Andandrao Adsul Live : ईडीने अ्डसुळ यांना अनेक समन्स पाठवली, ते गेले नाहीत, अटक होताच आजारी पडले: किरीट सोमय्या

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 27, 2021 | 6:35 PM

शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Andandrao Adsul ) यांना ईडीने (ED) सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील (City Co-operative Bank) 900 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. 

Andandrao Adsul Live : ईडीने अ्डसुळ यांना अनेक समन्स पाठवली, ते गेले नाहीत, अटक होताच आजारी पडले: किरीट सोमय्या
आनंदराव अडसूळ


मुंबई : शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Andandrao Adsul ) यांना ईडीने (ED) सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील (City Co-operative Bank) 900 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ईडीनं अद्याप ताब्यात घेतल्याच्या वृत्ताची पुष्टी केलेली नाही.  सिटी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  भाजपचे सहयोगी आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करत आहे. ईडीचे अधिकारी आज सकाळी  6 वाजता अडसूळ यांच्या घरी पोहोचल्याची माहिती मिळाली होती.आनंदराव अडसूळ यांच्याबरोबर त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनाही ईडीने समन्स पाठवल्याची माहिती आहे.

आज सकाळी नेमकं काय घडलं?

ईडीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरावर सकाळी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची टीम सकाळी सहाच्या सुमारास आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली पूर्व कदमगिरी घरावर पोहोचली. 4 तासांहून अधिक काळ आनंदराव अडसूळ यांची चौकशी करण्यात येत होती. ईडीचे चार अधिकारी आनंदराव अडसूळ यांच्या घरी पोहोचले होते. चौकशी दरम्यान आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली असून गोरेगाव येथील रुग्णालयात नेण्यात असल्याची माहिती आहे.

900 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप

आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

आनंद अडसूळ यांच्यावर कोणते आरोप?

आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयातही ते गेले होते. “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 9000 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप रवी राणांनी केला होता. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ 1 हजार एवढी रक्कम मिळत आहे, असंही रवी राणा म्हणाले होते.

ईडी अडसूळ यांच्यावर कारवाई करेल,राणांना विश्वास

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करणार का ?, असा सवाल रवी राणांनी विचारला आहे. सरकार आनंदराव अडसूळ यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अडसूळ यांची केस दाबण्याचा प्रयत्न होत होता, आज ईडीने त्यांना समन्स पाठवलं आहे. ईडी त्यांची चौकशी करेल आणि कारवाई देखील होईल, अशी अपेक्षा आहे, असं रवी राणा म्हणाले.

कोण आहेत आनंदराव अडसूळ?

– आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार
– 1996 पासून पाच वेळा खासदारकी
– शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांमध्ये अडसूळांचा समावेश
– गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांकडून पराभवाचा धक्का

इतर बातम्या: 

आनंदराव अडसूळ ईडीच्या ताब्यात, तब्येत बिघडल्याने अॅम्ब्युलन्स बोलावली!

शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात?, आनंदराव अडसूळ ED कार्यालयात हजर

आनंदराव अडसूळांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, सोमय्यांची ED-RBI कडे चौकशीची मागणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 27 Sep 2021 01:48 PM (IST)

  ईडीने अ्डसुळ यांना अनेक समन्स पाठवली, ते गेले नाहीत, अटक होताच आजारी पडले: किरीट सोमय्या

  ईडीने अ्डसुळ यांना अनेक समन्स पाठवले, पण ते जात नाहीत… अटक होताच आजारी पडले… सीटी बॅंकेत करोडो रुपये अडकले, अडसुळ, ऊद्धव ठाकरे कुणीच ऊत्तर देत नाही… अडसुळ पिता पुत्र यांनी कोटी रुपये खाजगी खात्यात वळवले… बाप बेटे मजा मारत आहेत… कर्नाळा बॅंक प्रकरणा कोणतीच कारवाई नाही… शेवटी इडीला कारवाई करावी लागली.. याचं स्वागत करतो…, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले.

 • 27 Sep 2021 12:23 PM (IST)

  ईडी हे भाजपचं उपकार्यालाय, अरविंद सावंत यांचं टीकास्त्र

  यंत्रणांचा राजकीय वापर सुरु आहे. ईडीचा राजकीय वापर करण्यात येत आहे. ईडी हे भाजपचं उपकार्यालय आहे, असं टीकास्त्र शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सोडलं आहे. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना न्याय मिळाला पाहिजे. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेसोबत इतर बँकांचं बोला. शिवसेनेला बदनाम करण्याचं कारस्थान करण्यात येत आहे. अनिल परब हे ईडीच्या चौकशीला सामोरं जातील त्यांच्यात ती क्षमता आहे. बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात देशातील भ्रष्टाचाराचा कळस आहे तिथं त्यांची सत्ता आहे त्यामुळं तिथं कारवाई होत नाही,  असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थ आहेत. रवी राणा यांच्यावर आरोप आहेत. रवी राणानं बीएसएनएलची जमीन हडप केली आहे. नवनीत राणा या सुप्रीम कोर्टात केस पराभूत होत आल्यात त्यामुळे  ही कारवाई करण्यात येत आहेत.  आनंदराव अडसूळ हा छातीवर वार घेतलेला माणूस आहे. सोमय्यांनी यांनी यापूर्वी कोकणातल्या नेत्यावर केलेल्या आरोपाचं काय झालं, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला.

 • 27 Sep 2021 12:06 PM (IST)

  आनंदराव अडसूळ यांच्या अमरावती नवसारी येथील घराला कुलूप

  मुंबई येथील सिटी को ऑप बँक घोटाळा प्रकरण अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अमरावती नवसारी येथील घरावरही ईडीचा छापा पडल्याची चर्चा मात्र प्रत्यक्षात छापा पडला नसल्याचं स्पष्ट झालेल्या यांच्या घराला कुलूप लागलेले आहे.

 • 27 Sep 2021 11:21 AM (IST)

  आनंदराव अडसुळांना गोरेगावच्या रुग्णालयात दाखल केलं

 • 27 Sep 2021 11:13 AM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आनंदराव अडसूळ यांना वाचवतात: रवी राणा

  मी कोणत्याही पक्षाचा आमदार नाही, अपक्ष आमदार आहे. सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या मुंबईत 13 ते 14 शाखा आहेत. बँक बुडाल्याचं खातेदारांना सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आनंदराव अडसूळ यांना वाचवत आहेत. मुख्यमंत्र्यांचा त्यांना पूर्ण आशीर्वाद आहे. मराठी भाषिकांची फसवणूक करण्यात येत असल्याचं रवी राणा म्हणाले आहेत. आनंदराव अडसूळ यांना अटक झाली पाहिजे, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

 • 27 Sep 2021 11:09 AM (IST)

  आनंदराव अडसूळ गोरेगावच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल

  ईडीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरावर सकाळी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची टीम सकाळी सहाच्या सुमारास आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली पूर्व कदमगिरी घरावर पोहोचली. 4 तासांहून अधिक काळ आनंदराव अडसूळ यांची चौकशी करण्यात येत होती. ईडीचे चार अधिकारी आनंदराव अडसूळ यांच्या घरी पोहोचले होते. चौकशी दरम्यान आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली असून गोरेगाव येथील लाईफलाईन रुग्णालयात नेण्यात असल्याची माहिती आहे.

Published On - Sep 27,2021 11:02 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI