LIVE | शिवसेना भाजपमध्ये जुंपली, संदीप गिऱ्हे यांची गजानन वलकेवार यांना धक्काबुक्की

| Updated on: Jan 05, 2021 | 6:28 AM

देशातील तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण घडामोडी फक्त एका क्लिकवर LIVE

LIVE | शिवसेना भाजपमध्ये जुंपली,  संदीप गिऱ्हे यांची गजानन वलकेवार यांना धक्काबुक्की

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Jan 2021 11:43 PM (IST)

    सागावे ग्रामपंचयेत बिनविरोध लढवण्याच्या प्रयत्नाला अपयश

    पालघर तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून आज   (सोमवारी)माघार घेण्याची शेवटची तारीख असल्यामुळे चार उमेदवारांमध्ये समोरासमोर निवडणूक होणार आहे, यापूर्वी एकूण ७ जागांपैकी  ३ जागा बिनविरोध झाल्या असून ७ सदस्यांपैकी ४ जागेसाठी लढत होणार आहे. सागावे ग्रामस्थानी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शर्तींचे प्रयत्न केले मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. आता चार जागांवर कोणते उमेदवार निवडून येतील हेच पाहणे औचित्य ठरणार आहे. ग्रामपंचायत एकूण  मतदार ६३१ असून त्यापैकी पुरुष ३०१ व महिला ३३० आहेत
  • 04 Jan 2021 11:42 PM (IST)

    पुण्यातील महाविद्यालयांची घंटा वाजणार, पुणे विद्यापीठाचे प्रत्यक्ष असभ्याक्रम 11 तारखेपासून होणार सुरू

    पुण्यातील महाविद्यालयांची घंटा वाजणार,

    – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू होणार 11 तारखेपासून, प्रँक्टीकलला दिलं जाणार प्राधान्य,

    – 11 तारखेपासून प्रत्यक्ष महाविद्यालयात होणार अभ्यासक्रमाला सुरुवात,

    – युजीसीनं घालून दिलेल्या नियमांच पालन करून महाविद्यालयात होणार सुरुवात,

    – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं परिपत्रक काढत दिली माहिती.

  • 04 Jan 2021 10:33 PM (IST)

    शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांची भाजपचे माजी पंचायत समिती उपसभापती गजानन वलकेवार यांना धक्काबुक्की

    चंद्रपूर : शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांची भाजपचे माजी पंचायत समिती उपसभापती गजानन वलकेवार यांना धक्काबुक्की, मूल बसस्थानका जवळ घडला प्रकार, राजोली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अशोक कावळे यांनी शिवसेना समर्थीत पॅनलकडून उमेदवारी अर्ज भरल्याने झाला दोघांमध्ये वाद, धक्काबुक्की नंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात मूल स्टेशन मध्ये दिली तक्रार, पोलीसांनी दाखल केला अदखलपात्र गुन्हा

  • 04 Jan 2021 09:14 PM (IST)

    मंचर ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र लढणार

    - आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीसाठी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील एकत्र

    - मंचर ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्रितपणे महाविकासआघाडी कडून एकत्र लढणार

    - गेल्या काही वर्षापासून एकमेकांविरोधात लढणारे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे कट्टर विरोधक निवडणुकीसाठी प्रथमच एकत्र

  • 04 Jan 2021 09:08 PM (IST)

    बुलडाणा जिल्हा कारागृहात असलेल्या 20 वर्षीय महिलेची आत्महत्या

    बुलडाणा जिल्हा कारागृहात असलेल्या 20 वर्षीय महिलेची आत्महत्या, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या जिल्हा कारागृहतील महिलेची आत्महत्या, न्यायालयीन कोठडीत होती आरोपी महिला, अकियाबी मुनाब खा असे मृतक महिलेचे नाव, स्वछतागृहतील शॉवर ला ओढणीने घेतला गळफास, रायपूर पोलिसांत महिलेवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून पंचनामा सुरू, कारागृह प्रशासनात खळबळ

  • 04 Jan 2021 09:01 PM (IST)

    राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडणार

    - रत्नागिरी -जिल्ह्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडणार

    - जिल्ह्यात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता

    - ७ जानेवारीपर्यंत विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

    - मुंबईच्या कुलाबा वेधशाळेकडून तसा इशारा मिळाल्याची माहिती

    - रत्नागिरीच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना कळविली

    - ऐन थंडीच्या मोसमात अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने आंबा बागायतदार चिंतातुर

    - जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण

    - यामुळे आंबा पीक अडचणीत येण्याची शक्यता

  • 04 Jan 2021 08:49 PM (IST)

    सोहेल खान, अरबाज खान आणि निर्वाण खान यांच्या विरोधात पालिकेकडून पोलिसात तक्रार , गुन्हा दाखल

    - सोहेल खान, अरबाज खान आणि निर्वाण खान यांच्या विरोधात पालिकेकडून पोलिसात तक्रार , गुन्हा दाखल

    - हे तिघेही 25 डिसेंबर ला यूएई वरून मुंबईत दाखल झाले

    - त्यांना कॉरटाईन करण्यासाठी ताज लैंड मध्ये व्यवस्था करण्यात आली होती

    - 26 तारखेला यांनी ह्या रूम रद्द केल्या

    - यामुळे पालिकेने यांच्या साथ नियंत्रण प्रतिबंधक कायद्यात अंतर्गत पोलिसात तक्रार केली

  • 04 Jan 2021 08:45 PM (IST)

    वर्धा जिल्ह्यात एकूण 50 ग्रामपंचायत, एकूण मतदारसंख्या 1 लाख 18 हजार 633

    वर्धा ग्रामपंचायत माहिती

    - जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या एकूण ग्रामपंचायती - ५० ग्रामपंचायत

    - निवडणूक होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीतील एकूण वॉर्ड व सदस्य संख्या - १७३ प्रभाग व ४७२ सदस्य संख्या

    - १७३ प्रभागातील ४७२ सदस्यांसाठी १२७९ उमेदवार रिंगणात

    - बिनविरोध झालेल्या एकूण ग्रामपंचायती - एकही नाही

    - बिनविरोध ग्रामपंचायतींची नावे - एकही नाही

    - जिल्ह्यातील बिनविरोध ठरलेली सदस्यसंख्या - 22 सदस्य अविरोध

    - जिल्ह्यात साटोडा , मसाळा , वरुड , तळेगाव (श्यामजीपंत) , येळाकेळी या ग्रामपंचयत चुरशीने लढल्या जात आहे.

    - ५० ग्रा.पंचायतींसाठी एकूण मतदारसंख्या - १ लाख १८ हजार ६३३

    - निवडणुकीवर बहिष्कार टाकलेल्या ग्रा.पंचायतींची संख्या - एकही नाही

  • 04 Jan 2021 07:55 PM (IST)

    नागपूर पोलिसांनी पकडला 28 किलो गांजा, 2 आरोपींना अटक 

    नागपूर पोलिसांनी पकडला 28 किलो गांजा , 2 आरोपीना केली अटक, 28 किलो गांजा सह एक कार आणि इतर साहित्य मिळून 4 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, झारखंड राज्याच्या रांची मधून केली जात होती गांजा तस्करी

  • 04 Jan 2021 07:54 PM (IST)

    वडाळा स्थानकात महिलेचा विनयभंग करून हत्येचा प्रयत्न करणारा आरोपी अटकेत

    वडाळा स्थानकात महिलेचा विनयभंग करून हत्येचा प्रयत्न करणारा आरोपी अटकेत, रेल्वे पोलीस घेत होते दोन दिवसांपासून शोध, सीसीटीव्ही जारी करून दिसल्यास पोलिसांना कळवण्याचे केले होते पोलिसांनी आवाहन, राजू बंड्या पांडे असं अटक आरोपीचे नाव, नवी मुंबईतल्या कोपरखैरणेमधून करण्यात आली अटक

  • 04 Jan 2021 07:47 PM (IST)

    मुक्ताईनगर तालुक्यात चार ग्रामपंचायत बिनविरोध

    मुक्ताईनगर तालुक्यात चार ग्रामपंचायत बिनविरोध, कर्की, वायला, राजुरे, आणि चिचोल तालुक्यातील हे गावे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या बिनविरोध निवड झाल्यास दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद, बिनविरोध झाल्याची माहिती मुक्ताईनगर तहसील विभागाकडून देण्यात आली आहे, आज माघार असल्यामुळे अजूनही तहसील विभागात काम सुरू आहे, उद्या चित्र स्पष्ट होणार

  • 04 Jan 2021 07:20 PM (IST)

    ड्रग्ज रॅकेटचं कनेक्शनची एनसीबीकडून चौकशी, टॉलिवूड अभिनेत्रीला अटक

    एनसीबीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आलेल्या टॉलिवूड अभिनेत्रीला अटक, परवा मिरारोड येथील एका हॉटेलमधून एनसीबीने ड्रग्ससह तिला ताब्यात घेतले होते. काल चौकशी कडून तिला सोडण्यात आलं होतं. मात्र आज पुन्हा चौकशीला बोलवून तिला अटक करण्यात आली आहे.

  • 04 Jan 2021 06:46 PM (IST)

    राज्यातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु : राजेश टोपे

    ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली आहे. त्यात मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदरमधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

  • 04 Jan 2021 06:37 PM (IST)

    अकोले तालुक्यात‌ 52 पैकी 6 ग्रामपंचायत बिनविरोध,  23 ग्रामपंचायतीत विखे समर्थकच आमनेसामने

    अकोले तालुक्यात‌ 52 पैकी 6 ग्रामपंचायत बिनविरोध, मोग्रस, शेरणखेल, म्हाळादेवी, उंचखडक खुर्द, वाघापूर, मनोहरपूर ग्रामपंचायती बिनविरोध, कोपरगाव तालुक्यात 29 पैकी एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही, काळे आणि कोल्हे यांची प्रतिष्ठापणाला, राहाता तालुक्यातील 25 पैकी 6 ग्रामपंचायती बिनविरोध होणार आहे. 23 ग्रामपंचायतीत विखे समर्थकच आमनेसामने, तर काही ग्रामपंचायतीत अपक्ष रिंगणात आहेत.

  • 04 Jan 2021 06:32 PM (IST)

    अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात अपयश

    अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात अपयश, 9 पैकी फक्त 2 जागा होणार बिनविरोध, तर 7 जागांवर निवडणूक होणार, अण्णा हजारे आणि आमदार निलेश लंके यांना अपयश, बैठक घेऊन बिनविरोध घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्यात अपयश आलं आहे.

  • 04 Jan 2021 06:22 PM (IST)

    एकदा तपास पूर्ण होऊ द्या, मग बघू : संजय राऊत

    मुंबई : "वर्षा राऊत ईडी कार्यालयात गेल्या असतील, त्या आल्यावर पाहू. मला नोटीस आलेली नाही. त्यामुळे मला माहिती नाही. त्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत. एकदा तपास पूर्ण होऊ द्या, मग बघू," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. "आमची ताकद आहे, हे कोण करतं याची सर्वांना कल्पना आहे. त्या वर्षा संजय राऊत आहेत. त्या चौकशीला जाण्यासाठी समर्थ आहेत," असेही राऊतांनी सांगितले.

  • 04 Jan 2021 06:11 PM (IST)

    यवतमाळच्या पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक

    यवतमाळ : यवतमाळच्या घाटंजी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले, राजाभाऊ घोगरे असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव, घोगरे यांनी 6 लाखांची लाच मागितली होती. त्यातील 1 लाख रुपये लाच स्विकारताना त्यांना अटक केली आहे. यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबतची कारवाई केली.

  • 04 Jan 2021 06:07 PM (IST)

    औरंगाबादेत तुरळक पावसाला सुरुवात, रब्बी पिकांना पुन्हा फटका

    औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात तुरळक पावसाला सुरुवात, जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण, ढगाळ वातावरणामुळे हवेतला गारवा झाला कमी, अवेळी पडलेल्या पावसामुळे रब्बी पिकांना पुन्हा फटका

  • 04 Jan 2021 06:06 PM (IST)

    भिवंडीतील बॉम्बे ऑईल कंपनीच्या टँकरला भीषण आग

    भिवंडी तालुक्यातील शेलार हद्दीत असणाऱ्या बॉम्बे ऑईल कंपनीच्या कच्च्या ऑईलच्या टँकरला भीषण आग, आगीत कंपनीसह टँकर जळून खाक, घटनास्थळी अग्निशमन  दल दाखल

  • 04 Jan 2021 06:02 PM (IST)

    शेतकरी आणि केंद्र सरकारच्या बैठकीत कोणताही तोडगा नाही, 8 जानेवारीला पुन्हा बैठक

    नवी दिल्ली : शेतकरी आणि केंद्र सरकारच्या बैठकीत कोणताही तोडगा नाही. येत्या 8 जानेवारीला पुढील बैठक होणार आहे. सरकार आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत कोणताही तोडगा नाही. MSP कायदा करण्याची मागणी शेतकरी संघटनाने केली आहे.

  • 04 Jan 2021 05:13 PM (IST)

    माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    कराड : माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर अनंतात विलीन, कराड तालुक्यातील उंडाळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पुत्र उदयसिंह पाटील यांनी दिला भडाग्नी, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

  • 04 Jan 2021 05:05 PM (IST)

    औरंगाबादऐवजी पुण्याचे नाव बदलून संभाजीनगर करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी

    औरंगाबादचं नाव बदलून संभाजी नगर करा ही राजकीय मागणी आहे. महानगरपालिका निवडणूक आल्यानंतर अशी मागणी नेहमी केली जाते, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.  तसा औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा फार संदर्भ सापडत नाही. संभाजी महाराज यांची समाधी पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याच नाव बदलून संभाजी नगर करा अशी आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले.

  • 04 Jan 2021 04:51 PM (IST)

    इतिहासात पहिल्यादाचा कुरुंदा ग्रामपंचायत बिनविरोध, राजेश पाटील इंगोले यांची बिनविरोध निवड

    हिंगोली : वसमत तालुक्यातील 17 सदस्य असलेली कुरुंदा ग्रामपंचायत बिनविरोध, इतिहासात पहिल्यादाचा कुरुंदा येथील ग्रामपंचायत बिनविरोध, वसमत विधानसभेच राजकारण कुरुंदयातून चालते. वसमत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत बिनविरोध होणार आहे. वसमत बाजार समितीचे सभापती राजेश पाटील इंगोले यांची बिनविरोध निवड होणार आहे.

  • 04 Jan 2021 04:45 PM (IST)

    नाशिक पोलिसांची कामगिरी, महिनाभरापासून बेपत्ता झालेल्या महिलांना शोधण्यात यश

    नाशिक : गेल्या महिनाभरापासून बेपत्ता झालेल्या 70 महिलांना नाशिक पोलिसांनी  शोधून परिवाराच्या स्वाधीन केलं आहे. तर एका महिन्यात 14 अल्पवयीन मुलांचा शोध लागला आहे. नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडये यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. टवाळखोरांना दणका देत मुलींची छेडछाड रोकणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

  • 04 Jan 2021 04:28 PM (IST)

    चंद्रपूरच्या भिसी ग्रामपंचायत निवडणुकीतील 66 पैकी 65 उमेदवारी अर्ज मागे

    चंद्रपूर : भिसी ग्रामपंचायत निवडणुकीतील 66 पैकी 65 उमेदवारी अर्ज मागे, भिसी ग्रामपंचायत निवडणुकीतील सर्व 66 उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उमेदवार आणि गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला होता. त्यानंतर भिसी ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा देण्याची मागणी आहे. त्यामुळे जवळपास 15 हजार मतदार असलेल्या भिसी गावाला सध्या अप्पर तालुक्याचा दर्जा मिळालेला आहे आणि राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने 29 डिसेंबरला एक GR काढून भिसीला नगर पंचायत करण्यात येत असल्याचा आदेश काढला होता. या GR प्रमाणेच निवडणूक घेण्याची स्थानिक ग्रामस्थांची  मागणी आहे.

  • 04 Jan 2021 04:25 PM (IST)

    वर्षा राऊत ईडी चौकशी | शिवसैनिकांना कलम 149 अंतर्गत नोटिसा

    शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी ईडी कार्यलयाच्या परिसरात जमू नये, यासाठी अनेक शिवसैनिकांना कलम 149 अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वर्षा राऊत या ईडी कार्यालयात उपस्थित झाल्यानंतर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात ग्रँड हॉटेल च्या बाहेर उपस्थित झाले आहेत. याच शिवसैनिकांनी ईडी कार्यालयाबाहेर बीजेपी कार्यालय नावाचा बॅनर लावला होता. त्यामुळे या शिवसैनिकांना जमावबंदीचा आदेशाच्या नोटिसा पोलिसांनी जारी केलया आहेत पोलिसांनी, पोलिसांच्या आदेशाला न जुमानता शिवसैनिक ईडी कार्यालय येथ जमले आहेत.

  • 04 Jan 2021 04:20 PM (IST)

    तृतीयपंथी अंजली पाटील यांना औरंगाबाद खंडपीठाचा दिलासा

    तृतीयपंथी अंजली पाटील यांना औरंगाबाद खंडपीठाचा दिलासा, भादली वार्ड क्रं 4 मधून निवडणूक लढण्यास तयार असल्याची दिली माहिती, लिंग निवडण्याचा अधिकार तृतीयपंथीला असतो असे दिले जजमेंट कोर्टाने दिले आहे.

  • 04 Jan 2021 04:17 PM (IST)

    मोहोळ तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतीची संख्या 11 वर

    सोलापुर - मोहोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध,  शिरापूर, पिर टाकळी,जामगाव, वाघोली, वडवळ ही गावे बिनविरोध, याआधी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतीची संख्या एकूण 11 वर गेली आहे.

  • 04 Jan 2021 04:14 PM (IST)

    मनसेकडून एसटी महामंडळाच्या बसवरील पाट्या काढल्या

    एस टी महामंडळ बसचे अमरावती-औरंगाबाद बोर्ड काढून छत्रपती संभाजीनगर असे फलक मनसेच्या वतीने लावण्यात आले.

    संभाजीनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येत्या 26 जानेवारी पर्यंत राज्य सरकारने औरंगाबाद चे 'छत्रपती संभाजीनगर' असे नामकरण करावे अशी मागणी केली आहे. राज्यभरातून मनसेच्या वतीने या मागणीला समर्थन दिले जात आहे याच पार्श्वभूमीवर आज या मागणीला आणखी बळ देण्याकरिता अमरावती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमरावती बस स्थानक येथील अमरावती-औरंगाबाद शिवशाही बसचे बोर्ड काढून छत्रपती संभाजी नगर असे फलक लावले आणि छत्रपति संभाजी महाराज्यांच्या नावाने जयघोष करण्यात आला.
  • 04 Jan 2021 04:06 PM (IST)

    मुक्ताईनगर तहसील कार्यालयाच्या आवारात ग्रामपंचायत उमेदवारांची गर्दी

    मुक्ताईनगर तहसील कार्यालयाच्या आवारात ग्रामपंचायत उमेदवारांची गर्दी, त्यामुळे या मुक्ताईनगर तहसील कार्यालयाबाहेर यात्रेसारखे स्वरुप. मुक्ताईनगर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या 15 जानेवारीला होणार आहेत. मात्र आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तहसील कार्यालयाच्या आवारात उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.  त्यामुळे याठिकाणी यात्रे सारखे स्वरूप दिसून आले.

  • 04 Jan 2021 04:03 PM (IST)

    सावळीविहिर खुर्द ग्रामपंचायतीत समझौता, राधाकृष्ण विखेंना यश

    शिर्डी : सावळीविहिर खुर्द ग्रामपंचायत बिनविरोध  करण्यास भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना यश सावळीविहिर खुर्दमध्ये समझौता, दोन्ही विखे समर्थक गटात लढत होती. मात्र या दोन्ही गटाला अडीच अडीच वर्ष सरपंच पद असा समझौता झाला आहे. यासाठी 26 अर्ज दाखल झाले होते. यातील 11 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

  • 04 Jan 2021 03:33 PM (IST)

    बारामतीच्या माळेगाव ग्रामपंचायतीच्या सर्व इच्छुकांची माघार

    माळेगाव ग्रामपंचायतीच्या सर्व इच्छुकांची माघार

    77  इच्छुकांनी उमेदवारी माघारी घेतली. माळेगावचे नगरपंचायतीत रुपांतर होणार असल्यानं उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. माळेगावमधील सर्व गटांच्या संमतीने निवडणुक न लढवण्याचा निर्णय झाला.

  • 04 Jan 2021 03:16 PM (IST)

    संजय राऊत यांच्या पत्नी ईडी कार्यालयात हजर

    मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. वर्षा राऊत नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. वर्षा राऊत यांना 5 जानेवारी रोजी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं.

  • 04 Jan 2021 03:12 PM (IST)

    जुहूमध्ये बॉलिवूड स्टार्सविरोधात आंदोलन करण्यास आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले

    मुंबईत काही शेतकरी जुहूमध्ये राहणाऱ्या बॉलिवूड स्टार्सविरोधात आंदोलन करण्यासाठी आले होते. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखले. याबाबत विचारले असता शेतकऱ्यांनी सांगितले की, देशातील शेतकरी कुडकुडणाऱ्या थंडीत दिल्लीत आंदोलन करत असताना हे अभिनेते शेतकऱ्यांच्या नावाने मतं मागून नेते बनले. हे लोक आता गायब आहेत. या लोकांना झोपेतून जागं करण्यासाठी आम्ही दिल्लीवरुन मुंबईत आलो आहोत. उद्या (मंगळवारी) अमिताभ बच्चन, सनी देओल, हेमा मालिनी, अनुपम खेर यांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहोत.

  • 04 Jan 2021 02:49 PM (IST)

    विदर्भवाद्यांचा उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराला घेराव घालण्याचा प्रयत्न

    विदर्भवाद्यांचा मोर्चा कडबी चौकात पोहचला. विदर्भवादी आक्रमक झाले असून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराला घेराव करण्यासाठी निघाले होते. दरम्यान पोलिसांनी हा मोर्चा कडबी चौकात अडवला.

  • 04 Jan 2021 02:36 PM (IST)

    नागपूर विधीमंडळ कक्षामुळे जनतेला न्याय मिळेल : अजित पवार

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विदर्भाचा सर्वांगीण विकास व्हावा, याबाबत दुमत नाही. नागपूर विधीमंडळ कक्षामुळे जनतेला न्याय मिळेल. या कक्षात जबरदस्तीने अधिकारी पाठवले तर ते मनापासून काम करणार नाही, त्यामुळे इच्छा असेल त्याच अधिकाऱ्याला नागपुरात पाठवावे.

  • 04 Jan 2021 02:31 PM (IST)

    कोरोनामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन रद्द, आता बजेट अधिवेशन नागपुरात व्हावे : उर्जामंत्री नितीन राऊत

    कोरोनामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन रद्द, आता बजेट अधिवेशन नागपुरात व्हावे, अशी मागणी उर्जामंत्री निती राऊत यांनी मांडली. ते म्हणाले की, राज्याच्या निधी वाटपाचे काम नागपुरातील अधिवेशनातून झालं तर चांगलं. तसेच राज्य सरकारच्या 12-13 विभागाची मुख्यालयं पुण्यात आहेत. आता जर मुख्यालय आलं तर नागपूरात यावं.

  • 04 Jan 2021 02:08 PM (IST)

    विदर्भ हा राज्याचा अविभाज्य घटक : उद्धव ठाकरे

    विदर्भ हा राज्याचा अविभाज्य घटक आहे.

    देशात केंद्रीकरण सरु आहे. आपण मात्र विकेंद्रीकरण करत आहोत.

    नागपुरावर अन्याय होऊ देणार नाही

    नागपुरातील विधिमंडळ कार्यालय 12 महिने सुरु राहील.

  • 04 Jan 2021 01:49 PM (IST)

    कन्नड अभिनेत्री श्वेता कुमारी आज पुन्हा एनसीबी कार्यालयात हजर

    मुंबई : एनसीबीने काल ताब्यात घेतलेली कन्नड अभिनेत्री श्वेता कुमारी आज पुन्हा एनसीबी कार्यालयात हजर झाली आहे. काल दिवसभर चौकशी झाल्यानंतर श्वेता कुमारी हिला सोडून देण्यात आले होते. काल सोडून दिल्यानंतर एनसीबीने श्वेता कुमारी हिला समन्स पाठवले होते. त्यानंतर ती आता पुन्हा एनसीबीच्या कार्यालयात हजर झाली आहे. श्वेता कुमारी मिरारोडच्या क्राऊन बिजनेस हॉटेलमध्ये ड्रग्ससहित सापडली होती.

  • 04 Jan 2021 01:46 PM (IST)

    कल्याणमध्ये गादीच्या दुकानाला आग, परिसरात गोंधळ

    ठाणे : कल्याण मधील चेतना रोड परिसरात आग लागली आहे. येथे एका गादीच्या दुकानाला आग लागली आहे. आगीचे कारण अजून अस्पष्ट असून दुकानातील सामान जळून खाक झाले आहे. अचानक आग लागल्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला आहे. मिलालेल्या माहितीनुसार येथ अग्निशमनाच्या दोना गाड्या पोहोचल्या आहेत.

  • 04 Jan 2021 01:35 PM (IST)

    वाढीव वीजबिलविरोधात विदर्भवाद्यांचे नागपुरात आंदोलन, पोलिसांचा चोख बंदोबस्त

    नागपूर : वाढीव वीजबिलविरोधात विदर्भवाद्यांनी आंदोलन पुकारलं आहे. शहरातील संविधान चौकात यावेळी जोरदार नारेबाजी करत आंदोलनाला सुरवात करण्यात आली आहे. विदर्भवाद्यांचा मोर्चा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या घराकडे निघणार असल्यामुळे पोलिसांचा येथे कडक बंदोबस्त आहे.

  • 04 Jan 2021 01:04 PM (IST)

    औरंगबादेत सत्ता आली की पहिल्या दिवशी औरंगाबादचं नाव बदलणार : चंद्रकांत पाटील

    "औरंगाबाद महानगरपालिकेने नामकरणासाठी नवा प्रस्ताव द्यावा लगणार आहे. औरंगाबादमध्ये आमची सत्ता आली की पहिल्या दिवशी आम्ही औरंगाबादचे नाव बदलणार," असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

  • 04 Jan 2021 12:43 PM (IST)

    इचलकरंजीमध्ये अवैध गुटका विक्री करणाऱ्या दुकानावर छापा

    सोलापूर : इचलकरंजी शहरातील गणेश नगर मध्ये अवैध गुटका विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकण्यात आला आहे. शहारपू पोलिसांनी हा छापा टाकला आहे. यावेळी पोलिसांनी एकाला तब्यात घेतले आहे.

  • 04 Jan 2021 12:40 PM (IST)

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील LIVE

    चंद्रकांत पाटील पुणे शहरातील समस्यांवर पत्रकारांशी संवाद साधत आहेत. ते शहरातील वेगवेगळ्या समस्यांवर काय करता येऊ शकेल, याची माहिती देत आहेत.

    >>> औरंगाबादचं नामकरण हा श्रद्धेचा विषय आहे.

    >>> संभाजी नगर हे नाव सगळ्यांना मान्य आहे.

    >>  औरंगाबादच्या नामकरणामध्ये राजकारणाचा विषय नाही.

    >  नामकरणाची कायदेशीर प्रोशिजर नव्याने करावी लागेल

    >>>भाजपची सगळ्यांनाच भीती आहे.

    >>>राज ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे.

    >>>राज जोपर्यंत परप्रांतियाबद्दल भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत युती शक्य नाही.

    >>>देश एक असताना परप्रांतियांशी फिजीकल संघर्ष योग्य नाही. त्यामुळे राज ठाकरे जोपर्यंत भूमिका बदलणार नाहीत तोपर्यंत युती शक्य नाही.

  • 04 Jan 2021 12:20 PM (IST)

    काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर दिल्लीत खलबतं, वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर शर्यतीत

    नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सध्या दिल्लीत आहेत. त्यांची दिल्लीतील काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांशी चर्चा सुरु आहे. नव्या प्रदेशाध्यक्षपदावर प्राथमिक चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदासाठी सुनील केदार, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार यांची नावं चर्चेत असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • 04 Jan 2021 11:58 AM (IST)

    महावितरणमधील भर्तीवरुन ओबीसी प्रकाश शेंडगे आक्रमक, भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी

    मुंबई : राज्यातील 87 टक्के मुलांना नोकरी नाही. नोकरी नसल्यामुळे त्यांचे लग्न जमत नाहीये. भरती प्रक्रिया थांबवू नये असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. EWS चा निर्णय झालेला आहे. तरीदेखील भरती का थांबवलेली आहे, असा सवाल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. तसेच, ऊज्यामंत्री नितीन राऊत यांनी भरती करू असं आशावासन दिलं. त्यांना ऊत्तर विचारायला गेलं की ते एसी ऑफिसमध्ये लपून बसतातं, असा प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

  • 04 Jan 2021 11:48 AM (IST)

    बोरिवलीतील वकील, रायन स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पालक आणि काही डबेवाले मनसेत

    मनसे पक्षप्रवेशासाठी कृष्णकुंजबाहेर मोठी गर्दी, बोरिवली विधानसभा क्षेत्रातील वकिलांचा मनसेत पक्षप्रवेश, क्षितीज गृपचे सदस्य मनसेत पक्षप्रवेश करणार, रायन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पालकही मनसेवासी होणार, डबेवाल्यांचे काही प्रतिनिधी मनसेत पक्षप्रवेश करतील

  • 04 Jan 2021 11:36 AM (IST)

    6 जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार, राज्य सरकारचा निर्णय

    कोल्हापूर : शिवाजी महारांजाचा शिवराज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला. त्यानंतर आता हा दिवस राज्यात शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांवर गुढी उभारुन हा दिवस साजरा केला जाणार आहे.

  • 04 Jan 2021 11:31 AM (IST)

    आपल्याला आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करायचा आहे : नरेंद्र मोदी

    नरेंद्र मोदी म्हणाले, " आपल्याला आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करायचा आहे. आपल्याला ग्राकांना समोर ठेवून उत्पादन करावे लागेल.

    भारताच्या उत्पादनांना संपूर्ण जगात मागणी वाढायला हवी. क्वालीटीवर आधारीत आपण उत्पादन करायला हवं

    नव्या वर्षात देशाला दोन लसी मिळाल्या आहेत. देशाने आत्मनिर्भर भारताच्या लक्ष्याकडे मार्गक्रमण केलं आहे.

  • 04 Jan 2021 11:26 AM (IST)

    LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी LIVE

    पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून आपण जगाचं नेतृत्व करत आहोत. प्रदूषण मापनाची साधनं, तंत्रज्ञानामध्ये भारताला यश येत आहे. : मोदी

  • 04 Jan 2021 11:22 AM (IST)

    ज्या देशाने विज्ञानाला प्राधान्य दिलं, तो देश समोर गेला आहे :मोदी

    ज्या देशाने विज्ञानाला प्राधान्य दिलं, तो देश समोर गेला आहे :मोदी

  • 04 Jan 2021 11:20 AM (IST)

    आपल्याला ग्राकांना समोर ठेवून उत्पादन करावे लागेल : मोदी

    आपल्याला आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करायचा आहे. आपल्याला ग्राकांना समोर ठेवून उत्पादन करावे लागेल. : मोदी

  • 04 Jan 2021 11:18 AM (IST)

    क्वालीटीवर आधारीत उत्पादन करायला हवं : मोदी

    भारताच्या उत्पादनांना संपूर्ण जगात मागणी वाढायला हवी. क्वालीटीवर आधारीत आपण उत्पादन करायला हवं : मोदी

  • 04 Jan 2021 11:17 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी live

    नव्या वर्षात देशाला दोन लसी मिळाल्या आहेत. देशाने आत्मनिर्भर भारताच्या लक्ष्याकडे मार्गक्रमण केलं आहे.

  • 04 Jan 2021 11:08 AM (IST)

    कोल्हार येथील प्रवरा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु, नगर-मनमाड मार्गावरील वाहतूक वळवली

    अहमदनगर : कोल्हार येथील प्रवरा नदीवरील पुलाच्या दुरूस्तीला सुरूवात झाली आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. हे काम एकूण तीन टप्प्यांत होणार असून एकूण सहा दिवस या कामासाठी लागणार आहेत. शिर्डीहून नगरकडे जाणारी सर्व वाहतूक कोल्हार गावातून बेलापूर मार्गे वळवण्यात आली आहे. तर नगरकडून संगमनेर, मालेगाव धुळेकडे जाणारी वाहतून नेवासाफाटा-कायगाव टोका-गंगापूर मार्गे वळवली आहे.

  • 04 Jan 2021 10:56 AM (IST)

    बाळासाहेब थोरात कालपासून दिल्लीत; राज्य सरकारवरील नाराजी, प्रदेशाध्यक्ष पदावर चर्चा

    मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काल (4 डिसेंबर) पासून दिल्लीत आहेत. थोरात यांची काल उशिरा राजीव सातव यांच्याशी भेट झाल्याची माहिती आहे. यावळी राज्यसरकारमधील काँग्रेसची नाराजी आणि प्रदेशाध्यक्षपद सोडण्यावरुन चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 04 Jan 2021 10:49 AM (IST)

    भाजपच्या कोअर कमिटीत माजी मंत्री विनोद तावडेंना स्थान नाही

    महापालिका निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या 5 आणि 6 जानेवारीला बैठका होणार आहेत. सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत या मेरेथॉन बैठका होणार आहेत. या बैठकींना भाजपचे प्रदेश पदाधिकारी, विविध मोर्चांचे अध्यक्ष सहभागी होतील. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकींना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाक्ष्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, भाजपच्या कोर कमिटीत माजी मंत्री विनोद तावडे यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे विविध राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

  • 04 Jan 2021 10:35 AM (IST)

    औरंगाबादचे नामांतर भाजपच्या काळात व्हायला हवे होते : संजय राऊत

    खासदार संजय राऊत म्हणाले की, औरंगाबादचे नामांतर भाजपच्या काळात व्हायला हवे होते. तसेच त्यांनी शिवसेनेला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांचा नामांतराला विरोध आहे, त्यांना प्रश्न विचारायला हवेत.

  • 04 Jan 2021 10:33 AM (IST)

    संभाजीनगर या नावाबाबत आमची भूमिका स्पष्ट : संजय राऊत

    औरंगाबादच्या नामांतराला होत असलेल्या विरोधाबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, औरंगाबादबाबतची शिवसेनेची भूमिका सर्व पक्षांना माहिती आहे. संभाजीनगर या नावाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे.

  • 04 Jan 2021 10:30 AM (IST)

    बाळासाहेबांनी औरंगाबादचं नाव 30 वर्षांपूर्वी बदललं आहे : संजय राऊत

    30 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं केलं आहे, त्यावर फक्त सही शिक्का उमटायचा आहे, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 04 Jan 2021 10:27 AM (IST)

    अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि भाऊ शौविक NCB कार्यालयात

    अभिनेत्री रिया चक्रवर्ती एनसीबी कार्यलयात, रियासोबत भाऊ शौविक आणि वडीलही उपस्थित, रिया आणि शौविक हजेरी लावण्यासाठी कार्यालयात, कोर्टाकडून जामीन देताना महिन्याच्या पहिल्या सोमवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट, रिया आणि शौविक हजेरी लावून परतले

  • 04 Jan 2021 09:25 AM (IST)

    यावर्षीचा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा ऑनलाईन पद्धतीने, जिजाऊ सृष्टीवर गर्दी न करण्याचे आवाहन

    बुलडाणा : 12 जानेवारीला होणारा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा ऑनलाइन साजरा होणार आहे. जिजाऊ भक्तांना घरीच राहून हा सोहळा साजरा करण्याचे आवाहन आवाहन करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोजन समितीने हा निर्णय घेतला आहे. समितीने जिजाऊ सृष्टीवर गर्दी न करण्याचे केले आवाहन केले आहे.

  • 04 Jan 2021 09:25 AM (IST)

    नाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, एकाच कुटुंबातील तिघे जखमी

    नाशिक : नाशिकमधील खुटवडनगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात एकाच कुटुंबातील तीन जान जखमी झाले आहेत. हा स्फोट भीषण ससल्याचं सांगितलं जात असून घरातील वस्तू, सामान यांचं मोठं नुकसान झालं आहे.

  • 04 Jan 2021 08:59 AM (IST)

    हातकणंगलेमध्ये भाजपत अंतर्गत नाराजी, महिला नगरसेविकांची उपनगराध्यक्षांवर जाहीर टीका

    कोल्हापूर : "सहा महिन्यांचा कालावधी ठरलेला असताना तब्बल दोन वर्ष झाली तरी अजून भरत लठ्‌ठे यांची उपनगराध्यक्षपदाची हौस फिटलेली नाही. महत्वाची पदे आणि प्रतिष्ठा देऊन भारतीय जनता पक्षाने त्यांचा नेहमीच सन्मान केला आहे. असे असताना भाजपच्याच महिला नगरसेवकांविरोधात त्यांची खटकेबाजी सुरू आहे. लठ्‌ठे यांनी वेळीच शहाणपणा दाखवावा; अन्यथा एक दिवस आम्हीच त्यांचा सत्तेचा माज उतरवू,'' असा घणाघात हातकणंगले येथील भाजपच्या चार महिला नगरसेविकांनी हुपरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष लठ्‌ठे यांच्यावर पत्रकार परिषदेत केला.

  • 04 Jan 2021 08:46 AM (IST)

    गंगापूर धरणातून 800 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    नाशिक : गंगापूर धरणातून पुढील 15 दिवस पाण्याचा विसर्ग सुरु राहणार आहे. सोडलेल्या पाण्यातून शेती तसेच औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे. 700 ते 800 क्यूसेक विसर्गाने हे पाणी सोडण्यात येते आहे. पुढील 15 दिवस पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • 04 Jan 2021 08:42 AM (IST)

    शिर्डीला जाताना भाविकांच्या गाडीचा अपघात, तिघांचा मृत्यू

    नाशिक : शिर्डीला जाणाऱ्या मुंबई येथील भाविकांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 3 मृत्यू झाला आहे. मुंबईहून नाशिकमार्गे शिर्डीला जात असताना ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.

  • 04 Jan 2021 08:19 AM (IST)

    साहित्य संमेलनासाठी स्थळ पाहणी, 7 जानेवारीला सदस्य समिती नाशिकमध्ये येणार

    नाशिक : अखिल भारतीय साहित्य संमलेनासाठी येत्या 7 जानेवारी रोजी स्थळ निवडण्यात येणार आहे. त्यासाठी निवड समिती सदस्य नाशिकमध्ये येणार आहेत. दरम्यान, कोरोनाकाळात शासनाकडून संमेलनाला संमती मिळण्याबाबतदेखील संभ्रम आहे. तसेच, नाशिकमध्ये संमेलन घेण्याबाबत सदस्यांमध्येच दोन मत प्रवाह आहेत.

  • 04 Jan 2021 08:03 AM (IST)

    कोल्हापुरात सॅनिटायझर बाटली पेटल्याने स्फोट, महिलेचा मृत्यू

    कोल्हापूर : सॅनिटायझर बाटली पेटल्याने झालेल्या स्फोटात एका महिलेचा महिलेचा मृत्यू झाला आहे. कागल तालुक्यातील बोरवडे येथे ही घटना घडली. सुनीता काशीद असं मृत महिलेचं नाव आहे. 27 डिसेंबर रोजी स्फोटाची घटना घडली होती. त्यानंतर महिलेवर उपचार सुरु होते. त्यानंतर या महिलेचा मृत्यू झाला.

  • 04 Jan 2021 08:00 AM (IST)

    सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ, ग्राहकांना फटका

    मुंबई : सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सोयाबीन तेलाचे दर 135 वर येऊन ठेपले आहेत. दोन महिन्यात सोयाबीन तेलाच्या दरात किलोमागे 35 रुपयांनी वाढ झाली आहे. सूर्यफुलाच्या तेलाचे दर 145 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. यंदा देशात सोयाबीन आणि पाम कच्च्या तेलाची 60 टक्के आयात करण्यात आली आहे. त्यामुळे तेलाच्या किमती भडकल्या आहेत.

  • 04 Jan 2021 07:43 AM (IST)

    कणकवली बाजारपेठेत आगीचे तांडव, 2 दुकाने जळून खाक

    सिंधुदुर्ग : कणकवली बाजारपेठेतील झेंडा चौकातील कोल्ड्रिंक्सचे आणि किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. पहाटे तीनच्या सुमारास लागली ही आग लागली. या दुकानाच्या शेजारील घरालाही आगीची झळ लागली आहे. दरम्यान अग्नीशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत लाखोंची हानी झाल्याचे सांगण्यात येत असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही.

  • 04 Jan 2021 07:32 AM (IST)

    मीरा भाईंदरमधील शिवसेनेचे नेते मेंनेंजीस सातन याचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

    ठाणे : मीरा भाईंदरचे काशीमिरा हायवे भागातील शिवसेनेचे मेंनेंजीस सातन यांनी शिवसेनेला राम राम ठोकत आपल्या शेकडो समर्थकांसोबत कांग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र कांग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. मीरा रोडच्या नया नगर काँग्रेस कार्यालयात कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होत. असून कांग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 04 Jan 2021 07:27 AM (IST)

    औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न पेटला, आठवलेंचा नामांतराला विरोध

    मुंबई : औरंगाबाद शहराच्या नामांतराचा वात आता चांगलाच पेटला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी औरंगाबादचं संभाजीनगर करण्यास विरोध दर्शविला आहे. रिपब्लिकन पक्षाचा औरंगाबादच्या नामांतराला तीव्र विरोध राहील अशी भूमिका आठवले यांनी मांडली आहे.

  • 04 Jan 2021 07:00 AM (IST)

    भारतीय संघ आज सिडनीत, तूर्तास चौथी कसोटी ब्रिस्बेनलाच

    नवी दिल्ली : चौथ्या कसोटी सामन्यासाठी ब्रिस्बेनला न जाण्याचा निर्णय भारतीय संघानं घेतल्याचं वृत्त आहे. कारण, ब्रिस्बेनमधील क्वॉरन्टाइन नियम अतिशय कडक आहेत. भारतीय संघ दोन महिन्यापासून जर नियम शिथिल करणार नसाल, तर ब्रेस्बेनला आमचा संघ पोहचणार नाही, असं बीसीसीआयनं स्पष्ट केल्याचं वृत्त आहे.

  • 04 Jan 2021 06:56 AM (IST)

    ईडीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार?; राऊतांनी केला खुलासा

    मुंबई : येत्या 5 जानेवारीला शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यामुळे येत्या 5 जानेवारीला शिवसेना ईडीविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा चर्चा होत्या. त्यांनतर संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावत या सर्व बातम्या चुकीच्या असल्याचं सांगितलं. जेव्हा उतरायचं तेव्हा उतरु असं ते म्हणाले.

  • 04 Jan 2021 06:52 AM (IST)

    चंद्रकांत पाटील पुणे आयुक्तांची भेट घेणार, विविध समस्यांवर होणार चर्चा

    पुणे : शहरातील तसेच कोथरूड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांना घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील आणि पुणे मनपा आयुक्त यांच्यात सकाळी 11 वाजता बैठक होईल. त्यानंतर 12 वाजता ते पत्रकारांशी संवाद साधतील.

  • 04 Jan 2021 06:47 AM (IST)

    पुणे, नाशिक, औरंगाबादेत आजपासून इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या शाळा सुरु

    पुणे : पुणे, नाशिक, औरंगाबादेत आजपासून इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या शाळा सुरु होणार आहेत. तर पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्य़ास अद्याप प्रशासनाने परवानगी दिली नाही. पुणे, नाशिक आणि औरंगाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरु होत आहेत.

  • 04 Jan 2021 06:42 AM (IST)

    राज्यात 6 ते 7 जानेवारीला कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज

    मुंबई : थंडीची चाहूल लागलेली असतानाच रात्री मुंबई उपनगरात काही भागांत रिमझिम पावसानं हजेरी लावली. राज्यात 6 ते 7 जानेवारीला कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच तापमानातही घट होण्याचा अंदाज आहे.

  • 04 Jan 2021 06:34 AM (IST)

    माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन

    सातारा : काँग्रेसच्या विचारधारेशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिलेले माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर याचं आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षे वयाचे होते. पुरोगामी विचाराचा नेता म्हणून विलासकाका उंडाळकर यांची महाराष्ट्रभर ओळख होती. सलग 35 वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले.

Published On - Jan 05,2021 6:25 AM

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.