सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं काय झालं? वर्ष होऊनही सीबीआय मौन का?; सचिन सावंताचा सवाल

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटवर ट्विट करून भाजप आणि सीबीआयवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. (CBI should immediately clarify the current status of investigation in Sushant Singh case)

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं काय झालं? वर्ष होऊनही सीबीआय मौन का?; सचिन सावंताचा सवाल
सुशांतसिंह राजपूत
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 3:22 PM

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं काय झालं? वर्षे उलटलं तरी या प्रकरणावर सीबीआयचं मौन का? तपास कुठपर्यंत आला? असे सवाल करतानाच या प्रकरणी महाराष्ट्राची बदनामी केल्याप्रकरणी भाजपने माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. (CBI should immediately clarify the current status of investigation in Sushant Singh case)

सचिन सावंत यांनी ट्विटवर ट्विट करून भाजप आणि सीबीआयवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. सीबीआयने बिहार पोलिसांकडून सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूची चौकशी हाती घेण्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. बिहार पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 177 कलमाचे उल्लंघन केले होते. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलिसांच्या एकूण तपासाबद्दल समाधान व्यक्त केले होते. परंतु मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा आणि महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा राजकीय डाव होता. बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा याकरता वापर केला गेला. भाजपाने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन खुलेआमपणे खून, बलात्काराचे आरोप केले व बिहार निवडणुकीतही सुशांतच्या मृत्यूचा वापर केला, अशी टीका सावंत यांनी केली आहे.

सीबीआयवर दबाव आहे का?

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला एक वर्ष पूर्ण झाले असून अद्याप सीबीआय कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचलेली नाही. एम्स पॅनेलने सुशांतसिंहच्या हत्येला नकार देऊनही 300 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. सीबीआय याप्रकरणी अजूनही मुद्दाम मौन बाळगून आहे, त्याच्यामागे कोणाचा दबाव तर नाही ना? अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा केलेल्या सुशांतसिंह प्रकरणात एका वर्षात काय प्रगती झाली? चौकशीची काय सद्यस्थिती आहे? महाराष्ट्रातील तपास जाणीवपूर्वक अंतहीन ठेवण्याचे मोदी सरकारचे आदेश आहेत का? हे सीबीआयने तात्काळ स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

भाजपने माफी मागावी

आघाडी सरकारवरील सुनियोजित राजकीय हल्ल्याची रणनिती आखून भाजपा संचलित वाहिन्यांना सुशांतसिंहचा खून झाल्याचा सातत्याने उच्चार करण्यास सांगितले गेले. भाजप नेते महाराष्ट्राची बदनामी करत होते. सीबीआय आणि इतर एजन्सींनी बनावट माहिती लीक केली. भाजप आयटी सेलने हजारो बनावट ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब अकाउंट तयार केले व त्या माध्यमातून अपप्रचार केला. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी सुशांतसिंहच्या मृत्यूच्या केलेल्या तपासाच्या चेष्टेतून मोदी सरकारकडून या यंत्रणांचा राजकीय अजेंड्यासाठी कसा वापर केला जात आहे हे स्पष्ट होते. भाजपाने या प्रकरणात महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली त्याबद्दल जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. (CBI should immediately clarify the current status of investigation in Sushant Singh case)

संबंधित बातम्या:

मुंबईची लोकल कधी सुरू होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पहिल्यांदाच दिलासादायक विधान

राजकीय धुराळ्यानंतर राज्यपालांचं एक पाऊल मागे, उद्घाटन टाळलं, साधी पाहणीही नाही!

महाराष्ट्राच्या लेकीचा UPSC मध्ये डंका, धुळ्याच्या हर्षदाची भारतीय सांख्यिकी सेवेत चौथ्या रँकवर झेप

(CBI should immediately clarify the current status of investigation in Sushant Singh case)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.