AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CORONA | बीकेसीत 1000, महालक्ष्मीजवळ 600 बेड्स, मुंबईत कोरोना उपचारांसाठी कुठे किती सुविधा?

मुंबईत कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी सरकारकडून जम्बो सुविधांची निर्मिती केली जात आहे. (Mumbai Corona Quarantine Facility) 

CORONA | बीकेसीत 1000, महालक्ष्मीजवळ 600 बेड्स, मुंबईत कोरोना उपचारांसाठी कुठे किती सुविधा?
| Updated on: May 26, 2020 | 12:19 AM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 52 हजारावर (Mumbai Corona Quarantine Facility) पोहोचला आहे. दिवसभरात राज्यात नवीन 2 हजार 436 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे हा आकडा 52 हजार 667 वर पोहोचला आहे. तर महाराष्ट्राचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील बाधितांचा आकडा हा 31 हजारांच्या पार गेला आहे.

मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 430 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता 31 हजार 972 वर पोहोचली आहे. तर मुंबईत दिवसभरात 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 1026 झाली आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण हे सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी सरकारकडून जम्बो सुविधांची निर्मिती केली जात आहे. मुंबईत NSCI, गोरेगाव, महालक्ष्मी या ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी सोय करण्यात आली आहे.

मुंबई मनपातर्फे दररोज 7 लाख अन्नाची पाकिटे वाटप करण्यात आली आहे. मुंबईत 360 फिव्हर क्लिनिक, 1996 हेल्पलाईनवर 65 हजार कॉल्स आतापर्यंत केले आहेत.

कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

1. वांद्रे कुर्ला संकुलात एमएमआरडीने 15 दिवसांत देशातील पहिले ओपन हॉस्पिटल उभारले आहे. यात 1000 बेड्सची जम्बो सुविधा तसेच 200 बेड्सची आयसीयू सुविधाही देण्यात आली आहे.

2. महालक्ष्मी येथे कोरोना केअर सेंटरचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. यात 600 बेड्सची सुविधा असून यात 125 बेड हे आयसीयू वॉर्डसाठी असतील. कोविड 19 च्या मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे ठेवले जाईल.

3. नेस्को गोरेगाव येथे 535 बेड्सची सुविधा असलेली जम्बो सुविधा कोरोना रुग्णांसाठी करण्यात आली आहे.

4. रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे 7000 पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेली डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल पुढील 2 आठवड्यात येणार आहे.

5. येत्या 31 मे पर्यंत एसएससीआय वरळी, महालक्ष्मी, बांद्रा, नेसको, गोरेगाव अशा मिळून 2475 खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेत आहेत.

6. प्रत्येक वॉर्डमध्ये किमान 100 खाटा आणि 20 आयसीयू खाटा असलेल्या रुग्णालयांची सुविधा ताब्यात घेतली.

7. स्वत:च्या विलगीकरणाची सोय नसलेल्या कोविड रुग्णांसाठी 30 हजार खाटा क्षमतेच्या कोविड केअर सेंटरची व्यवस्था

8. मुंबईतील खाटांचे नियोजन आता संगणकाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी खाटा उपलब्ध आहेत ते लगेच कळेल. खाटांचा डाटा रिअल टाईम डॅशबोर्डमध्ये प्रत्येक बेडला युनिक आयडी. डिस्चार्ज धोरणाची कडक अंमलबजावणी.

9. रुग्णालयांची स्वच्छता, जेवण व इतर अनुषंगिक बाबींतून डीन यांची जबाबदारी कमी केली. आरोग्य उपचारांवर अधिक लक्ष देता येणे शक्य.

10. रुग्णवाहिका 100 वरुन 450 वर. या सेवेसाठी देखील मोबाईल अॅप.

11. केईएम, नायर, सायन, जेजे, सेंट जॉर्ज आणि बीएमसी रुग्णालये यांची जबाबदारी 5 आयएएस अधिकाऱ्यांकडे. प्रत्येक रुग्णालयात वॉर रुम, सीसीटीव्ही असणार

(Mumbai Corona Quarantine Facility)

संबंधित बातम्या :

कोकणात कोरोनाचा कहर, रत्नागिरीत 156 तर सिंधुदुर्गात 17 रुग्ण

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटमध्ये रुग्णवाढीचा वेग मंदावला, कोणत्या वॉर्डात किती?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.