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितलं.
3 / 5
धनंजय देशमुख यांची समजूत घालण्यासाठी पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधला. स्वत: एसपी कावत मोबाइलवरुन धनंजय देशमुख यांच्याशी बोलले. ते ज्या टाकीवर चढले होते. त्यालाच समांतर एक दुसरी टाकी आहे, तिथे जाऊन महिला पोलीस अधिकाऱ्यांनी धनंजय देशमुख यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.
4 / 5
अखेर पोलीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर धनंजय देशमुख खाली उतरले. खाली आल्यानंतर धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे पाटील यांची गळाभेट झाली. हा आंदोलनातला एक भावनिक क्षण होता.