144 in mumbai : मोठी बातमी! ठाण्यानंतर मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश, बंदोबस्त वाढवला

144 in mumbai : मुंबईत कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय पक्षांच्या कार्यालयाचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय. राजकीय बॅनरबाजी होणार नाही याकडेही विशेष लक्ष दिलं जातंय. आंदोलन किंवा हिंसा होणार यांची याचीही खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

144 in mumbai : मोठी बातमी! ठाण्यानंतर मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश, बंदोबस्त वाढवला
मुंबई
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 3:39 PM

मुंबई : राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलं असून शिंदे विरुद्ध ठाकरे, असा संघर्ष निर्माण झालाय. यामुळे बंडखोर आमदार आणि शिवसैनिक यांच्यात हा संघर्ष दिसून येत असून अनेक ठिकाणी तोडफोडीच्याही घटना घडतायत. याच सगळ्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी घेत  मुंबईमध्ये (Mumbai) 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये काही अपवादात्मक बाबींना सूट आहे. मात्र, लाऊडस्पीकर वैगेरे इत्यादी बाबींवर बंदी आहे. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांचे (Police) प्रयत्न सुरू आहेत. काल पोलीस आयुक्तांनी मुंख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.  आमदार (MLA), खासदार आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयाचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय. राजकीय बॅनरबाजी होणार नाही याकडेही विशेष लक्ष दिलं जातंय. आंदोलन किंवा हिंसा होणार यांची याचीही खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सध्या राजकीय वातावरण तापल्यानं पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जातेय.

राजकीय पेच, पोलीस अलर्ट

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडतायेत. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट, असा संघर्ष रोज पहायला मिळतोय. एकीकडे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरू झाली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट संख्याबळ पूर्ण करून सरकार स्थापनेच्या तयारीत असल्याचं दिसतंय. यामुळे मुंबईत कधीही बंडखोर येऊ शकतात आणि राजकीय पेच निर्माण होऊ शकतो , यामुळे देखील पोलीस अलर्ट आहेत.

आमदारांचं निलंबन? वातावरण तापणार

शिवसेनेने पक्षादेश न पाळल्यामुळे जवळपास 16 आमदारांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. त्यामुळे यावर देखील चर्चा होऊ शकते. एकीकडे  निलबंन रद्द करण्यासाठी कारवाई सुरु केली आहे. यासंदर्भातील पत्र शिवसेनेने विधानसभेच्या उपाध्यक्षांना दिलं आहे. त्यामुळे शिंदे गटासमोरील या क्षणाचं हे सर्वात मोठं आव्हान आहे. याला कायदेशीर रित्या कसं सामोरं जावं, यासंबंधीची चर्चा आज गुवाहटीत होणाऱ्या बैठकीत केली जाईल. तर दुसरीकडे आज शिवसेनेच्या कार्यकारिणीत यावर काय निर्णय घेतला जातो, हे पहावं लागेल. दरम्यान, यावर वातावरण तापू शकतं. निलंबन करण्यात आलं तर वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे देखील खबरदारी घेतली जातेय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकडे पोलीस प्रशासनाचं लक्ष आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.