तेव्हा तुमची सतरंजी किती फाटली होती… राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा राज ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी हा पक्ष आहे असं मानायलाच मी तयार नाही. राष्ट्रवादी ही निवडून येणाऱ्यांची मोळी आहे, असा हल्लाच राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या या विधानाचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.

तेव्हा तुमची सतरंजी किती फाटली होती... राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा राज ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 6:35 PM

मुंबई | 9 मार्च 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा तोफ डागली. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे असं मानायलाच आपण तयार नाही. निवडून येणाऱ्यांची ती मोळी आहे. शरद पवार यांनी ही मोळी बांधली आहे, असा हल्लाच राज ठाकरे यांनी केला. तसेच राष्ट्रवादीतील फुटीवरूनही त्यांनी निशाणा साधला. शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही आतून एकच आहे, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राज ठाकरे यांच्या या आरोपाचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी समाचार घेतला आहे.

राज ठाकरे यांनी केलेलं विधान हस्यास्पद आहे. त्यांनी स्वत:च्या पक्षाची परिस्थिती पाहावी. तुमच्या 13 आमदारांपैकी एकच आमदार निवडून कसा आला? याचं आधी चिंतन करा. इतकंच काय तुमच्या मुलाने माथाडी कामगार नेत्यावर कसा जीवघेणा हल्ला केला हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे आपली सतरंजी किती फाटली होती हे एकदा बघावं, असा हल्लाच अमोल मिटकरी यांनी केला आहे. उगाचचं उचलली जीभ लावली टाळ्याला करू नका. तुमचं इंजिन भंगारात जमा व्हायला आलं आहे. थोडं सांभाळा. मग राष्ट्रवादीवर हल्ला करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

तो माणूस भाजपसोबत कसा जाईल?

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते स्वतः नाटक कंपनी आहेत. मिमिक्री आर्टिस्ट आहेत. कोणाचीही नक्कल करू शकतात म्हणजे ते आर्टिस्ट आहेत. स्वतःचा पक्ष वाढवण्यापेक्षा दुसऱ्याच्या पक्षात काय चालू आहे हे कशाला बघताय? आम्ही खुलेआम सांगतोय आमच्यातून गेलेल्यांना कुणालाही दरवाजा उघडणार नाही. आमचे सर्व दरवाजे आम्ही बंद करून टाकले आहेत. ज्या माणसाने एका विचारासाठी धर्मनिरपेक्ष विचारासाठी आपलं घर तुटताना पाहिलं आणि सांगितलं मी विचार मागे घेणार नाही, तो माणूस भाजपमध्ये कसा जाईल? आणि सोडून गेलेल्यांना परत सोबत कसा घेईल? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मोळी बांधली की चोळी?

काल त्यांनी इशारा दिला दादागिरी करू नका माझं नाव शरद पवार आहे. हा इशारा फक्त एका आमदाराला न्हवता. दादागिरी कुठे कुठे चालू आहे हे सर्वांना माहीत आहे. त्या सगळ्या आमदारांना होता. शरद पवार अत्यंत जिद्दीने आणि महाराष्ट्र जिंकायचा हेतूने बाहेर पडले आहेत. राज ठाकरे यांनी आपला पक्ष बघावा. मोळी बांधली आहे का चोळी बांधली आहे ते पाहावं आणि आपल्या पक्षापुरतं मर्यादित राहावं, असा इशाराच आव्हाड यांनी दिला.

खायचे आणि दाखवयाचे दात वेगळे

भोंग्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरे गेल्या वर्षभरात अनेकदा मुख्यमंत्र्यांकडे चहा प्यायले. तसेच मुख्यमंत्रीही 50 वेळा राज ठाकरेंकडे चहा प्यायले आहेत. चहा पिता पिता ते बोलले असते तर मजा आली असती. त्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा हल्लाच आव्हाड यांनी राज यांच्यावर केला.

तो टोला उद्धव ठाकरेंना

सध्या राजकारणात दुसऱ्यांची पोरं कडेवर घेऊन काही लोक नाचत आहे. मला दुसऱ्यांची पोरं कडेवर घ्यायची नाहीत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. राज ठाकरे यांच्या या टीकेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला वाटतं राज ठाकरे यांनी हे विधान उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून केलं असेल. कारण उद्धवजी दुसऱ्यांच्या पक्षातले लोक स्वतःच्या पक्षात घेणाऱ्यांला मर्दानगी म्हणतात. आणि म्हणून काही शिवसैनिक हे उद्धवजींना सोडून एकनाथ शिंदेंकडे चाललेत. राज ठाकरे यांचा टोला उद्धव ठाकरे यांच्या दिशेने आहे असं मला वाटतं, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.